माय चॉईस "दिपीका" :-)

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 April, 2015 - 14:45

कदाचित आतापर्यंत बहुतेकांनी यूट्यूबवर दिपीकाचा "माय चॉईस" विडिओ बघून झाला असेल.
नाही, तर मग आता बघा.

बस्स ३-४ मिनिटेच लागतील, पण यातच बरेच काही सांगून जाणारा...

https://www.youtube.com/watch?v=KtPv7IEhWRA

फक्त हा विडिओ बघताना तुम्ही मराठी वा महाराष्ट्रीय आहात, शहरातले वा खेड्यातले आहात, भारतीय वा एनआराय आहात वगैरे थोडावेळ बाजूला सारून फक्त एक स्त्री किंवा पुरुष आहात हेच ध्यानात ठेवून बघा.

दोनचार दिवसांतच लाखो हिटस मिळालेल्या या विडिओबद्दल मी तुर्तास ईतकेच म्हणेन,
मला आवडला!

ईतरांचे विचार जाणून घ्यायलाही आवडतील, पण मत मांडायच्या आधी विडिओ जरूर बघा.

असो, त्या निमित्ताने चार शब्द दिपीकाबद्दल.

दिपीका प्रकाश पदुकोन!
स्टार बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोन यांची मुलगी म्हणून माझी तिच्याशी पहिली ओळख झाली.
आजही ती त्यांचीच मुलगी आहे, पण तिने त्याहीपेक्षा मोठी अशी स्वताची ओळख निर्माण केली आहे.
काय, कशी, किती, हे नव्याने कोणायला सांगायची गरज भासू नये. ईतकी मोठी.
पण एक नक्की, हा विडिओ तीच करू शकते, हे विचार तीच मांडू शकते..

तिच्या अभिनयाचा, दिसण्याचा, स्टाईलचा, ड्रेसिंग सेन्सचा, स्मार्टनेसचा.. अ‍ॅण्ड येस्स, मी प्रचंड मोठा फॅन आहे ते तिच्या अ‍ॅटीट्यूडचा!

बॉलीवूड कलाकार वा सेलिब्रेटींना अफेअर्स काही नवीन नाहीत,. पण त्यातही, आपल्याकडे पुरुषांचे एकापेक्षा जास्त अफेअर्स त्यांना कूल डूड बनवतात तेच स्त्रियांच्या बाबतीत त्यांना कॅरेक्टरलेस ठरवतात., बस्स याच नियमाला ती सर्वार्थाने तडा देणारी वाटली, नेहमीच!

तिचे आजवर ज्याच्या कोणाशी नाव जोडले गेले, त्यात नेहमीच, मला तिचा तो वाटला तिची "माय चॉईस!" ..

तिने आपल्या मर्झीने नाती जोडली, तिने आपल्या सोयीने सारी बंधने दूर सारली. पण ना कसला कलंक ना कोणता दाग. आजही ती बॉलीवूडची ग्लॅमरस डॉल म्हणून ओळखली जाते. सर्वांना हवीहवीशी वाटणारी हिरोईन. कारण तिची डिग्निटी तिने शाबूत ठेवलीय. नव्हे, काय कोणाची बिशाद त्याला धक्का पोहोचवायची.

बस्स, या विडिओमध्ये एक दिपीका पदुकोन होती म्हणूनच हा विडिओ मला तरी कुठल्याही प्रकारचा पब्लिसिटी स्टंट वा ढोंग वा दुटप्पीपणा वाटला नाही.

तिने अभिनयक्षेत्र निवडले म्हणून तिने जे जे केले त्याची चर्चा झाली, पण ईतर कुठल्याही स्त्रीने आपल्या आयुष्यात तिच्यासारखा अ‍ॅटीट्यूड आणि कॉन्फिडन्स बाळगून जगायला हरकत नाही. मग क्षेत्र कोणतेही असो.

याचा अर्थ तिने आपल्या आयुष्यात जे केले तेच केले पाहिजे असे मुळीच नाही, ईनफॅक्ट ते जर तुमच्या तत्वात बसत नसेल तर मुळीच करू नका, आफ्टरऑल ईट्स "युअर चॉईस".. Happy

जाता जाता एवढेच सांगेन,
ती अशी आहे जिचा प्रत्येक पुरुषाला हेवा वाटावा,
तो हि ईतका, की जर त्याला पुढचा जन्म स्त्रीचा मिळणार असेल तर त्याने देवाकडे तो दिपीकाचा मागावा.

....................

तळटीप - यात कुठल्याही प्रकारचे सर्कास्टिकपणा वा उपरोध शोधायला जाऊ नका. Happy
त्यापेक्षा बघितला नसल्यास विडिओ बघा,
हि घ्या पुन्हा एकदा लिंक - https://www.youtube.com/watch?v=KtPv7IEhWRA

- ऋन्मेष

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा,

>> पण चर्चा मात्र फक्त निवडक गोष्टींचीच होणार.

तुमची तक्रार एका अर्थी रास्त आहे. आता साबणाच्या जाहिरातीत बाई दाखवली की लोकं साबण सोडून बाईच बघणार! साबणाच्या जाहिरातीत बाई न दाखवणं हा एक उपाय असू शकतो. तसाही बाईचा आणि साबणाचा संबंधच काय मुळातून? याच धर्तीवर दीपिकाच्या चोळीचा स्त्रीच्या सक्षमीकरणाशी संबंधच काय मुळातून? चोळी दाखवायची गरजच काय होती?

आ.न.,
-गा.पै.

याच धर्तीवर दीपिकाच्या चोळीचा स्त्रीच्या सक्षमीकरणाशी संबंधच काय मुळातून? चोळी दाखवायची गरजच काय होती?>>>> आहे ना. खुप जवळचा संबंध आहे. बाई ही बाई आहे म्हणूनच नुसतं हुक उघडायची अ‍ॅक्शन केली तरी लोकं लगेच आधी जज करायलामोकळे होतात. नुसतं जज करुन थांबत नाहीत तर पुढे जाऊन त्यांना बाहेरख्याली असल्याचा शिक्का लावायला सुद्धा कमी करत नाही. ह्याची अजून एक्स्ट्रिम केस म्हणजे कमी कपडे घातले म्हणजे "They are looking for sex" असा सरळसोट अर्थ लावून त्यांच्यावर जबरदस्ती/बलात्कार सुद्धा करायला बघतात. मुळातच स्त्री ही सुद्धा आपल्यासारखी एक "व्यक्ती" आहे हे सोयिस्करपणे विसरायला होतं लोकांना.

अरेरे !
एका प्रतिष्ठीत वर्तमानपत्रामधे या व्हिडीओ बद्दल जे काही छापून आलेलं आहे त्यामुळं पहायची गरज नाही असं वाटलं. पण इथे एव्हढी उलटसुलट चर्चा झाल्यावर पाहीला. यातली काही वाक्ये भडकपणे देण्याची गरज या वर्तमानपत्राला का वाटली असावी ? अर्थात विश्वास ठेवला ही चूक झाली हे खरंच. अशाच पद्धतीने बातम्या देणार असतील तर नकोच वाचायला.

मला हा व्हिडीओ विशेष आवडला नव्हता. (पण त्यानिमित्ताने लोकं चर्चा करत आहेत, मतं तपासून पाहात आहेत हे आवडले. )

ही माझ्या मैत्रिणीची पोस्ट. मला आवडली. http://www.isimplylovemakeup.com/2015/04/coffee-breaks-with-islm-mychoic...

व्हिडीओ पहिला. आवडला. त्यानिम्मिताने चर्चा होतेय तेही आवडले. बस्के +१
दीपिकाची इतकी चर्चा का झाली कळलं नाही, तिने फक्त काम केलंय ना? कंटेंट/ मेसेज जास्त महत्त्वाचा ना.
वर जो कायदा सांगितलाय (बायको ही नवऱ्याची अनामत) हा हिंदू लॉ आहे का भारतीय दंडविधान? म्हणजे हिंदू व्यक्तीने रजिस्टर लग्न केले तर तो लागू होतो का?
काहीही असलं, तरीही त्यासंदर्भातला माय चोइस मुद्दा ही खटकला नाही. कायदा बदलायचा असेल तर कायद्याला विरोध/ लॉबिंग केलच पाहिजे ना? का तेही बेकायदेशीर आहे?

>> नुसतं हुक उघडायची अ‍ॅक्शन केली तरी लोकं लगेच आधी जज करायलामोकळे होतात.
आँ? पुरुषांनी चारचौघांत चेन उघडायची अ‍ॅक्शन केली तर लोक जज करत नाहीत काय?

मला व्हीडिओ उथळ वाटला. सोशल कंडिशनिंगचे बळी पुरुषही असतात. कपडे घाला, घालू नका, शून्य ते शंभर जणां/जणींसोबत शरीरसंबंध ठेवा - परिणाम भोगा. बिग डील! पुरुष फ्रॉक घालून फिरतो म्हणाला तर जज होणार नाही काय?

खरे प्रश्न माझ्या मते मुळात जगण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार नाकारलाच जाणं असे आहेत. त्याबद्दल व्हीडिओ काही बोलत नाही.

बरोबर आहे बाई, पुरुषानी ती अ‍ॅ़क्श्न केली तर त्याला ही जज करतीलच. मी माझ्या पोस्टीत पुढे जे लिहिलय त्याचा रेफर्न्स आहे त्या वाक्याला. The point was little things that are just casual , somehow seem to give men an idea that its a signal the woman is available and willing.
If the women in the society took a man unzipping his pants as a sign that he is available and then proceed with further molesting him or even raping him then yes, this would apply to them too.

ऋन्मेष ने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही.
दिपिका ने स्वतःची ओळख निर्माण केली म्हणजे एक अभिनेत्री सोडल्यास तिने सोशल वर्क काय केलंय? प्रसिद्धी चा उपयोग निदान त्यासाठी तरी करायचा (कन्स्ट्रक्टिव्ह म्हणतेय मी) आता हा व्हिडिओ कन्स्ट्रक्टिव्ह अ‍ॅक्टिव्हिटी आहे असं मला वाटत नाही. तो निवडताना तिने स्वतःचे निकष लावायला हवे होते. निव्वळ कुणितरी दिला तिने बोलला बास झालं....

दिपिका तिची स्टाईल, अ‍ॅटिट्यूड, स्मार्टनेस, ग्लॅमरस डॉल, चॉईस ने रिलेशन्स स्विकारली/नाकारली. हे सर्व ऋन्मेषनी लिहिलं आहे. स्त्री म्हणून तिच्याकडे इतर कोणते गुण नाहित क्? वरचे सर्व पॉईंट्स मला भौतिक (फिजिकल) म्हणजे वरकरणी जे दिसतं ते वाटतात. आत माणूस नसतो का?

ऋन्मेषचा दोष नाही. पण व्हिडिओची प्रसिद्धी मूळातच चूकिच्या पद्धतीने झाली आहे. तिचा वन ऑफ द चॉईस फार जास्त हायलाईट करून टाकलाय. बाकी बद्दल चर्चाच नाही. मिडियाला अजून काय हवं असतं? हेच की. अख्खा चंद्र सुंदर असला तरी त्यावर काळा डाग कसा आहे आणि तो आम्ही कसा पहिल्यांदा स्पॉट केला हेच सांगणार आणि जनमानसात योग्य तो मेसेज पोहोचत असेल तरी त्यातला उथळपणा (सो कॉल्ड) हायलाईट होणार. खरंच कठिण आहे,

त्यापेक्षा ते करण जोहर ने केलं ते निदान निव्वळ मनोरंजन तरी होतं आणि त्यातून त्याने दान धर्म तरी केला. दिपिकाचा व्हिडिओ म्हणजे निव्वळ चर्चा आणि वादाला तोंड.

खरे प्रश्न माझ्या मते मुळात जगण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार नाकारलाच जाणं असे आहेत. त्याबद्दल व्हीडिओ काही बोलत नाही.
>>>>>>

हा बरेच जणांचा सूर दिसतोय.
पण ते प्रश्न खर तर हे प्रश्न खोटे आहेत का? कमीजास्त महत्वाचे म्हणून शकतो, पण ते देखील व्यक्तीसापेक्ष झाले.
तसेच एखाद्या विडिओमध्ये सर्वच प्रश्नांना हात घातला पाहिजे असेही जरूरीचे नाही ना Happy

बायदवे, जगण्याचा अधिकार म्हणजे काय नेमके म्हणायचेय ते जरा विस्तारून सांगाल का ?

ऋन्मेष, स्त्रीभ्रुणहत्यांबद्दल ऐकलं नाहीत काय?

दिपिका तिची स्टाईल, अ‍ॅटिट्यूड, स्मार्टनेस, ग्लॅमरस डॉल, चॉईस ने रिलेशन्स स्विकारली/नाकारली. हे सर्व ऋन्मेषनी लिहिलं आहे. स्त्री म्हणून तिच्याकडे इतर कोणते गुण नाहित क्?

>>>>>>>>
स्त्री म्हणून वेगळे काय गुण हवेत? स्वयंपाकपाणी आणि शिवणकाम का? वर उल्लेखलेले गुण नाहीत का? पुरुषांच्या जगात स्वताचे स्थान निर्माण करणे हा गुण नाही का? या विडिओमध्ये तिने काम केले याचा अर्थ हा विडिओ लोकांपर्यंत पोहोचवायला तिला यात घेतले, कारण ती युथ आयकॉन आहे, हे तिचे कर्तुत्वच नाही का?

सोशलवर्कचा मुद्दा तर गैरलागू वाटतो. हि अपेक्षा का सेलिब्रेटींकडून ठेवायची? आणि जर कोणी सोशलवर्क केलेच तर त्यालाही आपण दुटप्पीपणा आणि ढोंग बोलतो, जसे आमीरखानलाही सत्यमेव जयतेवरून म्हटले जाते.

ऋन्मेष, स्त्रीभ्रुणहत्यांबद्दल ऐकलं नाहीत काय?
>>>>>

जर जन्माला आलेल्या स्त्रीभ्रूणाला त्याचे हक्क आणि सन्मान मिळाले तर का होतील स्त्रीभ्रूणहत्या.

मला हा व्हिडिओ अतिशय उत्तम वाटला. कुणाला त्यातला मेसेज पटला, कुणाला उथळ वाटला, कुणाला अपमानास्पद वाटला, कुणाला स्त्रीमुक्तीला झोडपायला कारण मिळालं. काही असो पण समानता-सक्षमीकरण या अनुषंगाने अनेक महत्वाच्या प्रश्नांवर उलटसुलट चर्चा अक्षरश: सगळ्या सोशल मिडियावर घडल्या. हेच व्हिडिओचं यश नाही का?

मला या व्हिडिओ मधला मेसेज अगदी पटलाच. त्या "सेक्स बिफोर, आउटसाइड मॅरेज इज माय चॉइस" चा दुसरा अर्थही असु शकतो, जो आपल्याला फारसा परिचित नसल्यामुळे ते वाक्य उथळ वाटतंय. या वाक्यातला "माय" हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे द्रौपदीसारख्या कुणावर एकापेक्षा जास्त पार्ट्नर्स ठेवण्याची सक्तीही तुम्ही करु शकत नाही, तो "तिचा" चॉइस असायला हवा. असे संबंध ठेवणे हा माझा चॉइस आहे, तितकाच न ठेवणे हाही माझा चॉइस आहे, असा अर्थ मला तरी लागला. पण तमाम लोकांना बहुतेक फक्त पहिलाच अर्थ कळला असं वाटतंय. Sad

शिवाय त्या व्हिडिओमधल्या इतर पुर्ण मेसेजकडे दुर्लक्ष करुन तेवढ्या एकाच वाक्यावर राळ उडवणे म्हणजे ट्रोलिंगच आहे. पण त्यामुळेच व्हिडिओची चर्चा झाली.

ज्यांच्या मते हा फक्त एलिट महिलांसाठीचा व्हिडिओ आहे, त्यांना यातला मेसेज कळलाच नाही, असं मला वाटतंय. अमुक एका गोष्टीविषयीच का बोलली, तमुक मुद्दा का नाही बोलली वगरे काही अर्थच नाही. इट्स अ १२० सेकंडस व्हिडिओ. नॉट अ डॉक्युमेंटरी. त्यात काही लिमिटेड मुद्देच येऊ शकतात, त्यात त्यांनी बहुधा ज्याविषयी फारसं बोललं जात नाही, ते सिलेक्ट केले असावेत. शिक्षण, जगण्याचा अधिकार हे मुद्दे अजिबात कमी महत्वाचे नाहीत पण ते "चॉइसेस" नाहीत, "राइट्स/ अधिकार" आहेत. कायद्याने दिलेले अधिकार. व्हिडिओ चॉइसेस विषयी आहे. म्हणजे या कायद्याच्या आधारे मिळणारे अधिकार/ अभिव्यक्तीस्वातंत्र्य उपभोगण्याचा चॉइस.

>> म्हणजे या कायद्याच्या आधारे मिळणारे अधिकार/ अभिव्यक्तीस्वातंत्र्य उपभोगण्याचा चॉइस.
नताशा, मग हे 'स्टेटिंग द ऑब्व्हियस' होत नाही का?

मी जे काही वाचलं होतं त्यावरून पुरूषांनी केलं तर चालतं मग....... पण असा उल्लेख या व्हिडीओत आढळला नाही. जर एखादा देश व्यक्तीस्वातंत्र्याच्या अशा पातळीवर आहे की जिथे स्वातंत्र्यांच्या पातळ्यांमधे फारसा फरक नाही तर या व्हिडीओत काही गैर नाही. भारतासारख्या देशात असे व्हिडीओज बनवू नयेत का ? बनावावेत की. पण

जर खरं असेल काटींग काऊचला चॉईस म्हणणार की शोषण ?

लोकहो,

वैद्यबुवांचं हे विधान पटलं.

>> नुसतं हुक उघडायची अ‍ॅक्शन केली तरी लोकं लगेच आधी जज करायलामोकळे होतात.

दुर्दैवाने हे बरोबर आहे. आणि ते चलच्चित्र बनवणाऱ्यांना माहीतही आहे. प्रस्तुत संदेश स्त्रियांसाठी आहे. पुरूषांना नाही. एकीकडे चोळी दाखवून पुरूष प्रेक्षकांच्या जनावरी भावनांना हात घालायचा. आणि दुसरीकडे त्यालाच 'माझी निवड' असं गोंडस नाव देऊन स्त्री प्रेक्षकांची दिशाभूल करायची.

चांगलं चाललंय!

आ.न.,
-गा.पै.

स्वाती, हो आहे ना.. पण तरी लोकांना (अगदी अनेक स्त्रीयांनाही) ते पचनी पडत नाहिये ना. इट्स अ रिअ‍ॅलिटी चेक!

दुर्दैवाने हे बरोबर आहे. आणि ते चलच्चित्र बनवणाऱ्यांना माहीतही आहे. प्रस्तुत संदेश स्त्रियांसाठी आहे. पुरूषांना नाही. एकीकडे चोळी दाखवून पुरूष प्रेक्षकांच्या जनावरी भावनांना हात घालायचा. >> चोळीला हात घातला कि 'एक'च गोष्ट आठवत असेल तर अशा video ची गरज अधिक आहे.

गा पै Lol अहो हवं तसं वळवू नका माझं विधान.
त्या विडियो मध्ये खरं तर काहीही अश्लिल नाहीये. स्क्रीन वर नुसती चोळी बघूनच जर लगेच जनावरी भावना जागृत होत असतील ह्याचा अर्थ परिस्थिती किती वाईट आहे हेच अधोरेखित होतय.

असामी Happy

चोळीला हात घातला कि 'एक'च गोष्ट आठवत असेल तर अशा video ची गरज अधिक आहे. >> +१

चोळीपायी रामायण अनेक देशात घडलं. ब्रा हे फेमिनीस्ट मूव्हमेंट मधील एक सिंबल आहे. ब्रा जाळणे, कचर्‍यात फेकणे हे स्त्रीत्वाच्या मर्यादा नाकारणे याचे निर्देशक मानले गेले. आय वूड बी सरप्राईजड इफ समवन मेड अ वुमेन्स एम्पावरमेंट व्हिडीयो विदाउट अ ट्रीब्यूट टू ब्रा.

नताशा, माय चॉइस हा नाकारण्यातही असू शकतो हा मुद्दा मिस झालेला. तो सांगितल्याबद्दल धन्यवाद.
असामी +१

रस्त्यावर झिप्स उघडणारे सत्पुरुष पाहून स्त्रियाम्च्या जनावरी भावना कशा जागृत होत नाहीत? पण चलच्चित्रामध्ये नुसती अ‍ॅक्शन पाहून या सत्पुरुषाम्च्या जनावरी भावना जागृत होतात? बहुतेक आपापल्या पत्नीचं अर्धं पाप घेऊन अन स्वत्;च अर्ध पुण्य देऊन बिचार्‍यांमध्ये फक्त जनावरी भावनाच शिल्लक रहात असाव्यात. पापी कुठले! Proud

रस्त्यावर झिप्स उघडणारे सत्पुरुष पाहून स्त्रियाम्च्या जनावरी भावना कशा जागृत होत नाहीत? >>>> होतात पण बहुतेक त्या नरडीचा घोट घेणार्‍या भावना असाव्यात अशी शंका आहे.
Lol

नताशा पोस्ट आवडली. राळ ही ठराविक वाक्यांवरच उडवली आहे.

ऋन्मेष - तुम्ही दिपिकाचा व्हिडिओ इतका चविने का पाहिलात? कारण ती प्रसिद्ध आहे म्हणून ना? अहो मी सोशल वर्क करायला तयार आहे पण मी चौकात उभी राहिले किंवा असे मेसेज देणारे व्हिडिओ केले तर कोणी पाहणार आहे का? तिने सोशल वर्क करावं ही माझी अपेक्षा नाही, फक्त स्वतःची प्रसिद्धी जनजागृती साठी योग्य प्रकारे वापरावी इतकंच.

सल्लू चालवतो ना बीइंग ह्युमन? त्याला फंडिंग नक्कीच इतर एन्जीओ पेक्षा मिळत असणार, ते निव्वळ त्याच्या प्रसिद्धीमूळेच. हे विसरता कामा नये. इतकंच हाय लाईट करायचं आहे मला. तिने सोशल वर्क करावं असा माझा हट्ट मूळिच नाही.

>> स्क्रीन वर नुसती चोळी बघूनच जर लगेच जनावरी भावना जागृत होत असतील ह्याचा अर्थ परिस्थिती किती वाईट आहे

मला कळलं नाही हे. हू आर वी किडिंग? मी पुन्हा विचारते, अन्डरवेअरला हात घातलेल्या पुरुषाच्या आवाजात हीच क्लिप कशी वाटेल?

Pages