आयुष्याशी नक्की काय देवाणघेवाण करायची आहे, हा व्यवहार न समजलेल्या तीन मित्रांची कहाणी झोया अख्तरने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मध्ये दाखवली होती.
'जो अपनी आंखों में हैरानियाँ ले के चल रहें हो, तो जिंदा हो तुम
दिलों में तुम अपनी बेताबियाँ ले के चल रहें हो, तो जिंदा हो तुम'
ह्या जावेद अख्तर साहेबांच्या ओळींपर्यंत येऊन ती कहाणी थांबली होती. 'दिल धडकने दो'सुद्धा इथेच, ह्या ओळींच्या आसपासच आणून सोडतो.
१९७८ च्या 'गमन' मधील गझलेत 'शहरयार'नी म्हटलं होतं, 'दिल है तो धड़कने का बहाना कोई ढूंढें!' बरोबर आहे. 'धडकना' हा तर दिलाचा स्थायी भाव. मात्र आजकाल स्वप्नं, अपेक्षा, जबाबदाऱ्या वगैरेंच्या रेट्यामुळे आपण आपल्याच 'दिला'ला आपल्याच छातीतल्या कुठल्याश्या कोपऱ्यात इतके लोटतो की त्याला धडकण्यासाठी 'अॅण्टी अँग्झायटी' औषधी गोळ्यांची उधारीची ताकद द्यायला लागते, 'कमल मेहरा'प्रमाणे.
'जिंदगी ना मिलेगी दोबारा' ही तीन मित्रांची कहाणी होती आणि 'दिल धडकने दो' मध्ये आहेत तीन जोड्या. कमल मेहरा (अनिल कपूर) आणि नीलम (शेफाली शाह), कमल-नीलमची मुलगी 'आयेशा मेहरा' (प्रियांका चोप्रा) आणि तिचा नवरा 'मानव' (राहुल बोस) आणि कमल-नीलमचा मुलगा कबीर (रणवीर सिंग) आणि त्याचं प्रेम 'फराह अली' (अनुष्का शर्मा). कमल एक श्रीमंत उद्योगपती आहे. स्वत:च्या लग्नाचा ३० वा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने डबघाईला आलेल्या धंद्याला नवसंजीवनी देण्यासाठी काही व्यावसायिक मित्रांना एकत्र आणून, कुटुंब व जवळचे नातेवाईक ह्यांना घेऊन युरोपात क्रुझ ट्रीपचा प्लान तो बनवतो. ह्या 'फॅमिली-ट्रीप-मेड-पब्लिक' मध्ये मेहरा कुटुंबातले काही छुपे आणि काही खुली गुपितं असलेले प्रॉब्लेम्स समोर येतात आणि त्यापासून दूर पळणंही शक्य होत नाही. ते त्यांचा सामना करतात आणि ही क्रुझ ट्रीप त्यांना एका आनंदी शेवटाकडे पोहोचवते.
ती तशी पोहोचवणार आहे, हे आपल्याला माहित असतं का ? नक्कीच असतं. पण तरी पूर्ण पावणे तीन तास दिल 'मनापासून' धडकत राहतं !
'दिल धडकने दो' ची कहाणी खरं तर चोप्रा आणि बडजात्यांच्या पठडीची आहे. त्यांना 'जी ले अपनी जिंदगी' किंवा 'बचा ले अपने प्यार को' वगैरेसारखे डायलॉग इथे यथेच्छ झोडता आले असते. पण कौटुंबिक नाट्य असलं तरी त्याला संयतपणे हाताळलं असल्याने 'झोया अख्तर' टच वेगळा ठरतो. तगडी स्टारकास्ट असल्यावर चित्रपट भरकटत जातो, असा अनेक वेळचा अनुभव आहे. पण तसं होत नाही. बिनधास्त तरुणाईच्या विचारशक्तीच्या सक्षमतेवरचा नितांत विश्वास झोयाच्या सर्वच चित्रपटांत दिसून आलेला आहे. तो इथेही दिसतो, त्यामुळे मनाने तरुण असलेल्या प्रत्येकाला 'दिल धडकने दो' आवडला नाही, तरच नवल !
उद्योगपतींच्या मुलांकडून, त्यांच्या व्यवसायाची जबाबदारी खांद्यावर घेण्याची अपेक्षा खूप सुरुवातीपासून केली जाते. हा दबाव असा असतो की बहुतेक वेळी त्या मुलाला काही दुसरं करायचं असेल, तरी आपल्या इच्छांना मुरड घालावी लागते. 'कबीर'कडे एक मोठा व्यवसाय सांभाळायची कुवत आणि ते करायची इच्छाही नसते, ह्याची त्याला पदोपदी जाणीव होत असतानाही तो काही करू शकत नसतो. 'रणवीर सिंग' हा माझ्या मते एक साधारण क्षमतेचा, सामान्य चेहऱ्याचा कामचलाऊ नट आहे. पण 'कबीर'चं स्वत:शीच चाललेलं हे द्वंद्व त्याने चांगलं साकारलं आहे.
कबीरचा सगळ्यात जवळचा मित्र त्याचा लाडका कुत्रा 'प्लुटो'सुद्धा अनेक ठिकाणी सुंदर हावभाव दाखवतो ! त्याला आमिर खानने आवाज दिला आहे. जावेद अख्तर साहेबांच्या शब्दांना आमिरने उत्तम न्याय दिला आहे.
'अनुष्का शर्मा'ने, 'NH10', 'बॉम्बे वेलवेट' नंतर अजून एक दमदार सादरीकरण केलं आहे. स्वतंत्र विचारांची व ओतप्रोत आत्मविश्वास असणारी 'फराह' उभी करताना, उथळपणा व अतिआत्मविश्वास दिसण्याचा धोका होता. मात्र ह्यातली सीमारेषा व्यवस्थित ओळखून, कुठेही तिचं उल्लंघन न करता तिने आपली छाप सोडली आहे.
प्रियांकाची 'आयेशा'सुद्धा एक स्वयंपूर्ण स्त्री आहे. लग्न झाल्यावर, कुणाच्याही आधाराशिवाय संपूर्णपणे स्वत:च्या हिंमतीच्या व मेहनतीच्या जोरावर तिने तिचं स्वत:चं व्यवसायविश्व निर्माण केलेलं असतं. एक कर्तबगार स्त्री असूनही, केवळ एक 'स्त्री' असल्यामुळे तिच्यासोबत सासू, पती व आई-वडिलांकडून होणारा दुजाभाव आणि तो सहन करून प्रत्येक नात्याला पूर्ण न्याय देण्याचा तिचा प्रामाणिक प्रयत्न, त्यातून येणारं नैराश्य, त्यावर मात करून पुन्हा पुन्हा उभी राहणारी तिच्यातली मुलगी, पत्नी, सून, मैत्रीण तिने सुंदर साकारली आहे.
राहुल बोस आणि फरहान अख्तरला विशेष काम नाही. त्यातही राहुल बोसच्या भूमिकेला जराशी लांबी आहे. पण का कुणास ठाऊक तो सगळ्यांमध्ये मिसफिटच वाटत राहतो. कदाचित कहाणीचीही हीच मागणी आहे, त्यामुळे ह्या मिसफिट असण्या व दिसण्याबद्दल आपण त्याला दाद देऊ शकतो !
'शेफाली शाह'ची 'नीलम' प्रत्येक फ्रेमच्या एका कोपऱ्यात स्वत:ची स्वाक्षरी करून जाते ! तिचा वावर इतका सहज आहे की तिने स्वत:लाच साकार केलं असावं की काय असं वाटतं. मानसिक दबाव वाढल्यावर बकाबका केकचे तुकडे तोंडात कोंबतानाचा तिचा एक छोटासा प्रसंग आहे. त्या काही सेकंदांत तिने दाखवलेली चलबिचल अवस्था केवळ लाजवाब !
'अनिल कपूर' मेहरा कुटुंबाचा प्रमुख दाखवला आहे. तो ह्या स्टारकास्टचाही प्रमुख ठरतो. त्याच्या कमल मेहरासाठी पुरेसे स्तुतीचे शब्द माझ्याकडे नाहीत. मी फक्त मनातल्या मनात त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या ! एका प्रसंगात आयेशाशी बोलताना आक्रमकपणे आवाज चढवून तो थयथयाट करतो. सहसा, असा तमाशा करताना कुणी उभं राहील, इथे-तिथे फेऱ्या मारेल, अंगावर धावून जाईल. पण हा माणूस खुर्चीत बसून आरडाओरडा करतो ! दुसऱ्या एका प्रसंगात मोबाईलवर बोलता बोलता त्याची नजर नको तिथे पडते आणि मग त्या व्यक्तींपासून लपण्यासाठी तो झाडामागे जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. ती दोन-पाच क्षणांची धावपळ त्याने जबरदस्त केली आहे.
फरहान अख्तर आणि जावेद अख्तरलिखित संवाद चुरचुरीत आहेत. अनेक जागी वनलायनर्स, पंचेस आणि शब्दखेळ करून तसेच काही ठिकाणी वजनदारपणा देऊन हे संवाद जान आणतात.
अनेक चित्रपटांनंतर चित्रपटातलं 'संगीत' चांगलं जमून आलेलं आहे. 'गर्ल्स लाईक टू स्विंग' आणि 'धक धक धक धक धडके ये दिल' ही गाणी तर छानच ! 'धक धक धक धक धडके ये दिल' हे अख्खं गाणं एका सलग 'शॉट'मध्ये चित्रित करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. ते निव्वळ अफलातून वाटलं !
शेवट थोडा अतिरंजित झाला असला, तरी एरव्ही 'दिल धडकने दो' वास्तवाची कास सोडत नाही.
ह्या आधीच्या चित्रपटांमुळे झोया अख्तरवर 'उच्चभ्रूंच्या मनोरंजनासाठी चित्रपट बनवणारी' असा शिक्का बसलेला असावा, 'दिल धडकने दो' हा शिक्का अजून गडद करेल. पण हेसुद्धा एक आयुष्य आहे आणि ते नक्कीच बघण्यासारखं आहेच. कारण कोपऱ्यात लोटल्या गेलेल्या दिलाला इथे एक 'धड़कने का बहाना' नक्कीच मिळतो.
रेटिंग - * * * *
http://www.ranjeetparadkar.com/2015/06/movie-review-dil-dhadakne-do.html
हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज ०७ जून २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-
फरहान अख्तरच्या लक बाय चान्स
फरहान अख्तरच्या लक बाय चान्स मधे इषा शर्वाणि होती, ती असायला हवी होती डान्सर च्या रोल मधे !<<< तो पण झोयाचाच चित्रपट होता. (अभिनेता फरहान होता अर्थात!!) माझ्या मते, बॉलीवूडमध्ये सिनेमा याच विषयावर बनलेल्या चित्रपटांपैकी लक बाय चान्स आणि ओम शांती ओम हे चित्रपट खूप प्रामाणित आहेत.
मी या आठवड्यांत हा चित्र्पट बघेन. पण तरी रणवीर सिंगबद्दल: मला बँड बाजा बारातमध्ये तो जास्त भावला नव्हता. त्याचे जे व्यक्तीमत्व आहे तसलाच रोल त्यानं केल्यासारखे वाटले होते. नंतर रिकी बहलमध्ये तो आवडला, लूटेरामध्येही ठिकठाक वाटला, पण "अभिनेता" म्हणून पटला ते रामलीलापासून. गुज्जु बोलायची स्टाईल, तो छोट्या गावांमधल्या पोरांमधला ओव्हरस्माअर्टनेस त्यानं जो काही साकारलाय ते मस्तच. नंतर त्याच्याबद्दल माहिती वाचताना तो मूंबईतच लहानाचा मोठा झालाय हे वाचून बँड बाजामधला त्याचा दिल्लीबॉय स्टाईल अजूनच जास्त भावली. अधिक कौतुक सिनेमा पाहिल्यावर!!
लेडिज / रिकी बेहेल मध्येही
लेडिज / रिकी बेहेल मध्येही छान काम केलंय रणवीरनं
+1 to Ranveer Singh praising
+1 to Ranveer Singh praising posts
रणवीर किल-दिल सारख्या रोल
मला कळत नाही, जर तो मला सुमार
मला कळत नाही, जर तो मला सुमार वाटतो तर तो माझ्या आवडी-निवडीचा भाग मानून पुढे का जात नाहीये विषय ? म्हणजे मी मान्य करायला हवंय का की, 'हो, तो लै भारी आहे!' मग थांबणार का ?
तर करतो..
रणवीर सिंग जब्बरदस्त आहे ! __/\__
+1 to Ranveer Singh praising
+1 to Ranveer Singh praising posts
बाकी परीक्षण आवडले
नक्की बघणार
(प्रियंका चोप्रा ).....लंबी
(प्रियंका चोप्रा ).....लंबी रेस की घोडी राहणार.
>>
गोड्डी बोला? या गाली दिया? ::फिदी:
मी थोडी म्हणल हे तुमच्या
मी थोडी म्हणल हे तुमच्या शेजार्यांचे मत आहे! >>>>
(मायबोलीवर बर्याच वर्षांपासून सगळे अगदी ठासून ठासून लिहित असतात स्वतःच्या वैयक्तिक मताबद्दल ! दुसर्यांची मत कोणी लिहिल्याचं पाहिलं नाही मात्र.
)
@ पराग >>>१
@ पराग >>>१
रणवीर सिंग, येडचाप, बावळट ते
रणवीर सिंग, येडचाप, बावळट ते मच्युअर, डिलिजंट अश्या सैफ अली खानच्या फिल्मी प्रवासाचं फास्ट फॉरवर्ड वर्जन आहे, पिरिअड.
मी लिहीली आहे सविस्तर पोस्ट
मी लिहीली आहे सविस्तर पोस्ट आधी. वैयक्तिक मत मा.बो वर इतरेजनांनी देणे ह्याबद्द्ल मला आदर आहे.
पण 'समीक्षण' (सम् + इक्षण, म्हणजे व्यवस्थित, समतोल पद्धतीने बघणे) हा जेव्हा रोल असतो तेव्हा वैयक्तिक मते द्यावी का? (मुद्दा रणवीरसिंग कुणाला किती आवडतो असा नव्हता). अनेक जाणकार आहेत, ते करतील खुलासा.
चांगलं लिहिलंय. रणवीर आवडतो.
चांगलं लिहिलंय.
रणवीर आवडतो. (उगीच आपलं... आता सगळेच बोलत आहेत तर आम्ही पण दामटतो की).
मला कळत नाही, जर तो मला सुमार
मला कळत नाही, जर तो मला सुमार वाटतो तर तो माझ्या आवडी-निवडीचा भाग मानून पुढे का जात नाहीये विषय ? >>
तुम्ही आवडुन घ्या अस कुणिच म्हणत नाहिये इथे पण तुम्ही मान्डलेल्या मताच्या विरोधी मतात कुणि मत्च द्याय्च नाहि का?
वर रणबीरसिंगची तुलना सैफूशी
वर रणबीरसिंगची तुलना सैफूशी झालीय ती त्याची तारीफ आहे की निंदा..
कारण सैफ अली खान आधी असह्य होता व कालांतराने सुसह्य झाला ईतकेच.. यापुढे त्याचे कौतुक म्हणजे शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज !
आज पाहिला झोया अख्तरचा ट्रॅक
आज पाहिला
झोया अख्तरचा ट्रॅक रेकॉर्ड्च्या मानाने बन्डल वाटला. मला जाणवलेल्या काही गोष्टी.
१) रणविर सिंग बॉडी बनवलेल्या वाण्याच्या मुलासारखा दिसतो (अत्यन्त सुमार आहे). अनिल कपुरचा मुलगा शोभत नाही. पुर्ण चित्रपट चेहर्यावर टपोरी भाव घेउन वावरतो. त्याला काय करायचे आहे हे त्याला नव्हे दिग्दर्शकाला पण कळले असे वाटत नाही. विमानाची मालकी जाणार म्हणुन तो विमान उडवुन येतो, पण मालकी गेली तरी पैसे भरुन कधीच विमान उडवता येणार नाही असे नाही त्यामुळे त्या विमानावर प्रेम असते म्हणुन तो दुख्खी होतो का काय ते नीटसे कळले नाही वा त्याच्या दुख्खाची तीव्रताही जाणवली नाही.
त्यामानाने त्याने सीमंतिनीने दिलेल्या व्हिडीओत बर्यापैकी उत्तम संवाद म्हटले आहेत.
२) हिरवणीचे वडिल जुन्या चित्रपटात हिरोला असे पैसे देउन दुर पाठवत, त्यावेळी हिरो तो रिश्वत्चा चेक
फाडुन टाकत असे. आता हिरो चेक पण वटवतो आणि परदेशात मजा मारुन मग हिरॉइन पण पटवतो यापलिकडे फरहानला फारसे काम नाही.
३) फरहान अख्तरला हायलाइट करण्यासाठी राहुल बोसला आणि त्याच्या आईला उगाचच पाणचटपणा करायला लावला आहे जो पुर्वीपासुन आपल्या चित्रपट सृष्टीत चालत असे.
४) एकुण वरवरचा मुलामा लावुन तीच जुनी कथा उगाळली आहे. थ्री इडियटमध्ये गर्ल्फ्रेन्ड सोडली, ये जिन्दगी मध्ये एन्गेजमेन्ट मोडली, आता लग्न मोडले.
थ्री इडियट मध्ये सैफ, ये जिन्दगी मध्ये फरहान, या चित्रपटात रणवीर चा एक अध्यारुत सीन दाखवला.
अशी बरीच म्हणजे बरीच साम्यस्थळे आहेत. तीन जण वा तीन कपल घेउन चित्रपट म्हणजे एक फॉर्मुला बनवल्याचे यावेळी खुपच तीव्रतेने जाणवले.
चांगल्या बाजुला ब्रुनोकडुन संवाद म्हणुन घेतल्यामुळे चित्रपटात रिकाम्या जागा थोड्या खुसखुशीतपणे भरल्या गेल्या आहेत.
अनिल कपुर, प्रियांका चोप्राने usual suspects प्रमाणे उत्तम अभिनय केला आहे.
विशेषतः अनिलचा एक त्रस्त बिझिनेसमन आणि प्रियांकाचा टेनिसचा सीन पण उत्तम.
शेफाली शाहचा अभिनय सरप्राइझ होता.
एकुण इन शॉर्ट पहिले दोन ( ३ इडियट, ये जिन्दगी..) पाहिले असल्यास हा नाही पाहिला तर चालेल.
लाइट साइडला माझी मैत्रिण चित्रपट्गृहातुन बाहेर येताना म्हणाली मॉरल ऑफ द स्टोरी की दुसर्या फॅमिली बरोबर फुकटपण क्रुझवर जाउ नये!
ईथेही निखार विखाार : मस्तच
ईथेही निखार विखाार :फिदी::
मस्तच रसप
निलीमा, तुम्हाला '३ इडियटस'
निलीमा, तुम्हाला '३ इडियटस' म्हणायचे आहे का 'दिल चाहता है'? कारण ३ इडियटस मधे सैफ नाही.
अंजली , निलीमा ला दिल चाहता
अंजली , निलीमा ला दिल चाहता है असच म्हणायच आहे पण त्या त्रिकुटामुळे ती त्याचा थ्री इडीयट्स म्हणतेय ..
बाकी दिल चाहता है मला खुप जास्त आवडलेला सिनेमा..
जिं ना मि दो ओके ओके.. अभय देओल साठी बघीतला ..
हा थिएटर ला जाऊन बघणार नैच बहुतेक.. कारण तेच. शेफाली आणि राहुल बोस शिवाय कोणीच आवडत नै..
अनिल कपुर कधी आवडलाच नै. त्यातही लेटेस्ट मधे मिशन इंपॉसिबल मधे त्यान एक प्लेबॉय बिझनेसमन साकारायच्या नादात जे काही केलेय .. देवा.. याला एखाद्या बिझनेसमन च्या रोल मधे कधीच झेलु शकणार नै मी.. इथ दिसतय कि त्यानं बर्यापैकी काम केलयं पण तरी नकोच.. रणवीर पन नै आवडत सो लॅपटॉप वरच बघणारे ..
सिनेमा पाहिला काल प्रियांका
सिनेमा पाहिला काल
प्रियांका फारच कंट्रोल्ड अभिनय. यशस्वी उद्योजिका जिला फोर्ब्स ने गौरवलं आहे, तरीही घरातुन ( सासर आणि माहेर) रेकग्निशन नसलेली. त्या रेक्ग्निशन साठी आसुसलेली. तरीही आपले सगळे रोल छान निभावणारी. मुर्ख सासुला सांभाळुन घेणारी. खुप वेग वेगळ्या शेड्स.
अनिल कपुर एका सेल्फ मेड बिजनेसमन चा तोरा, पण मार्केट मधली पत पूर्ण पणे हरवुन बसलेला. एक कपल येणार नाही म्हंटल्यावर ८००० युरो वाचले म्हणणारा. डोलारा असह्य झालेला, त्या साठी कोणतीही तडजोड स्वीकारणारा.
रणवीर कधीच आवडत नाही, पण ह्या सिनेमात आवडला, प्रेझेंटेशन करताना उत्तर देता न आल्याने बावरलेला चेहेरा, आपल्याला काय करायचे आहे हे न कळलेला, हॅप्पी गो लकी....
शेफाली अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम...... तिचं किटी मधलं वावरणं, मुला बद्दल अतिरेकी अपेक्शा असणं, नवर्या बद्दलची इन्सीक्युरीटी, त्या फ्रस्ट्रेशन खाणंमुद्दाम फॅटी खाणं, सतत वजनाच्या काळजीत असण्, पार्टीत वावरतानाही सतत एक डोळा नवर्यावर असणं...... खुप सुरेख. एका गुणी अभिनेत्रीला खुप सुरेख रोल मिळाला
झरीना वहाब, राहुल बोस मुद्दामुन तसे दाखवले असावेत.
फरहान चा वावर छान पण हे कॅरॅक्टर उगाचच आहे. त्याची गरजच नव्हती, त्याच्या वीना प्रियांकाचे काही अडावे अशी परीस्थीती नाही. तिला ह्या रीलेशन्शिप चे ओझे झालेलेच असते. त्यात सनी येणे वा न येणे ह्याला काहीच महत्व नाही. ती कोणावरच अवलंबुन नसते. मग त्याची एंट्री फक्त तिला इमोशनल सपोर्ट द्यायला?? आय थिंक त्या पेक्षा तिला एकटं दाखवलं असतं तर जास्त इफेक्टिव्ह झालं असतं...... नाहीतरी ती खुप करीयर माइंडेड दाखवली आहे.... मग काहीच हरकत नव्हती. आजकाल अशा मुली असतात.
ह्या सिनेमाशी मी रीलेट होवु शकले, कारण मी अशा वर्तुळात वावरलेली आहे. त्या वर्तुळातिल लोकांना जवळुन पहिलेली आहे. मला ह्यातली घुसमट लगेच समजली. अशी माणसं एकेकाळी माझ्या आजु बाजुला वावरत होती. इकडे प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी चा असतो बहुतेकदा!!!! सतत ग्रोथ आणि क्रेडिटिबिलीटी च्या टेंशन मधे असणे, त्या साठी काहीही प्रपोजल्स स्वीकारणे, लग्न त्याच साठी करणे इ.इ.इ
>> फरहान चा वावर छान पण हे
>> फरहान चा वावर छान पण हे कॅरॅक्टर उगाचच आहे. त्याची गरजच नव्हती, त्याच्या वीना प्रियांकाचे काही अडावे अशी परीस्थीती नाही. तिला ह्या रीलेशन्शिप चे ओझे झालेलेच असते. त्यात सनी येणे वा न येणे ह्याला काहीच महत्व नाही. ती कोणावरच अवलंबुन नसते. मग त्याची एंट्री फक्त तिला इमोशनल सपोर्ट द्यायला?? आय थिंक त्या पेक्षा तिला एकटं दाखवलं असतं तर जास्त इफेक्टिव्ह झालं असतं...... नाहीतरी ती खुप करीयर माइंडेड दाखवली आहे.... मग काहीच हरकत नव्हती. आजकाल अशा मुली असतात. <<
वेल सेड, मो की मी..!!
इन फॅक्ट मला असं वाटतय की
इन फॅक्ट मला असं वाटतय की प्रियांका ला एकटं दाखवुन आजकालच्या मुलींची मानसिकता दाखवायची एक संधी झोया ने सोडली. कारण आयुष्यात लग्न ही एक घटना आहे एकमेव नाही.... किंबहुना ज्या मुली करीअर करतात त्यांनी एकटे रहाणे ही मानसिकता खुप पटणारी वाटते.
दिव्या सेठ ला एक हि डायलॉग
दिव्या सेठ ला एक हि डायलॉग नाहीये पण तिचे expressions लाजवाब आहेत !
इन फॅक्ट मला असं वाटतय की
इन फॅक्ट मला असं वाटतय की प्रियांका ला एकटं दाखवुन आजकालच्या मुलींची मानसिकता दाखवायची एक संधी झोया ने सोडली. कारण आयुष्यात लग्न ही एक घटना आहे एकमेव नाही.... किंबहुना ज्या मुली करीअर करतात त्यांनी एकटे रहाणे ही मानसिकता खुप पटणारी वाटते....+१
मो का मी , कही तुम मेरी डु आय
मो का मी , कही तुम मेरी डु आय तो नही?
संपुर्ण पोस्टीला मम
मला इ त का बंडल वाटला सिनेमा की मी एक तास भर झोप सुद्धा काढून घेतली थिएटर मधे.
तिकिटाचे पैसे वसून करून घ्यावेत म्हणून.
प्रियांका आणि रणवीर बेस्ट आहेत यात.
फरहानला वाया घालवला (घेतलाच का झोया जाणे)
फार फार फार निराशा केली या सिनेमाने
'शेफाली शाह'ची 'नीलम' the
'शेफाली शाह'ची 'नीलम' the Best! amazing
मीरा... असे एकटीने स्वबळाबर
मीरा... असे एकटीने स्वबळाबर बिझिनेस संभाळणारी व्यक्तीरेखा भारतीय चित्रपटात क्वचितच दिसलीय. कसा का असेना, त्याच्या नावाने कुंकु तर लावता येतंय ना... हीच मानसिकता असते !
मोहन की मीरा >> + १ निलीमा,
मोहन की मीरा >> + १
निलीमा, तुम्हाला '३ इडियटस' म्हणायचे आहे का 'दिल चाहता है'? कारण ३ इडियटस मधे सैफ नाही.
>>
बरोबर टीना दिल चाहता है असेच म्हणायचे आहे.
मोहन की मीरा >> + १ मला आवडला
मोहन की मीरा >> + १
मला आवडला चित्रपट.. फरहानला वाया घालवला हे मात्र खरं
माझा जरा गोंधळ होतोय.
माझा जरा गोंधळ होतोय. प्रियांकाने मस्त काम केले हे समजले पण तिच्या भुमिकेबद्दल जे लिहिले आहे, 'एक कर्तबगार स्त्री असूनही, केवळ एक 'स्त्री' असल्यामुळे तिच्यासोबत सासू, पती व आई-वडिलांकडून होणारा दुजाभाव आणि तो सहन करून प्रत्येक नात्याला पूर्ण न्याय देण्याचा तिचा प्रामाणिक प्रयत्न,' ते हिंदी मालिकेतल्या सहनशील सुनेबद्दल लिहिल्यासारखे वाटत आहे. म्हणजे बहुगुणी पण सर्वांचे ऐकुन घेणारी व मग बाजुला जाऊन मुळुमुळु रडणारी... तर तशी भुमिका नाहिये ना? म्हणजे कर्तबगारी फक्त बाहेर, घरात मुळुमुळु.. असे असेल तर मग जराशी निराशा होईल.
सुनिधी, नाही आहे तशी. तुमची
सुनिधी,

नाही आहे तशी.
तुमची निराशा नाही होणार.
Pages