आयुष्याशी नक्की काय देवाणघेवाण करायची आहे, हा व्यवहार न समजलेल्या तीन मित्रांची कहाणी झोया अख्तरने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मध्ये दाखवली होती.
'जो अपनी आंखों में हैरानियाँ ले के चल रहें हो, तो जिंदा हो तुम
दिलों में तुम अपनी बेताबियाँ ले के चल रहें हो, तो जिंदा हो तुम'
ह्या जावेद अख्तर साहेबांच्या ओळींपर्यंत येऊन ती कहाणी थांबली होती. 'दिल धडकने दो'सुद्धा इथेच, ह्या ओळींच्या आसपासच आणून सोडतो.
१९७८ च्या 'गमन' मधील गझलेत 'शहरयार'नी म्हटलं होतं, 'दिल है तो धड़कने का बहाना कोई ढूंढें!' बरोबर आहे. 'धडकना' हा तर दिलाचा स्थायी भाव. मात्र आजकाल स्वप्नं, अपेक्षा, जबाबदाऱ्या वगैरेंच्या रेट्यामुळे आपण आपल्याच 'दिला'ला आपल्याच छातीतल्या कुठल्याश्या कोपऱ्यात इतके लोटतो की त्याला धडकण्यासाठी 'अॅण्टी अँग्झायटी' औषधी गोळ्यांची उधारीची ताकद द्यायला लागते, 'कमल मेहरा'प्रमाणे.
'जिंदगी ना मिलेगी दोबारा' ही तीन मित्रांची कहाणी होती आणि 'दिल धडकने दो' मध्ये आहेत तीन जोड्या. कमल मेहरा (अनिल कपूर) आणि नीलम (शेफाली शाह), कमल-नीलमची मुलगी 'आयेशा मेहरा' (प्रियांका चोप्रा) आणि तिचा नवरा 'मानव' (राहुल बोस) आणि कमल-नीलमचा मुलगा कबीर (रणवीर सिंग) आणि त्याचं प्रेम 'फराह अली' (अनुष्का शर्मा). कमल एक श्रीमंत उद्योगपती आहे. स्वत:च्या लग्नाचा ३० वा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने डबघाईला आलेल्या धंद्याला नवसंजीवनी देण्यासाठी काही व्यावसायिक मित्रांना एकत्र आणून, कुटुंब व जवळचे नातेवाईक ह्यांना घेऊन युरोपात क्रुझ ट्रीपचा प्लान तो बनवतो. ह्या 'फॅमिली-ट्रीप-मेड-पब्लिक' मध्ये मेहरा कुटुंबातले काही छुपे आणि काही खुली गुपितं असलेले प्रॉब्लेम्स समोर येतात आणि त्यापासून दूर पळणंही शक्य होत नाही. ते त्यांचा सामना करतात आणि ही क्रुझ ट्रीप त्यांना एका आनंदी शेवटाकडे पोहोचवते.
ती तशी पोहोचवणार आहे, हे आपल्याला माहित असतं का ? नक्कीच असतं. पण तरी पूर्ण पावणे तीन तास दिल 'मनापासून' धडकत राहतं !
'दिल धडकने दो' ची कहाणी खरं तर चोप्रा आणि बडजात्यांच्या पठडीची आहे. त्यांना 'जी ले अपनी जिंदगी' किंवा 'बचा ले अपने प्यार को' वगैरेसारखे डायलॉग इथे यथेच्छ झोडता आले असते. पण कौटुंबिक नाट्य असलं तरी त्याला संयतपणे हाताळलं असल्याने 'झोया अख्तर' टच वेगळा ठरतो. तगडी स्टारकास्ट असल्यावर चित्रपट भरकटत जातो, असा अनेक वेळचा अनुभव आहे. पण तसं होत नाही. बिनधास्त तरुणाईच्या विचारशक्तीच्या सक्षमतेवरचा नितांत विश्वास झोयाच्या सर्वच चित्रपटांत दिसून आलेला आहे. तो इथेही दिसतो, त्यामुळे मनाने तरुण असलेल्या प्रत्येकाला 'दिल धडकने दो' आवडला नाही, तरच नवल !

उद्योगपतींच्या मुलांकडून, त्यांच्या व्यवसायाची जबाबदारी खांद्यावर घेण्याची अपेक्षा खूप सुरुवातीपासून केली जाते. हा दबाव असा असतो की बहुतेक वेळी त्या मुलाला काही दुसरं करायचं असेल, तरी आपल्या इच्छांना मुरड घालावी लागते. 'कबीर'कडे एक मोठा व्यवसाय सांभाळायची कुवत आणि ते करायची इच्छाही नसते, ह्याची त्याला पदोपदी जाणीव होत असतानाही तो काही करू शकत नसतो. 'रणवीर सिंग' हा माझ्या मते एक साधारण क्षमतेचा, सामान्य चेहऱ्याचा कामचलाऊ नट आहे. पण 'कबीर'चं स्वत:शीच चाललेलं हे द्वंद्व त्याने चांगलं साकारलं आहे.
कबीरचा सगळ्यात जवळचा मित्र त्याचा लाडका कुत्रा 'प्लुटो'सुद्धा अनेक ठिकाणी सुंदर हावभाव दाखवतो ! त्याला आमिर खानने आवाज दिला आहे. जावेद अख्तर साहेबांच्या शब्दांना आमिरने उत्तम न्याय दिला आहे.
'अनुष्का शर्मा'ने, 'NH10', 'बॉम्बे वेलवेट' नंतर अजून एक दमदार सादरीकरण केलं आहे. स्वतंत्र विचारांची व ओतप्रोत आत्मविश्वास असणारी 'फराह' उभी करताना, उथळपणा व अतिआत्मविश्वास दिसण्याचा धोका होता. मात्र ह्यातली सीमारेषा व्यवस्थित ओळखून, कुठेही तिचं उल्लंघन न करता तिने आपली छाप सोडली आहे.
प्रियांकाची 'आयेशा'सुद्धा एक स्वयंपूर्ण स्त्री आहे. लग्न झाल्यावर, कुणाच्याही आधाराशिवाय संपूर्णपणे स्वत:च्या हिंमतीच्या व मेहनतीच्या जोरावर तिने तिचं स्वत:चं व्यवसायविश्व निर्माण केलेलं असतं. एक कर्तबगार स्त्री असूनही, केवळ एक 'स्त्री' असल्यामुळे तिच्यासोबत सासू, पती व आई-वडिलांकडून होणारा दुजाभाव आणि तो सहन करून प्रत्येक नात्याला पूर्ण न्याय देण्याचा तिचा प्रामाणिक प्रयत्न, त्यातून येणारं नैराश्य, त्यावर मात करून पुन्हा पुन्हा उभी राहणारी तिच्यातली मुलगी, पत्नी, सून, मैत्रीण तिने सुंदर साकारली आहे.
राहुल बोस आणि फरहान अख्तरला विशेष काम नाही. त्यातही राहुल बोसच्या भूमिकेला जराशी लांबी आहे. पण का कुणास ठाऊक तो सगळ्यांमध्ये मिसफिटच वाटत राहतो. कदाचित कहाणीचीही हीच मागणी आहे, त्यामुळे ह्या मिसफिट असण्या व दिसण्याबद्दल आपण त्याला दाद देऊ शकतो !
'शेफाली शाह'ची 'नीलम' प्रत्येक फ्रेमच्या एका कोपऱ्यात स्वत:ची स्वाक्षरी करून जाते ! तिचा वावर इतका सहज आहे की तिने स्वत:लाच साकार केलं असावं की काय असं वाटतं. मानसिक दबाव वाढल्यावर बकाबका केकचे तुकडे तोंडात कोंबतानाचा तिचा एक छोटासा प्रसंग आहे. त्या काही सेकंदांत तिने दाखवलेली चलबिचल अवस्था केवळ लाजवाब !
'अनिल कपूर' मेहरा कुटुंबाचा प्रमुख दाखवला आहे. तो ह्या स्टारकास्टचाही प्रमुख ठरतो. त्याच्या कमल मेहरासाठी पुरेसे स्तुतीचे शब्द माझ्याकडे नाहीत. मी फक्त मनातल्या मनात त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या ! एका प्रसंगात आयेशाशी बोलताना आक्रमकपणे आवाज चढवून तो थयथयाट करतो. सहसा, असा तमाशा करताना कुणी उभं राहील, इथे-तिथे फेऱ्या मारेल, अंगावर धावून जाईल. पण हा माणूस खुर्चीत बसून आरडाओरडा करतो ! दुसऱ्या एका प्रसंगात मोबाईलवर बोलता बोलता त्याची नजर नको तिथे पडते आणि मग त्या व्यक्तींपासून लपण्यासाठी तो झाडामागे जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. ती दोन-पाच क्षणांची धावपळ त्याने जबरदस्त केली आहे.
फरहान अख्तर आणि जावेद अख्तरलिखित संवाद चुरचुरीत आहेत. अनेक जागी वनलायनर्स, पंचेस आणि शब्दखेळ करून तसेच काही ठिकाणी वजनदारपणा देऊन हे संवाद जान आणतात.
अनेक चित्रपटांनंतर चित्रपटातलं 'संगीत' चांगलं जमून आलेलं आहे. 'गर्ल्स लाईक टू स्विंग' आणि 'धक धक धक धक धडके ये दिल' ही गाणी तर छानच ! 'धक धक धक धक धडके ये दिल' हे अख्खं गाणं एका सलग 'शॉट'मध्ये चित्रित करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. ते निव्वळ अफलातून वाटलं !
शेवट थोडा अतिरंजित झाला असला, तरी एरव्ही 'दिल धडकने दो' वास्तवाची कास सोडत नाही.
ह्या आधीच्या चित्रपटांमुळे झोया अख्तरवर 'उच्चभ्रूंच्या मनोरंजनासाठी चित्रपट बनवणारी' असा शिक्का बसलेला असावा, 'दिल धडकने दो' हा शिक्का अजून गडद करेल. पण हेसुद्धा एक आयुष्य आहे आणि ते नक्कीच बघण्यासारखं आहेच. कारण कोपऱ्यात लोटल्या गेलेल्या दिलाला इथे एक 'धड़कने का बहाना' नक्कीच मिळतो.
रेटिंग - * * * *
http://www.ranjeetparadkar.com/2015/06/movie-review-dil-dhadakne-do.html
हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज ०७ जून २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-
ओके साती.
ओके साती.
छान आहे सिनेमा! जरा जास्ती
छान आहे सिनेमा! जरा जास्ती मोठा झालाय पण बोअर झाला नाही. बासुदा, हृषीदा स्टाईलने सगळं सगळं उलगडून सांगितलं आहे..ट्रेलर्सचा अतिडोस झाल्याने पहिली ओळख कंटाळवाणी वाटते! नसती तरी चालली असती! आणि शेवटची १५ मिनिटे दिग्दर्शक झोयाने सुट्टी घेतली असावी..काहीही अ आणि अ गोष्टी घडतात! सगळ्यांची कामं मस्त! प्रियांका नको तिथे glamorous दिसते तिच्या ओठांमुळे पण तिला छान रोल आहे आणि तिने चांगलं काम केलंय! मला रणवीर सिंग हळूहळू आवडायला लागला आहे आधी आजीबात आवडत नव्हता (बँड, बाजा बारात आवडला असून सुद्धा)! ह्यात मला त्याच्या मेकपमनचं wardrobe/look manager चं कौतुक वाटतं. तो खरंच असा २५ वर्षाचा तरुण दिसलाय. आणि त्याच्या वागण्यातून, बोलण्याच्या पद्धतीतून देखील तो त्याच वयाचा वाटतो! अनिल कपूर, शेफाली छाया रॉक! मी असं गॉसिप ऐकलं की शेफालीचा रोल आधी माधुरी दीक्षितला ऑफर केला होता पण प्रियांकाची आई होणे MD ला मान्य नव्हते! Thank god! I could never imagine MD in the role! Shefali has nailed it!
Thank god! I could never
Thank god! I could never imagine MD in the role! Shefali has nailed it!
<<
थँक गॉड! नेने काकुंनी वाट लावली असती या(ही) रोलची
लोल डीजे श्रीदेवीला पण
लोल डीजे श्रीदेवीला पण विचारले होते म्हणे. (केक कोंबायचा सीन आणि एकूणच तिने चांगला केला असता हा रोल
)
माधुरी !!! बापरे..... नको ग
माधुरी !!!
बापरे..... नको ग बाई.... नाव घ्यावा असा एकही सिनेमा नाहिये नेने बाईंचा!!! त्या पेक्षा तिच्या समकालीन श्रीदेवी, जुही ह्यांनी खुपच विविधता दाखवली आहे. बाई आपल्या कोशातुन बाहेर येत नाहीत. एक प्रहार( नाना दिग्दर्शक होता म्हणुन ) सोडला तर सगळा खडखडाट आहे. अगदी ऑथर बॅक्ड रोल लिहुनही बाई "मी माधुरी" ह्या पलिकडे येवुच शकत नाहीत.
आजकालच्या मुली जास्त हुशार आणि विचारी आहेत. वेगळ्या विषयाचे सिनेमा सहज करुन जातात. प्रियांका, अनुश्का, दिपिका, बिपाशा, आलिया, करीना, हो काजोल आणि राणी सुध्धा..... केवढी रेंज आहे. विद्या आणि कंगना ची गोष्ट्च वेगळी आहे. अमिताभ जो आधी चक्रात अडकला होता, आता पहा काय व्हरयटी आहे रोल्स मधे..... नेने बाईंनी नुसते डान्स शो होस्ट करुन आपले टॅलेंट वाया घालवु नये.
माधुरी दिक्षितने घाणेरडे
माधुरी दिक्षितने घाणेरडे चित्रपट करून स्वतःचे talent वाया घालवलेय अगदी ! मो की मी ला अनुमोदन !
अगदी ऑथर बॅक्ड रोल लिहुनही
अगदी ऑथर बॅक्ड रोल लिहुनही बाई "मी माधुरी" ह्या पलिकडे येवुच शकत नाहीत. >>>
जबरदस्त अनुमोदन!!! तेच तेच डान्स शोज, जाहिराती, त्यात तसंच दिसणं, हसणं, अजूनही मी कित्ती कित्ती सुंदर आणि तरूण दिसते हाच चेहर्यावर कायम भाव, यातून खरंच तिनं बाहेर यायला हवं. प्रहार आणि मृत्युदंड सोडता कुठल्याही सिनेमात ती वेगळी छाप पाडू शकली नाही. तिच्याबरोबरच्या अनेक जणींनी वेगळ्या भूमिका केल्या आहेत. अगदी शोभेची बाहुली म्हणून समजली गेलेली करिश्माही फिजा आणि झुबेदा मधे छाप सोडून गेली होती.
अग्गं बै ! मोकिमी, चिकू,
अग्गं बै ! मोकिमी, चिकू, अस्मानी ...... एकदम भरपूरच बेस्ट फ्रेन्ड्स मिळाल्यासारखे वाटले इथे येऊन मला !
डीज्जे कुठे हाइस ? ये लवकर!! 
बघितला ठिक आहे पण झोयाचे
बघितला ठिक आहे पण झोयाचे आधिचे चित्रपट जास्त चान्गले होते.पिक्चर फार स्लो झालाय, गाणि फार इन्ट्रेस्टिन्ग नाही,
स्टोरीत पण तितकासा दम नाही, प्रियान्का,शेफाली आनि अनिल ने मस्त काम केलियेत, काही काही सन्वाद आणि सिन हहपुवा आहेत अगदी!.. वन लायनर मजा आणतात.
रणविर आणि अनुष्काने प्रामाणिक काम केलेय पण त्याच्या ते लव्ह-बॉन्डिन्ग अजिबात दिसुन येत नाही,
शेवट आग्दी बकवास!
मोकिमी, चिकू, अस्मानी आणि
मोकिमी, चिकू, अस्मानी आणि मैत्रेयी, विषयाला धरून बोला !!
हा बाफ 'दिल धडकने दो' ह्या चित्रपटाबद्दल्ल आहे.
अग्गं बै ! मोकिमी, चिकू,
अग्गं बै ! मोकिमी, चिकू, अस्मानी ...... एकदम भरपूरच बेस्ट फ्रेन्ड्स मिळाल्यासारखे वाटले इथे येऊन मला ! डीज्जे कुठे हाइस ? ये लवकर!!
<<
वा वा, मजा आली सकाळी सकाळी इथे !
माधुरी खुप प्रतिभावान आहे पण
माधुरी खुप प्रतिभावान आहे पण स्वतःच्या इमेजमधे बाहेर पडत नाहिये, अडकली आहे याबद्दल अनुमोदन.
नाहीतर ती उत्तम अभिनेत्री आहे याबद्दल कणभर शंका नाही.
ह्म्म्म ठिक आहे.. तरीसुद्धा
ह्म्म्म ठिक आहे.. तरीसुद्धा विषयाला धरूनच बोला..
(No subject)
हौ प्रेडिक्टेबल पग्या
हौ प्रेडिक्टेबल पग्या
पराग!
पराग!
इथे सगळे त्या
इथे सगळे त्या शेफालीच्या"केक"च्या शॉटचा उल्लेख करता आहेत. पण तीचा, शेवटी डॉक्टरच्या रुममध्ल्या सीनमध्ये अनिलकपुर स्वतःबद्दलच सांगायला लागतो, तेंव्हा तिचा अभिनय class of ... त्यावेळेचे रणवीरसिंगचे डायलॉगतर बहुधा फरहाननेच स्वानुभवावरून लिहीले वाटले. छान आहेत.
ल़क बाय चान्स, जिंनामिदो आणि हा सिनेमा, हे सर्व नातेसंबधावरचे असल्याने सारखे वाटणे स्वाभाविक आहे. लबाचा विषय दुसर्या दोन्हीपेक्षा वेगळा आहे एव्हढेच. तरीही मला हा सिनेमा आवडला. थिएटरम ध्ये बघितयामुळे छानच वाटला.
पण तीचा, शेवटी डॉक्टरच्या
पण तीचा, शेवटी डॉक्टरच्या रुममध्ल्या सीनमध्ये अनिलकपुर स्वतःबद्दलच सांगायला लागतो, तेंव्हा तिचा अभिनय class of ... >> सहमत! शेफाली ने मस्त पेललीय भुमिका! पण का कुणास ठाउक ती मला प्रियान्काची आई वाटली नाही, रणविर आणि तिच्यातले नाते जसे आइ-आणी तिचा pamperd मुलगा अस जाणवल तस प्रियान्का च काही वाटल नाही...
पराग!!??? मैत्रेयी, कौन है
पराग!!??? मैत्रेयी, कौन है यह आदमी? (संदर्भ कपिल)
पराग,
पराग,
hush.....konatarree kapil cha
:-d hush.....konatarree kapil cha fan aahe tar.....
hush.....konatarree kapil cha
:-d hush.....konatarree kapil cha fan aahe tar.....
ह्या धाग्याचं शीर्षक वाचून
ह्या धाग्याचं शीर्षक वाचून दिल है तो धडकने का बहाना कोई ढूँढे, पत्थर की तरह बेहिस ओ बेजानसा क्यूँ है! ह्या ओळी आठवून मनातल्या मनात पूर्ण गाणं म्हणणारी मी एकटीच आहे का?
ह्या चित्रपटात फरहान अख्तरची
ह्या चित्रपटात फरहान अख्तरची गरज नव्हती. ( मला तो आवडतो पण तरिही त्याच्या रोलची गरज नव्हती. ) त्याने उगाच येऊन प्रोफेसरची प्रिचिंग भुमिका निभावली, जी प्रियांकादेखील दोन तीन डायलॉग्स मधून निभावू शकली असती.
अनिल कपूर आणि शेफाली जबरीच अभिनय. तसेच रणवीरला तो रोल (कन्फुज्ड ) जमलाय. अनुष्का शर्मा नसली असती तरी चालले असते. तिचे ओठ किळसवाणे वाटले. लिप जॉब गॉन बॅड.
पण दिग्दर्शनात सिनेमा अपुरा पडतो अनेकदा हे का? असे उगाच वाटते. ( ते वाटण्याचे कारण झोयाचा सिनेमा हे आहे) उदा. ती नुरी बेशुद्ध पडण्याची (शेवटी) काय गरज होती? म्हणजे त्यातून काय साधले. कारण लगेच सगळे अटेंशन रणवीरच्या उडीवर जाते.
कुणालातरी कलाकृतीतून बोध का मिळत नाही / मिळाव ह्याचे प्रश्न कुठेतरी वाचले. ह्या पिक्चर मध्ये बरंच प्रिचिंग आहे. तोच तो घिसापिटा विषय आहे. पण मांडणी छान आहे. आणि शेवटचे २० मिनिट टोटली "हिंदी पिक्चर". त्या उडी प्रकरणापसून नंतर उठून जावे वाटले होते.
ऑल इन ऑल झोया अख्तरचा एक साधारण सिनेमा.
फरहानला वाया घालवला (घेतलाच
फरहानला वाया घालवला (घेतलाच का झोया जाणे)>>> बहन का रिश्ता निभाने के लिये... घर के बिझनेस मे रिश्तेदार तो आतें ही है..
फरहान अख्तर आणि अनुष्का शर्मा दोघांची गरज नव्हती खर तर.. मो की मी म्हणाल्या त्याप्रमाणे प्रियांका एकटी, स्वबळावर राहिली असती तर ते जास्त छान वाटलं असतं.. खtप खास नाहीये चित्रट, एकदा टीपी म्हणून बघितला तरी चालेल... 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' इतका अपील तर नक्कीच नाही झाला. शेफाली आणि प्रियांका दोघींचं काम खूप आवडलं. प्रियांकाने एक यशस्वी बिझनेसवूमन असूनही सतत दुस-यांच्या आनंदाचा विचार करणारी, त्यासाठी त्यांच्या मनाप्रमाणे वागणारी, बिलकूल आक्रस्ताळी नसलेली पण नंतर स्वत:च्या हक्कासाठी शांत पण ठामपणे उभी राहिलेली तरूणी चांगली रंगवली आहे.. मला जाम आवडली ती या पिक्चरमध्ये...
रणवीर - अनुष्का प्रेमकहाणी उगाच घुसडल्ये...
घरातला एकूणज जो गोंधळ आहे तो सोडवायला आणि आपल्या मुलांना काय हवंय, काय वाटतं हे ओळखायला बाकीची प्रेमकहाणी कशाला पाहिजे?.. प्रियाकांच्या डिव्होर्सच्या डिसीजनला सपोर्ट करणं हेच खूप महत्वाचं.. तिथेच चित्रपट संपवायला हवा होता.. शेटची १५ मिनिटं अ आणि अ आहेत अगदी...
वरची सगळी चर्चा पाहून चित्रपट
वरची सगळी चर्चा पाहून चित्रपट बघावा की नाही असा प्रश्न पडलाय
वरची सगळी चर्चा पाहून चित्रपट
वरची सगळी चर्चा पाहून चित्रपट बघावा की नाही असा प्रश्न पडलाय
अगदी अगदी.. माझाही उद्या रविवार आहे.. कोणता पिक्चर बघावा या विचारात आहे.. इथे पब्लिक कॉमेंट साठी अधून मधून डोकावतोय तर कन्फ्यूजच होतेय..
पण एक आहे, जे चांगला आहे बोलत आहेत ते देखील संथ आहे असे म्हणत आहेत.. आणि मला थिएटरात जरा जरी पकले तर सरळ उठून जावेसे वाटते.. पण/आणि जाता येत नाही याचा जास्त त्रास होतो.
ऋन्मेऽऽष, अगो, एकदा
ऋन्मेऽऽष, अगो, एकदा बघण्यासारखा आहे नक्की.. बोअर होत नाही.
जि +१. अगो, एकदा बघण्यासाठी
जि +१. अगो, एकदा बघण्यासाठी छान आहे. टीव्हीवर आल्यावर पाहिलास तरी चालेल पण टर्की-ग्रीस पाहायचे असेल थिएटर हवे.
करियर ओरिएंटेड मुलगी एकटीच नव्हे तर एकाकी रहाते हा नवा स्टेरिओटाईप आहे. झोयाने तो केला नाही हे मला विशेष आवडले. फरहान-प्रियांकाला त्यांच्यातील नाते मान्य होते एवढाच स्क्रिनवर शेवट आहे. फरहान बरोबर प्रियांकाचे नाते कसे फुलले (लग्न, लिव्ह-इन का नुसती कमिटेड गर्लफ्रेंड) हे सिनेमात नाही. त्यामुळे आपापल्या अनुभवविश्वानुसार प्रेक्षक इंटर्प्रिट करत राहतात.
ओके, थँक्स जि अँड सी.
ओके, थँक्स जि अँड सी. टर्की-ग्रीस मोठ्या पडद्यावर बघायला आवडेल त्यामुळे बहुतेक बघेन आता लवकरच
Pages