कदाचित आतापर्यंत बहुतेकांनी यूट्यूबवर दिपीकाचा "माय चॉईस" विडिओ बघून झाला असेल.
नाही, तर मग आता बघा.
बस्स ३-४ मिनिटेच लागतील, पण यातच बरेच काही सांगून जाणारा...
https://www.youtube.com/watch?v=KtPv7IEhWRA
फक्त हा विडिओ बघताना तुम्ही मराठी वा महाराष्ट्रीय आहात, शहरातले वा खेड्यातले आहात, भारतीय वा एनआराय आहात वगैरे थोडावेळ बाजूला सारून फक्त एक स्त्री किंवा पुरुष आहात हेच ध्यानात ठेवून बघा.
दोनचार दिवसांतच लाखो हिटस मिळालेल्या या विडिओबद्दल मी तुर्तास ईतकेच म्हणेन,
मला आवडला!
ईतरांचे विचार जाणून घ्यायलाही आवडतील, पण मत मांडायच्या आधी विडिओ जरूर बघा.
असो, त्या निमित्ताने चार शब्द दिपीकाबद्दल.
दिपीका प्रकाश पदुकोन!
स्टार बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोन यांची मुलगी म्हणून माझी तिच्याशी पहिली ओळख झाली.
आजही ती त्यांचीच मुलगी आहे, पण तिने त्याहीपेक्षा मोठी अशी स्वताची ओळख निर्माण केली आहे.
काय, कशी, किती, हे नव्याने कोणायला सांगायची गरज भासू नये. ईतकी मोठी.
पण एक नक्की, हा विडिओ तीच करू शकते, हे विचार तीच मांडू शकते..
तिच्या अभिनयाचा, दिसण्याचा, स्टाईलचा, ड्रेसिंग सेन्सचा, स्मार्टनेसचा.. अॅण्ड येस्स, मी प्रचंड मोठा फॅन आहे ते तिच्या अॅटीट्यूडचा!
बॉलीवूड कलाकार वा सेलिब्रेटींना अफेअर्स काही नवीन नाहीत,. पण त्यातही, आपल्याकडे पुरुषांचे एकापेक्षा जास्त अफेअर्स त्यांना कूल डूड बनवतात तेच स्त्रियांच्या बाबतीत त्यांना कॅरेक्टरलेस ठरवतात., बस्स याच नियमाला ती सर्वार्थाने तडा देणारी वाटली, नेहमीच!
तिचे आजवर ज्याच्या कोणाशी नाव जोडले गेले, त्यात नेहमीच, मला तिचा तो वाटला तिची "माय चॉईस!" ..
तिने आपल्या मर्झीने नाती जोडली, तिने आपल्या सोयीने सारी बंधने दूर सारली. पण ना कसला कलंक ना कोणता दाग. आजही ती बॉलीवूडची ग्लॅमरस डॉल म्हणून ओळखली जाते. सर्वांना हवीहवीशी वाटणारी हिरोईन. कारण तिची डिग्निटी तिने शाबूत ठेवलीय. नव्हे, काय कोणाची बिशाद त्याला धक्का पोहोचवायची.
बस्स, या विडिओमध्ये एक दिपीका पदुकोन होती म्हणूनच हा विडिओ मला तरी कुठल्याही प्रकारचा पब्लिसिटी स्टंट वा ढोंग वा दुटप्पीपणा वाटला नाही.
तिने अभिनयक्षेत्र निवडले म्हणून तिने जे जे केले त्याची चर्चा झाली, पण ईतर कुठल्याही स्त्रीने आपल्या आयुष्यात तिच्यासारखा अॅटीट्यूड आणि कॉन्फिडन्स बाळगून जगायला हरकत नाही. मग क्षेत्र कोणतेही असो.
याचा अर्थ तिने आपल्या आयुष्यात जे केले तेच केले पाहिजे असे मुळीच नाही, ईनफॅक्ट ते जर तुमच्या तत्वात बसत नसेल तर मुळीच करू नका, आफ्टरऑल ईट्स "युअर चॉईस".. 
जाता जाता एवढेच सांगेन,
ती अशी आहे जिचा प्रत्येक पुरुषाला हेवा वाटावा,
तो हि ईतका, की जर त्याला पुढचा जन्म स्त्रीचा मिळणार असेल तर त्याने देवाकडे तो दिपीकाचा मागावा.
....................
तळटीप - यात कुठल्याही प्रकारचे सर्कास्टिकपणा वा उपरोध शोधायला जाऊ नका. 
त्यापेक्षा बघितला नसल्यास विडिओ बघा,
हि घ्या पुन्हा एकदा लिंक - https://www.youtube.com/watch?v=KtPv7IEhWRA
- ऋन्मेष
मी कुणाबरोबर संभोग करायचा, ते
मी कुणाबरोबर संभोग करायचा, ते मी ठरवीन. पण माझा फोटो काढून तुम्ही पेपरात छापू शकत नाही. ते ठरवायचा अधिकार तुम्हाला नाही, असं म्हणणंसुद्धा 'माय चॉईस' असेल.
पण माझा फोटो काढून तुम्ही
पण माझा फोटो काढून तुम्ही पेपरात छापू शकत नाही. >>>> ???
मल्लिका शेरावत राखी
गरजेपेक्षा अधिक चर्चा झालेल्या वरच्या यादीत आता दीपिकाच्या "माय चॉईस" या व्हिडीओची भर पडली आहे. यापेक्षा अधिक चर्चा व्हायला हवी होती ती इंदुजा पिल्लैच्या मॅरेज प्रोफाईलची. मायबोलीवर ही चर्चा कुठे झाली आहे काय? माझ्या तरी वाचनात आलेली नाही.
वरच्या यादीतल्या १,२,३ वर
वरच्या यादीतल्या १,२,३ वर मायबोलीबर कुठे चर्चा झाली आहे काय? माझ्या तरी वाचनात आलेली नाही.
मायबोली प्रशासनाने चर्चेसाठी धागे काढायचे एकाधिकार ऋन्मेषना दिले आहेत काय? माझ्या तरी तसे वाचनात आलेले नाही.
एक प्रश्न पुन्हा विचारतोय. ती फिल्म दीपिकाने तयार केली आहे का? की फक्त चेहरा, आवाज (आणि समर्थन) दिलंय?
मी कुणाबरोबर संभोग करायचा, ते
मी कुणाबरोबर संभोग करायचा, ते मी ठरवीन. पण माझा फोटो काढून तुम्ही पेपरात छापू शकत नाही. ते ठरवायचा अधिकार तुम्हाला नाही>>> यात काय चुकीचं आहे?
का कोण जाणे, स्त्री
का कोण जाणे, स्त्री स्वातंत्र्याबद्दलच्या ज्या मतांना (जी योग्यच आहेत) इथं समर्थन दर्शवलं जातं, व्यवहारात अशीच एखादी केस समोर आली तर याच विचारांनी त्या व्यक्तीचा योग्य तो मान राखला जाईल का ? विवाहबाह्य संबंधांचा हक्क स्त्री ला असला पाहीजे हे मान्य करू. पण त्याचं कारण पुरूषाला आहे म्हणून हे असेल तर स्त्री मुक्तीची चळवळ ही स्त्री केंद्रीत नसून ती पुरूषकेंद्रीत आहे असं म्हणायला पाहीजे. जर पुरूषाचं वागणं समर्थनीय नसेल तर ते हक्क कशाला हवेत ? पुरूषांच्या चुकीच्या वागण्यात दुरूस्ती व्हायला हवी हा अजेण्डा हवा. जर पुरूषाचे विवाहबाह्य संबंध मान्य होणार असतील तर मग स्त्री ला ते नाकारता येणार नाही. मग तो समाजाचा दुटप्पीपणा झाला. आवरतो, कारण व्हिडीओ पाहणे होईलसं वाटत नाही.
..तिने फक्त माय चॉईस काय आहे
..तिने फक्त माय चॉईस काय आहे हे सांगितलंय. तो "चॉईस" बरा-वाईट जसा पण असेल तो निवडण्याच्या स्वातंत्र्याबद्दल मोठ्या गर्जना केल्या आहेत. परंतु तो पर्याय निवडल्यावर होणार्या परिणामांबद्दल काय? ती देखील तिचीच जबाबदारी आहे. आता तिने या व्हिडीओचा पुढचा भाग "इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी" या नावाने काढावा तरच संतुलन साधले जाईल. नाही तर कसंय ती कसेही कपडे घालणार, कुणाबरोबरही, कधीही XXX करणार, आणि काही बरंवाईट झालं तर मग मात्र संपूर्ण समाजाला दोष देणार हे काही पटत नाही.
+१
चेतन गुगळे यांच्याशी बर्याच अंशी सहमत.
विडीओ बघून काही विशेष वाटले नाही. वरच्या स्तरातील लोकांना अशी काहीतरी हुक्की येते आणि असा काहीतरी विडीओ काढतात मीडियाला २ दिवस चघळायला विषय मिळतो.
आता हे 'माय चोइस'च पुरुषी
आता हे 'माय चोइस'च पुरुषी वर्जन पहा:-
https://www.youtube.com/watch?v=VhjOnXGXpHo
हा सगळा भंपकपणा आहे. आमिर
हा सगळा भंपकपणा आहे. आमिर खानने डोळ्यांत टिपं आणून, आवंढे गिळून पीडितांच्या दु:खांचा बाजार मांडायचा. दीपिकाने फडतूस २-३ मिनिटांचे व्हिडिओ करून महिला सबलीकरणाचा कळवळा दाखवायचा. प्रत्यक्षात कुणालाही कायद्यापासून, माणुसकीपर्यंत कशाचीही पडलेली नाही. सगळ्यांना हवी आहे फक्त प्रसिद्धी आणि पैसा. त्यासाठी कुणाच्या भावनाच काय, कशाचाही बाजार मांडायला हे लोक तयार आहेत.
आमिरच्या कार्यक्रमात जेव्हा रस्ता अपघातावरील भागात सलमानचा उल्लेख येत नाही, तेव्हा त्याचा भंपकपणा लपत नाही.
दीपिका एकीकडे महिला सबलीकरणाचा आव आणून, एक अभिमानी स्त्री म्हणून स्वत:चा फोटो छापला म्हणून तमाशा करते आणि दुसरीकडे महिलांचा - तिचा स्वत:चाही - अत्यंत खालच्या पातळीवर येऊन, विनोदाच्या नावाखाली असभ्य, अश्लील शेरेबाजी करून अपमान केला जातो तेव्हा पहिल्या रांगेत बसून दाताड वेंगाडते.
दुनियेला अक्कल शिकवण्यापेक्षा हे स्टार लोक स्वत:च्या इंडस्ट्रीतल्या लोकांना दोन शहाणपणाच्या गोष्टी सांगण्याची हिंमत ठेवतात का ?
संजय दत्तसारख्या कायद्याने देशद्रोही ठरलेल्या व्यक्तीवर टीका करण्याची हिंमत आहे का ?
'प्रकरण न्यायप्रविष्ट आहे' वगैरे टिपिकल गोंडस बाता मारून आरोपींसोबत काम करताना ह्यांचा सारासारविचार कुठे शेण खात असतो ?
तुमचे मतस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य केवळ तुमच्या खाजगी आयुष्याशी संबंधित असेल, समाजासाठी नालायक ठरलेल्या तुमच्या सहकाऱ्यांबद्दल काही बोलण्यासाठी ते तुम्हाला बांधील मानत असेल, तर मग हे व्हिडीओ करून स्वत:ची खाजगी मतं लोकांसमोर मांडायची हौस का ?
हा सगळा बाजार आहे. खोटारडेपणा आहे. भंपकपणा आहे. उद्या ही बया एखाद्या पुरुषाशी लग्न करून भुर्रकन् सगळं काही सोडून अमेरिकेला निघूनही जाऊ शकते कारण तो तिचा 'माय चॉईस' असेल. आपण ह्या तद्दन खोटारड्या लोकांच्या मुक्ताफळांवर मोठ्या आवडीने, हिरीरीने, पोटतिडकीने चार दिवस चर्चा करू आणि पुन्हा घरी गेल्यावर सोफ्यावर बसून तंगड्या ताणून आईला, बायकोला, बहिणीला 'पाणी दे' म्हणून आज्ञा देऊ. तो पाण्याचा ग्लाससुद्धा त्यांनीच उचलायचा म्हणून तिथेच ठेवून देऊ. कशाला उगाच ह्या मोठ्या मोठ्या गोंडस बाता मारायच्या सबलीकरण वगैरेच्या ?
ना त्या स्टार लोकांच्या अंगात दम आहे, ना आपल्या विचारांत तितका उदारमतवाद, ही इतकीच गोष्ट जर प्रत्येकाने मनापासून स्वीकारली तरी बदलासाठी पुरेसं आहे. फुटकळ व्हिडीओंची काहीही आवश्यकता नाही नैतिकता शिकवायला.
पगारे सहमत. धागा काढायचा
पगारे सहमत.
धागा काढायचा अधिकार सर्वांनाच आहे,
इंदुजा पिल्लैच्या मॅरेज प्रोफाईलची चर्चा करायला धागा काढायची विनंती मी स्वत: चेतनजींना करू इच्छितो.
मल्लिका शेरावत आणि राखी सावंत यांच्याबद्दल मायबोलीवर चर्चा झाल्याचे माझ्याही पाहण्याऐकण्यात नाही, बहुधा पेज थ्री न्यूजमध्ये होते, आपण तो वाचत नसल्याने आपल्याला माहीत नाही.
पूनम पांडेचे नाव मध्यंतरी एकाच बातमीनिमित्त स्पोर्टस न्यूज मध्ये वाचलेले. त्यानंतर आज चेतनजींच्या पोस्टमध्येच वाचतोय. अर्थात तिची चर्चा देखील पेज थ्री न्यूजमध्ये होत असेल तर कल्पना नाही.
अरविंद केजरीवाल यांचे नाव त्या लिस्ट मध्ये बघून अंमळ आश्चर्य वाटले. कारण अल्पावधीत एक पक्ष उभा करून दिल्लीमध्ये नमोलाटेला थोपवून एक ऐतिहासिक, आय रिपीट ऐतिहासिक (६० पैकी ५७ जागा नवख्या पक्षाने) असा विजय मिळवणे या कामगिरीबद्दल त्यांची करावी तितकी चर्चा कमीच.
बहुधा त्यांचे नाव या लिस्टमध्ये राजकीय नावडीतून आले असावे, ते या धाग्याशी संबंधित नसल्याने त्यावर नो कॉमेंटस
रसप, आपले मत दिपिकाच्या किंवा
रसप,
आपले मत दिपिकाच्या किंवा तत्सम स्टार लोकांच्या दुटप्पीपणाबद्दल आलेय. विडिओमधील विचार योग्य की अयोग्य यावर आपल्याला काय म्हणायचे हे समजत नाही. म्हणजे विडिओमधील विचार योग्य आहेत पण ते दिपिकाच्या तोंडी शोभत नाहीत असे म्हणायचेय की ते विचारच चूकीचे आहेत असे म्हणायचेय हे क्लीअर होत नाहीये.
रसप, एखादा विचार कोणी पुढे
रसप, एखादा विचार कोणी पुढे आणला तर तो त्याने कोणत्या हेतुने आणला तो मुद्दा कधीकधी महत्वाचा नसतो जर तो मुद्दा पुढे आणणारी व्यक्ती आपल्याला आवडत असेल तर. आपण नकळत त्यावर विचार करु लागतोच.
आमिर खानबद्दल तसेच झाले आहे. तरीही आमिरच्या शोबद्दल तुम्ही जे लिहिलय ते बरोबर वाटत नाही. सोपे वाटले का त्याने शोमधे जे काही दाखवले ते दाखवणे? सर्व काय त्याच्या हाताशी उपलब्ध होते असे वाटते का? त्याने टाईमपास म्हणुन, फक्त प्रसिद्धी, पैसे मिळावेत म्हणून हे केलय म्हणणे अन्यायकारक आहे.
त्याच्या शो मधला एक महत्वाचा माणुस माझ्या एका चांगल्या मैत्रिणीच्या आईशेजारी रहातो. त्यांचे नेहमी एकमेकांकडे येणेजाणे असते. त्याने काकुंना या शोसाठी आमिरसकट पुर्ण टीमने किती मेहनत घेतली आहे ते सांगितले होते. तरीही त्या व्यक्तिने काकुंना शोमधे पुढच्या भागांत काय असणार आहे ते कधीच सांगितले नाही इतकी गुप्तता बाळगली होती.
त्यांची मेहनत ऐकुन तरी हा फक्त प्रसिद्धीचा सोस म्हणुन केलाय असे वाटले नाही. तेव्हा सरसकट असे काही म्हणु नये. आमिरला पैसा,प्रसिद्धी मिळवायची पण असेल व त्याचबरोबर त्याची शोमागील कळकळपण खरी असु शकते नाही का? दोन्ही का हवे असु नये? चांगल्या गोष्टीत संशयाचा फायदा द्यावा.
या विडियोबाबतः एकुण संदेश पटला. ती कायद्याला झुगारायचे बोलत नाहिये, जबाबदारी नाकारायचे बोलत नाहिये. ती फक्त ज्या गोष्टी केल्यामुळे "बाई असुन केल्या" म्हणुन समाजात जास्त नावे ठेवली जातात तसे समाजाने करु नये हेच जास्त सांगते आहे असा मी काढलेला अर्थ. (दीपिका मला खुप आवडते, she is extraordinarily gorgeous).
उद्या सलमान खानने पण असा काही विडियो काढला तर एकदातरी तो कशाबद्दल आहे त्यावर विचार नक्की करीन (बहुतेक).
व्हिडीओ पाहीला.उथळ
व्हिडीओ पाहीला.उथळ वाटला.दिपीका चक्क ब्राचे हूक लावताना त्यात दाखवली आहे.माय चॉईसचा मेसेज जरी ठिक असला तरी हा आचरटपना टाळता आला असता.
चेतन सुभाष गुगळे, तुमच्याशी
चेतन सुभाष गुगळे,
तुमच्याशी सहमत. सोनाक्षी सिन्हाने तिचं मत नोंदवलं आहे : https://www.youtube.com/watch?v=ETo2si8rO5E
सोनाक्षीला व्यवस्थित शब्दांत कदाचित मांडता आलं नाहीये. तरीपण मला तिचं म्हणणं पटलं. एम्पॉवरमेंट म्हणजे केवळ चॉईस नव्हे.
आ.न.,
-गा.पै.
दॅट्स प्रीसाईजली द पॉईंट!
माय चॉईस वर सोनाक्षी ची
माय चॉईस वर सोनाक्षी ची रिअॅक्शन
https://www.youtube.com/watch?v=GPmCmXuwAvU
मला पटली. दिपीका चा व्हिडीओ आवडलाच पण तिने त्यात माय चॉईस म्हणुन जे काही लिस्ट केले आहे ते उथळ आहे. ती, तिच्या सारख्या हाय सोसायटीतील मुली किंवा ईव्हन आपल्या सारख्या मुली आत्त्ता सुध्दा ह्या गोष्टी करतो (त्यातल्या काही गोष्टी बाय चॉईस करत नाही!) त्यासाठी एम्पावरमेंट्ची गरज नाही. ज्यांना खरच गरज आहे त्यांच्या समस्या एकदम वेगळ्या आहेत आणि त्यांच्या समस्ये समोर ह्या व्हिडीओतील गोष्टी अगदीच नगण्य आहेत. पण मे बी अ गुड स्टार्ट.
ठीक आहे. पण हा स्त्रियांचे
ठीक आहे. पण हा स्त्रियांचे आर्थिक स्वातंत्रय किंवा रिप्रॉडक्टिव्ह राइट्स बद्दल फारसे बोलत नाही. दीपिकाचा अॅक्सेंट अगदीच बेकार आहे. दक्षिण मुंबईतील स्त्रियांना घेउन एका दिव्सात शूट उरकल्यासारखे आहे. व्हॅनिटी
प्रॉजेक्ट वाटतो. कमर्शिअल सिनेमात कामे करून झाली अॅक्टिंग काय ते येतच नाही. डिप्रेशन बद्दल सांगून झाले मग आता काय घ्या स्त्रि मुक्ती आणि पाडा जिलेबी अश्या प्रकारचा व्हिडिओ वाट्तो आहे.
किती ती चर्चा. मी विडियो
किती ती चर्चा.
मी विडियो पाहिला नाही अजुन पण बर्याच जणानी फ़क्त एकाच मुद्द्यावर चर्चा झाली असे लिहिलेय . जर इथे सहमति देणार्या लोकाच्या ग्फ्रेने किंवा बायकोने तो मुद्दा उचलून धरला आणि त्याप्रमाणे वर्तन सुरु केले आणि तो तिचा चॉइस आह हे स्वीकारुन ह्या लोकांनी आयुष्य आधी जसे होते तसेच सुरु ठेवले तर ती खरी सहमति म्हनता येइल. पण हे होइल का ही शंका वाटतेय. सहमति केवळ लिहिण्यासाथिछ.
हाय फाय लोकांसाठीच बराय तो
हाय फाय लोकांसाठीच बराय तो व्हिडिओ. काही खास विशेष नाहिये....
घ्या स्त्रि मुक्ती आणि पाडा
घ्या स्त्रि मुक्ती आणि पाडा जिलेबी >>>
असं काही सुचलं की समृद्ध अडगळीएव्हढे मोठमोठे प्रतिसाद द्यावे लागत नाहीत.
हाय फाय लोक.. समाजातील वरचा
हाय फाय लोक.. समाजातील वरचा स्तर.. या स्तरातील मॉडर्न स्त्रियांनाही अजून आपल्याला पुरुषांच्या तुलनेत कमी लेखले जाते, वा त्यांच्याइतके हक्क नाहीत याची खंत असणे हे देखील एक जळजळीत वास्तव आहे..
त्यांच्या मागण्या नक्कीच वेगळ्या आहेत.. ज्या समाजातील खालच्या स्तरात वा मध्यमवर्गातील स्त्रियांना लागू होत नसतील.. समाजातील विविध स्तरातील स्त्रियांना जे हवेय त्यात भिन्नता असणारच.. पण तरीही.. माय चॉईस.. आम्हाला आमची चॉईस असणे हा फॅक्टर कॉमन असावा.. किंबहुना हाच सर्व मागण्यांचा पाया असावा..
एखाद्या उच्व मध्यमवर्गातील स्त्रीला नोकरीधंदा करत स्वताच्या पायावर उभे राहायची माय चॉईस हवी असावी..
एखाद्या मध्यमवर्गातील स्त्रीला स्वताच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करायची माय चॉईस हवी असावी..
तर एखाद्या गावातील स्त्रिला आपल्या भावासारखे आपल्यालाही आपल्या इच्छेनुसार शिक्षण घेता यावे ही माय चॉईस हवी असावी..
माय चॉईस.. हा शब्द प्रत्येक स्त्री साठी परवलीचा ठरावा..
दिपिकाने आपली माय चॉईस लिस्ट ठरवली.. आता इतर स्त्रियांनी आपली ठरवावी.. आणि त्यानुसार त्यांना काय करता येतेय वा काय नाही हे स्वतालाच प्रामाणिकपणे विचारावे..
मला तरी विडिओचा उद्देश हा वाटतो.. बस्स आता दिपिकाची माय चॉईस आपल्याशी जुळत नाही म्हणून हे हायफाय लोकांसाठी झाले बाकीच्या स्त्रियांना काय कामाचे म्हणून दुर्लक्ष करणे मला योग्य वाटत नाही..
000 - वर कोणीतरी म्हटले की स्वताच्या गर्लफ्रेंडला किंवा बायकोला परवानगी द्याल का...
तर येस्स, माझ्या ग'फ्रेंड किंवा बायकोची जी काही माय चॉईस असेल त्याचा आदर मी नक्कीच करेन.. अगदी तिची लिस्ट दिपिकासारखीच असेल तरीही करावाच लागेल.. आणि जर मला ते पचवणे जड जात असेल, मी स्वताही तसे काही करत नसेल, तर याचा अर्थ एवढाच की आमची विचारसरणी भिन्न आहे, आम्ही मेड फॉर इच अदर नाही आहोत.. या परिस्थितीत ते समजून घेऊन आम्ही उगाच आमच्यातले नाते खेचणार नाही.. वेगळे होऊ, पण तिला बंधने घालून नाही ठेवणार..
जे स्वातंत्र्य मी उपभोगतो तेच तिलाही उपभोगायचे असेल तर माझी कधीही काहीही हरकत नसेल.. नव्हे नसतेच हे माझ्या ग'फ्रेंडला कधीतरी भेटून कन्फर्म करून घेऊ शकता..
मी कुणाबरोबर संभोग करायचा, ते
मी कुणाबरोबर संभोग करायचा, ते मी ठरवीन. पण माझा फोटो काढून तुम्ही पेपरात छापू शकत नाही. ते ठरवायचा अधिकार तुम्हाला नाही>>> यात काय चुकीचं आहे? >>> मलाही हाच प्रश्न पडला.
दीपिका ने माझा फोटो छापू नका सांगण्याबद्दल - त्याचा संदर्भ काय आहे? ती एवढ्यात कधी म्हंटली होती का?
अनेक लोक त्या एका विबासं वर अडकलेले दिसतात. तो मुद्दा चुकीचाच आहे, पण हा सगळा व्हिडिओ त्याबद्दल नाही. मी जसा इंटरप्रिट केलाय तो साधारण असा: ती स्त्रियांच्या वतीने असे सांगत आहे की ती जे बरोबर करेल, चुकीचे करेल तो तिचा चॉईस आहे. इतर लोकांनी त्यावरून 'जज' करायचे कारण नाही. जेथे ती चुकीचे करेल तेथे त्यामुळे अॅफेक्ट होणार्या लोकांना तिच्यावर टीका करण्यापासून ते तिला कोर्टात खेणण्यापर्यंत जे काही रास्त आहे ते करण्याचा हक्क आहेच. पण ते सोडून इतरांसाठी it is none of anybody's business.
इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे यात आहेत - एखादीने कोणते कपडे घातले आहेत, ती कोणाबरोबर राहात आहे, तिने कुंकू लावले आहे की नाही यात इतरांनी पडायचे, त्यावरून तिच्या चारित्र्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही, असा मेसेज आहे.
व्हिडीओ काही फार भारी बिरी आहे असे अजिबात नाही. पण ते तेवढे एक विबासं वाले वाक्य सोडले तर न पटण्यासारखेही काही नाही. मला हा व्हिडीओ असा जाणवला.
हीच दीपिका तिकडे रोस्ट मधे गलिच्छ जोक वर हसली, तर हसली असेल. तिची मर्जी. ती, आणि ज्या लोकांवर ती हसली ते बघून घेतील. बाकीच्यांचे काय गेले त्यात? एक पब्लिक फिगर म्हणून तिची इमेज तुमच्या दृष्टीने काळवंडली - हे ठीक आहे. पण एवढेच.
Male-Female equality means
Male-Female equality means equality of opportunity. It doesn’t mean male and females having the same characteristics and qualities.
धन्यवाद साकल्य आणि
धन्यवाद साकल्य आणि गामा_पैलवान_५७४३२
रसप, साधना, अमा, अदिति व धिरज काटकर. यांनी मांडलेल्या मुद्यांशी सहमत.
<< भरत मयेकर | 5 April, 2015
<< भरत मयेकर | 5 April, 2015 - 15:29
वरच्या यादीतल्या १,२,३ वर मायबोलीबर कुठे चर्चा झाली आहे काय? माझ्या तरी वाचनात आलेली नाही. >>
<< ऋन्मेऽऽष | 5 April, 2015 - 21:30
मल्लिका शेरावत आणि राखी सावंत यांच्याबद्दल मायबोलीवर चर्चा झाल्याचे माझ्याही पाहण्याऐकण्यात नाही, बहुधा पेज थ्री न्यूजमध्ये होते, आपण तो वाचत नसल्याने आपल्याला माहीत नाही.
पूनम पांडेचे नाव मध्यंतरी एकाच बातमीनिमित्त स्पोर्टस न्यूज मध्ये वाचलेले. त्यानंतर आज चेतनजींच्या पोस्टमध्येच वाचतोय. अर्थात तिची चर्चा देखील पेज थ्री न्यूजमध्ये होत असेल तर कल्पना नाही. >>
मायबोलीवर उजव्या बाजूला "शोध" असे ठळक अक्षरांत लिहीले असून त्याखाली एक आयताकृती खिडकी आहे त्यात वरील माननीयांची नावे लिहून शोध घ्या म्हणजे सापडेल. कितीतरी धागे व प्रतिसादांमध्ये त्यांचा उल्लेख आला आहे. हे पाहा:-
शोध यंत्राचे परिणामः-
http://www.maayboli.com/search_results?as_q=%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%A8%...
http://www.maayboli.com/search_results?as_q=%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%...
http://www.maayboli.com/search_results?as_q=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%...
आणि खास द्विशतकी प्रतिक्रिया मिळालेला हा धागा
भारत रत्न पूनम ताई पांडे आणि प्रतिक्रिया
http://www.maayboli.com/node/35363
<< अरविंद केजरीवाल यांचे नाव त्या लिस्ट मध्ये बघून अंमळ आश्चर्य वाटले. कारण अल्पावधीत एक पक्ष उभा करून दिल्लीमध्ये नमोलाटेला थोपवून एक ऐतिहासिक, आय रिपीट ऐतिहासिक (६० पैकी ५७ जागा नवख्या पक्षाने) असा विजय मिळवणे या कामगिरीबद्दल त्यांची करावी तितकी चर्चा कमीच.
बहुधा त्यांचे नाव या लिस्टमध्ये राजकीय नावडीतून आले असावे, ते या धाग्याशी संबंधित नसल्याने त्यावर नो कॉमेंटस >>
अशक्य आश्वासने देत निवडणूकीत विजय मिळविणे हे कर्तृत्व होऊ शकत नाही. सुरुवातीला फक्त ४९ दिवस राज्य चालविणे आणि दुसर्या वेळी प्रचंड बहुमत मिळवून देखील काही दिवसातच पक्षातील सहकार्यांसोबत बिनसणे हे त्यांचे कर्तृत्व. याउप्परही जर काही काळ स्थिर सरकार देत त्यांनी महत्त्वाच्या काही सुधारणा केल्याच तर ते त्यांचे खरे कर्तृत्व ठरेल. तेव्हा नक्कीच चर्चा व्हावी. सध्या दोन सहस्त्रांहूनही अधिक प्रतिक्रिया झाल्याने नवीन धागा उघडावा लागला आहे व इतरही अनेक धाग्यांवर चालू असलेली त्यांच्याबद्दलची चर्चा ही गरजेपेक्षा अधिक आहे असेच माझे मत आहे.
नरेन्द्र मोदी यांनीही असाच ऐतिहासिक विजय निवडणूकीत मिळविला होता परंतु अपेक्षापूर्ती न झाल्याने आज ते जनतेच्या प्रचंड टीकेचा विषय बनले आहेत. किंबहूना त्यांच्या बहूचर्चित सूटामुळेच दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना निवडणूकीत प्रचंड मोठा विजय मिळाला आहे.
सध्याच्या सर्वच राजकीय पक्षांविषयी माझी नावड मी कधीच लपविलेली नाही. या विषयाने मी मायबोलीवर व इतरत्र देखील एक स्वतंत्र लेख प्रकाशित केला आहे.
चेतनजी, माझ्या मायबोली सदस्य
चेतनजी,
माझ्या मायबोली सदस्य कालावधीत मी यांची नावे कुठे पाहिली नाहीत.
आणि मायबोलीच्या भूतकाळात ती शोधायला जावी अशी त्या नावांबद्दल मला क्रेझही नाही.
उलट आपण ती शोधलीत आणि पूनम पांडेचा धागा वरही काढलात हे बघून खेद वाटला. कारण एकेप्रकारे तिला हि तिला पुनःप्रसिद्धीच झाली
आधी विधान करायचं की या
आधी विधान करायचं की या नावांची चर्चा होत नाही. मग तसे पुरावे दिले की, आपलं पहिलं विधान मागे घेण्याऐवजी म्हणायचं चर्चा माझ्या समोर झाली नाही; माझ्या आधी झाली असल्यास शोधण्याची क्रेझ नाही. वा! अप्रतिम!! आपण राजकारणात उत्तम करिअर करू शकाल.
बाकी, पूनम पांडेंचा तो धागा वाचला नाही तरी त्यातले प्रतिसाद वाचा. सगळा धागा बेफिकीर यांनी हायजॅक केलाय. त्यांच्या प्रतिसादातून मायबोली सदस्यांची उद्बोधक माहिती मिळेल.
आधी विधान करायचं की या
आधी विधान करायचं की या नावांची चर्चा होत नाही. मग तसे पुरावे दिले की, आपलं पहिलं विधान मागे घेण्याऐवजी म्हणायचं चर्चा माझ्या समोर झाली नाही; माझ्या आधी झाली असल्यास शोधण्याची क्रेझ नाही. वा! अप्रतिम!!
>>>>>>>>>
पहिली गोष्ट,
आपण म्हणता ते विधान सचिन पगारे यांनी केले होते..
आणि ते देखील असे होते बघा :-
वरच्या यादीतल्या १,२,३ वर मायबोलीबर कुठे चर्चा झाली आहे काय? माझ्या तरी वाचनात आलेली नाही.
त्यांनीही स्पष्ट उल्लेख केला होता की त्यांच्या वाचनात तरी आलेली नाही.
तसेच मी देखील त्याला सहमते दर्शवत म्हणालो होतो, माझ्याही वाचनात आली नव्हती.
व्हिडिओ अजिबात आवडला नाही.
व्हिडिओ अजिबात आवडला नाही. "चॉइस" ह्या शब्दाचा एकूण अर्थच ह्या व्हिडिओमध्ये फार उथळ घेतला गेला आहे!! ह्या व्हिडिओच्या निर्माता-दिग्दर्शकांना आणि त्यात काम करण्यार्यांना एकतर खरे प्रश्न माहितच नाहीत किंवा हा व्हिडिओ केवळ elite आणि high-society महिलांकरिता बनविला गेला आहे असे वाटते.
@ सुमुक्ता खूपच थोडक्या
@ सुमुक्ता
खूपच थोडक्या शब्दांत नेमकं लिहीलं आहे.
Pages