माय चॉईस "दिपीका" :-)

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 April, 2015 - 14:45

कदाचित आतापर्यंत बहुतेकांनी यूट्यूबवर दिपीकाचा "माय चॉईस" विडिओ बघून झाला असेल.
नाही, तर मग आता बघा.

बस्स ३-४ मिनिटेच लागतील, पण यातच बरेच काही सांगून जाणारा...

https://www.youtube.com/watch?v=KtPv7IEhWRA

फक्त हा विडिओ बघताना तुम्ही मराठी वा महाराष्ट्रीय आहात, शहरातले वा खेड्यातले आहात, भारतीय वा एनआराय आहात वगैरे थोडावेळ बाजूला सारून फक्त एक स्त्री किंवा पुरुष आहात हेच ध्यानात ठेवून बघा.

दोनचार दिवसांतच लाखो हिटस मिळालेल्या या विडिओबद्दल मी तुर्तास ईतकेच म्हणेन,
मला आवडला!

ईतरांचे विचार जाणून घ्यायलाही आवडतील, पण मत मांडायच्या आधी विडिओ जरूर बघा.

असो, त्या निमित्ताने चार शब्द दिपीकाबद्दल.

दिपीका प्रकाश पदुकोन!
स्टार बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोन यांची मुलगी म्हणून माझी तिच्याशी पहिली ओळख झाली.
आजही ती त्यांचीच मुलगी आहे, पण तिने त्याहीपेक्षा मोठी अशी स्वताची ओळख निर्माण केली आहे.
काय, कशी, किती, हे नव्याने कोणायला सांगायची गरज भासू नये. ईतकी मोठी.
पण एक नक्की, हा विडिओ तीच करू शकते, हे विचार तीच मांडू शकते..

तिच्या अभिनयाचा, दिसण्याचा, स्टाईलचा, ड्रेसिंग सेन्सचा, स्मार्टनेसचा.. अ‍ॅण्ड येस्स, मी प्रचंड मोठा फॅन आहे ते तिच्या अ‍ॅटीट्यूडचा!

बॉलीवूड कलाकार वा सेलिब्रेटींना अफेअर्स काही नवीन नाहीत,. पण त्यातही, आपल्याकडे पुरुषांचे एकापेक्षा जास्त अफेअर्स त्यांना कूल डूड बनवतात तेच स्त्रियांच्या बाबतीत त्यांना कॅरेक्टरलेस ठरवतात., बस्स याच नियमाला ती सर्वार्थाने तडा देणारी वाटली, नेहमीच!

तिचे आजवर ज्याच्या कोणाशी नाव जोडले गेले, त्यात नेहमीच, मला तिचा तो वाटला तिची "माय चॉईस!" ..

तिने आपल्या मर्झीने नाती जोडली, तिने आपल्या सोयीने सारी बंधने दूर सारली. पण ना कसला कलंक ना कोणता दाग. आजही ती बॉलीवूडची ग्लॅमरस डॉल म्हणून ओळखली जाते. सर्वांना हवीहवीशी वाटणारी हिरोईन. कारण तिची डिग्निटी तिने शाबूत ठेवलीय. नव्हे, काय कोणाची बिशाद त्याला धक्का पोहोचवायची.

बस्स, या विडिओमध्ये एक दिपीका पदुकोन होती म्हणूनच हा विडिओ मला तरी कुठल्याही प्रकारचा पब्लिसिटी स्टंट वा ढोंग वा दुटप्पीपणा वाटला नाही.

तिने अभिनयक्षेत्र निवडले म्हणून तिने जे जे केले त्याची चर्चा झाली, पण ईतर कुठल्याही स्त्रीने आपल्या आयुष्यात तिच्यासारखा अ‍ॅटीट्यूड आणि कॉन्फिडन्स बाळगून जगायला हरकत नाही. मग क्षेत्र कोणतेही असो.

याचा अर्थ तिने आपल्या आयुष्यात जे केले तेच केले पाहिजे असे मुळीच नाही, ईनफॅक्ट ते जर तुमच्या तत्वात बसत नसेल तर मुळीच करू नका, आफ्टरऑल ईट्स "युअर चॉईस".. Happy

जाता जाता एवढेच सांगेन,
ती अशी आहे जिचा प्रत्येक पुरुषाला हेवा वाटावा,
तो हि ईतका, की जर त्याला पुढचा जन्म स्त्रीचा मिळणार असेल तर त्याने देवाकडे तो दिपीकाचा मागावा.

....................

तळटीप - यात कुठल्याही प्रकारचे सर्कास्टिकपणा वा उपरोध शोधायला जाऊ नका. Happy
त्यापेक्षा बघितला नसल्यास विडिओ बघा,
हि घ्या पुन्हा एकदा लिंक - https://www.youtube.com/watch?v=KtPv7IEhWRA

- ऋन्मेष

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< तुम्ही कधी कोणाच्या प्रेमात पडला आहात का सर?

असाल तर चाहत म्हणजे काय असते हे वेगळे उलगडून सांगायला नको >>

पडलोय. दोन दशकांपूर्वीच. ती देखील सेलेब्रिटीच आहे, पण तितकीशी लोकप्रिय आणि यशस्वी नाही. तिच्याबद्दलच्या माझ्या भावना मी माझ्यापाशीच ठेवल्यात. अर्थात माझ्या भावना मी लपविल्यात असे नाही. माझ्या घरच्यांना आणि जवळच्या मित्रांना तिच्याविषयी ठाऊक आहेच पण इतर सर्वांपर्यंत या भावना पोचाव्यात अशा पद्धतीने फोरमवर लिहून मी त्या सार्वजनिक केल्या नाहीत, अन्यथा त्यांचीही अशीच चिरफाड झाली असती. कारण सरळ आहे ती मला जितकी महान वाटते तितकी समाजातील इतरांना नक्कीच वाटत नाही.

<< तर या समाजात एक व्यक्ती म्हणून वावरताना पुरुषांना जे आपल्या आयुष्याचे वैयक्तिक निर्णय घ्यायचे हक्क असतात तसेच ते स्त्रियांनाही आहेत. यात इतरांनी ढवळाढवळ करू नये, त्यावरून आम्हाला जज करू नये, इटस नन ऑफ युअर बिजनेस.

यात एखादी मुलगी आपल्या नवर्याविरुद्ध बंड करतेय असे कुठेही नाही. >>

इतर लोक खरंच ढवळाढवळ करतात? जॉन आणि बिपाशा लग्नाशिवाय एकत्र राहतच होते, कित्येक वर्षे. मी तरी त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला गेलो नाही. तुम्हीदेखील गेला नसालच. आपल्या मायबोलीकरांपैकी इतर देखील कुणी गेल्याचं मला ठाऊक नाही. मग ढवळाढवळ काय असते?

जज् करणं म्हणजे काय? एखादी व्यक्ति जी प्रसिद्ध (सेलेब्रिटी) आहे, तिच्या लहानसहान बाबींची सामान्य लोकांच्या तूलनेत मोठ्या प्रमाणात सार्वजनिक रीत्या चर्चा होतच राहते. म्हणजे मला दीड वर्षांपूर्वी विषमज्वर (टायफॉईड) झाला, मी अगदी जगतोय की मरतोय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आजही मी त्यातून पूर्ण बरा झालेलो नाहीये, पण याची कुठे चर्चा नाही. सोनम कपूरला स्वाईन फ्लू झाला तर त्याची मात्र सर्व वर्तमानपत्रांमध्ये चर्चा आहे. ही सेलेब्रिटी असण्याची अपरिहार्य वास्तविकता आहे. नटी आजारी पडली तर तिची बातमी होते. चाहते शुभेच्छा देतात. तसेच ती कोथरूडसारख्या उपनगरांमध्ये रात्री उशिरा अल्पवस्त्रांमध्ये मद्याच्या अमलाखाली लडखडत पळताना आढळली तर त्याचीही बातमी होतेच. लोक ती चवीने चघळताना तिच्याविषयी स्वतःचे मत व्यक्त करतात. तिला चावडी गप्पांमध्ये कदाचित चार शिव्यादेखील घालतात. याला जज करणे म्हणतात का? तिच्या पाठीमागे तिला शिव्या घालणारे तिला प्रत्यक्ष समोर जाऊन कधीच काही सुनावत नाही हे देखील तितकेच खरे नाही का? मग तिला काय फरक पडतो? तिचं वागणं तिचा चॉईस मग जज् करणं लोकांचा चॉईस. एखादाच माथेफिरू कधी तरी कुणा गौहर खान सारख्या नटीवर हात उगारतो. अशा वेळी त्याला कायदेशीर रीत्या शिक्षादेखील होतेच की. (शिवाय हा त्या नटीचा किंवा चॅनेलच पब्लिसिटी स्टंट देखील असतो). इतरवेळी मग या अपरोक्ष जज करण्याचं नटीला काही सोयरसुतक असू नये.

पण ज्याला काही फरक पडतोय त्यानं जज् केलं तर? म्हणजे समजा एक मोठा चित्रनिर्माता आहे आणि त्याला रामायणावर मालिका बनवायची आहे आणि त्यात सीतेच्या भूमिकेकरिता नटी निवडायची आहे. त्याने समजा एखाद्या नटीला निवडलं आणि उद्या तिनं दुसरीकडे एखादं बोल्ड फोटोसेशन केलं तर त्यावरून तिला जज करीत त्या निर्मात्याने तिला सीतेच्या भूमिकेपासून बेदखल केलं तर? अशा वेळी निर्मात्याच्या जज् करण्याचा त्या नटीला नक्कीच फरक पडेल. पण त्यावेळी हेदेखील मान्य करायलाच हवं की अशा प्रकारे जज् करण्याचा हक्क निर्मात्याला जरूर आहे.

तसंही पैसे मिळत असले की नट्यांचा चॉईस आपोआप संकुचित होतो. हे वाचा:-

http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31835&articlexml=090...

पूर्ण बाफ वाचायचा लय कटाळा आला. ए ऋन्मेष तुझ्या गफ्रेचे काय मत आहे रे या बाफाविषयी आणी दिपीकाविषयी?

ह्या स्क्रिप्टमधे एक गोष्ट नमूद करायची होती: लग्नानंतर नवर्‍यासोबत से# करायचे की नाही करायचे ही पण माझी निवड असेल. कित्येकदा नवरा बायकोवर बळजबरी करुन तिच्यासोबत से# करतो.

अवांतर.....
>>>> यांची मुलगी म्हणून माझी तिच्याशी पहिली ओळख झाली. <<<<
कधी? कुठे? कशीकाय?

मुद्याचे.....
मला दीपिका पदुकोण आवडते, तशीच इशा गोएलही आवडते, खरे तर सगळ्याच नट्या आवडतात... हो ना! उगाच कशाला दोष काढीत बसावे माणसाने? कोल्ह्याला द्राक्षे आंबट अशा पद्धतीने? नै का? Proud Wink

अन प्रकाश पदुकोण तर आमच्या वेळचा स्पोर्ट्समधील हिरो होता... Happy त्याकाळी म्हणजे १९७६/७७ च्या सुमारास सातारच्या नगरपालिकेच्या स्टेडियममधिल बॅडमिंटन वुडन कोर्टचे उद्घाटन त्याच्या हस्ते झाले होते.

परत अवांतर.....
मी व्हिडिओ बघितला नाही, मी त्याबद्दल बोलणार नाही (हे "मी शेन्गा खाल्या नाहित, मी टरफले उचलणार नाही" या चालीत वाचावे ही नम्र विनंती)
हापिसात यूट्यूब ब्यान आहे ना Sad मग्ग काय करू?

टीव्हीवर असेल. नवीन टेक्नॉलॉजीचा टीव्ही दिसतोय. वॉकीटॉकीसारखी दोन्ही बाजूंनी बोलण्याची सोय Proud

कदाचित आतापर्यंत बहुतेकांनी यूट्यूबवर दिपीकाचा "माय चॉईस" विडिओ बघून झाला असेल>>
आम्हाला हे असले टुकार व्हिडीओ बघण्यात आमचा वेळ घालवायचा नाही. सो याला पास.

पार भुस्काट पाडलंय राव इशयाचं.. आधिच जीव उलीउलीसा त्यात रवंथ करीत बस्त्यात समदी , गुरं डोरं फतकल मारून बसत्यात का न्हाई, अक्षी तसं

चौकट राजा, तो मेसेज नवर्‍याला, बॉयफ्रेण्डला उद्देशून नाही. संबंध नसताना जे लोक जज करतात त्यांना उद्देशून आहे. त्या दृष्टिकोनातून पाहून बघा.>>

आहे संबंध! उदा: १) मी अमुक वेळी घरी येणार ही माझी निवड. २) तुझे मुल ठेवायचे की नको ही माझी निवड ३) समागन मी विवाहपुर्वी की बाह्य करायचे ही माझी निवड.

ह्या ज्या ओळी आहेत हे असे आपण फक्त ज्यांच्याशी आपला संबंध येतो त्यांच्याशीच बोलतो.

बी, तो मेसेज म्हणजे विवाहबाह्य संबंधाबद्दलचा तो नवर्‍याला, बॉफ्रेला उद्देशून नाही.

बी, तो मेसेज म्हणजे विवाहबाह्य संबंधाबद्दलचा तो नवर्‍याला, बॉफ्रेला उद्देशून नाही.>> अच्छा. पण मला वाटत तुझे ते वाक्य वाचून ही सगळी संहिता आपल्याशी संबंध असणार्‍याला उद्देशून नसून तरीही आपल्याला जज करणार्‍या इतर लोकांसाठी आहे असे वाटले असेल. धन्यवाद.

दीपिकाचा व्हिडिओ ही त्याची व्यावसायिक कारणे (ह्याबाबत नंतर) बाजूला ठेवली तर एका विशिष्ट वर्गातील स्त्रीची बाहेर पडलेली खदखद आहे. हा विशिष्ट वर्ग कोणता, तर साधारणपणे आज ज्या मुली तिशीच्या किंवा कमी आहेत, बर्‍यापैकी सधन आहेत, व्यवस्थित शिक्षण मिळालेल्या आहेत, नोकरी करत आहेत किंवा स्वेच्छेने करत नाही आहेत, ज्यांचे आई वडील समाजातील विकसित, प्रगत थरात मोडतात आणि ज्यांना इंग्लिश येत आहे. ह्या मुलींना अनेक प्रश्न भेडसावत आहेत, जसे कुटुंबव्यवस्था का हवी, नवरा अधिक महत्वाचा का वगैरे! हे प्रश्न ह्याहून वयाने मोठ्या किंवा ह्याहून वेगळ्या परिस्थितीतील स्त्रियांना नसतात असे नाही तर त्याबाबत स्वतःहून काही करण्याची त्यांची वेळ तरी गेलेली असते किंवा क्षमता तरी नसते.

विवाहबाह्य संबंध, विवाहपूर्व संबंध, समलिंगी संबंध ह्याबाबत 'माझा निर्णय' अंतिम असेल इतका साधा हा मेसेज आहे. अर्थातच, ह्या तीनशिवाय इतर कित्येक विषयांमध्येही 'माझा निर्णय' अंतिम असेल हा संदेश आहे, हेही आहेच. येथे चर्चा प्रामुख्याने ह्या तीन घटकांवर झालेली दिसते म्हणून तेवढेच नोंदवले. इंग्लिशमधील 'माय चॉईस'चे भाषांतर मराठीत 'माझी निवड' असे करण्यापेक्षा 'माझा निर्णय' असे केले जावे असे ह्या व्हिडिओतून आग्रहाने व अप्रत्यक्षपणे पण मुद्दलात सांगितले गेलेले दिसते.

आता हा संदेश इतर करोडो, वेगळ्या पार्श्वभूमीत व वयोगटात असलेल्या महिला / मुलींना तसाच्या तसा लागू होत नाही हे मान्य! पण असा एक व्हिडिओ निघाला, तो काय आहे ते बघितले आणि त्याबद्दल काहीतरी मत निर्माण झाले इतक्या प्रक्रिया तरी ह्या व्हिडिओने ट्रिगर नक्कीच झाल्या असतील. मग ती ती मुलगी तिच्या तिच्या परिस्थितीत कोणते निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळवू शकते इतका तरी विचार सुरू होतो. आज दीपिका असे म्हणत आहे, उद्या त्या मुलीच्या बघण्यातील एखादी मुलगी लग्नानंतर 'मूल नकोच' हा निर्णय अंंमलात आणताना तिला दिसेल. खूप हळू, पण ठाम बदलांची प्रक्रिया सुरू करण्याइतके श्रेय तरी व्हिडिओला (फक्त दीपिकाला असे म्हणत नाही आहे) द्यायला हवे. कदाचित एखादी मुलगी जीन्स घालू लागेल, एखादी दोन मुलांशी गप्पा मारू लागेल, एखादी प्रौढ विवाहीत स्त्री चक्क गणपतीच्या मिरवणूकीत नाचून पाहील. काहीही घडेल पण ते नक्कीच त्या त्या व्यक्तीसाठी लहानसे तरी स्वातंत्र्यच असेल. त्यामुळे हा व्हिडिओ आजच्या युगात आवश्यक झाला होता व दिलेल्या अडीच मिनिटांच्या अल्प अवधीत बरेच विचार त्यात प्रभावीपणे नोंदवलेही गेले. हा व्हिडिओ नसताच तर जे चालले आहे ते चालले असतेच, पण हा व्हिडिओ आल्यामुळे निदान 'आपण निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत' हा मेसेज तरी झिरपत आहे.

आता दीपिका - दीपिका आघाडीची हिरॉईन आहे व तिने हा व्हिडिओ करून स्वतःची प्रसिद्धीही प्राप्त केली आहे ह्यात वाद नसावा. पण हेच कॅत्रिना, सोनाक्षी सिन्हा वगैरेही करायला मोकळ्या होत्या. विद्या बालन स्त्रियांसाठीच्या शौचालयांच्या प्रसाराच्या जाहिरातीत दिसत आहे. एका जाहिरातीत एक सासू सुनेला क्रिकेट मॅच बघायला इथेच बस म्हणत आहे. पण कॅतरिना हापूस आंब्यांच्या पलीकडे पोचलेली नाही. हाही अर्थातच ज्याचा त्याचा चॉईसच! पण त्यातच दीपिकाचा चॉईस (प्रसिद्ध होण्यासाठी का होईना समाज प्रबोधन करणे - कदाचित उलटेही असू शकेल) अधिक भावतो. तिने असे काही म्हंटले की ती प्रसिद्धीच्या मागे आहे म्हणण्यापेक्षा तिने एक पाऊल तरी उचलले असे म्हणता येईलच की?

व्यावसायिक कारणे - ह्या व्हिडिओशी संबंधीत सगळ्यांचीच चांदी झालेली असेल. पण टॉपलेस फोटो देऊन किंवा प्रिन्स चार्ल्सचा किस घेऊन प्रख्यात होण्यापेक्षा हे काय वाईट?

दीपिकाला / व्हिडिओला अपेक्षित असलेल्या प्रेक्षकांच्या स्तरापेक्षा वेगळे स्तर ढवळून निघावेत असे निदान वाटू तरी लागले आहे ना? हेही नसे थोडके.

पण मला वाटत तुझे ते वाक्य वाचून ही सगळी संहिता आपल्याशी संबंध असणार्‍याला उद्देशून नसून तरीही आपल्याला जज करणार्‍या इतर लोकांसाठी आहे असे वाटले असेल. धन्यवाद. >> हो बी तुझा पॉइंट बरोबर आहे. मान्य.

@ ऋन्मेऽऽष,

चक्क चोवीस तासांहूनही अधिक उलटले तरी प्रतिवाद करणारा एकही नवीन प्रतिसाद नाही? तब्येत बरी आहे ना?

https://www.youtube.com/watch?v=SGamruyyYzI

हा वर दिलेला एक असा व्हिडिओ आहे जो असे वाटायला लावतो की दीपिकाच्या व्हिडिओसारख्या व्हिडिओंचा भडिमार व्हायला हवा आहे.

@ ऋन्मेऽऽष,

चक्क चोवीस तासांहूनही अधिक उलटले तरी प्रतिवाद करणारा एकही नवीन प्रतिसाद नाही? तब्येत बरी आहे ना?

>>>>

ऑफिसकामात बिजी, मोठे प्रतिसाद लिहिता येत नाही, पण येतील, तुर्तास वाचून नोंद करून ठेवतोय Happy

लोकांनी जज करु नये एवढच सांगायचं होतं तर फारच ड्रामा केलाय.

>> तिने फक्त एक व्हिडिओ केला अडीच मिनिटांचा.. सगळा ड्रामा तर तो बघणार्‍या लोकांनी (ज्यांना व्हिडिओ आवडला किंवा न आवडला दोघांनीही) केला.

पहिल्यांदा जेव्हा व्हिडिओ बघितला तेव्हा ते समस्त पुरुषवर्गाला उद्देशुन आणि स्त्रीवर्गाला प्रेरित करायच्या उद्देशाने म्हटले आहे असेच वाटले. (फक्त नवर्‍याविरुद्ध किंवा बॉयफ्रेंड विरुद्ध नाही)

>> बरं

मग परत बघताना दिपिका ज्या प्रकारे सांगते ते म्हणजे समोरच्याला अगदी पाय आपटुन ठाम प्रत्युत्तर देते आहे असे वाटले आणि त्याची गरजच काय असा प्रश्न पडला.

>> एकतर तिचा जो टोन आहे (मग तो विनम्र असेल नाहीतर प्रचंड अरोगंट), तो संपुर्ण व्हिडिओभर सेम आहे. तुम्हाला संस्कृतीबुडवी वाटतील अशी वाक्य ती बोलायला लागल्यावर अचानक तुम्हाला तिचे पाय आपटतांना वगैरे दिसायला लागले. प्रत्यक्षात तुम्हाला ती वाक्य सहन झाली नाहीत.

मी मला वाटेल तसे कपडे घालीन, हवे तसे राहीन इ. इ आणि म्हणून मला जज करु नका असं जोरात म्हणून काय साधलं?

>> पुन्हा तेच. ती जोरात बिरात म्हणाली नाही. ती शांतपणे म्हणाली. पण तुम्हाला योग्य त्या ठिकाणी लागलं. आणि तेही जोरात.

समाज आहे तो.. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ह्या न्यायानी एकाच गोष्टीचे निरनिराळे अर्थ लावणारच लोक. ह्या आधीही तसे होते आणि ह्यापुढेही तसेच असेल. ते बरोबर नाहीच.

>> जर ते बरोबर नाहीये हे तुम्हाला पटतंय तर परीस्थिती बदलण्यासाठी तुम्ही काय करताय? तिने प्रयत्न केल्यावर जजच करताय ना तिला?

आणि अजुनही मला वाटते कि दिपिका समाजाच्या ज्या वर्गात मोडते तिथे तिला हा प्रश्न नाहीच आहे.

>> म्हणुन अर्ध्याहुन अधिक लोक तिने काय सांगितलंय यावर बोलण्यापेक्षा "ती अशीच आहे. ती तशीच आहे." असं दिपिकाला झोडपत सुटलेत? तिचं यश स्वकर्तृत्वाने मिळवलंय कि बि*गिरी करुन यावर बोलताहेत?

अश्या प्रकारे सांगितल्यास मूळ संदेश योग्यप्रकारे व योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचतच नाही आहे.

>> मग तुम्ही सांगा योग्य प्रकारे.

असो. वाटले होते त्यापेक्षा फारच फुसका बार निघाला.

>> नक्की ठरवा. फुसका बार आहे कि जोरजोरात ओरडली आहे कि अजुन काही?

चेतनजी,
आपण प्रेम केलेत, पण प्रेमात ती मर्यादा नाही गाठलीत जिथे इतर दुनियेची पर्वा सोडून आपल्या जगात फक्त ती आणि आपणच असतो. मग ते प्रेम पब्लिक फोरमवर व्यक्त करतानाही कोणाला आपल्या भावनांची कदर आहे की नाही वा कोणी त्याला हसत तर नाही ना याचा काही फरक पडत नाही आपल्याला, नव्हे ते हसणारे आपल्या खिजगणतीतही नसतात ..

मला जगण्याचा फक्त एकच मार्ग माहीत आहे, सतत कोणाच्या ना कोणाच्या प्रेमात राहणे..

आणि मला प्रेम करण्याचाही एकच मार्ग माहीत आहे, ते अमर्याद करणे !

स्वतंत्र धाग्याचा विषय आहे हा, पुन्हा कधीतरी नक्की Happy

तुझे मुल ठेवायचे की नको ही माझी निवड
>>>>>

बी आपणच आधीच्या एका पोस्टमध्ये लिहिले होते की...

<<ह्या स्क्रिप्टमधे एक गोष्ट नमूद करायची होती: लग्नानंतर नवर्‍यासोबत से# करायचे की नाही करायचे ही पण माझी निवड असेल. कित्येकदा नवरा बायकोवर बळजबरी करुन तिच्यासोबत से# करतो.>>>

माझ्यामते हे मतितार्थाने एकच आहे.

<< आपण प्रेम केलेत, पण प्रेमात ती मर्यादा नाही गाठलीत जिथे इतर दुनियेची पर्वा सोडून आपल्या जगात फक्त ती आणि आपणच असतो. मग ते प्रेम पब्लिक फोरमवर व्यक्त करतानाही कोणाला आपल्या भावनांची कदर आहे की नाही वा कोणी त्याला हसत तर नाही ना याचा काही फरक पडत नाही आपल्याला, नव्हे ते हसणारे आपल्या खिजगणतीतही नसतात ..

मला जगण्याचा फक्त एकच मार्ग माहीत आहे, सतत कोणाच्या ना कोणाच्या प्रेमात राहणे..

आणि मला प्रेम करण्याचाही एकच मार्ग माहीत आहे, ते अमर्याद करणे ! >>

तेवढं तर तुम्हीदेखील नाही केलंत. मागे मी तुम्हाला मस्त चित्रपटाचं उदाहरण दिलं होतं. आवडत्या नटीकरिता तो तिच्या घरासमोरच्या हॉटेलात भांडी घासतो, पण जिद्दीने तिला मिळवितोच. मला हे नक्कीच जमणार नाही, कारण मी वास्तवात जगतो आणि वास्तव हे आहे:-

https://www.youtube.com/watch?v=FFW6dBHPcTo

असो, पण हे तुम्हाला देखील जमणार नाहीच कारण तुम्ही कायमच एकीच्या नव्हे तर सतत कोणाच्या ना कोणाच्या प्रेमात राहणे.. यावर विश्वास ठेवताय.

तेवढं तर तुम्हीदेखील नाही केलंत. मागे मी तुम्हाला मस्त चित्रपटाचं उदाहरण दिलं होतं. आवडत्या नटीकरिता तो तिच्या घरासमोरच्या हॉटेलात भांडी घासतो, पण जिद्दीने तिला मिळवितोच.
>>>>>>>

फरक आहे. तो त्या नटीचा चाहता नसून त्याचे त्या नटीवर प्रेम होते. माझी तशी केस असती तर मी ते नक्कीच केले असते, नव्हे आयुष्यात यापेक्षाही बरेच काही प्रेमासाठी करून झाले आहे.

.....

तुम्ही कायमच एकीच्या नव्हे तर सतत कोणाच्या ना कोणाच्या प्रेमात राहणे.. यावर विश्वास ठेवताय.
>>>>
हो,
पण एकावेळी एकीच्याच प्रेमात असतो, बस्स ती सर्व प्रयत्न करूनही माझी नाही होऊ शकली, दुसर्‍याची झाली, तर तिच्या आठवणीत रडत आपले आयुष्याची वाट लावण्यापेक्षा दुसरीत मन गुंतवावे, आधीच्यापेक्षाही जास्त...

<< पण एकावेळी एकीच्याच प्रेमात असतो, बस्स ती सर्व प्रयत्न करूनही माझी नाही होऊ शकली, दुसर्‍याची झाली, तर तिच्या आठवणीत रडत आपले आयुष्याची वाट लावण्यापेक्षा दुसरीत मन गुंतवावे, आधीच्यापेक्षाही जास्त... >>

इथे ७६ धागे टाकलेत तसे तिला पकवले तर ती तुमची कशी होईल हो? थोडं सबुरीने घ्या म्हणजे नक्की तुमची होईल.

पियू,
> तिने फक्त एक व्हिडिओ केला अडीच मिनिटांचा.. सगळा ड्रामा तर तो बघणार्‍या लोकांनी (ज्यांना व्हिडिओ आवडला किंवा न आवडला दोघांनीही) केला.>
बघणार्‍या लोकांच्या प्रतिक्रिया येणार हे उघड होतं. मी ज्याला "ड्रामा" म्हणालो तो त्या व्हिडिओच्या सादरीकरणाबद्दल आहे. आणि मला तो ड्रामाच वाटतो कारण नुसते कॅमेरासमोर उभं राहुन हाच संदेश सांगितला असता तर? तर माझ्या मते हा व्हिडिओ एवढा प्रसिद्ध झालही नसता.

> एकतर तिचा जो टोन आहे (मग तो विनम्र असेल नाहीतर प्रचंड अरोगंट), तो संपुर्ण व्हिडिओभर सेम आहे. तुम्हाला संस्कृतीबुडवी वाटतील अशी वाक्य ती बोलायला लागल्यावर अचानक तुम्हाला तिचे पाय आपटतांना वगैरे दिसायला लागले. प्रत्यक्षात तुम्हाला ती वाक्य सहन झाली नाहीत.>
अमान्य. ती जे सांगते आहे ते (म्हणजे कंटेंट) मला ठामपणे सांगते आहे असच वाटत, विनम्र / अरोगंट टोनचा फरक पडत नाही. पाय आपटुन सांगणे ह्याचा अर्थ ठामपणे सांगणे असा मला म्हणायचा होता तुम्ही कदाचित जरा वेगळा घेतलात. " तुम्हाला संस्कृतीबुडवी वाटतील अशी वाक्य" वगैरे चा संबंध नाही. परत परत त्याच गोष्टींची उदाहरणे देत नाही पण ज्याला तुम्ही "संस्कृतीबुडवी वाटतील असं" म्हणताय ते माझ्या लेखी पुरुषांनीही तितकच लागु होतं. हे मत जाणून न घेता 'मला ते सहन झालं नाही' असा कृपया निष्कर्ष काढु नका.

>पुन्हा तेच. ती जोरात बिरात म्हणाली नाही. ती शांतपणे म्हणाली. पण तुम्हाला योग्य त्या ठिकाणी लागलं. आणि तेही जोरात.> परत अमान्य. माझ्या पाहण्यातल्या अनेक मुली स्वतःला हवं ते जगाची पर्वा न करता काँफिडंटली करतात. ज्यांचे कपड्यांचे चॉईस बोल्ड म्हणावे असे असतात, लग्नानंतर काही महिन्यात वेगळे रहायचा निर्णय घेतला, परिस्थितीनी अतिशय वेगळ्या मुलावर प्रेम व लग्न केले, आवडीच्या मुलाबरोबर डेटींग केले व नंतर ब्रेकअप वगैरे उदाहरण मी बघतो व मी ते सहज मान्य करु शकतो. 'समाजाची पर्वा न करणे' हा गुण मला मुळतःच स्त्रीयांमधे आहे असं वाटतं. आपल्याला कोणी जज करतय ह्याचा फारसा फरक स्त्रीयांना पडत नाही उलट पुरुषांनाच तसा विचार करणं जमत नाही असं मला वाटतं. त्यामुळे व्हिडिओ मधे ती जे काही म्हणते ते मला "उगाच" किंवा व्यर्थ किंवा त्यात नवीन काय असं वाटलं. कदाचित मला जे म्हणायच होतं ते वर चेसुगु व बेफिकिर ह्यांनी जास्त चांगलं लिहिलय. केवळ स्त्री असल्यामुळे काही केल्यास समाज काय म्हणतो ह्याची पर्वा न करता करण्याच्या गोष्टी व खुशालचेंडु पणा ह्यात फरक मी करु शकतो. लोकांनी 'मला जज करु नये' ह्या सबबीखाली एखद्याचे वागणे बेताल वागणे असु नये एवढीच अपेक्षा आहे.

> जर ते बरोबर नाहीये हे तुम्हाला पटतंय तर परीस्थिती बदलण्यासाठी तुम्ही काय करताय? तिने प्रयत्न केल्यावर जजच करताय ना तिला?>
अमान्य. मी तिला अजिबात जज करत नाही. तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यात काय करावं हा तिचा प्रश्न आहे व त्यावर मी काहीही बोललो नाही. ती एक सेलिब्रिटी आहे आणि नकळत्या वयातल्या अनेक मुला मुलींवर तिच्या वर्तनाचा आणि तिने केलेल्या विधानांचा परिणाम होतो ह्याची जाणीव तिने ठेवावी ही अपेक्षा मी नक्कि ठेवेन. कोणताही सार्वजानिक व्हिडिओ / ऑडिओ संदेश वा लिखाण करताना तिच्यासारख्या प्रत्येक सेलिब्रिटीनी ती जाणीव ठेवावी असं मला वाटतं. म्हणुन मी पहिल्या प्रतिसादात काही उदाहरणे दिली जे जास्त भीषण प्रश्न आहेत आणि त्याबद्दल तिच्यासारख्या लोकांनी संदेश पोचवल्यास समाजात जास्त प्रबोधन होईल.
>तुम्ही काय करताय?> - काय करु शकतो मी? मी कोणी सेलेब्रिटी नाही कि मी काही बोलावं आणि लोकांनी माझे शब्द झेलायला उभं रहावं. पण मी अशा वाचनानंतर, चर्चेनंतर माझ्या स्वतःची मतं दुरुस्त करतो, माझ्या मित्रांची बदलावी म्हणुन त्यांच्याशी बोलतो, माझ्या मुलांना / कुटंबातल्या लोकांना मी ते शिकवेनच. तुम्ही अजुन काय वेगळं करता ते सांगा, मी शक्य ते फॉलो करेन.

>> म्हणुन अर्ध्याहुन अधिक लोक तिने काय सांगितलंय यावर बोलण्यापेक्षा "ती अशीच आहे. ती तशीच आहे." असं दिपिकाला झोडपत सुटलेत? तिचं यश स्वकर्तृत्वाने मिळवलंय कि बि*गिरी करुन यावर बोलताहे?>> हे असलं काही मी अजिबात म्हणालो नाही. कृपया माझे प्रतिसाद नीट वाचा.

>> नक्की ठरवा. फुसका बार आहे कि जोरजोरात ओरडली आहे कि अजुन काही?>>
फुसका बारच. वर कारणमिमांसा विस्ताराने लिहिली आहे, तेव्हा परत लिहित नाही.

इथे ७६ धागे टाकलेत तसे तिला पकवले तर ती तुमची कशी होईल हो
>>>>>>

काहीतरी हिशोब चुकतोय.. मी मोजतोय तर ७७ भरलेत, तुम्ही एकदा पुन्हा मोजून बघता का Happy

ती एक सेलिब्रिटी आहे आणि नकळत्या वयातल्या अनेक मुला मुलींवर तिच्या वर्तनाचा आणि तिने केलेल्या विधानांचा परिणाम होतो ह्याची जाणीव तिने ठेवावी ही अपेक्षा मी नक्कि ठेवेन. कोणताही सार्वजानिक व्हिडिओ / ऑडिओ संदेश वा लिखाण करताना तिच्यासारख्या प्रत्येक सेलिब्रिटीनी ती जाणीव ठेवावी असं मला वाटतं>>>

हा एक स्टँडर्ड डायलॉग आहे या व्हिडिओला विरोध करणार्‍याम्चा.. पण मग हे विरोधक (जे सेलेब्रिटीज च्या वर्तनाविषयी अन त्याच्या तरुणांवर होणार्‍या परिणामाविषयी एवढे जागरुक आहेत) कधी तावातावाने सल्मान खान किंवा हनीसिंग यांना विरोध करताना दिसत नाहीत, हे एक नवलच. त्यांचं वर्तन दीपिकाच्या व्हिडिओपेक्षा हजारपट घातक आहे. इन फॅक्ट मझ्यामते दिपिकाच्या व्हिडिओत तरुणांवर वाईट परिणाम करणारं काही नाहीच आहे.

चौकट राजा,

माझ्या प्रतिसादाचा उल्लेख केल्याबद्दल मनापासून धन्यवाद! पण मला हे अजून नीटसे लक्षात आलेले नाही की तुमचे आणि माझे म्हणणे एकच कसे आहे. चु भु द्या घ्या

<< काहीतरी हिशोब चुकतोय.. मी मोजतोय तर ७७ भरलेत, तुम्ही एकदा पुन्हा मोजून बघता का >>

असेल, असेल. इथे बाकीचे एक प्रतिसाद टाकतात तोवर तुमचा एक धागा टाकून झालेला असतोय. बाकी, पुरस्काराबद्दल तुमचे अभिनंदन.

Pages