फ्लॉवर - बटाटा सुकी भाजी.

Submitted by आरती on 6 May, 2015 - 06:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- १ लहान गड्डा फ्लॉवर
- २ मध्यम आकाराचे बटाटे
- २ हिरव्या मिरच्या
- १/२ चमचा गोडा मसाला
- २ चमचे एव्हरेस्ट शाही बिर्याणी मसाला
- १ लसूण पाकळी
- फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हळद, हिंग
- चवीप्रमाणे मीठ, साखर (एक चिमटी)

क्रमवार पाककृती: 

फ्लॉवर-बटाट्याचे मोठे-मोठे तुकडे करून धुवून निथळून घ्या. मिरचीला उभे काप देऊन घ्या. (मी लाल ओली मिरची वापरली आहे)
तेल तापवून, त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर आच एकदम कमी करा. आता जिरे, हळद, हिंग, हिरवी मिरची घाला. लसूण पाकळी किसून, गोडा मसाला आणि बिर्याणी मसाला सगळे तेलात घालून थोडे परतून घ्या. साखर-मीठ घालून एकत्र करा. फ्लॉवर-बटाटा घाला. आच मोठी करून भराभर हलवा. धुतलेल्या भाजीत जे थोडे पाणी राहिले असेल ते सगळे निघून जाईल. आता पुन्हा आच कमी करून २ मिनिट झाकण घालून आणि नंतर झाकण न घालताच नुसती तेलावरच शिजू द्या. खुप मऊ शिजवायची नाहीये. हवी असल्यास कोथिंबीर घाला.

ही भाजी केवळ त्या बिर्याणी मसाल्यामुळे एकदम शाही होते. पार्टीला सुकीभाजी म्हणून करावी इतकी मस्त लागली. (आणि म्हणूनच अगदीच साधीशी असून इथे टाकावीशी वाटली). शिवाय सकाळच्या गडबडीतही करता यावी इतकी झटपट झाली.

शेवटची ताटात वाढुन घेतल्यावर फोटो काढायचे सुचले.
fllower bhaji.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ माणसांना एक वेळच्या जेवणाला पुरली.
अधिक टिपा: 

मी सगळे घटक अंदाजे घातले होते. इथे प्रमाण लिहिताना साधारण आठवून लिहिले आहे.
भाजी करताना ती इतकी मस्त लागेल असे वाटले नव्हते त्यामुळे मोजले नव्हते.. नेहमीच्या मिरची-काडीलींब फोडणीतला फ्लॉवर-बटाटा खाऊन कंटाळा आला म्हणून हा प्रयोग केला.

ही भाजी थोडी चमचमीत होते. कमी तिखट खाणार्‍यांनी मिरची एकच वापरावी आणि बिर्याणी मसाला पण थोडा कमीच घालावा.

माहितीचा स्रोत: 
माझाच प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! मस्त दिसतीय भाजी. आरती, नवीन पर्याय सुचवल्याबद्दल धन्यवाद.:स्मित: नाहीतर फ्लॉवर फार कन्टाळवाणा होतो काही वेळा.

छान भाजी.. पंजाबी घसिटाराम हलवाईच्या हॉटेलमधे असायची हि भाजी. अजिबात पाणी न घातल्याने मस्त चव येते.

फ्लॉवरच्या भाजीसाठी सगळे दिवस आणि कुठलीही वेळ शुभच (त्यांच्यामते)

(वरती कंटाळाच्या ऐवजी 'वैताग' लिहीणार होते Happy )

फार कन्टाळवाणा होतो काही वेळा.>>
रश्मी, अगदी.

भाजी फारच मस्तं दिसतेय. बिरयानी मसाला घालून करून बघते.

>>फ्लॉवरच्या भाजीसाठी सगळे दिवस आणि कुठलीही वेळ शुभच (त्यांच्यामते) Lol

बटाट्या ऐवजी दुधी भोपळा, फ्लावर ऐवजी पालक, आणि शाही बिर्याणी मसाल्याऐवजी हिरव्या मिरच्या घातल्यास होईल का ही भाजी?
(घटक बदलण्याची आपली पध्दत आहे, म्हणून विचारतो.. ) Proud

शाही बिर्याणी मसाल्याऐवजी हिरव्या मिरच्या?? ही कसली एक्स्चेंज ऑफर आहे नक्की? Happy निदान छोले मसाला किंवा गेला बाजार सांबार मसाला तरी सुचवायचंत, गोगा Proud

मस्त फोटो.
आमच्याकडे फ्लॉवर-बटाटा सुकी भाजी एव्हरेस्टचाच किचन किंग मसाला घालून होते. आता अशीही करुन पाहीन.

गो.गा.,
न चालायला काय झाल ... कोथिंबीरी ऐवजी मुळ्याचा पाला असेल तर तो ही चालेल (घरात असेल तर) Wink

बाकी भाजी थोडी चमचमीत होते हे सांगायचे राहीलेच. कमी तिखट खाणार्‍यांनी मिरची एकच वापरा आणि बिर्याणी मसाला पण थोडा कमीच घालावा. वरती पण बदल केला आहे.

अगो,
मी किचन किंग कधीच वापरला नाहीये, एकदा आणुन बघते. अजुन कोणत्या भाज्यांना वापरतेस तो ?

आरती, एवरेस्टचा किचन किंग मसाला परतून करण्याच्या कुठल्याही भाजीला चांगला लागतो.

एवरेस्टचाच चिकन करी मसाला वापरून कांदा, बटाटा, गाजर, फरसबी, वाटाणा, फ्लॉवर अशी मिक्स भाजी, परतून केलेली अप्रतीम लागते. बाकी काहीही नाही घालायचं यात. फक्त हा एकच मसाला, नो हळद, नो लसूण, नो आलं. ओलसरपणा हवाच असेल तर एखादा टोमॅटो बारीक चिरून फोडणीत परतून घ्यायचा.

अगो +१
आरती, परवाच की किंग मसाला वापरून ही भाजी करताना की किंग म ऐवजी हैदराबादी शा बि मसाला घालावा अस मनात आल पण लेकींना बदल न चालल्यास काय करणार असा विचार करून मोह आवरला..(इतरवेळी त्यांना आहे ते खावेच लागते पण सध्या परिस्थिती वेगळी आहे)
आता करतेच एकदा वीक एंडला! धाकटीला अगदी रो ज फ्ला भाजी हवी असते.

आमच्याकडे फ्लॉवर-बटाटा सुकी भाजी एव्हरेस्टचाच किचन किंग मसाला घालून होते.>>>+१

आता शाही बिर्याणी मसाला घालून पाहीन.

आरती,मस्त रेसिपी, फ्लॉवर माझा आवडता, ह्या पद्धतीने करेन.
एव्हरेस्टचाच किचन किंग मसाला घालून होते + १ फोडणीत, कांदा, टोमॅटो घालून बेबी कुकरमध्ये मस्त होते.
पाणी घालून केलेली फ्लॉवर भाजी मला नाही आवडत.

धन्यवाद योकु. किचन किंग आणला की एकदा तुझ्या पद्धतीने करून बघेन.

दक्षिणा,
कांदा लसुण नसलेला एखादा स्टॉंग चविचा मसाला वापरून बघ.

गोगा
तुमची ईच्छा पुर्ण झाली Happy

सगळ्यांना धन्यवाद. करून बघीतल्यावर कळवा नक्की.

आज केली आहे. चव आवडली, मसाला मी घाबरत घाबरत घातला होता, आणखी थोडा चालला असता. थोडी आमचूर पावडरही मस्त लागेल यात.
पण तुझी भाजी बरीच पिवळी दिसत आहे, माझी मसाल्यामुळे चॉकलेटी दिसतेय चक्क! Uhoh

मीही केली.. माझी फोटोत दिसतेय तितकी मसालेदार नाही झाली. पण चवीला बरीय. पाण्यात शिजवलेल्या पाणचट फ्लॉवरपेक्षा कैकपटीने चांगली.

आरती आज मी ही भाजी करून पाहिली. Happy
phpeXY0eyAM.jpg

माझ्याकडे शाही बिर्याणी मसाला नव्हता, सांबार आणि छोले मसाला होता. लाल मिरच्या पण नव्हत्या. मग मी सांबार + छोले मसाला आणि हिरव्या मिरच्या वापरून केली भाजी. आणि हो मी कांदा पण घातला होता. मस्त झाली होती. आवडली मला. Happy
पूनम सारखीच माझी भाजी पिवळी नाही झाली, साधारण चॉकलेटीसरच रंग आला होता.

करेक्ट दक्षिणे, साधारण असाच रंग आला होता माझ्या भाजीलाही, अजून थोडा डार्कच. माझ्याकडे सुहाना बिर्याणी मसाला आहे. पण मसाला मसालेदार नाहीये, स्वाद छान आहे.

माझी मात्र पिवळी झालेली. मी शानचा बिर्याणी मसाला वापरला... (जो कोणी शान असेल तो मेला असेल हे वाचुन, त्याने बिर्याणि मसाला बनवला कशासाठी आणि मी त्याला जागा दिली कुठे Happy )

दक्षिणा,
तुझ्या भाजीचा रंग वेगळा येणारच कारण मसालाच वेगळा आहे. सांबार आणि छोले दोन्ही मसाले थोडे लालसरच असतात. शाही बिर्याणी आण आत एकदा Happy
मिरच्या हिरव्याच घालायच्या आहेत. माझ्या हिरव्याच्या लाल झाल्या होत्या म्हणुन लाल घातल्या Happy

पूनम, माझा मसाला अगदी बारीक नव्हता, बराच खडा होता त्यात. त्यामुळे ब्राऊन कलर न येता आधीचा हळदीचा पिवळा टिकुन राहीला. (हळद मी तेलात घातली होती )

साधना,
भाजी आवडली असेल तर शानला काय वाटायचे ते वाटु दे Happy

Pages