पिकल्या केळ्यांचे भरीत

Submitted by काउ on 6 May, 2015 - 13:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तीन पिकलेली केळी

दही

बारीक चिरलेला काम्दा , लसुण

फोडणीचे साहित्य . तेल , मोहरी , जिरे , हळद , हिंग

तिखट , मीठ

क्रमवार पाककृती: 

केळ्यांचे मोठे मोठे तुकडे कापावेत.

फोडणी करुन घ्यावी . त्यात लसुन , कांदा घालुन परतावे . हळद व तिखट घालावे,

कॅळ्यांचे तुकडे घालुन थोडे परतावे. दॉन मिनिटे मंद आचेव. झाकण लावुन शिजवावे.

एका भांड्यात काढुन त्यात दही व मीठ मिसळावे.

वाढणी/प्रमाण: 
१ ते २ लोकांसाठी
अधिक टिपा: 

.

माहितीचा स्रोत: 
प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायु आहे.. सखाराम गटणे.
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.....keli bharit.jpg

पाककृतीत चूक आहे. प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायु आहे हे वाक्य स त कुडचेडकरांचे (केतकि पिवळी पडली चे लेखक) आहे.

तिखट करायला कांदा, लसूण कशाला? मिरची, मिरेपूड चालली असती की!

थोडक्यात, मी हे भरीत, दह्यात मीठ, मिरची, मिरेपूड, किंचीत हिंग मिक्स करुन केळ्याचे बारीक तुकडे घालून करते.

का कोण जाणे केळ्याबरोबर कांदा, लसूण नको वाटतो.

मध्यंतरी केळ्याची मेथीची कोवळी पाने, दही, मीठ, मिरपूड, साखर घालून केलेली कोशिंबीर खाल्ली. त्यात कोशिंबिरीला किंचित तेलातली मोहरी व हिंगाची फोडणी दिली होती. चांगली चव होती.

अरे का त्या केळ्याचा सत्यानाश करताय? खा की नुसतंच. Proud
फारतर दह्यातली कोशिंबीर किंवा शिकरण करा आणि ओरपा पण कांदा, लसूण, मेथी, फोडणी... अरारारा....

च्च, पिकली केळी गोड शिर्‍यात घालून संपवावीत की. केळी+कांदा+लसूण ह्या शिजलेल्या एंड प्रॉडक्टच्या चवीची कल्पनाही करवत नाही.

पिकलेली केळी आवडत नसल्याने पास.
शिजलेल्या एंड प्रॉडक्टच्या चवीची कल्पनाही करवत नाही. >....कच्च्या केळीची ,कांदा खोबरे मिरची मिरी यांचे खडबडीत वाटnaची भाजी मस्त लागते.