१. मैदा - १ कप
२. बेसन - २ टीस्पून
३. दही - २ टीस्पून
४. बेकिंग पावडर - ३/४ टीस्पून
५. पाणी - प्रमाण कृतीत
६. तूप/ बटर - २ टीस्पून
७. तळण्यासाठी तेल
८.पाकासाठी -
साखर - दीड कप
पाणी - पाऊण कप
वेलदोडा - १ बारीक कुटून
लिंबू रस - १ छोटा चमचा.
९.जिलेबी पाडण्यासाठी - आयसिंग कोन्/ तळाला छिद्र पाडलेले भांडे/ केचपची बॉटल/ साधा प्लॅस्टीक पिशवीचा बनवलेला कोन.
१. साखर आणि पाणी मिसळून मध्यम आचेवर पाक करून घ्यावा. वेलदोड्याची पूड मिसळावी.
अधूनमधून ढवळत रहावे. एकतारी पाक करून घ्यावा. आच बंद करून पाक बाजूला काढून ठेवावा. पाक घट्ट होऊन त्यात पुन्हा साखर तयार होऊ नये म्हणून एक चमचा लिंबाचा रस मिसळावा.
२. एका खोलगट भांड्यात मैदा, बेसन आणि दही एकत्र करून घ्यावे. जिलेबीला रंग येण्यासाठी अर्धा छोटा चमचा हळद मिसळावी. मग हळूहळू पाणी घालत मिसळावे. पीठ ड्रॉपिंग कंसिस्टंसी येईल असे भिजवावे, म्हणजे, अगदी पाणी नाही पण भज्यांसाठी भिजवतो त्यापेक्षा थोडे घट्ट.
३. १० मिनिटे मिश्रण तसेच ठेवावे. तोपर्यंत तेल तापवून घ्यावे. तेलातच तूप/ बटर टाकावे, त्याने जिलेबीला छान चव येते.
४. मग त्यात बेकिंग पावडर टाकून पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्यावे.
५. तेल चांगले तापल्याची खात्री करून, मिश्रण कोनामध्ये भरून जिलेब्या पाडाव्यात. सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.
६. जिलेब्या बनवणे ही कला आहे,त्त्यामुळे पहिला घाणा बिघडू शकतो. सुरूवातीला लहान वेढ्याच्या जिलब्या पाडाव्यात. त्या चांगल्या जमल्या की मोठ्या म्हणजेच ४-५ वेढ्यांच्या जिलब्या पाडाव्यात.
७. गरम जिलब्या पाकात टाकाव्यात. पाकात १० मिनिटे ठेऊन ताटात काढून घ्याव्यात.
८. गरम किंवा थंड जशा आवडतील तशा गट्टम कराव्यात.
हे फोटो :
१.जिलब्या खूप वेळ पाकात ठेऊ नये, नरम पडण्याची शक्यता. कुरकुरीत, तरीही पाक मुरलेल्या जिलब्या जास्त छान लागतात.
२.मी जिलब्या पाडायला साधा प्लॅस्टीकचा कोन घरी करून वापरला होता. जसा मेहेंदीचा कोन करतो तसाच मोठा कोन करून वापरला तरी चालतो.
छान !
छान !
संपादित . फोटो पाकृ मधे
संपादित . फोटो पाकृ मधे टाकलेत
धन्यवाद दिनेश.
धन्यवाद दिनेश.
मस्त
मस्त
सुरेख दिसतायत जिलब्या!!
सुरेख दिसतायत जिलब्या!!
धन्यवाद जयु आणि रावी
धन्यवाद जयु आणि रावी
मस्त!
मस्त!
मस्त दिसताहेत जिलब्या..
मस्त दिसताहेत जिलब्या.. तोंपासु!
दिसायला छानच दिसताहेत. एखादी
दिसायला छानच दिसताहेत. एखादी उचलुन तोंडात टाकावीशी वाटते.
धन्यवाद मंजूताई, मंजूडी,
धन्यवाद मंजूताई, मंजूडी, पिंगू
पाक काय छान भरलेला दिसतोय
पाक काय छान भरलेला दिसतोय जिलेबीत. खूप आवडली.
सुंदर झालीये जिलेबी
सुंदर झालीये जिलेबी
अरे वा.. फोटो तर छानच ! (
अरे वा.. फोटो तर छानच ! ( त्या प्रतिसादातली लिंक, मूळ पाककृती एडीट करुन त्यात टाकली तर बरे. )
धन्यवाद रश्मी, आशिका, दिनेश.
धन्यवाद रश्मी, आशिका, दिनेश.
त्या प्रतिसादातली लिंक, मूळ पाककृती एडीट करुन त्यात टाकली तर बरे>>> बदल केला
वा! वा! एकदम तोंपासु
वा! वा! एकदम तोंपासु
मस्त!
मस्त!
दक्षिणा, देवकी धन्यवाद
दक्षिणा, देवकी धन्यवाद
मस्तं पाककृती आहे. दुसरा फोटो
मस्तं पाककृती आहे. दुसरा फोटो फार आवडला.
मस्त..खुप छान.
मस्त..खुप छान.
मस्त जमल्यात.
मस्त जमल्यात.
अरे वा.. अगदी मी करून
अरे वा.. अगदी मी करून बघण्यासारखी दिसतेय पाककृती..
फोटोही छान आलेत साक्षी
सुरेख. आमच्याघरी आम्ही जिलेबी
सुरेख. आमच्याघरी आम्ही जिलेबी पाडायला नारळाची करवंटी वापरली होती.
साक्षी, मस्तच फोटो.
साक्षी, मस्तच फोटो.
मस्त आहे पाकृ
मस्त आहे पाकृ
अमेझिंग! गरम जिलबी खूप आवडते
अमेझिंग! गरम जिलबी खूप आवडते हा हू करत खायला. नक्की करणार प्रयोग.
चकलीचा सोवर्या वापरला तर?
धन्यवाद मृण्मयी, सुलेखा,
धन्यवाद मृण्मयी, सुलेखा, मनीमोहोर, बी, आरती, अश्विनी
>>>>अरे वा.. अगदी मी करून बघण्यासारखी दिसतेय पाककृती..फोटोही छान आलेत साक्षी>>> धन्यवाद दाद नक्की करून बघा आणि फोटो टाका
>>>>अमेझिंग! गरम जिलबी खूप आवडते हा हू करत खायला. नक्की करणार प्रयोग.
चकलीचा सोवर्या वापरला तर?>>>> आशूडी, नक्की करा. सोर्या नाही वापरता येणार, इतकं घट्ट नाही करायचं पीठ. चमच्यातून खाली पडलं पाहिजे असं भिजवायचं. करून फोटो नक्की टाका
मस्त.
मस्त.
अमेझिंग........ tondala pani
अमेझिंग........
tondala pani sutal
कवटी का करवंटी?
कवटी का करवंटी?
व्वा! दुसरा फोटो खासच! छान
व्वा! दुसरा फोटो खासच! छान पाकृ!
Pages