माय चॉईस "दिपीका" :-)

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 April, 2015 - 14:45

कदाचित आतापर्यंत बहुतेकांनी यूट्यूबवर दिपीकाचा "माय चॉईस" विडिओ बघून झाला असेल.
नाही, तर मग आता बघा.

बस्स ३-४ मिनिटेच लागतील, पण यातच बरेच काही सांगून जाणारा...

https://www.youtube.com/watch?v=KtPv7IEhWRA

फक्त हा विडिओ बघताना तुम्ही मराठी वा महाराष्ट्रीय आहात, शहरातले वा खेड्यातले आहात, भारतीय वा एनआराय आहात वगैरे थोडावेळ बाजूला सारून फक्त एक स्त्री किंवा पुरुष आहात हेच ध्यानात ठेवून बघा.

दोनचार दिवसांतच लाखो हिटस मिळालेल्या या विडिओबद्दल मी तुर्तास ईतकेच म्हणेन,
मला आवडला!

ईतरांचे विचार जाणून घ्यायलाही आवडतील, पण मत मांडायच्या आधी विडिओ जरूर बघा.

असो, त्या निमित्ताने चार शब्द दिपीकाबद्दल.

दिपीका प्रकाश पदुकोन!
स्टार बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोन यांची मुलगी म्हणून माझी तिच्याशी पहिली ओळख झाली.
आजही ती त्यांचीच मुलगी आहे, पण तिने त्याहीपेक्षा मोठी अशी स्वताची ओळख निर्माण केली आहे.
काय, कशी, किती, हे नव्याने कोणायला सांगायची गरज भासू नये. ईतकी मोठी.
पण एक नक्की, हा विडिओ तीच करू शकते, हे विचार तीच मांडू शकते..

तिच्या अभिनयाचा, दिसण्याचा, स्टाईलचा, ड्रेसिंग सेन्सचा, स्मार्टनेसचा.. अ‍ॅण्ड येस्स, मी प्रचंड मोठा फॅन आहे ते तिच्या अ‍ॅटीट्यूडचा!

बॉलीवूड कलाकार वा सेलिब्रेटींना अफेअर्स काही नवीन नाहीत,. पण त्यातही, आपल्याकडे पुरुषांचे एकापेक्षा जास्त अफेअर्स त्यांना कूल डूड बनवतात तेच स्त्रियांच्या बाबतीत त्यांना कॅरेक्टरलेस ठरवतात., बस्स याच नियमाला ती सर्वार्थाने तडा देणारी वाटली, नेहमीच!

तिचे आजवर ज्याच्या कोणाशी नाव जोडले गेले, त्यात नेहमीच, मला तिचा तो वाटला तिची "माय चॉईस!" ..

तिने आपल्या मर्झीने नाती जोडली, तिने आपल्या सोयीने सारी बंधने दूर सारली. पण ना कसला कलंक ना कोणता दाग. आजही ती बॉलीवूडची ग्लॅमरस डॉल म्हणून ओळखली जाते. सर्वांना हवीहवीशी वाटणारी हिरोईन. कारण तिची डिग्निटी तिने शाबूत ठेवलीय. नव्हे, काय कोणाची बिशाद त्याला धक्का पोहोचवायची.

बस्स, या विडिओमध्ये एक दिपीका पदुकोन होती म्हणूनच हा विडिओ मला तरी कुठल्याही प्रकारचा पब्लिसिटी स्टंट वा ढोंग वा दुटप्पीपणा वाटला नाही.

तिने अभिनयक्षेत्र निवडले म्हणून तिने जे जे केले त्याची चर्चा झाली, पण ईतर कुठल्याही स्त्रीने आपल्या आयुष्यात तिच्यासारखा अ‍ॅटीट्यूड आणि कॉन्फिडन्स बाळगून जगायला हरकत नाही. मग क्षेत्र कोणतेही असो.

याचा अर्थ तिने आपल्या आयुष्यात जे केले तेच केले पाहिजे असे मुळीच नाही, ईनफॅक्ट ते जर तुमच्या तत्वात बसत नसेल तर मुळीच करू नका, आफ्टरऑल ईट्स "युअर चॉईस".. Happy

जाता जाता एवढेच सांगेन,
ती अशी आहे जिचा प्रत्येक पुरुषाला हेवा वाटावा,
तो हि ईतका, की जर त्याला पुढचा जन्म स्त्रीचा मिळणार असेल तर त्याने देवाकडे तो दिपीकाचा मागावा.

....................

तळटीप - यात कुठल्याही प्रकारचे सर्कास्टिकपणा वा उपरोध शोधायला जाऊ नका. Happy
त्यापेक्षा बघितला नसल्यास विडिओ बघा,
हि घ्या पुन्हा एकदा लिंक - https://www.youtube.com/watch?v=KtPv7IEhWRA

- ऋन्मेष

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< आता मुद्दा खोडा माझा >>

मुद्दा काय आहे?
चर्चा झाली नाही?
तुमच्यासमोर झाली नाही?
शोधायची क्रेझ नाही?

मुद्द्याला तुम्ही सोयीस्कर बगल दिलेली आहेच.

<<<<<आधी विधान करायचं की या नावांची चर्चा होत नाही. मग तसे पुरावे दिले की, आपलं पहिलं विधान मागे घेण्याऐवजी म्हणायचं चर्चा माझ्या समोर झाली नाही; माझ्या आधी झाली असल्यास शोधण्याची क्रेझ नाही. वा! अप्रतिम!! आपण राजकारणात उत्तम करिअर करू शका<<<<<>>>

हा माझ्यावरचा आरोप सिद्ध करा Happy

पहिलं विधान माझे नसल्याने ते मी कसे मागे घेतले?

<< हा माझ्यावरचा आरोप सिद्ध करा >>

मागच्याच पानावर सिद्ध करून दाखवला पण तुम्ही मान्य करीत नाही. तुम्हाला शतक ठोकायचं ना? ठोका आता.

शतक Happy

काल रात्री व्हिडिओ पाहिला. त्यात प्रसिद्धि मिळण्याजोगं इतकं काय आहे ते कळलं नाही. फक्त दिपिकाने प्रमोट केलाय म्हणून इतकी प्रसिद्धी? Uhoh
sex before marriage आणि sex outside marriage या दोन मुद्द्यांशिवाय तिने अनेक मुद्दे माय चॉईस म्हणून दिले आहेत, पण त्याचा उल्लेख सुद्धा नाही. फक्त सेक्स आणि तिने ब्राचं हुक (लावलंय का काढलंय) यावरच चर्चा. कठिण आहे.

मागच्याच पानावर सिद्ध करून दाखवला पण तुम्ही मान्य करीत नाही.
>>>
कुठे?
तुम्ही भरत मयेकर यांचे विधान मी बोललेलो असे म्हणत ते फिरवल्याचा माझ्यावर आरोप केलात, त्यावर बोला. जर ते विधान माझे नव्हतेच तर ते मी फिरवणार कसे. त्यात मी चुकून पगारे यांचे नाव घेतल्याने तुम्ही तेच घेऊन मूळ आरोपाला बगल दिलीत.

असो,

तुम्हाला शतक ठोकायचं ना? ठोका आता.
>>>>>>
हा दुसरा आरोप.
आज मला सचिनची व्यथा समजतेय. Happy

आज मला सचिनची व्यथा समजतेय.>>
आम्हाला बी रुन्मेश्ची व्यथा समजलिये..(पण त्यावर उपाय नाही समजला अजुन)
rm2.jpg

sex before marriage आणि sex outside marriage या दोन मुद्द्यांशिवाय तिने अनेक मुद्दे माय चॉईस म्हणून दिले आहेत, पण त्याचा उल्लेख सुद्धा नाही. फक्त सेक्स आणि तिने ब्राचं हुक (लावलंय का काढलंय) यावरच चर्चा.

>> +१

मला वाटलं होतं की ती सरकारी जाहिरात आहे, चॉइस, माला डी वगैरे सारखं... ! Uhoh
हे तर काय बी दाखवून रायली बे भो...!

तसं बी माऊली म्हणत्यात, 'जो जे वांछील तो ते लाहो'... माग काय नव सांगितलं बयेने?
तिनं पैसे छापले आणि आपण लागलो चर्चा झोडायला... Sad

हा व्हिडिओ केवळ elite आणि high-society महिलांकरिता बनविला गेला आहे असे वाटते.>>>>>>>>
पण या "हाय फाय" सोसायटी वाल्या महिला (या फिल्म मधील बहुसंख्य) पेज थ्री टाईप्स त्यांना हवे तसे वागत असतीलच..मग त्यांना आणखी कुठला चॉइस हवा आहे?
(का हा लोकांचा गैरसमज आहे की त्या स्वैर वागु शकतात पण प्रत्यक्षात त्यांना वागता येत नाही आणि म्हणुन हि फिल्म बनवली आहे?)

एक आर्टफॉर्म म्हणून छान आहे विडियो पण मलाही शंका येऊन गेली की किती लोकांना खरच त्यातला मेसेज लक्षात येइल.
मला वाटतं फक्त अप्पर क्लास महिलांबरोबर सगळ्याच स्तरांमधल्या तरुण सुशिक्षित मुलं मुली ज्यांना इंग्लिश समजतं त्यांना समजेल हा विडियो. तरुण पिढी एरवीच जास्त ओपन माईंडेड असते नवीन कॉन्सेप्ट्स, नवीन ट्रेंड्सबाबत.
मी मध्यंतरी फेसबूक वर एका दिल्लीतल्या शाळेतल्या की कॉलेजमधल्या मुलीनी यो यो हनी सिंगच्या सेक्सीस्ट लिरिक्सचा विरोध दर्शवणारं "रॅप" एकलं होतं. फार भारी बनवलं होतं! मला वाटलं त्यापेक्षा तिच्या वयाच्या मानानी त्या मुलीचं सेक्सीजम बद्दलचं अंडरस्टँडिंग फारच पुढचं होतं.

"हाय फाय" सोसायटी वाल्या महिला (या फिल्म मधील बहुसंख्य) पेज थ्री टाईप्स त्यांना हवे तसे वागत असतीलच..
का हा लोकांचा गैरसमज आहे की त्या स्वैर वागु शकतात पण प्रत्यक्षात त्यांना वागता येत नाही..
>>>>

हो नक्कीच, असू शकते. त्या सो कॉलड हायफाय सोसायटीमध्येही मुलामुलीमध्ये भेद होत असणारच, बंधने येत असणारच..

पण माझ्यामते त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा हा आहे की त्यांना निव्वळ धिटाई दाखवत घेतलेले स्वातंत्र्य नकोय, तर ते समाजाने स्विकारायला देखील हवेय.

दुर्दैवाने बाहेर त्या व्हिडिओ ची चर्चा निव्वळ दिपिका ने ब्राचं हुक लावलंय्/काढलय. विवाहबाह्य आणि विवाहपुर्व लैंगिक संबंधांना दुजोरा दिला आहे या तीन गोष्टींच्या आसपासच फिरतेय, त्यामुळे निव्वळ तेव्हढं पाहण्यासाठी लोक तो व्हिडिओ पाहून लाईक करतायत. खोटं का बोलू पण मी ही अरे आहे तरी काय हा व्हिडिओ म्हणून काल पाहिला तेव्हा मी पण त्या वाक्यांची आणि ब्राची वाट पहात होते की नक्की कोणत्या संदर्भाने तिने अशा व्हिडिओ मध्ये ते अ‍ॅक्ट केलं असेल. आणि व्हिडिओ संपता संपता माझ्या लक्षात आलं it is just not about sex or related freedom, it is about freedom of her own-self as an individual and choices related to them.
पण चर्चा मात्र फक्त निवडक गोष्टींचीच होणार.

दक्षिणाजी, असे नाहीये.
चर्चा करणारे किंवा त्यातही खास करून विरोध दर्शवणारे या मुद्द्यांवर येत असतील, पण विडिओ बघताना ते तसे तितकेसे नाही जाणवत.

स्वत:चेच उदाहरण,
मी विडिओ दोन वेळा पाहिला.
पहिल्यांदा पाहतानाही तो हुकचा सीन मला ना खटकला ना काही विचित्र वाटले. (इथे विचित्र वाटणे म्हणजे ग'फ्रेंड बरोबर बघत असतो तर अचानक ते द्रुश्य बघून संकोचायला झाले असते वगैरे अश्यातले ते नाही वाटले)

दुसर्‍यांदा मी पुन्हा ते संवाद नीट लक्षपुर्वक ऐकायला पुन्हा तो विडीओ पाहिला, (कारण ईंग्लिश कच्चे), तर तेव्हाही तो सीन आला आणि गेला, फारसे विशेष जाणवलेही नाही.. ना मी त्याची वाट बघत होतो..

थोडक्यात विडिओ बघायच्या आधीच जर एखाद्याच्या डोक्यात असेल की अरे यात दिपिकाचा एक सेक्सी सीन आहे तरच त्यात ते आवर्जून शोधले जावे अन्यथा मला तरी ते वल्गर आचरट नाही वाटले.
याचे कारण तो सीन येण्याअगोदरच माझ्या डोक्यात त्यात मांडलेले विचार खेळू लागले होते..
माझ्या स्वताच्या मते हे विडिओचेच एक यश आहे!

अवांतर - हूक लावलेय का काढलेय हे देखील बरेच जणांना माहीत नसणे हे बरेच काही सांगून जाते. Happy

it is just not about sex or related freedom, it is about freedom of her own-self as an individual and choices related to them. >>> पण मग स्वातंत्र्याचा एवढा लिमिटेड अर्थ का घेतला गेला आहे? शिक्षण, करीयर ह्याबद्दल काहीच कसे बोलले गेले नाही (की मला ते कळले नाही???). ते स्वातंत्र्य नको आहे का? केवळ लग्न, सेक्स, कपडे, दागिने, रात्री-अपरात्री उशिरा येणे एवढेच स्वातंत्र्य हवे आहे का??? हा व्हिडिओ दीपिकाला स्वतःसाठी हव्या असणार्‍या चॉइसबद्दल आहे की सर्व महिलांसाठी आहे??? सर्व महिलांसाठी असेल तर दुर्देवाने मूळ प्रश्नच त्या व्हिडिओशी संबंधित असणार्‍या लोकांना कळलेले नाहीत असे मला वाटते.

केवळ लग्न, सेक्स, कपडे, दागिने, रात्री-अपरात्री उशिरा येणे एवढेच स्वातंत्र्य हवे आहे का??? >> स्त्रियांना 'जज' केले जाण्याच्या विविध पायर्‍या आहेत, त्यात ही पहिली. म्हणून त्यावर फोकस असेल. एनीवे, एक टॉपिक धरून त्यावर व्हिडीओ केलाय असे दिसते. त्या विषयावर हा काही फार मोठा वैचारिक व्हिडीओ वगैरे नव्हे. फक्त एक स्टेटमेण्ट आहे.

स्त्रियांना 'जज' केले जाण्याच्या विविध पायर्‍या आहेत, त्यात ही पहिली. म्हणून त्यावर फोकस असेल.>>> असे असेलही किंवा इतर पायर्‍यांची कल्पनाच नाही म्हणूनही असेल

हा काही फार मोठा वैचारिक व्हिडीओ वगैरे नव्हे >> हे मात्र पटले

ऋन्मेष मी खरंतर फार लक्ष देऊन आणि पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ पाहिला नाहिये. पण तुम्ही हेडर मध्ये काय काय लिहिलं आहे ते पुन्हा वाचा.

फा, तुझ्या पोस्टींमधून तो विडियो फार काही बिग डील नाहीये हे सारखं अधोरेखित केलं जातय जे ठीक आहे, ते तुझं वैयक्तिक मत आहे. फक्त माझ्यामते समाजाला उपदेशपर काही सांगताना ते वैचारिक दृष्ट्या वजनदार बनवण्याकरता जो काही फॉरमॅट वापरतात त्यामुळे एकंदरितच त्याचा टोटल बँड वाजतो.
ह्या विडियो मध्ये तू म्हणतोयस ते स्त्रीयांना बर्‍याच ठिकाणी जज केलं जातं त्याची उदाहरणं आहेत आणि त्याच्या मांडणीमध्ये क्रियेटिविटी किंवा वैचारिक पावर लावलेली आहे. तो पावरफुल त्याच्या एक्सिक्युशन मध्ये आहे. Happy

शिक्षण करियर ह्या विषयी बोलणारे व्हिडीयोज असावेत पण अनेक वेळा ह्या चॉईसेस करताना स्त्रिया (कुठल्याही थरातील) कपडे, येण्याच्या वेळा सारख्या लहान वाटणार्‍या गोष्टींपुढे कोलमडून पडतात. उदा: हायस्कूल मध्ये सलवार कमीझ हा युनिफॉर्म ऑप्शन नसेल, स्कर्ट-ब्लाऊझ पिनाफोर असेल तर आजही मुलीला घरी बसवणारे लोक मुबलक आहेत. दिवसा अर्थार्जन करून एखादे स्किल ईव्हनिंग स्कूल मध्ये जाऊन शिकावे वाटले तर अमुक वाजता घरी येत नाही म्हणून पोरीला बदडणारे बाप आहेत.

फक्त दिपीका ने सांगितले म्हणून हा व्हिडियो हाय-फाय महिलांसाठी आहे असे होत आहे का? हाच संदेश शबाना आझमी किंवा नंदिता दास ने दिला असता तर तो सर्वसमावेशक वाटला असता का?

फक्त दिपीका ने सांगितले म्हणून हा व्हिडियो हाय-फाय महिलांसाठी आहे असे होत आहे का? हाच संदेश शबाना आझमी किंवा नंदिता दास ने दिला असता तर तो सर्वसमावेशक वाटला असता का? >>> नाही असे मुळीच नाही. दीपिका ग्लॅमरस आहे म्हणून मी हे म्ह्णत नाही. ह्या व्हिडिओ मध्ये महत्वाच्या प्रश्नांना बगल दिल्यासारखी मला वाटली. आणि व्हिडिओ सर्वसमावेशक हवा होता तर इंग्रजीत कशाला बनविला?

दोनदा मी माय चॉईसची चित्रफित पाहिली.

मला कळत नाही. आपल्यापकी किती लोकांना लग्नापुर्वी समागन आणि लग्नानंतर जोडीदाराव्यतिरिक्त इतर कुणाशी समागन करण्याची संधी मिळते? खूपच कमी लोकांना ही संधी मिळत असावी आणि मिळात जरी असेली तरी खूप कमी जण ती संधी उपभोगत असतील. माझी निवड मधील फक्त ते एक वाक्य इतक्या लोकांना खटकले हा मला एक दांभिकपणा वाटतो आहे.

बाकी दीपिकाची ही कविता म्हणण्याची पद्धत मला आवडली. त्यात ईमोशन्स होत्या.

फा, तुझ्या पोस्टींमधून तो विडियो फार काही बिग डील नाहीये हे सारखं अधोरेखित केलं जातय जे ठीक आहे, ते तुझं वैयक्तिक मत आहे. फक्त माझ्यामते समाजाला उपदेशपर काही सांगताना ते वैचारिक दृष्ट्या वजनदार बनवण्याकरता जो काही फॉरमॅट वापरतात त्यामुळे एकंदरितच त्याचा टोटल बँड वाजतो.
ह्या विडियो मध्ये तू म्हणतोयस ते स्त्रीयांना बर्‍याच ठिकाणी जज केलं जातं त्याची उदाहरणं आहेत >> बुवा +१.

सीमंतिनी, कपड्यांची चॉईस आणि उशीरा घरी परतण्याचे स्वातंत्र्याच्या मुद्द्याशी सहमत.
समाजाच्या सर्वच स्तरांना लागू होणारा मुद्दा.

अर्थात यातही दिपिका असल्याने कपड्यांची चॉईस म्हणताच एखाद्याच्या नजरेसमोर मॉडर्न तंग तोकडे कपडे आले असावेत.. मात्र सोयीचे जीन्स टीशर्ट घालण्याची परवानगीही किती जणांना असते.. खास करून लग्न होऊन सासरी गेले आणि एकत्र कुटुंब असले की सासरच्या कलानेच घ्यावे लागते.. मला बरेचदा मुलींच्या लग्नानंतरच्या अ‍ॅडजस्टमेंटचे कौतुक कम नवल वाटते.. पण असल्या लोक काय म्हणतील टाईप उगाचच कराव्या लागणार्‍या अ‍ॅडजस्टमेंटसाठी वाईटही वाटते..

Pages