माय चॉईस "दिपीका" :-)

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 April, 2015 - 14:45

कदाचित आतापर्यंत बहुतेकांनी यूट्यूबवर दिपीकाचा "माय चॉईस" विडिओ बघून झाला असेल.
नाही, तर मग आता बघा.

बस्स ३-४ मिनिटेच लागतील, पण यातच बरेच काही सांगून जाणारा...

https://www.youtube.com/watch?v=KtPv7IEhWRA

फक्त हा विडिओ बघताना तुम्ही मराठी वा महाराष्ट्रीय आहात, शहरातले वा खेड्यातले आहात, भारतीय वा एनआराय आहात वगैरे थोडावेळ बाजूला सारून फक्त एक स्त्री किंवा पुरुष आहात हेच ध्यानात ठेवून बघा.

दोनचार दिवसांतच लाखो हिटस मिळालेल्या या विडिओबद्दल मी तुर्तास ईतकेच म्हणेन,
मला आवडला!

ईतरांचे विचार जाणून घ्यायलाही आवडतील, पण मत मांडायच्या आधी विडिओ जरूर बघा.

असो, त्या निमित्ताने चार शब्द दिपीकाबद्दल.

दिपीका प्रकाश पदुकोन!
स्टार बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोन यांची मुलगी म्हणून माझी तिच्याशी पहिली ओळख झाली.
आजही ती त्यांचीच मुलगी आहे, पण तिने त्याहीपेक्षा मोठी अशी स्वताची ओळख निर्माण केली आहे.
काय, कशी, किती, हे नव्याने कोणायला सांगायची गरज भासू नये. ईतकी मोठी.
पण एक नक्की, हा विडिओ तीच करू शकते, हे विचार तीच मांडू शकते..

तिच्या अभिनयाचा, दिसण्याचा, स्टाईलचा, ड्रेसिंग सेन्सचा, स्मार्टनेसचा.. अ‍ॅण्ड येस्स, मी प्रचंड मोठा फॅन आहे ते तिच्या अ‍ॅटीट्यूडचा!

बॉलीवूड कलाकार वा सेलिब्रेटींना अफेअर्स काही नवीन नाहीत,. पण त्यातही, आपल्याकडे पुरुषांचे एकापेक्षा जास्त अफेअर्स त्यांना कूल डूड बनवतात तेच स्त्रियांच्या बाबतीत त्यांना कॅरेक्टरलेस ठरवतात., बस्स याच नियमाला ती सर्वार्थाने तडा देणारी वाटली, नेहमीच!

तिचे आजवर ज्याच्या कोणाशी नाव जोडले गेले, त्यात नेहमीच, मला तिचा तो वाटला तिची "माय चॉईस!" ..

तिने आपल्या मर्झीने नाती जोडली, तिने आपल्या सोयीने सारी बंधने दूर सारली. पण ना कसला कलंक ना कोणता दाग. आजही ती बॉलीवूडची ग्लॅमरस डॉल म्हणून ओळखली जाते. सर्वांना हवीहवीशी वाटणारी हिरोईन. कारण तिची डिग्निटी तिने शाबूत ठेवलीय. नव्हे, काय कोणाची बिशाद त्याला धक्का पोहोचवायची.

बस्स, या विडिओमध्ये एक दिपीका पदुकोन होती म्हणूनच हा विडिओ मला तरी कुठल्याही प्रकारचा पब्लिसिटी स्टंट वा ढोंग वा दुटप्पीपणा वाटला नाही.

तिने अभिनयक्षेत्र निवडले म्हणून तिने जे जे केले त्याची चर्चा झाली, पण ईतर कुठल्याही स्त्रीने आपल्या आयुष्यात तिच्यासारखा अ‍ॅटीट्यूड आणि कॉन्फिडन्स बाळगून जगायला हरकत नाही. मग क्षेत्र कोणतेही असो.

याचा अर्थ तिने आपल्या आयुष्यात जे केले तेच केले पाहिजे असे मुळीच नाही, ईनफॅक्ट ते जर तुमच्या तत्वात बसत नसेल तर मुळीच करू नका, आफ्टरऑल ईट्स "युअर चॉईस".. Happy

जाता जाता एवढेच सांगेन,
ती अशी आहे जिचा प्रत्येक पुरुषाला हेवा वाटावा,
तो हि ईतका, की जर त्याला पुढचा जन्म स्त्रीचा मिळणार असेल तर त्याने देवाकडे तो दिपीकाचा मागावा.

....................

तळटीप - यात कुठल्याही प्रकारचे सर्कास्टिकपणा वा उपरोध शोधायला जाऊ नका. Happy
त्यापेक्षा बघितला नसल्यास विडिओ बघा,
हि घ्या पुन्हा एकदा लिंक - https://www.youtube.com/watch?v=KtPv7IEhWRA

- ऋन्मेष

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.....

इंटरेस्टींग ..

ह्या व्हिडीयोवरचं अजून एक मत ऐकलं ते म्हणजे हा व्हिडीयो asexual करायला हवा होता .. (समानताच अधोरेखीत करायची असेल तर त्या दृष्टीने)

ते थोडंफार पटलंही आणि नाहीही ..

ज्यांनां हा व्हिडीयो आवडला, त्यातला मेसेज कळला त्यांनां झिपला हात घातलेल्या पुरूषाचाही व्हिडीयो पटायला हवा .. नसेल पटत, विचित्र वाटत असेल विचारांत सक्षमीकरण पोचलेलं नाही असं होईल ..

मला कळलं नाही हे. हू आर वी किडिंग? मी पुन्हा विचारते, अन्डरवेअरला हात घातलेल्या पुरुषाच्या आवाजात हीच क्लिप कशी वाटेल?>>>>>>>>>> तुमचा काहीतरी मेजर झोल होतोय का डोक्यात बाई? अहो पुरुषांच्या विषयी ही कँपेन असती तर त्यालाही लागू पडेलच ना? पण तुम्ही एकदम पॅरॅलल काय ड्रॉ करत आहात? अहो हा बेसिक प्राबलेम आहे. अहो कमी कपडे तर सोडा पुर्ण झाकलेली बाई एकटी दुकटी सापडली तर तिच्यावर झडप घालायला बघतात आणि कारण काय तर म्हणे एकटं फिरलं तर असच होणार. हे त्याचं रिजनिंग असतं.त्या विषयी सुरु आहे तर त्यात तुम्ही पुरुषांना कुठे घालताय?

Another thing, keeping in mind the current state of affairs, do you really think a man in his underwear creates a similar effect on women like it would on men if they see a woman in her underwear?

ह्या व्हिडीयोवरचं अजून एक मत ऐकलं ते म्हणजे हा व्हिडीयो asexual करायला हवा होता .. (समानताच अधोरेखीत करायची असेल तर त्या दृष्टीने)>>>>> मी माझ्या पहिल्या पोस्ट मध्ये पण लिहिलय तो विडियो स्त्रीयांच्या राईट ऑफ चॉईस बद्दल आहे एक्वल राईट्स बद्दल नाही.

झिपला हात घातलेला असेल तरीही पटेलच, माय चॉइस. (दुसऱ्याला ही चॉइस आहे, आणि माय चॉइस हे दुसऱ्याच्या चॉइसवर अतिक्रमण नाही हे अझ्युम्ड आहे.)

ज्यांनां हा व्हिडीयो आवडला, त्यातला मेसेज कळला त्यांनां झिपला हात घातलेल्या पुरूषाचाही व्हिडीयो पटायला हवा .. नसेल पटत, विचित्र वाटत असेल विचारांत सक्षमीकरण पोचलेलं नाही असं होईल ..>> हे मला उद्देशून आहे का? असल्यासः मेसेज जर समानतेचा असेल तर पटेल की.

झिपला हात घातलेल्या पुरूषाचाही व्हिडीयो >>> असा मुळातच का बनवला जाईल? पुरूषांना हे ओरडून सांगायची गरज पडतच नाहीये की त्यांच्या चॉईसला किंमत आहे. कारण ती आहेच. रादर केवळ त्यांनाच चॉईस आहे हेच गृहितक आहे ना?

>> अहो हा बेसिक प्राबलेम आहे. अहो कमी कपडे तर सोडा पुर्ण झाकलेली बाई एकटी दुकटी सापडली तर तिच्यावर झडप घालायला बघतात आणि कारण काय तर म्हणे एकटं फिरलं तर असच होणार.

माय पॉइंट प्रिसाइजली. म्हणजे प्रॉब्लेम लाइज एल्सव्हेअर!

झिपला हात घालून पुरुषाने 'माय चॉइस' म्हणणं जितकं येडपट वाटेल तितकीच ही व्हीडिओही मला येडपट वाटते.

माय पॉइंट प्रिसाइजली. म्हणजे प्रॉब्लेम लाइज एल्सव्हेअर!

झिपला हात घालून पुरुषाने 'माय चॉइस' म्हणणं जितकं येडपट वाटेल तितकीच ही व्हीडिओही मला येडपट वाटते.>>>>>>> ते हुक ला हात लावणं हे एक सिंबल होतं की if I undress for someone it is my choice. Just because you see me in skimpy clothes on the screen or even out in the open doesn't mean I will or I should undress for you. I am not your property.
तुम्ही परत पुरुषाचा मुद्दा काढाल तर उत्तर आधीच देतो, हो, तिथेही ते अप्लिकेबल आहे जर जशी परिस्थिती आता स्त्रीयांच्या चॉईसेस बाबत आहे तशी पुरुषांच्या चॉईसेसबद्दल असती तर. सारखं पुरुषांनी हे केलं तर काय हा मुद्दा टोटली आउट ऑफ प्लेस आहे चर्चा फक्त स्त्रीयांच्या राईट ऑफ चॉईस बद्दल सुरु असताना.

स्त्री मुक्ती चळवळीसाठी आयुष्य वेचणार्‍यांच्या ऊभ्या हयातीतल्या कामाला कोणी एवढं सिरियसली घेतलं नसेल. विडिओतल्या बाकी ९८ पैकी एकीने दिपिकाने केलेला लीड रोल केला असता तर एवढा गवगवा, एवढी चर्चा झाली असती का असे वाटून गेले.

कोण म्हणतंय आणि कसं म्हणतंय ह्याला प्रचंड अवास्तव महत्व दिल्या जातंय असं दिसतंय. त्यामुळेच धाग्याच्या नेमक्या ऊद्देशाबद्दल आणि त्यापाठच्या भावनेबद्दल शंका आहेत.

पेप्सी पासून बनियन पर्यंत आणि शौचालय पासून गुजरात पर्यंत सगळीकडे स्टार्स घेतात ना खप वाढायला? का प्रत्य्क्ष ती पेप्सी बनवणार्‍या शॉप फ्लोअरच्या माणसाला घेतात? मग एका चांगला मेसेजचा खप वाढवायला, घेतली स्टार तर काय हरकते? त्यानी पब्लिसिटी होत असेल तर चांगलंच आहे ना..

अदिति, मला नाही वाटत. समजून घेतल्यावर आपण काय करतो ह्याला महत्व आहे आणि त्यापेक्षा आपण स्मजून घ्यायच्या आधीच रफा दफा करतोय का, हे सुद्धा बघायला पाहिजे.

>> स्वाती, तुझा शंकासुर का झालाय?
Proud

माझ्या मते क्लिपचा फोकस चुकला आहे. सिंपल.

संदेश काय आहे? समानता नाहीये का? मग असमानतेचं मूळ कुठे आहे नक्की?

कधी/कुठले/कसे कपडे घालावेत याबद्दल सोशल कंडिशनिंग दोन्ही जेन्डर्सना असतं. संसार थाटायचं प्रेशर दोन्ही जेन्डर्सना असतं. दोन्ही जेन्डर्सच्या समलिंगित्वाकडे गुन्हा असल्यासारखं पाहिलं जातं. मुलं होऊ देणं / न देणं हा (संसारात) कोणा एकाचा चॉइस असू शकत नाही. कुंकू आणि बांगड्यातर हसं होण्याइतके जुनाट विषय या व्हीडिओच्या टार्गेट ऑडियन्ससाठी नक्कीच आहेत.

'मी केवळ स्त्री आहे म्हणून कोणाची प्रॉपर्टी नाही' हा खरा मुद्दा. हे समजणं हे सक्षमीकरण.
केवळ स्त्री आहे म्हणून कंप्लीटली नाकारल्याच जातात अशा बाबी (हाच मुद्दा 'संशोधनातील स्त्रिया'वरही मी लिहिला होता) म्हणजे श्वास घेण्याचा अधिकार आणि ज्ञानार्जन करण्याचा अधिकार. ते मिळावेत, एव्हरीथिंग एल्स फॉलोज.

व्हिडीओ मधला मॅसेज नण्तर समजाउन सांगावा लागत असेल तर व्हिडीओ फ्लॉप झाला अस समजायच का? >>> मलाच पण सेम असचं वाटतयं.

ऋन्मेष - तुम्ही दिपिकाचा व्हिडिओ इतका चविने का पाहिलात? कारण ती प्रसिद्ध आहे म्हणून ना?
>>>>>>
नाही.
तसे असते तर मी दिपिकाचे एकूण एक चित्रपट पाहिले असते.
मला त्या विडिओबद्दल समजले ते त्यातील कंटेन्टमुळे. आणि हे मला समजले कारण तो विडिओ प्रसिद्ध झाला. आणि तो प्रसिद्ध व्हावा यासाठी दिपिकाची पॉप्युलारिटी वापरली गेली. जसे दर दुसर्‍या जाहीरातीत शाहरूख दिसतो, कारण ती जाहीरात घराघरात पोहोचावी. पण कोणी शाहरूख आहे म्हणून पेप्सी पित नाही, त्याला आवडते वा नावडते त्यावरच ते ठरते.

तो "तिचा" चॉइस असायला हवा. असे संबंध ठेवणे हा माझा चॉइस आहे, तितकाच न ठेवणे हाही माझा चॉइस आहे, असा अर्थ मला तरी लागला. पण तमाम लोकांना बहुतेक फक्त पहिलाच अर्थ कळला असं वाटतंय.
>>>>
अगदी अगदी, प्लस वन!

चोळीला हात घातला कि 'एक'च गोष्ट आठवत असेल तर अशा video ची गरज अधिक आहे.
>>>>
वाह असामी, प्लस सेव्हन एटी सिक्स!

असामी,

>> चोळीला हात घातला कि 'एक'च गोष्ट आठवत असेल तर अशा video ची गरज अधिक आहे.

कुणाला अधिक गरज आहे? हे चलच्चित्र बायकांना संदेश देतंय ना? आणि त्याची गरज मात्र पुरुषांना जास्त आहे ...?

असो.

अर्भकाला अंगावर पाजणाऱ्या बाईचा फोटो का नाही टाकला 'माय चॉईस' म्हणून? पुरुषांचं छानपैकी प्रबोधन झालं असतं की!

आ.न.,
-गा.पै.

कुणाला अधिक गरज आहे? हे चलच्चित्र बायकांना संदेश देतंय ना? आणि त्याची गरज मात्र पुरुषांना जास्त आहे ...? >> तुम्हाला काय वाटते कोणाला अधिक गरज आहे नक्कि ? बायकांना असेल तर त्यांना नक्कीच तुम्हाला अपेक्षित असलेली एक गोष्ट आठवणार नाहित. पुरुषांना असेल तर त्याच्यापलीकडे बघता येत नसेल तर व्हिडियोची गरज भासणारच.

अर्भकाला अंगावर पाजणाऱ्या बाईचा फोटो का नाही टाकला 'माय चॉईस' म्हणून? पुरुषांचं छानपैकी प्रबोधन झालं असतं की! > >तुमची १००% खात्री आहे ह्याबद्दल ? नाही हे साहजिक आहे, असती तर हे पोस्ट केले नसते. 'माय चॉईस' ह्या शब्दाचा अर्थ बघा.

पाहिली हि क्लीप.

आधी क्लिप बद्दलः
पहिले सत्यः दिपीका ह्या नटीने अशी क्लिप काढली म्हणून लोकांचे ज्यास्त लक्ष गेले.

आता त्यातल्या तिच्या "चॉइस" बद्दल: तिने नेमके हेच का चॉईस चर्चेला निवडले हा प्रश्ण येवु शकत नाही कारण तो तिचा चॉईस आहे. त्यामुळे , काय ते तिने काहिहि पॉईंट्स निवडलेत. ते उथळ आहेत वगैरे निरर्थक वाटते. कारण प्रत्येकाची लेवल(शैक्षणिक, आर्थिक, वैचारीक आणि महत्वाचे ती ताकद) नुसार तिला ते "मुद्दे" वा चॉइस दाखवावे वाटले. आता ते कुठल्या लेवल वरच्या स्त्री वर परीणाम करु शकतात किंवा समाजात काय बदल घडू शकतात हा वादाचा मुद्दा होवु शकतो.

पण एका अर्थी विचार केला तर वाटले, ती ह्या क्लिप मध्ये हेच चॉईस का नाही निवडणार? कारण समाजात अजूनही अगदी ह्याच मुद्द्यावर, स्त्री ला पडताळून (judge) बघितले जाते. अगदी स्त्री शिकलेली असु दे, कमावणारी असु दे वा पुर्णपणे स्वतंत्र पणे जगणारी.

अजूनही,

  • ती विवाहित आहे तर ती कुंकू लावते का?
  • ती स्त्री/मुलगी असून रात्री उशीरा आली तर चाल चलन ठिक नाही.
  • तिला मुलगे मित्र आहेत म्हणजे ती लफडेबाज
  • ती कपडे कसे घालते त्यावरून ती नालायल किंवा अब्रू नसलेली.
  • ती मेकअप खूप करते म्हणजे अतिशहाणी

समाज अजून ह्यातच अडकलेला आहे मग का नाही हेच मुद्दे येणार? अजूनही so called modern in thinking असे "दाखवणारे" आणि आपल्याच आजूबाजूला वावरणारे त्यांनाच विचारा की , लग्नाआधी, चार्-पाच मित्र आहेत व ते खूप जवळचे आहेत व त्यांच्याबरोबर ती रात्री भटकते अशी मुलगी आहे असे सांगितल्यावर त्यांनी तिच्याशी लग्न केले असते का?

हे खालील विचार वा चर्चा एका मार्केटींग कंपनीत कामावर असलेल्या पुरुषांचे आहेत. हे प्रत्यक्षात घडलेत व घडतात.
-----------------------------------------------------------
तीन चार पुरुष टाळकी पार्टीत एक दोन घोट घेवून अशी चर्चा करतात.

पुरुष एकः वो डीपार्टमेंट वाली एकदम हॉट है. कभी स्कर्ट डालती है तो देखना. हॅं हॅं...
----------------------------------------------------------------
पुरुष दोन : अरे तेरे शादी का का हुवा? कोइ लडकी आयी थी ना?
पुरुष तीनः अरे नही, जॉब के लिये बहुत घुमती है, क्या पता कितने चक्कर चलाईगी. और घर पे कौन देखेगा बच्चा सब होने के बाद. और बहोत साल बाहर रहके आयी है. पता नही यहा का लडका क्यों चाहिये?

(नोटः दोन्ही पुरुष मार्केटींग मध्ये काम करतात. आणि बॉस ने दिलेल्या पैशात रात्रीची सोय हवी असेल तर तीही करतात ऑन्साईट वर ह्यामध्ये स्ट्रीप डान्स, लॅप डान्स आणि जी पाहिजे ती मजा उपलब्ध असेल तशी. हेच मुलीने केले तर?)
-------------------------------------------------------------------

प्रत्येक पुरुष असा नसला तरी अजून समाजात मुलीने कसे असावे ह्याचे रुल्स अगदी ठासून भरलेत.

दुर्दैवाने, my choice हा फक्त शिक्षण, पैसा असून सुद्धा मिळत नाही काहि स्त्रीयांना. बर्‍याच नोकरी करणार्‍या स्त्रींयाना सुद्धा आपले निर्णय घेता येत नाही(ज्यांना क्षमता नाही किंवा स्वतःहून लादून घ्यावे लागलेत त्या स्त्रीया वेगळ्याच).

-----------------------------------------------------------------------
बराच उहापोह करून सुद्धा हा विडिओ काहीच कोणाचं बदलणार नाही हेच खरे. कारण हे बदल जिथे व ज्या लेवल वर आवश्यक आहेत ते सुरु कधी होणार व कसे हाच प्रश्ण आहे.
कारण खरा मेसेज किती पालथ्या घड्या टाळक्यांना कळणार की,

stop judging woman , let her live as an individual and most importantly as a human-being.
पण इथे टाळकीच अशी आहेत ना.....

अतिशय उथळ आणि तददन फालतू क्लिप आहे ती!
भारतातल्या सर्वसामान्य स्त्रियांना यापेक्षा अनेक गोष्टीसाठी झगडावे लागत असताना ही कोण टिकोजीराव दीपिका स्वत:चं तुनतुण लावतेय?

झंपी चांगला प्रतिसाद आहे. बराच उहापोह करून सुद्धा हा विडिओ काहीच कोणाचं बदलणार नाही हेच खरे >> चर्चा सुरू होणे आणि आपले काही तरी चुकते आहे काय असे एक क्षण देखील वाटणे हीच सुरूवात आहे. बदल हळूहळूच घडतील लगेच क्रांती होऊन इतकी वर्ष असलेली मानसिकता बदलणार नाही.

वत्सला, तुम्ही वरचाच प्रतिसाद वाचा आणि थोडा विचार करा.

प्रत्येकालाच चॉईस आहे. वेठबिगारीची कामं करायला नकार दिला म्हणून वस्ती पेटवून देणा-या आपल्या देशात त्या मानाने स्वातंत्र्याच्या उच्च पातळीवर असलेल्यांचे प्रश्न "उपरे" वाटण्याची शक्यता आहे. पण स्वातंत्र्याची सर्वोच्च पातळी सुद्धा माहीती असायला हवीच. मात्र, या पातळीवरच्या लोकांनी कधीही आपल्या देशाला लाज आणणा-या वस्तुस्थितीबद्दल आपल्या कलेचा उपयोग करू नये हे खटकणारं नक्कीच आहे. त्यांनी अमूकच करावं ही जबरदस्ती नाही, पण त्यांच्या चॉईस मधे सामाजिक जबाबदारी म्हणून कधी या गोष्टी येणार आहेत का ? खालच्या पातळीवरच्या स्त्रीचं दुहेरी किंवा तिहेरी शोषण आहे.

दीपीका पदुकोणे ने या व्हिडीओत असावं का ?
समजा या व्हिडीओत ती नसती तर संदेश "योग्य" रीतीने पोहोचला नसता का ? टाईम्स वृत्तपत्राशी तिने जो लढा दिला त्या वेळी तिच्या भूमिकेचं समर्थन सर्वांनी केलं होतं. पण मग त्या भूमिकेशी फारकत घेत त्या रोडीज की फीडीज मधे त्या ही पेक्षा खालच्या टीकेवर ती जेव्हां हसून दाद देते तेव्हां समर्थन करणारे वुचकळ्यात पडत नाहीत का ? तिने हसावं की नाही हा प्रश्न नाही तर भूमिकेतलं सातत्य हा प्रश्न आहे. तुम्हाला अशी अभिनेत्री या व्हिडीओत असावी असं का वाटलं ? ज्यांनी आपल्या चॉईस संदर्भात संघर्ष करून भूमिका घेतली त्यांना का नाही घ्यावंसं वाटलं ?

अभिनेत्री रेखा स्वतःच्या चॉईस ने तिचं जीवन जगली. तिला लग्नाच्या बंधनात नव्हतं अडकायचं. तिला का घेऊ नये ? अशा अनेक आहेत , असतील. उद्या एखाद्याला व्यसनमुक्ती बद्दल सामाजिक जागृती करणारा व्हिडीओ बनवावासा वाटला आणि त्यात धर्मेंद्र किंवा नानाला घेतले तर त्यावर टीका होणार ना ? दहशतवादाचा मुकाबला कसा करावा या व्हिडीओत संजय दत्त ला घेऊन चालेल का ? रस्ते सुरक्षा किंवा ड्रायव्हिंग सेन्स बद्दलच्या व्हिडीओत सलमान खानला साईन केलं तर ?

या व्हिडीओचा विषय जरा वेळ बाजूला ठेवूयात. त्याने काय जागृती व्हायची आणि कुठल्या थरात व्हायची ती होवो.

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=a188A

या बातमीत ज्या समाजात स्वतःच्याच स्वातंत्र्याबद्दल अंधःकार आहे अशा वातावरणात लढा देणारी महीला कधी आपल्या समाजाची आयकॉन होऊ शकत नाही का ? आयकॉन सोडा किती जणांना माहीती असतं ? किमान माहीत झाल्यावर या प्रश्नावर दोन शब्द तरी ? या महीलेचा लढा हा असंख्य महीलांच्या समस्येचं प्रतिनिधित्व करत नाही का ? हा एखाद्या सिनेमाचा, नाटकाचा, कादंबरीचा विषय नाही का ? की त्या त्या समाजातच एखाद्या शहाण्याने नोंद घ्यायची ? अभिव्यक्तीस्वातंत्र्यातही अशा भिंती आहेत का ?

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=bFS7i
ही तर महानायिकाच म्हटली पाहीजे.

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=rFS9y
हे आणखी एक उदाहरण.

जातपंचायती विरुद्ध लढा दिलेल्या एका महीलेची इथे आठवण होते. खरं म्हणजे हा व्हिडीओ पाहील्यापासून तिचीच आठवण येत राहीली. मग असे व्हिडीओज अपील होत नाहीत.

गंमत म्हणजे असे मुद्दे उपस्थित होतात तेव्हां एखादा अतिशय गंभीर बोटं करून प्रश्न टंकतो, की असे प्रश्न हाती घ्यावेत ही सर्वांवर जबरदस्ती आहे का ?

असे प्रश्न विचारले जाणं यात बरंच काही दडलेलं आहे. याला उत्तर देणं म्हणजे वेळेचा अपव्यय.

या निमित्ताने स्त्री मुक्तीला कुणीही झोडपत नाही, तर लिमिटेड स्त्री-मुक्ती, लिमिटेड समाजकार्य याला चिमटे जरूर काढावेसे वाटतात. ज्या महीला प्रत्यक्षात कार्यरत आहेत, त्यांचं समाजकार्य जर प्रकाशझोतात आणलं गेलं तर अशा व्हिडीओजची गरज भासेल का ? कला म्हणून काढा की... पण जागृती हे ध्येय असेल तर ख-या खु-या आयकॉन्सची नोंद न घ्यावंसं वाटणं याला काय म्हणावं ?

प्रा. सुषमा अंधारेंचं स्वतःचं जीवन सुद्धा संघर्षाचं प्रतीक आहे. त्यांचे विचार जास्त मुद्देसूद आणि थेट वाटतात.

http://www.esakal.com/esakal/20130113/5258286586032986856.htm

http://www.esakal.com/esakal/20130106/5318388561382199588.htm

सर्वात शेवटी थांबताना, आमची बहीण सुषमातैंचा लेख पुन्हा एकदा.
http://www.esakal.com/esakal/20130120/4997159061243383690.htm

.

उद्या जर या समाजात बदल घडलाच, भले 0.0001% का असेना, तर त्याचे श्रेय दिपिकाला मिळू नये....

जर असे असेल तर ही मुळात काही फार उदात्त भावना नाही.

टाईम्स वृत्तपत्राशी तिने जो लढा दिला त्या वेळी तिच्या भूमिकेचं समर्थन सर्वांनी केलं होतं. पण मग त्या भूमिकेशी फारकत घेत त्या रोडीज की फीडीज मधे त्या ही पेक्षा खालच्या टीकेवर ती जेव्हां हसून दाद देते तेव्हां समर्थन करणारे वुचकळ्यात पडत नाहीत का ? >>> हाच तर पॉईंट आहे या व्हिडीओ चा! बुचकळ्यात पडणे स्वाभाविक आहे, त्यावर मी कधीच टीका करणार नाही. पण त्यापुढे जाउन हे लक्षात घेणे आवश्यक आहे - की तिची संमती गृहीत धरून किंवा तिच्या संमतीची गरजच नाही असे समजून तिचा फोटो टाइम्स ने छापणे हे तिला मंजूर नाही, पण एखाद्या ठिकाणी अश्लील, अपमानकारक विनोद होणार आहेत हे माहीत असून तेथे जाणे तिला मंजूर आहे. तिची मंजूरी, हा महत्त्वाचा फरक आहे. दीपिकाचीच नव्हे, तर अशा प्रत्येक बाबतीत त्यात असलेल्या प्रत्येक स्त्रीची. That is her choice, and she should have that choice!

Pages