फणसाचे लोणचे (अगदी सोप्पे)

Submitted by सायु on 12 June, 2015 - 06:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी बारिक चिरलेला फणस
दीड वाटी कीसलेली कैरी (साल सोलुन)
दीड वाटी तेल
मीठ अंदाजे (५ ते ६ चहाचे चमचे)
केप्रे आंबा लोणचे मसाला १ वाटी

क्रमवार पाककृती: 

सर्व प्रथम फणसाचे काप धुवुन पुसुन बारिक चिरुन घ्या. कुकर मधे stand ठेवुन त्यावर एका बंद डब्यात हे काप दोन शिटया होईस्तोवर वाफवुन घ्या. हे काप जरा वेळ एका सुती कापडावर गार होऊ द्या..

कुकर सुरु असतांना कैरीची पाठ सोलुन कीसुन घ्या, एका पसरट टोपात/ परातीत केप्रे लो. मसाला आणि मिठ एकत्र करा. कढईत तेल तापवायला ठेवा, चांगले तापले की एक पळी भर तेल या मसाल्यावर सोडा.. व्यवस्थीत कालवुन घ्या.. गार झाले की त्यात आधी कीसलेली कैरी आणि मग फणसाचे तुकडे घालुन पुन्हा नीट कालवुन घ्या..

उरलेलं तेल थंड झाल्यावर लोणच्यात घाला.. झाल लोणच तय्यार.. आता हे लोणच स्वच्छ हवा बंद बरणीत भरुन ठेवा.. ३ ते ४ महिने टिकतं..

अधिक टिपा: 

फणस उकडतांना पाणी आत शिरायला नको.. बुरशी येऊ शकते..

माहितीचा स्रोत: 
धाकटी बहिण दिपा नगरकर
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ताजे ताजे लोणचे आजच केले..:)

f2.jpgf1.jpg

दोन कैर्‍या जरा नरम वाटल्या म्हणुन त्याचा तक्कु केला... Happy
takku.jpg

व्वा! तोंपासु ... माझ्या मैत्रीणीची आई फणस वाफवल्यावर तळून घेते पाण्याचा अंश राहू नये म्हणून... वर्षभर लोणचं टिकत... आठवलं .. मागच्यावर्षी खाल्लय हे लोणचं ... अजूनही चव जीभेवर रेंगाळतेय...

छान, भाजीचा फणस वापरला असेल ना ? याचे कारवारी पद्धतीने पण छान लोणचे होते ( मिठाचे पाणी उकळून त्या पाण्यात लाल मिरच्या वाटून लावतात. )

वा! सायली मस्त रेसिपी.
सट्यांड हे काय असं विचारणार होते पण पडला प्रकाश. Proud

सायली, कारवार मधे अशी बरीच लोणची करतात. मिठाचे पाणी उकळून घेतात मग त्यात लाल मिरची वाटतात. मोहरी वगैरे पण घालतात पण तेल नसले तरी चालते. अशी लोणची पाण्याचा वापर केलेला असला तरी खुप टिकतात. खराब होत नाहीत.

सगळ्याचे आभार... देवकी, मानुषी ताई वि. आभार.. चुका दुरुस्त केल्या आहेत..
(ऑफीस मधुन घाई घाईत रेसीपी पोस्टली आहे Happy सांभाळुन घ्या)

दिनेश दा धन्यवाद... वेगळाच प्रकार दिसतो..

आहा .. माझं आवडतं लोणचं .. आई नेहमी करते..
मला खर तर वाटलं कि एखाद्या कोकणातल्या व्यक्तीची रेसेपी येणार ..
Seems like हे लोणचं विदर्भातले लोकच जास्त बनवतात Wink

मस्त, फणसाचे लोणचं कधी ऐकलं नव्हतं मी.

हो टीना, कोकणात आमच्याकडे नाही ऐकलं कधी.

सालासकट कैरी नाही का चालणार. काही फरक पडेल. (जणू काही मी करणारच आहे Wink ) .

आळशी नंबर एक मी.