पाऊस सुरू होऊन आठवडा झाला पण त्यात त्याने कोसळायचा मुहुर्त शनिवार रविवार विकांतालाच साधल्याने त्याच्याशी आमनेसामने असे दोन हात झालेच नाहीत,
पण आज पाऊसाने दिवसभर तुरळक संततधार काय लावली संध्याकाळी घरी पोहोचायचे वांधे झाले. नाही हो, छत्री बरोबर होती पण पटरीवरची ट्रेन रखडली होती. कुठून पकडली आणि कुठे पोहोचायचे होते, तेवढे विचारू नका. पण सुरूवातीचा ८० टक्के प्रवासाला जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ शिल्लक २० टक्के कापायला लागला.
आता ज्यांना हे सवयीचे झालेय ते इथेच धागा सोडून पसार होतील. पण अरे थांबा. आता चालायचंच, म्हणत कधीपर्यंत हे चालवून घेणार. मध्यंतरी सरकारने लोकल ट्रेनच्या भाड्यात वाढ केली होती. थेट दुप्पट केले होते. तेव्हा सारे कसे पोटावर पाय पडल्यासारखे कळवळून उठले होते. मग तसे रोज गळा आवळला जाताना का नाही चवताळून उठत. रोज श्वास घुसमटला जाताना का नाही एखाद्या दिवशी धुमसून बाहेर पडत. स्साला काय लाईफ आहे आपली! वेळेला काही किंमत आहे की नाही आपल्या!.. आहे ना, ओवरटाईमचे तासाला तीनशे रुपये मिळतात! आज पाऊण तास एक्स्ट्राची ट्रेनमध्ये झक मारली. तीच जर ऑफिसच्या एसीमध्ये मारली असती तर सव्वादोनशे रुपये सुटले असते. थोडक्यात सव्वादोनशे रुपयांचे नुकसान झाले.. अन भरपाई शून्य!
तरी बरेय आपला फर्स्टक्लास आहे. उलट्या दिशेच्या ट्रेनला गर्दी कमी आहे. बसल्याजागी थोडे पाय ऐसपैस पसरता येताहेत. पण समोरच्या ट्रॅकवर रखडलेली ट्रेन. तिचा सेकंडक्लासचा डब्बा. आणि दारावर लटकलेले स्त्री-पुरुष!.. हो, पुरुष आणि स्त्री सुद्धा! काय बोलणार त्यांना. या ताई, तुम्ही बसा. मी उठतो. पण आमची ट्रेन तर उलट दिशेला चाललीय. मग तुम्ही तुमच्या घरी कश्या पोहचाल. आपले काय, घरी तासभर लेट पोहोचलो तरी फिकीर नॉट. आयुष्यातील फुकट जाणारा पाऊण तास, बसल्याजागी मोबाईलवर सत्कारणी लाऊ. स्टेशनला ऊतरून वडापाव खात घरी जाऊ. पण आपली चिल्लीपिल्ली वाट बघत असतील. आज आपला कूकर उशीरा लागला तर त्यांनाही जेवण लेट मिळेल. ऑफिसचा लेटमार्क जास्तीचे थांबून भरून काढाल, हा कसा भराल.
काही हरकत नाही. थोडे ऊशीरा पोहोचाल. पण जरा जपून जा. आपला जीव जास्त मोलाचा. थोडी रग लागली हाताला म्हणून दांडा सोडू नका.
बुलेट ट्रेन येतेय आता मुंबईत.. मुंबई ते गुजरात. १८ हजार कोटी! काल पेपरात वाचले. एवढा खर्चा करताहेत, तर कोणाचे तरी भले होणारच असेल. कोणाचे तरी अच्छे दिन येणारच असतील. पण त्यातून मिळणारा थोडा महसूल ईथेही वापरा. ज्या मुंबईतून ही बुलेट ट्रेन सुरू करत आहात त्या लोकल मुंबईकरांचा प्रवासही थोडा सुसह्य करा. अडकलेल्या ट्रेनमध्ये तळमळणार्या आत्म्याची ही ईच्छाच समजा. सुखकर नाही, बस्स सुसह्य.
या वरच्या पॅराग्राफमध्ये राजकारण शोधायला जाऊ नका. लेखातही शुद्धलेखनाच्या चुका शोधायला जाऊ नका. त्या होतच राहतात. मोबाईलवर लिहीत असल्याने जरा जास्तच असतील. तरीही छोटी छोटी वाक्ये. सोपे सोपे शब्द. छोट्या छोट्याश्याच तुकड्यातील, साधे सोपे आयुष्य. पाऊण तास असा वसूल केला.. चार ओळी खरडून.. मन मोकळे करून.. मूड चांगला लागला असता तर पावसावरच्या चारोळ्याच खरडल्या असत्या.. पण काही हरकत नाही, बेटर लक नेक्स्ट टाईम.. उद्या पुन्हा अडकली ट्रेन तर पुन्हा भेटूया.. तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज.. ऋन्मेष.
दिनेश्क, हंस कुणाची नकल करत
दिनेश्क,
हंस कुणाची नकल करत नाही अप्पाकाका >> म्हणूनच मी तुमची नक्कल करत नाही.
असे प्रकार होतच नाहीत हे अनेकांनी लिहूनही वरची लांबलचक पोस्ट कशाला ते समजलं नाही. पण काहीही छापणे हा सदस्यांचा हक्कच असल्याने त्यावर सविस्तर स्पष्टीकरण नाही दिलेत तरी चालेल.
धन्यवाद
मुंबईकरांचे अच्छे दिन केव्हा
मुंबईकरांचे अच्छे दिन केव्हा येणार ..
मुळ विषया हा आहे वाटत.
भाईंदरचे नाव गुजरातीमधे
भाईंदरचे नाव गुजरातीमधे लिहिलेले हे मी स्वतः प्रवास करताना पाहिले होते. त्यासाठी मला कुणाच्या सर्टीफिकेट्सची आवश्यकता नाही. नंतर बहुतेक त्यात बदल केला असावा. अशा गोष्टींसाठी वरील पोस्ट होती
धन्यवाद
काहीही छापणे हा सदस्यांचा
काहीही छापणे हा सदस्यांचा हक्कच आहेच आणि असायलायच हवा
अच्छे दिन येतील कि, जरा ५-१० वर्षे थांबाल कि नाही. तरी बरे मुंबईमध्ये हातात घेतलेले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ब-यापैकी वेळेत होतात. इतर शहरात फक्त चर्चा होते वर्षानुवर्षे... जसे कि पुण्याची मेट्रो
गुजरातीमधे स्थानकांची नावे हा
गुजरातीमधे स्थानकांची नावे हा प्रकार जवळजवळ २० पेक्षा अधिक वर्षांपासून मी बघतो आहे. त्यात नवीन काहीही नाही.
कृपया. धन्यवाद.
कशाला खोट बोलत आहात ? असे
कशाला खोट बोलत आहात ? असे असते तर उल्हासनगर नामक स्थानकाचे नाव सिंधीमधे दिसुन आले असते. तिथे सिंधी प्राबल्य जास्त आहे. घाटकोपर स्थानकाचे नाव हिंदी मराठी इंग्रजी मधुनच आहे.
हा प्रकार आताच सुरु झालेला आहे.
धन्यवाद
तुम्ही मध्य रेल्वे बाबत म्हणत
तुम्ही मध्य रेल्वे बाबत म्हणत असाल. पश्चिम रेल्वेवर जे बघितले आहे तेच सांगितले. पश्चिम रेल्वेवर अनेक स्थानकांची नावे गुजरातीतून अगदी २०+ वर्ष आहेत. आता सिंधीतून नावे का नाहीत हे तुम्ही सिंधी बांधवांनाच जाऊन विचारा.
कृपया. धन्यवाद.
वेस्टर्न लाईनला गुजरातीमध्ये
वेस्टर्न लाईनला गुजरातीमध्ये स्थानकांची नावे आहेत ती गेली कित्येक दशके!!! गुजरात बॉर्डर जवळ असल्यानं देवनागरी आणि गुजरातीमध्ये नावे लिहिलेली आहेत. रेल्वेचे त्यासाठी नियम आहेत त्यानुसारच सीमाभागात नावे लिहिली जातात. कर्नाटका-महाराष्ट्र बॉर्डरवर देखील काही स्थानकांची नावे कानडी आणि देवनागरी लिपीमध्ये आहेत. गोव्यामध्ये गावांची नावे कोकणी आणी मराठी अशी दोन्ही पद्धतीने देवनागरीमध्ये लिहिलेली दिसतील.
धन्यवाद नंदिनी. - - - - -
धन्यवाद नंदिनी.
- - - - - - - - - - - - - - - - - - - -
दिनेश्क,
वरचा प्रतिसाद वाचावा.
कृपया, धन्यवाद.
पश्चिम रेल्वेवर अनेक
पश्चिम रेल्वेवर अनेक स्थानकांची नावे गुजरातीतून अगदी २०+ वर्ष आहेत.>>> क्वाय??????? कुठल्या मुंबई आणि लोकल बद्दल बोलत आहात तुम्ही? आजच ऐतेय मी हे. ऐतेनच.
सस्मित, मी जन्माने मुंबईकर
सस्मित, मी जन्माने मुंबईकर असल्याने व अनेक वर्ष रेल्वेने प्रवास केल्याने मला नीट माहीत आहे. वरचा नंदिनी यांचा प्रतिसादही अवश्य वाचावा.
धन्यवाद, कृपया.
धाग्याने शंभरी पार
धाग्याने शंभरी पार केल्याबद्दल कुमार ऋन्मेषचे अभिनंदन!!!
नंदीनी सीमे जवळची नावे दोन्ही
नंदीनी सीमे जवळची नावे दोन्ही भाषेत असतात मी फक्त लोकल ट्रेन विषयी बोलत आहे. एक्सप्रेस ट्रेन ने प्रवास केल्यावर गुजरात जवळ येताना स्टेशनची नावे त्याभाषेत असतात तोच प्रकार कर्नाटक सीमेजवळ देखील आहे.
लोकल ट्रेनचेच मी पण बोलत आहे.
लोकल ट्रेनचेच मी पण बोलत आहे. मी जन्माने मुंबईकर असल्याने व अनेक वर्ष रेल्वेने प्रवास केल्याने मला नीट माहीत आहे. वेस्टर्न लाइनवर हा प्रकार गेली अनेक वर्ष आहे.
धन्यवाद, कृपया.
भाईंदर हे स्थानक गेल्या
भाईंदर हे स्थानक गेल्या वर्षापासुन गुजरात सीमेजवळ येते ही माहीती नविन कळली.
नंतर काही दिवसांनी प्रसिध्दी मिळाल्यानंतर नाव बदलून मराठी/हिंदी मधे लिहिले गेले.
उगाच सरकारच्या लांगुलचालन
उगाच सरकारच्या लांगुलचालन करण्याच्या नीतीला अप्पाकाका खरे ठरवत आहे जे ढळढळीत खोटे आहे.
भाईंदर स्थानकावर विरोध झाल्यानंतर नाव बदलण्याचा घाट बदलला गेला . अन्यथा आज सगळीकडे गुजराती मधे देखील नावे दिसली असती. २० वर्ष वगैरे बोलने सोडून द्या. जो प्रकार फक्त सीमेजवळ होतो तो आतल्या भागात होत नाही . आणि होउ पण नये. मुंबई मधे मराठी आणि हिंदी इंग्रजी यांचेच बोर्ड असावे.
धन्यवाद
अहो मी पण जन्माने मुंबईकरच
अहो मी पण जन्माने मुंबईकरच आहे. जन्मानेच नव्हे तर जन्मापासुन वास्तव्य पण मुंबईतच आहे.
मी लोकल ट्रेनबद्दल बोलत होते.
सीमा बीमा काही माहीती नाही.
सीमा बीमा काही माहीती नाही. सो माझा पास.
सरकारचा काय संबंध? आणि पश्चिम
सरकारचा काय संबंध? आणि पश्चिम रेल्वेच्या अनेक उपनगरी स्थानकांची नावे गुजराती मधे अनेक वर्ष नावे आहेत हे सत्य काही त्यामुळे बदलत नाही. बाकी, इंग्रजीपेक्षा गुजराती ही भारतीय भाषा असल्याने बोर्ड मराठी व दुसरी लोकल प्रबळ भाषेत असावेत. कारण मुंबई ही सगळ्या भारताची आहे.
कृपया, धन्यवाद.
मी लोकल ट्रेनबद्दल बोलत
मी लोकल ट्रेनबद्दल बोलत होते.>> सस्मित, वरची कमेंट वाचा. This is a very old thing on many Western Railway Mumbai Local Stations.
धन्यवाद, कृपया.
कशाला खोट बोलत आहात ? असे
कशाला खोट बोलत आहात ? असे असते तर उल्हासनगर नामक स्थानकाचे नाव सिंधीमधे दिसुन आले असते. तिथे सिंधी प्राबल्य जास्त आहे. घाटकोपर स्थानकाचे नाव हिंदी मराठी इंग्रजी मधुनच आहे.
हा प्रकार आताच सुरु झालेला आहे.
नंदीनी सीमे जवळची नावे दोन्ही भाषेत असतात मी फक्त लोकल ट्रेन विषयी बोलत आहे>>> '
म्हणजे तुमचे म्हणने आहे की मे २०१४ पूर्वी भाईंदर स्टेशनला गुजरातीमध्ये नाव नव्हते, आणि आता आहे. हेच म्हणायचं आहे का तुम्हाला?
सॉरी टू से, पण मी २००५-२००६ या दरम्यान भाईंदर स्टेशलनला गुजरातीमध्ये नाव पाहिलेले आहे. त्या भागात गुजराती लोक जास्त आहेत म्हणून नव्हे तर गुजरात सीमेला जवळ आहे म्हणून- पूर्वी त्या भागात आज आहेत इतकी स्टेशन्स नव्हती तेव्हापसून केलेला नियम आहे !! रेल्वेचे सीमाभागात नावं लिहायच काही नियम आहेत, ते एकदा वाचून घ्या.
लोकल असो वा एस्प्रेस, रेल्वेला नियम सारखेच लागू होतात.
धाग्याने शंभरी पार
धाग्याने शंभरी पार केल्याबद्दल कुमार ऋन्मेषचे अभिनंदन!!!
धन्यवाद नंदिनी
धन्यवाद नंदिनी
हा धागा कितीवेळा आपला ट्रॅक
हा धागा कितीवेळा आपला ट्रॅक बदलेल, काय माहीत.
हा खरे तर शिवसेनेचा आवडता
हा खरे तर शिवसेनेचा आवडता विषय पण ते गुजरात्यांच्या गळ्यात गळा घालुन बसलेत आणि मा बो कर विनाकारन भांडताहेत.
आधी भाईंदर स्टेशनवर ३ भाषेत
आधी भाईंदर स्टेशनवर ३ भाषेत नाव होती गेल्या जुन मधे बदल केले त्यानंतर विरोध झाल्यामुळे परत नाव इंग्रजी मराठी हिंदी मधे लिहिले गेले.
नियम असतील म्हणून परत बदल केले नंदीनी आज भाईंदर स्टेशनवर जाउन बघा कुठल्या भाषेत नावे आहे? नंतर बोला
सुरेख, कुणीही भांडत नाहीये
सुरेख, कुणीही भांडत नाहीये इथे.
हा खरे तर शिवसेनेचा आवडता
हा खरे तर शिवसेनेचा आवडता विषय पण ते गुजरात्यांच्या गळ्यात गळा घालुन बसलेत.
<<
<<
कोण गुजराती आणि कुठे बसलेत?
(No subject)
(No subject)
Pages