वेदाध्ययनातील- संथा देणे... अर्थात वेदाभ्यास शिक्षण/पाठांतर पद्धती.

Submitted by अत्रुप्त आत्मा on 25 March, 2015 - 08:42

खुलासा:- वेदपाठशाळांमधे प्राचीन काळापासून अध्ययन/अध्यापनाची एकच एक अशी, परंपरागत पद्धती रहात आलेली आहे. ही पद्धती फक्त पाठ करून ठेवण्याच्या विषयाकरिताच निर्माण झालेली आहे. हिला सामन्यतः मौखिकी अध्यापन पद्धती असे म्हटले जाते. ह्या पद्धती विषयी खूप जणांच्या मनात कुतुहल,आस्था,चिकित्साभाव इत्यादी असते. आंम्हा पुरोहित मंडळीना काम करत असताना,पाठांतर पाहुन ह्या अनुषंगानी काहि प्रश्नंही विचारले जात असतात. अश्या सर्व प्रश्नकर्त्यांना हा विषय नीट माहिती व्हावा,एव्हढ्याच हेतूने हा सदर लेख येथे देत आहे.

@संथा देणे म्हणजे काय? >> संथा देणे म्हणजे ,वेदपाठ शिकविणारे गुरुजी , समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचे छोटे तुकडे(चरण)पाडून ,वदवून आपल्या मागे घोकायला/म्हणायला सांगतात..याला प्राथमिक अर्थानी संथा-देणे असे म्हटले जाते. यापुढे...(विद्यार्थ्यांनी)संपूर्ण पाठांतर करण्याच्या विशिष्ट पद्धतीला, संथा घालणे अगर संथा म्हणणे ..असे म्हटले जाते. एखादा विषय/याज्ञिकातला प्रयोग/संहितेचा अध्याय (तोंड)पाठ करताना, संथा म्हणण्याचे ४ ट्प्पे असतात.
१) चरणाची संथा(४वेळा) २) अर्धनीची संथा(४वेळा) ३) ऋचेची संथा(४वेळा) ४) गुंडिकेची संथा(४वेळा) = एकंदर १६ संथा.

१)चरणाची संथा:- चरणाच्या संथेत, गुरुजिं..प्रथम समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचा एकेक चरण दोनदा सांगतात.. मग विद्यार्थ्यांनी पोथित बघून तो त्यांच्या मागून ७वेळा घोकायचा. यात म्हणताना चूक झाली,की पुन्हा सुरवात. यात शुद्धअक्षर,जोडाक्षर,त्याचे गुरुत्व,अनुस्वारांचे उच्चार,स्वराघात,र्‍हस्व आणि दीर्घ/प्रदीर्घ-अश्या काना ,मात्रा,वेलांट्या,उकार, विसर्ग आणि त्यांचे तसेच उच्चार ,हे शंभर टक्के शुद्ध होत आहेत की नाहीत? हे गुरुजी कसून तपासत असतात. (कारण एकदा अशुद्ध पाठ झालं..की ती (मेंदूत उमटलेली) प्रींटाऊट,नंतर पुसणं कर्मकठीण असतं.) तर..हे स्तोत्रातले पाडलेले एकेक चरण ७ वेळा घोकत संपूर्ण अध्याय वा स्तोत्र - पूर्ण केलं जातं... ही झाली "चरणाची" पहिली संथा. अश्या चार संथा झाल्या की 'चरण' पूर्ण होतो. ही सगळी संथा गुरुजिंसमक्ष होते. (कारण तेच-मंत्रात अजिबात अशुद्धी राहू नये.)

२)अर्धनीची संथा:- अर्धनीच्या संथेत ,सामान्यतः दोन चरण एकत्र घेऊन..किंवा मंत्राची अर्धी ओळ सात वेळा म्हटली जाते. (काहि वेळा जगतिच्छंदा सारखा,मंत्राचा लांबलचक छंद असेल,तर एका ओळीत ४/४ किंवा अगदी ६/६ चरणंही पाडावे लागतात) आधी चरण डोक्यात-बसलेला असतोच..त्यामुळे इथपासून गुरुजी समोर नसले,तरी चालते. तर.. ही...एकामागून एक ओळ पूर्ण ७ वेळा घोकत ...संपूर्ण अध्याय पूर्ण केला... की अर्धनीची १ संथा झाली...आता अश्याच पुढे अजुन ३ संथा म्हणायच्या..म्हणजे या अर्धनीच्या चार संथा होतात.

३)ऋचेची संथा:- ऋचेच्या संथेत..मागील अर्ध्या ओळीच्या संथेचा पुढचा भाग सुरु होतो..म्हणजे आता २ ओळिंची संपूर्ण ऋचा ,आणि पुढच्या ऋचेचा पहिला चरण(धरुन) ..,तसे ७ वेळा म्हणायचे. यातील पुढच्या ऋचेचा पहिला चरण त्यात घेण्याचे वैशिष्ठ्य असे..की यामुळे संपूर्ण अध्यायातल्या प्रत्येक पहिल्या ऋचेची-दुसर्‍या ऋचेशी गुंफण तयार होते. (कनेक्टींग होते.) ऋचे'तल्या या (पहिल्या)संथेवर,शिकविणार्‍या गुरुजिंचे बारीक लक्ष असते. (कारण तेचः- अशुद्धी आली कींवा मधे कुठे तयार झालेली आहे काय? हे पहाणे.) ह्या ऋचेच्या परत पुढे तीन संथा म्हणायच्या. म्हणजे या ऋचेच्याही एकंदर चार संथा पूर्ण होतात.

४) गुंडीकेची संथा:-..हा शेवटचा, परंतू अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. आता मागील ऋचेच्या संथेनी हीचेच निम्मे काम केलेले असते. पण तरिही.., आता कितीही पाठ येत असले..तरी(यातल्या पहिल्या संथेला) पोथीत पाहूनच..सदर पाठांतराच्या अध्यायाचा एकेक अनुवाक अथवा वर्ग (पॅरेग्राफ) ७/७ वेळा म्हणायचा असतो. आणि तो सगळा अध्याय पूर्ण करायचा असतो. ही झाली गुंडिकेची पहिली संथा.. अश्या अजुन तीन म्हणून ,ह्या गुंडिकेच्या चार संथा पूर्ण करायच्या. या गुंडिकेच्या संथेमधे, साधारणपणे दुसर्‍या किंवा तिसर्‍या संथेपासून ,(आता) विद्यार्थ्याची..इच्छा अगर तयारी-नसली तरी विद्यार्थ्यांनी पोथित न पहाताच ,मान वर करुन संथा म्हणायची असते. कारण त्याशिवाय-पाठ येणे..ही क्रीयाच आकाराला येऊ शकत नाही. अर्थात कोणत्याही सर्व सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याला यातल्या शेवटच्या २ संथांमधे सर्वकाहि बिनचूक तोंडपाठ-येतेच. पण त्याहून(बुद्धिनी) आगे/मागे जे असतील..त्यांना कमी अगर जास्त कष्ट घ्यावे लागतात. तर,अश्या ह्या एकंदर १६ संथा घातल्या की आपल्याला अपेक्षित असलेला पाठांतराचा विषय-तयार होतो.

आता आपण याचे-संकलित..,एका स्तोत्रपाठांतराच्या उदाहरणाद्वारे पाहुया. (हे आणखि डिटेलिंग,विशिष्ट हेतूनी आणि जाणिवपूर्वक करत आहे.)

चरणाची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं,(७वेळा) गौरीपुत्रं विनायकम् ।(७वेळा)
भक्तावासं स्मरेन्नित्यं, (७वेळा)आयुःकामार्थसिद्धये॥(७वेळा)

प्रथमं वक्रतुण्डं च,(७वेळा) एकदन्तं द्वितीयकम् ।(७वेळा)

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं,(७वेळा)गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ (७वेळा).....
असेच प्रत्येक चरण म्हणत स्तोत्राच्या शेवटापर्यंत जायचे असते..मग येथे चरणाची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की चरणाची मुख्य संथा पूर्ण होते.

अर्धनिची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् ।(७वेळा)
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥(७वेळा) ॥

प्रथमं वक्रतुण्डं च, एकदन्तं द्वितीयकम् ।(७वेळा)

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ (७वेळा).....
अशीच प्रत्येक अर्धनि/अर्धी ओळ म्हणत स्तोत्राच्या शेवटापर्यंत जायचे असते..मग येथे अर्धनिची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की अर्धनिची मुख्य संथा पूर्ण होते.

ऋचेची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥..प्रथमं वक्रतुण्डं च(७वेळा)

प्रथमं वक्रतुण्डं च, एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ लम्बोदरं पञ्चमं च(७वेळा).....
अशीच प्रत्येक ऋचा ,पुढल्या ऋचेचा पहिला चरण तिच्यात लावुन म्हणत स्तोत्र एकेक ऋचेनी म्हणत पूर्ण घोकायचे असते..मग येथे ऋचेची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की ऋचेची मुख्य संथा पूर्ण होते.

गुंडिकेची म्हणायची संथा:-
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥ (सुरवात ते शेवट -७वेळा..)
.....असेच सुरवात ते शेवट -७वेळा.. म्हटले,की मग येथे गुंडिकेची एक संथा पूर्ण होते.अश्याच प्रकारे अजुन तिन संथा म्हटल्या,की गुंडिकेची मुख्य संथा पूर्ण होते.

आता आपल्याला आवश्यमेव असा एक प्रश्न पडेल,की "(बुद्धिचा..)इतका बारीक किस पाडून, ही पाठांतर पद्धती तयार होण्या/करण्यामागचे प्रयोजन काय बरे असावे???" Happy

उत्तरः- ज्या काळात ही पद्धती आली/विकसीत झाली.तो काळ लेखनकलेची सुरवातहि न झालेला असा काळ होता. अश्या वेळी आपल्या जिवापाड जपाव्याश्या वाटणार्‍या गोष्टींपैकी, ही मंत्र /काव्य/स्तोत्र जतनाची एक गोष्ट होती. आणि याशिवायंही ,पुढे लेखनकला विकसीत झाल्यावर..जो विषय वारंवार म्हणावा,वापरावा लागणार आहे..त्यासाठी भल्यामोठ्ठ्या पोथ्यांची बाडे बरोबर घेऊन हिंडणे.हे ऋषीमुनिंपासून ते सामन्यजनांपर्यंत सर्वांनाच त्याकाळी सोपे नव्हते. त्याशिवाय पोथ्या पाण्यानि/आगिमुळे,वाळवी/कसर लागण्यापुळे खराब होणे अशिही कारणे होतिच. आणखि म्हणजे, परस्पर विरोधीमतांच्या गटांनी एकमेकाचे लिखित स्वरुपातिल वांङगमय नष्ट करणे,हे ही एक प्रबळ कारण त्याकाळी होतेच...या अश्या सर्व कारणांसाठी हे ज्ञान मुखोद्गत-पाठ ठेवावे लागले असेल.(आमच्याकडला अचुक शब्द म्हणजे-जिवंत ठेवावे लागले असेल.) आणि विशेषतः जर ते जसे च्या तसे पाठ ठेवावे लागले असेल,तर त्याला अशीच तंतोतंत शब्दपाठांतराची पद्धती असायला हवी होती. आणि म्हणुन तसे जर का एकदा पाठ झाले,आणि त्याच्या वारंवार आवृत्या* म्हणुन पाठ ठेवलेही गेले, तर वरिल कारणांनी येणारे नष्टतेचे भय बाळगावे लागत नाही, हे तर निश्चित आहे. (आज आपण हे आपल्याला हव्या त्या सर्व विषयांसाठि, हजारो प्रकारच्या रेकॉर्डिंगच्या साधनांनि करतच असतो. Happy )

आता जसेच्या तसे...म्हणजे काय हो नक्की? तर खाली दिलेले हे गणपतिस्तोत्र पहात पहात ह्या लिंकवर http://mfi.re/listen/zxd8acxaxqxwc2i/ganapatistotra_myself.mp3 जाऊन हे क्लिपिंग ऐका. जेणेकरुन ह्या पद्धतिनी पाठ केले असता,जसेच्या तसे मेंदुत उमटते..म्हणजे काय होते? ते कळणे सहज होइल Happy
(गायकबियक कुणी नाही.. मीच आमच्या(उच्चार)पद्धतिनी म्हटलेलं आहे हां! Wink )
http://mfi.re/listen/zxd8acxaxqxwc2i/ganapatistotra_myself.mp3
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥

.........................................................................................................................

आवृत्ति*:- हा वेदाध्ययनातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. एकदा पाठ झालेला विषय/अध्याय..किमान २ वर्ष तरी दररोज १ आवृत्ती म्हणून जिवंत-ठेवावा लागतो. नाहितर आमच्याकडल्या प्रसिद्ध म्हणी प्रमाणे..तो नवव्या दिवशी नवा-होतो. म्हणजे अक्षरशः पुन्हा संथा-घेऊन शिकण्याच्या पातळीवर येतो. आणि असंही हे सोपं काम नसतच. नुसती ऋग्वेदाची संहिता घेतली..तरी त्यात आठ अष्टके..म्हणजे ६४ अध्याय आहेत. अध्ययन सुरु झाल्यापासून जसजसे पाठांतर वाढत जाइल..तसतसा हा आवृतीचा काळ वाढत जातो. आणि दर दोन वर्षानी समांतर होत रहातो. मग पुढे ब्राम्हण/आरण्यक्/उपनिषदे/शिक्षाचतुष्टय/ज्योतिष(फलज्योतिषवालं नव्हे!)/शास्त्र/निरुक्त असे अनेक ग्रंथोपग्रंथ पचवत, जिवंत ठेवत, अध्ययन करावे लागते..एका वेदाच्या दशग्रंथांच्या अध्ययनाला पहिल्या वर्षाला ६ तास.. इथून सुरवात होऊन..शेवटच्या वर्षाला हा शिक्षण कालावधी १६ ते १८ तासांपर्यंत जाऊन बसतो. म्हणूनच ऋग्वेदाचे दशग्रंथ पूर्ण कंठस्थ (पाठ) होण्याचा कालावधी किमान १२ वर्षे आहे.

पाठांतरातील अग्निदिव्य :- संचार जाणे .. संचार.., हा पाठांतराच्या वाटेतला अटळ सहप्रवासी आहे. आता संचार म्हणजे काय? तर एकसमान किंवा तोच तोच.. शब्द वा मंत्र ,संपूर्ण अध्ययनाच्या विषयांमधे कुठेही वारंवार येणे.. यामुळे काय होते? तर ..एका महारस्त्यावर जवळ जवळ सारखी नावं असलेले दोन फाटे असतील..तर नामसाधर्म्याच्या गोंधळामुळे, माणूस जसा या ऐवजी त्या गावात पोहोचावा. तसे काहिसे, हे सारखे-मंत्र अथवा शब्द करीत असतात. ऋग्वेदाच्या नुसत्या संहितेमधे असे हजारो संचार आहेत. नुसतं त्याच संहितेमधून वेगवेगळे पाच अध्याय व दोन सूक्त एकत्र करून निर्मिलेलं जे पंचसूक्त पवमान आहे..त्यात सुमारे आडिचशे संचार आहेत. बरं.., हे संचार म्हणजे फक्त (समान)शब्द आणि संपूर्ण अथवा अर्ध्या (समान)मंत्राचेच आहेत काय? आणि नुसते तेव्हढेच आहेत काय? तर..तसे नाही. काहि ठिकाणी तर, फक्त या अध्यायात या ओळीत विशिष्ट शब्दावर मात्रा आहे ..आणि एकदम पुढच्या कुठल्या तरी अध्यायात तोच मंत्र पण त्याच ओळिवर विशिष्ट शब्दावर (आता) मात्रा नाही, एव्हढाच फरक आहे. म्हणजे ही पवमानातली गंमत बघा. एके ठिकाणी "शुंभमा ऋतायुभि:" असे आहे,तर दुसरीकडे , "शुंभमानो ऋतायुभि:" असे आहे. परत दोन्ही कडच्या पुढच्या ओळी निसंशय वेगळ्याच असतात. आणि मग जर का हे लक्षात राहिले नाही..तर या अध्यायातून त्या अध्यायात उडी पडते. याच घडणार्‍या प्रकाराला म्हणतात, संचार-जाणे! उदाहरणा दाखल आपण आजुन एक दोन संचार पाहू .. सुदुघाहि-पयस्वती: आणि सुदुघाहि-घृतःश्चुतः.. हा शब्दाचा संचार झाला.हा ही सहज लक्षात रहातो. पण अनुस्वारांचे संचार म्हणजे,मेंदूची शस्त्रक्रीया करतांना जितकं बारीक..आणि नजर न हलता लक्ष ठेवावं लागेल..तसला भयंकर प्रकार. तो असा - पतामांतरिक्षा आणि पवंतामांतरिक्षा - या शब्दातल्या दुसर्‍या अक्षरावर ,म्हणजे व - वर ..प्रथम अनुस्वार नाही आणि नंतर पुढे, तोच अनु-स्वार-झालेला आहे!!! इतका सूक्ष्म फरक लक्षात राहाणे मुश्किल..आणि मग इकडून तिकडच्या आध्यायात उडि पडणे निश्चित! (यातलं पंचसूक्त पवमान..हे पाठ-ठेवायला अत्यंत कर्मकठिण आहे. मला स्वतःला हे पाठ झाल्यापासून सलग तिन महिने याची आवृती ठेवल्यानंतरही..पुढे पुन्हा सलग २ महिने पाठ म्हणताना, रोज २ अथवा ३ संचार-जायचेच! आणि ते ही रोज वेगवेगळे! आज ह्या गल्लीत चुकलो,की उद्या त्या गल्लीत! रामा..शिवा..आणि गोविंदा..बाकि काही नाही! )

आता आपल्या सुप्रसिद्ध रुद्रातला हा शब्दसंचार..,प्रत्यक्षच कसा-जातो..?ते पहा...
(रुद्रामधे, आकरा नमका'चे आणि आकरा चमका'चे असे एकंदर २२अनुवाक आहेत.)

यातल्या नमकाच्या पहिल्या अनुवाकातल्या तिसर्‍या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनुरघोरा पापकाशिनी। आणि पुढची (वेगळी)ओळः- तयानस्तनुवा शंतमया गिरिशंता भिचाकशीहि॥

आता इथून सरळ नमकाच्या दहाव्या अनुवाकातली दुसर्‍या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनु:शिवाविश्वा हभेषजी। आणि पुढची (वेगळी)ओळ:- शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥

आता यात जर का रुद्र म्हणणारा माणूस पहिल्या अनुवाकात , यातेरुद्र शिवातनु च्या पुढे शिवाविश्वा हभेषजी असे चुकून म्हणून गेला..तर त्याची पाठांतर पद्धतीमुळे मेंदूत कोरली गेलेली पुढची ओळ ही दहाव्या अनुवाकातली ,म्हणजे शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥
.., हीच तोंडातून उमटणार. हा गेला संचार! आणि याच्याही अगदी उलट घडून दहाव्या अनुवाकातून पहिल्या अनुवाकात असा उलटंही तो येणार.म्हणजे - संचार जाणार!

आणि कित्तीही कुशाग्र बुद्धिमत्तेचा माणूस असला , तरी संपूर्ण एका वेदातले असे हजारो संचार लक्षात ठेवणं हे सामान्य बुद्धीमत्तेच्या बाहेरचचं काम.. मग हे काम सोप्प व्हावं म्हणून पुढे .. वेदांमधे पद/क्रम/जटा/माला/घन अशी सोय निर्माण करण्यात आली. याचा उचित वापर केला..कि हे संचारचं गाडं आडवं आलं, तरी त्याला नीट उभं करता येतं. (याविषयी पुन्हा केंव्हा तरी असच लिहिन! ) अर्थात, ज्या अध्ययनाचा आधार फक्त आणि फक्त पाठांतर हाच (राहिला)होता, त्या अतीप्राचीन (लेखनकलेची सुरवातही न झालेल्या) कालखंडात अश्या तर्‍हेच्या युक्त्या अथवा सोयी सुचणं, हे ही त्याच मानवी बुद्धीशी सुसंगतच म्हटलं पाहिजे. मग त्याचं समर्थन आजच्या आणि यापुढच्या काळात कोणत्याही पद्धतीनी अगर हेतूनी होवो.

आज हा पाठांतर पद्धतीचा छोटासा आढावा घेणारा लेख लिहुन झाला याचं समाधान एका कारणानी तर आहेच आहे.

१) वेदज्ञान.., हे त्या किंवा आजच्या अथवा पुढच्या काळात उपयोगी/अनुपयोगी .. उपकारक/अनुपकारक..असं कसंही असलं .तरी .. हे ज्ञान पूर्वी आणि आजही पाठ ठेवणारे जे वेदाध्यायी आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेची जाणिव..या लेखनामुळे करवून देता आली.(एरवी..हे नुसतं सांगून शक्य नाही,आणि नसलंही पाहिजे. Happy ) याशिवाय.., जे लोक:- "ह्हॅ!...हे शिकायला काय अक्कल अथवा बुद्धी लागते?" असे (कोणत्याही हेतूने) म्हणतात..त्यांना.. किमान हा लेख वाचल्यानंतर,पुन्हा असं म्हणताना,काहि क्षण थांबून विचार करावा लागेल...
धन्यवाद. Happy
===============================================
पराग दिवेकर..(हिंदू पुरोहित.)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शरीराला ज्याची गरज उरली नाही असा भाग शरीर टाकून देते यात विनाशकारी काय? सातीने त्या अर्थाने लिहिलेले नाहीये. टणटण्या बुद्धीने काहीही वेडेवाकडे अर्थ काढू नये.

महामुर्खशिरोमणी अखंडवेडज्ञानधारीपाखंडी वत्स,
वैद्यकिय धाग्यावर लिहिलेले शरीररचनेचे महत्त्व धार्मिक बाबींना जोडुन आपण बौध्दीकक्षमतेची पातळी प्रकट केली आहे. असे तुच्छ आणि निषिध्द विचार करण्यापुर्वी तु स्वतःच्या गलिच्छ मनात एकदातरी बघण्याची चेष्टा करायला हवी होती तर तु या पापापासुन वाचला असता आणि मोक्षची प्राप्ती घेतली असती परंतु हे महामुर्खशिरोमणी अखंडवेडज्ञानधारीपाखंडी वत्स तुझ्या पापी विचारामुळे तुला कदापी मोक्षप्राप्ती होणे आता शक्य नाही. १०८ योनीत तुला अखंड भटकावे लागेल. मनुष्यरुपी अवताराचा हा शेवटचा जन्म तु पापातच उपभोगला आहेस याजन्मात पुण्य साठवण्याऐवजी किड लागलेल्या विचारांच्या मोहापाठी धावून त्यांच्या शरणार्थ गेल्यामुळे तुझे मागील सर्वजन्मीचे पुण्यसंचय स्वहस्तेच समाप्त करुन घेतले आहेस.तथापि देव अत्यंत दयाळु असल्याने तुझ्या या किळ्सवाण्या विचाराचा त्याग करण्यासाठी तुला शेवटची संधी देण्यात येत आहे अन्यथा विनाश अटळ आहे.

तथास्तु.

नीधप,

>> शरीराला ज्याची गरज उरली नाही असा भाग शरीर टाकून देते यात विनाशकारी काय?

एकंदरीत शारीरिक उत्सर्जनाची क्रिया चालू आहे हे मान्य आहे तर. आपण कधी निसर्गाच्या हाकेस ओ देतादेता देवळाच्या गाभाऱ्यात बसतो का? नाही ना? ओ संपल्यावर स्वत:स स्वच्छ करून मगच दर्शन घेतो, बरोबर? मग एव्हढी किमान शिस्त बाळगायला हरकत नसावी. कोणतरी तुम्हाला काहीतरी बोललं ते निषिद्ध आहे. पण म्हणून नियमांवर आगपाखड करणं बरोबर नव्हे.

आ.न.,
-गा.पै.

गापै
तुम्ही शरीरातून उत्सर्जित करत असलेली तत्त्वं कल्याणकारी असतात होय ?

लोकहो ... , या गा पै ना आपण दुर्लक्षित का करत नाही? त्यांना एकट्यालाच भिंतिवर डोकं आपटत बसू दे ना!
त्याच बरोबर मी मायबोली व्यवस्थापनास विनंती करतो की, त्यानी सदर मेंबरास वाचनमात्र करावे,;व सर्वांना या निरर्थक कटकटितून मुक्ति द्यावी. 3

@जरासंधासारखे तो पुन्हा पुन्हा जिवन्त होतोय...>>> होय ना? मग त्यास आपण सगळ्यांनि मिळुन प्रतिसादाच न देण्याचे काम केले, तर तो ज़रा'ही एकसंध होणार नाही. बरोबर ना?

डन

हो तुमचे नाव घेऊन, तुमची वाक्ये क्वोट करून त्याने तुम्हाला चिखलात कुस्ती खेळायचे आव्हान दिले तरी दुर्लक्षच करावे. ह्याला प्रचंड संयम लागेल पण तरी करावेच.

डन.

काउ,

>> विनाशकारी हा मुद्दा टिकत नाही म्हटल्यावर पैलवान आता उत्सर्जन या मुद्द्यावर आले.

द्रव्य विनाशकारी आहे म्हणूनच उत्सर्जित होतंय ना शरीराकडून?

आ.न.,
-गा.पै.

नीधप,

>> हो तुमचे नाव घेऊन, तुमची वाक्ये क्वोट करून त्याने तुम्हाला चिखलात कुस्ती खेळायचे आव्हान दिले तरी दुर्लक्षच
>> करावे. ह्याला प्रचंड संयम लागेल पण तरी करावेच.

माझ्यासारखे संयमी होताय? जरूर व्हा.

फक्त एक सांगू इच्छितो. काही लोकांनी केलेले निरर्थक आणि बेछूट अपमान पचवून माझा संयम घनिष्ट झाला आहे. असल्या लोकांकडे दुर्लक्ष करणं दुस्तर कर्म आहे. तुमच्या संयमाचा मात्र तितकासा कस लागणार नाही. कारण मी मुद्देसूद प्रतिवाद करतो.

तरीपण तुम्हाला ऑल द बेस्ट! Wink

आ.न.,
-गा.पै.

अरे त्या या धाग्यावरल्या वेदाध्ययनातील- संथा देणे... अर्थात वेदाभ्यास शिक्षण/पाठांतर पद्धती याचे काय झाले?
चांगला माहितीपूर्ण लेख होता, त्यात न आवडण्याचा प्रश्नच नाही. ते तसे होते नि काही लोक करतात. तुम्हाला करायचे नसेल तर नका करू, पण याचा उपयोग काय, हे खरे आहे का? करून काही फायदा आहे का? असले प्रश्न विचारायचे नि शेवटी उगाच वैयक्तिक भांडणे!!

आता त्याचा उपयोग काय हा प्रश्न वाजवी आहे. तसे म्हंटले तर कशाचाच काय उपयोग आहे हो? लिहायला तर सगळेच शिकतात. काही लोक उत्कृष्ट साहित्य निर्माण करतात तर काही नुसते मायबोलीवर येऊन वैयक्तिक शिव्यागाळी करतात.
तर उपयोग काय हा प्रश्न दुसर्‍याला विचारण्यात अर्थ नाही. स्वतःला ते विचारले पाहिजे.

भारतात काही लोक वैद्यकशास्त्र शिकले, ते आता हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करून प्राण वाचवतात, इतर लोक अजूनहि बायकांच्या शरीरधर्माबद्दल फुक्कट वाद घालून त्याचा नको तिथे संबंध जोडतात. खरे तर मुलीला हे सगळे योग्य वयात कुठून तरी कळतेच. त्यात वाद कसला घालायचा?

काही लोकांनी काँप्युटर, टेलेकम्युनिकेशन वगैरे शिकून, मायक्रोसॉफ्ट, गूगल, फेसबूक, नि असे असंख्य उद्योग धंदे उभारून स्वतः पैसा केला, इतरांना करायची संधि दिली.

इथे तेच ज्ञान वापरून नुसती वैयक्तिक शिविगाळी. चर्चा कसली डोंबलाची? कुणिहि इथे काहीहि शिकायला येत नाहीत, नुसते कुणि काही लिहीले की त्यावर याचा उपयोगच काय, हे खोटेच आहे, हे वेडेपणाचे आहे असले काहीतरी!

त्यापेक्षा निदान मनोरंजनासाठी गप्पा गोष्टी विनोद करावेत.

जगभरातल्या मराठी बांधवांच्या ओळखी कराव्या, मैत्री करावी. केंव्हा कुठे भेटतील सांगता येत नाही. प्रत्यक्ष भेटीचा आनंद वेगळाच.

उत्तम माहिती मिळाली लेखातुन. बरेच अज्ञान दूर झाले आहे या लेखामुळे. धन्यवाद गुरुजी.

वैयक्तिक: ते श्लोक ऐकुन अर्थ कळला नाही त्यातुन ज्या लहरी निर्माण होतात त्याने खुप प्रसन्न वाटते. आनंद होतो. लहानपणी जे काय थोडेफार संस्कृत श्लोक पाठ केले त्यामुळे जीभ अगदी स्वच्छ झाली. अवघड उच्चार सहज करता येऊ लागले.

मी लेखातील तपशीलाशी सहमत म्हणण्यापेक्षाही, तपशील आवडला असे जेव्हा म्हणतोय, तेव्हाच चर्चेच्या व आंधळ्या आक्षेपांच्या ओघात उत्तर म्हणून गामानी मांडलेल्या मुद्यांशीही सहमत आहे/बर्‍याच अंशी ते देखिल पटत आहेत.
अर्थात विचारस्वातंत्र्याच्या नावाखाली एखाद्यास लिंकपिसाट वगैरे दुषणे देऊन बोलणे शोभत नाही हे देखिल तितकेच खरे आहे. असो.

पतिपत्नीच्या पापपुण्याच्या भागीदारीचा शास्त्रातील विषय निघालाच तर एक आठवण करुन देऊ इच्छितो की वाल्याचा वाल्मिकी होण्याआधी वा होण्यासाठि जे कारण घडले ती कथा कुणाला आठवत असेल तर आठवुन बघा, (घडली होतीच कशी याचा पुरावा काय अशा प्रश्नकर्त्यांना हे आवाहन नाहीये, त्यांनी यावर विचार करू नये).
तर वाल्या जे पाप करीत होता, नारदांच्या सूचनेनुसार त्याचे पापातील वाटा पत्नीमुले घेतिल का हे विचारल्यानंतर जेव्हा त्यास कळले की पत्नि/मुले/अवलंबित केवळ त्याच्या पुण्याच्या अर्थात सत्कर्माचे भागीदार होऊ इच्छितात, पापाचे/अधम कर्माचे/कर्मपरिमाणांचे नाही तेव्हा त्यास उपरती होऊन, दु:ष्कर्म सोडून देऊन, तो पुढे वाल्याचा वाल्मिकी बनला अशा अर्थाची ही कथा. पुराणातील असली तरी पापपुण्याचे वाटेकरी/भागीदार होता येते, माणूस एकदुसर्‍याच्या पापपुण्याच्या कर्मफलाचा वाटेकरी होतही असतो हे सत्य.
ज्योतिष कुंडली बघताना तर आईबाप जिवंत असेस्तोवर, व्यक्तिची कुंडली स्वतंत्रपणे न बघता आईवडीलांचे कुंडलीचे परिणामही ताडून बघावे लागतात. त्याअर्थी, व्यक्ति "आईबापांच्या" पापपुण्यात/ त्यांच्या पापपुण्याच्या कर्मफलात सहभागी असतेच असते. (भले ते एकत्र रहात असोत वा कोसों दूर).
यामुळेच, जीवनाची सहचरी/सहचर निवडताना एकमेकांच्या कर्मफलाचे अर्थात पापपुण्याचे भागीदार होणे/नहोणे यावर आधारीत काही एक नियम/शास्त्र असेल, तुम्ही ते माना वा नका मानू, तरी त्यास केवळ स्वतःच्या मर्यादित तर्कानुसार, गामांची वा हिंदू धर्मशास्त्राची निंदानालस्ती करण्याकरता उपयोग केला गेला तर त्यात मला तरी नवल वाटत नाही.
इतक्या उत्कृष्ट विषयावरील निम्म्यापेक्षा जास्त पोस्टी या केवळ हिंदू धर्मचाली व त्यांचे समर्थन करणारा गामा कसे मूर्ख आहेत हे सिद्ध करण्याकरता व्हाव्यात व स्वतः धागाकर्ताही शेवटी " बहुसंख्य लोकेच्छेपुढे" नमुन त्यात सामिल व्हावा व गामांना लेखनबंदी करावी असे मत व्यक्त करावे यासारखी दुसरी दुर्दशा नाही. धागाकर्त्याकडून तरी हे अपेक्षित नव्हते. असो.

लिंबू, मला नाही वाटत येथे ती जी पाप-पुण्याची, त्यात भागीदार होण्याची संकल्पना आहे त्याला कोणी विरोध केलेला आहे. निदान बहुतांश लोकांचा त्यावर रोख नाहीच आहे. पण त्याचा पत्नीने पतीच्या अर्ध्या वचनात राहण्याशी काय संबंध?

आणि लग्नाच्या वयातील मुलाने तोपर्यंत असे काय पुण्य कमावलेले असते, आणि त्या वयाच्या मुलीने तोपर्यंत असे काय पाप केलेले असते? Happy आता निदान २०-२२ वर्षे झाल्यावर लग्न करतात, पूर्वी तर टीन एजर झाले की करत.

फारेण्ड, तुला लिंब्याकडून यावर खरंच लॉजिकल उत्तर मिळेल असे वाटते?
वाल्या कोळ्याच्या बायकामुलांनी पापात सहभागी व्हायला नकार दिला म्हणून यच्चयावत स्त्रिया पापमय असतात आणि यच्चयावत पुरूष पुण्यात्मे.
ज्यातून स्वतःचा जन्म झाला ते विनाशकारी तत्व.
असली गृहिते मांडणार्‍यांकडून लॉजिकल उत्तराची अपेक्षा?

काहीही अभ्यास न करता, चार लोक सांगतायत म्हणून तेच धर्मशास्त्र असे आंधळेपणाने पण ठासून सांगणे यापलिकडे वेगळं काय करतात हे लोक?
यांच्या कुठल्याही गृहितांना समानता, विज्ञान तर सोडाच माणुसकीचाही स्पर्श नाही. आणि त्याला विरोध केला धर्माला विरोध म्हणत अंगावर येणार.
यांच्यामते आंधळेपणा हीच धर्मपरायणता.
कुणी एक पुरोहित खरोखर लॉजिकल विचार करून बदल घडवायचा प्रयत्न करतोय, अभ्यास करतोय तर हे म्हणणार हा तर लोकानुनय.

मूळात इथं हिरीरीनं जे "धर्माची" बाजू मांडत अहेत त्यांचा धर्माचा असा काय सखोल अभ्यास आहे? उगाचच इकडले तिकडले संदर्भ आणायचे आणि "आमच्याकडे सगळं वैज्ञानिक आहे" असं म्हणात प्रत्येक जुन्या रूढीचा गोडवा गायचा. धर्मशास्त्र आणि रूढी या दोन भिन्न गोष्टी आहेत हे यांना अद्याप समजलेलं नाही. यापुढे काय बोलणार?

ह्या असल्या प्रकारांमुळे धर्मांतरे घडली . लोक या जाचाला कंटाळून बौद्ध झाले, ख्रिस्च्चन झाले ,लिंगायत झाले, जैनही झाले. कोल्हापूर परिसरात बहुजन समाजातले लोक जैन झालेले दिसतात त्याचे मूळ कारण हेच आहे . यांची अमानुष बंधने.

फा, अस्कसं म्हणतोयस? तो मुलगा आहे म्हणून त्याच्या आईबापाला पुण्य मिळालेलंच असतं की आणि त्याला त्या पुण्यफलातला 'वाटा'. Proud

या लेखाचा विषय वेगळा आहे, आपण त्यावर/ त्याच्याशी संबंधितच चर्चा करायची का? बाकी धर्मशास्त्र, विटाळ, पाप-पुण्य, धर्मशास्त्राचे नियमकानून (याच्या इथल्या उद्गात्यांनी ती धर्मशास्त्रं मुळातून ठार एक शब्दही न का वाचलेली असेनात) ही माबोवरची घिसीपिटी, पुनरावृत्ती चर्चा आहे आणि लेखविषयाशी थेट संबंधित नाही. तेव्हा असल्या फाटे फोडणार्‍या पा.घ. प्रतिसादांकडे दुर्लक्ष करूयात.

अतृप्त - पुढच्या लेखांची वाट बघतोय आम्ही सगळे Happy

Pages