१ वाटी बारिक चिरलेला फणस
दीड वाटी कीसलेली कैरी (साल सोलुन)
दीड वाटी तेल
मीठ अंदाजे (५ ते ६ चहाचे चमचे)
केप्रे आंबा लोणचे मसाला १ वाटी
सर्व प्रथम फणसाचे काप धुवुन पुसुन बारिक चिरुन घ्या. कुकर मधे stand ठेवुन त्यावर एका बंद डब्यात हे काप दोन शिटया होईस्तोवर वाफवुन घ्या. हे काप जरा वेळ एका सुती कापडावर गार होऊ द्या..
कुकर सुरु असतांना कैरीची पाठ सोलुन कीसुन घ्या, एका पसरट टोपात/ परातीत केप्रे लो. मसाला आणि मिठ एकत्र करा. कढईत तेल तापवायला ठेवा, चांगले तापले की एक पळी भर तेल या मसाल्यावर सोडा.. व्यवस्थीत कालवुन घ्या.. गार झाले की त्यात आधी कीसलेली कैरी आणि मग फणसाचे तुकडे घालुन पुन्हा नीट कालवुन घ्या..
उरलेलं तेल थंड झाल्यावर लोणच्यात घाला.. झाल लोणच तय्यार.. आता हे लोणच स्वच्छ हवा बंद बरणीत भरुन ठेवा.. ३ ते ४ महिने टिकतं..
फणस उकडतांना पाणी आत शिरायला नको.. बुरशी येऊ शकते..
ताजे ताजे लोणचे आजच
ताजे ताजे लोणचे आजच केले..:)
दोन कैर्या जरा नरम वाटल्या म्हणुन त्याचा तक्कु केला...
व्वा! तोंपासु ... माझ्या
व्वा! तोंपासु ... माझ्या मैत्रीणीची आई फणस वाफवल्यावर तळून घेते पाण्याचा अंश राहू नये म्हणून... वर्षभर लोणचं टिकत... आठवलं .. मागच्यावर्षी खाल्लय हे लोणचं ... अजूनही चव जीभेवर रेंगाळतेय...
धन्स मंजु ताई.. आता पुढच्या
धन्स मंजु ताई.. आता पुढच्या वेळेला वाफवल्यावर तळुन घेईन..
छान, भाजीचा फणस वापरला असेल
छान, भाजीचा फणस वापरला असेल ना ? याचे कारवारी पद्धतीने पण छान लोणचे होते ( मिठाचे पाणी उकळून त्या पाण्यात लाल मिरच्या वाटून लावतात. )
हो दा भाजीचाच फणस वापरला..
हो दा भाजीचाच फणस वापरला.. रेसीपी द्या प्लीज
( पाठ सोलुन) >>.अरेरेच प्रथम
( पाठ सोलुन) >>.अरेरेच प्रथम आले.;)
साल सोलून / कापून /काढून अशी दुरुस्ती कर ना.रेसिपी मस्तय.
वा! सायली मस्त
वा! सायली मस्त रेसिपी.
सट्यांड हे काय असं विचारणार होते पण पडला प्रकाश.
वा वा! लोणच्याचे लुक्स
वा वा! लोणच्याचे लुक्स कातिल!
'सट्यांड' ने पाव सेकंद खाल्ला!
सायली, कारवार मधे अशी बरीच
सायली, कारवार मधे अशी बरीच लोणची करतात. मिठाचे पाणी उकळून घेतात मग त्यात लाल मिरची वाटतात. मोहरी वगैरे पण घालतात पण तेल नसले तरी चालते. अशी लोणची पाण्याचा वापर केलेला असला तरी खुप टिकतात. खराब होत नाहीत.
सगळ्याचे आभार... देवकी,
सगळ्याचे आभार... देवकी, मानुषी ताई वि. आभार.. चुका दुरुस्त केल्या आहेत..
(ऑफीस मधुन घाई घाईत रेसीपी पोस्टली आहे सांभाळुन घ्या)
दिनेश दा धन्यवाद... वेगळाच प्रकार दिसतो..
आहा .. माझं आवडतं लोणचं .. आई
आहा .. माझं आवडतं लोणचं .. आई नेहमी करते..
मला खर तर वाटलं कि एखाद्या कोकणातल्या व्यक्तीची रेसेपी येणार ..
Seems like हे लोणचं विदर्भातले लोकच जास्त बनवतात
नविन प्रकार पहाणेत
नविन प्रकार पहाणेत आला.
धन्यवाद.
मस्त, फणसाचे लोणचं कधी ऐकलं
मस्त, फणसाचे लोणचं कधी ऐकलं नव्हतं मी.
हो टीना, कोकणात आमच्याकडे नाही ऐकलं कधी.
सालासकट कैरी नाही का चालणार. काही फरक पडेल. (जणू काही मी करणारच आहे ) .
आळशी नंबर एक मी.