वेदाध्ययनातील- संथा देणे... अर्थात वेदाभ्यास शिक्षण/पाठांतर पद्धती.

Submitted by अत्रुप्त आत्मा on 25 March, 2015 - 08:42

खुलासा:- वेदपाठशाळांमधे प्राचीन काळापासून अध्ययन/अध्यापनाची एकच एक अशी, परंपरागत पद्धती रहात आलेली आहे. ही पद्धती फक्त पाठ करून ठेवण्याच्या विषयाकरिताच निर्माण झालेली आहे. हिला सामन्यतः मौखिकी अध्यापन पद्धती असे म्हटले जाते. ह्या पद्धती विषयी खूप जणांच्या मनात कुतुहल,आस्था,चिकित्साभाव इत्यादी असते. आंम्हा पुरोहित मंडळीना काम करत असताना,पाठांतर पाहुन ह्या अनुषंगानी काहि प्रश्नंही विचारले जात असतात. अश्या सर्व प्रश्नकर्त्यांना हा विषय नीट माहिती व्हावा,एव्हढ्याच हेतूने हा सदर लेख येथे देत आहे.

@संथा देणे म्हणजे काय? >> संथा देणे म्हणजे ,वेदपाठ शिकविणारे गुरुजी , समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचे छोटे तुकडे(चरण)पाडून ,वदवून आपल्या मागे घोकायला/म्हणायला सांगतात..याला प्राथमिक अर्थानी संथा-देणे असे म्हटले जाते. यापुढे...(विद्यार्थ्यांनी)संपूर्ण पाठांतर करण्याच्या विशिष्ट पद्धतीला, संथा घालणे अगर संथा म्हणणे ..असे म्हटले जाते. एखादा विषय/याज्ञिकातला प्रयोग/संहितेचा अध्याय (तोंड)पाठ करताना, संथा म्हणण्याचे ४ ट्प्पे असतात.
१) चरणाची संथा(४वेळा) २) अर्धनीची संथा(४वेळा) ३) ऋचेची संथा(४वेळा) ४) गुंडिकेची संथा(४वेळा) = एकंदर १६ संथा.

१)चरणाची संथा:- चरणाच्या संथेत, गुरुजिं..प्रथम समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचा एकेक चरण दोनदा सांगतात.. मग विद्यार्थ्यांनी पोथित बघून तो त्यांच्या मागून ७वेळा घोकायचा. यात म्हणताना चूक झाली,की पुन्हा सुरवात. यात शुद्धअक्षर,जोडाक्षर,त्याचे गुरुत्व,अनुस्वारांचे उच्चार,स्वराघात,र्‍हस्व आणि दीर्घ/प्रदीर्घ-अश्या काना ,मात्रा,वेलांट्या,उकार, विसर्ग आणि त्यांचे तसेच उच्चार ,हे शंभर टक्के शुद्ध होत आहेत की नाहीत? हे गुरुजी कसून तपासत असतात. (कारण एकदा अशुद्ध पाठ झालं..की ती (मेंदूत उमटलेली) प्रींटाऊट,नंतर पुसणं कर्मकठीण असतं.) तर..हे स्तोत्रातले पाडलेले एकेक चरण ७ वेळा घोकत संपूर्ण अध्याय वा स्तोत्र - पूर्ण केलं जातं... ही झाली "चरणाची" पहिली संथा. अश्या चार संथा झाल्या की 'चरण' पूर्ण होतो. ही सगळी संथा गुरुजिंसमक्ष होते. (कारण तेच-मंत्रात अजिबात अशुद्धी राहू नये.)

२)अर्धनीची संथा:- अर्धनीच्या संथेत ,सामान्यतः दोन चरण एकत्र घेऊन..किंवा मंत्राची अर्धी ओळ सात वेळा म्हटली जाते. (काहि वेळा जगतिच्छंदा सारखा,मंत्राचा लांबलचक छंद असेल,तर एका ओळीत ४/४ किंवा अगदी ६/६ चरणंही पाडावे लागतात) आधी चरण डोक्यात-बसलेला असतोच..त्यामुळे इथपासून गुरुजी समोर नसले,तरी चालते. तर.. ही...एकामागून एक ओळ पूर्ण ७ वेळा घोकत ...संपूर्ण अध्याय पूर्ण केला... की अर्धनीची १ संथा झाली...आता अश्याच पुढे अजुन ३ संथा म्हणायच्या..म्हणजे या अर्धनीच्या चार संथा होतात.

३)ऋचेची संथा:- ऋचेच्या संथेत..मागील अर्ध्या ओळीच्या संथेचा पुढचा भाग सुरु होतो..म्हणजे आता २ ओळिंची संपूर्ण ऋचा ,आणि पुढच्या ऋचेचा पहिला चरण(धरुन) ..,तसे ७ वेळा म्हणायचे. यातील पुढच्या ऋचेचा पहिला चरण त्यात घेण्याचे वैशिष्ठ्य असे..की यामुळे संपूर्ण अध्यायातल्या प्रत्येक पहिल्या ऋचेची-दुसर्‍या ऋचेशी गुंफण तयार होते. (कनेक्टींग होते.) ऋचे'तल्या या (पहिल्या)संथेवर,शिकविणार्‍या गुरुजिंचे बारीक लक्ष असते. (कारण तेचः- अशुद्धी आली कींवा मधे कुठे तयार झालेली आहे काय? हे पहाणे.) ह्या ऋचेच्या परत पुढे तीन संथा म्हणायच्या. म्हणजे या ऋचेच्याही एकंदर चार संथा पूर्ण होतात.

४) गुंडीकेची संथा:-..हा शेवटचा, परंतू अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. आता मागील ऋचेच्या संथेनी हीचेच निम्मे काम केलेले असते. पण तरिही.., आता कितीही पाठ येत असले..तरी(यातल्या पहिल्या संथेला) पोथीत पाहूनच..सदर पाठांतराच्या अध्यायाचा एकेक अनुवाक अथवा वर्ग (पॅरेग्राफ) ७/७ वेळा म्हणायचा असतो. आणि तो सगळा अध्याय पूर्ण करायचा असतो. ही झाली गुंडिकेची पहिली संथा.. अश्या अजुन तीन म्हणून ,ह्या गुंडिकेच्या चार संथा पूर्ण करायच्या. या गुंडिकेच्या संथेमधे, साधारणपणे दुसर्‍या किंवा तिसर्‍या संथेपासून ,(आता) विद्यार्थ्याची..इच्छा अगर तयारी-नसली तरी विद्यार्थ्यांनी पोथित न पहाताच ,मान वर करुन संथा म्हणायची असते. कारण त्याशिवाय-पाठ येणे..ही क्रीयाच आकाराला येऊ शकत नाही. अर्थात कोणत्याही सर्व सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याला यातल्या शेवटच्या २ संथांमधे सर्वकाहि बिनचूक तोंडपाठ-येतेच. पण त्याहून(बुद्धिनी) आगे/मागे जे असतील..त्यांना कमी अगर जास्त कष्ट घ्यावे लागतात. तर,अश्या ह्या एकंदर १६ संथा घातल्या की आपल्याला अपेक्षित असलेला पाठांतराचा विषय-तयार होतो.

आता आपण याचे-संकलित..,एका स्तोत्रपाठांतराच्या उदाहरणाद्वारे पाहुया. (हे आणखि डिटेलिंग,विशिष्ट हेतूनी आणि जाणिवपूर्वक करत आहे.)

चरणाची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं,(७वेळा) गौरीपुत्रं विनायकम् ।(७वेळा)
भक्तावासं स्मरेन्नित्यं, (७वेळा)आयुःकामार्थसिद्धये॥(७वेळा)

प्रथमं वक्रतुण्डं च,(७वेळा) एकदन्तं द्वितीयकम् ।(७वेळा)

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं,(७वेळा)गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ (७वेळा).....
असेच प्रत्येक चरण म्हणत स्तोत्राच्या शेवटापर्यंत जायचे असते..मग येथे चरणाची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की चरणाची मुख्य संथा पूर्ण होते.

अर्धनिची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् ।(७वेळा)
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥(७वेळा) ॥

प्रथमं वक्रतुण्डं च, एकदन्तं द्वितीयकम् ।(७वेळा)

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ (७वेळा).....
अशीच प्रत्येक अर्धनि/अर्धी ओळ म्हणत स्तोत्राच्या शेवटापर्यंत जायचे असते..मग येथे अर्धनिची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की अर्धनिची मुख्य संथा पूर्ण होते.

ऋचेची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥..प्रथमं वक्रतुण्डं च(७वेळा)

प्रथमं वक्रतुण्डं च, एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ लम्बोदरं पञ्चमं च(७वेळा).....
अशीच प्रत्येक ऋचा ,पुढल्या ऋचेचा पहिला चरण तिच्यात लावुन म्हणत स्तोत्र एकेक ऋचेनी म्हणत पूर्ण घोकायचे असते..मग येथे ऋचेची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की ऋचेची मुख्य संथा पूर्ण होते.

गुंडिकेची म्हणायची संथा:-
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥ (सुरवात ते शेवट -७वेळा..)
.....असेच सुरवात ते शेवट -७वेळा.. म्हटले,की मग येथे गुंडिकेची एक संथा पूर्ण होते.अश्याच प्रकारे अजुन तिन संथा म्हटल्या,की गुंडिकेची मुख्य संथा पूर्ण होते.

आता आपल्याला आवश्यमेव असा एक प्रश्न पडेल,की "(बुद्धिचा..)इतका बारीक किस पाडून, ही पाठांतर पद्धती तयार होण्या/करण्यामागचे प्रयोजन काय बरे असावे???" Happy

उत्तरः- ज्या काळात ही पद्धती आली/विकसीत झाली.तो काळ लेखनकलेची सुरवातहि न झालेला असा काळ होता. अश्या वेळी आपल्या जिवापाड जपाव्याश्या वाटणार्‍या गोष्टींपैकी, ही मंत्र /काव्य/स्तोत्र जतनाची एक गोष्ट होती. आणि याशिवायंही ,पुढे लेखनकला विकसीत झाल्यावर..जो विषय वारंवार म्हणावा,वापरावा लागणार आहे..त्यासाठी भल्यामोठ्ठ्या पोथ्यांची बाडे बरोबर घेऊन हिंडणे.हे ऋषीमुनिंपासून ते सामन्यजनांपर्यंत सर्वांनाच त्याकाळी सोपे नव्हते. त्याशिवाय पोथ्या पाण्यानि/आगिमुळे,वाळवी/कसर लागण्यापुळे खराब होणे अशिही कारणे होतिच. आणखि म्हणजे, परस्पर विरोधीमतांच्या गटांनी एकमेकाचे लिखित स्वरुपातिल वांङगमय नष्ट करणे,हे ही एक प्रबळ कारण त्याकाळी होतेच...या अश्या सर्व कारणांसाठी हे ज्ञान मुखोद्गत-पाठ ठेवावे लागले असेल.(आमच्याकडला अचुक शब्द म्हणजे-जिवंत ठेवावे लागले असेल.) आणि विशेषतः जर ते जसे च्या तसे पाठ ठेवावे लागले असेल,तर त्याला अशीच तंतोतंत शब्दपाठांतराची पद्धती असायला हवी होती. आणि म्हणुन तसे जर का एकदा पाठ झाले,आणि त्याच्या वारंवार आवृत्या* म्हणुन पाठ ठेवलेही गेले, तर वरिल कारणांनी येणारे नष्टतेचे भय बाळगावे लागत नाही, हे तर निश्चित आहे. (आज आपण हे आपल्याला हव्या त्या सर्व विषयांसाठि, हजारो प्रकारच्या रेकॉर्डिंगच्या साधनांनि करतच असतो. Happy )

आता जसेच्या तसे...म्हणजे काय हो नक्की? तर खाली दिलेले हे गणपतिस्तोत्र पहात पहात ह्या लिंकवर http://mfi.re/listen/zxd8acxaxqxwc2i/ganapatistotra_myself.mp3 जाऊन हे क्लिपिंग ऐका. जेणेकरुन ह्या पद्धतिनी पाठ केले असता,जसेच्या तसे मेंदुत उमटते..म्हणजे काय होते? ते कळणे सहज होइल Happy
(गायकबियक कुणी नाही.. मीच आमच्या(उच्चार)पद्धतिनी म्हटलेलं आहे हां! Wink )
http://mfi.re/listen/zxd8acxaxqxwc2i/ganapatistotra_myself.mp3
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥

.........................................................................................................................

आवृत्ति*:- हा वेदाध्ययनातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. एकदा पाठ झालेला विषय/अध्याय..किमान २ वर्ष तरी दररोज १ आवृत्ती म्हणून जिवंत-ठेवावा लागतो. नाहितर आमच्याकडल्या प्रसिद्ध म्हणी प्रमाणे..तो नवव्या दिवशी नवा-होतो. म्हणजे अक्षरशः पुन्हा संथा-घेऊन शिकण्याच्या पातळीवर येतो. आणि असंही हे सोपं काम नसतच. नुसती ऋग्वेदाची संहिता घेतली..तरी त्यात आठ अष्टके..म्हणजे ६४ अध्याय आहेत. अध्ययन सुरु झाल्यापासून जसजसे पाठांतर वाढत जाइल..तसतसा हा आवृतीचा काळ वाढत जातो. आणि दर दोन वर्षानी समांतर होत रहातो. मग पुढे ब्राम्हण/आरण्यक्/उपनिषदे/शिक्षाचतुष्टय/ज्योतिष(फलज्योतिषवालं नव्हे!)/शास्त्र/निरुक्त असे अनेक ग्रंथोपग्रंथ पचवत, जिवंत ठेवत, अध्ययन करावे लागते..एका वेदाच्या दशग्रंथांच्या अध्ययनाला पहिल्या वर्षाला ६ तास.. इथून सुरवात होऊन..शेवटच्या वर्षाला हा शिक्षण कालावधी १६ ते १८ तासांपर्यंत जाऊन बसतो. म्हणूनच ऋग्वेदाचे दशग्रंथ पूर्ण कंठस्थ (पाठ) होण्याचा कालावधी किमान १२ वर्षे आहे.

पाठांतरातील अग्निदिव्य :- संचार जाणे .. संचार.., हा पाठांतराच्या वाटेतला अटळ सहप्रवासी आहे. आता संचार म्हणजे काय? तर एकसमान किंवा तोच तोच.. शब्द वा मंत्र ,संपूर्ण अध्ययनाच्या विषयांमधे कुठेही वारंवार येणे.. यामुळे काय होते? तर ..एका महारस्त्यावर जवळ जवळ सारखी नावं असलेले दोन फाटे असतील..तर नामसाधर्म्याच्या गोंधळामुळे, माणूस जसा या ऐवजी त्या गावात पोहोचावा. तसे काहिसे, हे सारखे-मंत्र अथवा शब्द करीत असतात. ऋग्वेदाच्या नुसत्या संहितेमधे असे हजारो संचार आहेत. नुसतं त्याच संहितेमधून वेगवेगळे पाच अध्याय व दोन सूक्त एकत्र करून निर्मिलेलं जे पंचसूक्त पवमान आहे..त्यात सुमारे आडिचशे संचार आहेत. बरं.., हे संचार म्हणजे फक्त (समान)शब्द आणि संपूर्ण अथवा अर्ध्या (समान)मंत्राचेच आहेत काय? आणि नुसते तेव्हढेच आहेत काय? तर..तसे नाही. काहि ठिकाणी तर, फक्त या अध्यायात या ओळीत विशिष्ट शब्दावर मात्रा आहे ..आणि एकदम पुढच्या कुठल्या तरी अध्यायात तोच मंत्र पण त्याच ओळिवर विशिष्ट शब्दावर (आता) मात्रा नाही, एव्हढाच फरक आहे. म्हणजे ही पवमानातली गंमत बघा. एके ठिकाणी "शुंभमा ऋतायुभि:" असे आहे,तर दुसरीकडे , "शुंभमानो ऋतायुभि:" असे आहे. परत दोन्ही कडच्या पुढच्या ओळी निसंशय वेगळ्याच असतात. आणि मग जर का हे लक्षात राहिले नाही..तर या अध्यायातून त्या अध्यायात उडी पडते. याच घडणार्‍या प्रकाराला म्हणतात, संचार-जाणे! उदाहरणा दाखल आपण आजुन एक दोन संचार पाहू .. सुदुघाहि-पयस्वती: आणि सुदुघाहि-घृतःश्चुतः.. हा शब्दाचा संचार झाला.हा ही सहज लक्षात रहातो. पण अनुस्वारांचे संचार म्हणजे,मेंदूची शस्त्रक्रीया करतांना जितकं बारीक..आणि नजर न हलता लक्ष ठेवावं लागेल..तसला भयंकर प्रकार. तो असा - पतामांतरिक्षा आणि पवंतामांतरिक्षा - या शब्दातल्या दुसर्‍या अक्षरावर ,म्हणजे व - वर ..प्रथम अनुस्वार नाही आणि नंतर पुढे, तोच अनु-स्वार-झालेला आहे!!! इतका सूक्ष्म फरक लक्षात राहाणे मुश्किल..आणि मग इकडून तिकडच्या आध्यायात उडि पडणे निश्चित! (यातलं पंचसूक्त पवमान..हे पाठ-ठेवायला अत्यंत कर्मकठिण आहे. मला स्वतःला हे पाठ झाल्यापासून सलग तिन महिने याची आवृती ठेवल्यानंतरही..पुढे पुन्हा सलग २ महिने पाठ म्हणताना, रोज २ अथवा ३ संचार-जायचेच! आणि ते ही रोज वेगवेगळे! आज ह्या गल्लीत चुकलो,की उद्या त्या गल्लीत! रामा..शिवा..आणि गोविंदा..बाकि काही नाही! )

आता आपल्या सुप्रसिद्ध रुद्रातला हा शब्दसंचार..,प्रत्यक्षच कसा-जातो..?ते पहा...
(रुद्रामधे, आकरा नमका'चे आणि आकरा चमका'चे असे एकंदर २२अनुवाक आहेत.)

यातल्या नमकाच्या पहिल्या अनुवाकातल्या तिसर्‍या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनुरघोरा पापकाशिनी। आणि पुढची (वेगळी)ओळः- तयानस्तनुवा शंतमया गिरिशंता भिचाकशीहि॥

आता इथून सरळ नमकाच्या दहाव्या अनुवाकातली दुसर्‍या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनु:शिवाविश्वा हभेषजी। आणि पुढची (वेगळी)ओळ:- शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥

आता यात जर का रुद्र म्हणणारा माणूस पहिल्या अनुवाकात , यातेरुद्र शिवातनु च्या पुढे शिवाविश्वा हभेषजी असे चुकून म्हणून गेला..तर त्याची पाठांतर पद्धतीमुळे मेंदूत कोरली गेलेली पुढची ओळ ही दहाव्या अनुवाकातली ,म्हणजे शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥
.., हीच तोंडातून उमटणार. हा गेला संचार! आणि याच्याही अगदी उलट घडून दहाव्या अनुवाकातून पहिल्या अनुवाकात असा उलटंही तो येणार.म्हणजे - संचार जाणार!

आणि कित्तीही कुशाग्र बुद्धिमत्तेचा माणूस असला , तरी संपूर्ण एका वेदातले असे हजारो संचार लक्षात ठेवणं हे सामान्य बुद्धीमत्तेच्या बाहेरचचं काम.. मग हे काम सोप्प व्हावं म्हणून पुढे .. वेदांमधे पद/क्रम/जटा/माला/घन अशी सोय निर्माण करण्यात आली. याचा उचित वापर केला..कि हे संचारचं गाडं आडवं आलं, तरी त्याला नीट उभं करता येतं. (याविषयी पुन्हा केंव्हा तरी असच लिहिन! ) अर्थात, ज्या अध्ययनाचा आधार फक्त आणि फक्त पाठांतर हाच (राहिला)होता, त्या अतीप्राचीन (लेखनकलेची सुरवातही न झालेल्या) कालखंडात अश्या तर्‍हेच्या युक्त्या अथवा सोयी सुचणं, हे ही त्याच मानवी बुद्धीशी सुसंगतच म्हटलं पाहिजे. मग त्याचं समर्थन आजच्या आणि यापुढच्या काळात कोणत्याही पद्धतीनी अगर हेतूनी होवो.

आज हा पाठांतर पद्धतीचा छोटासा आढावा घेणारा लेख लिहुन झाला याचं समाधान एका कारणानी तर आहेच आहे.

१) वेदज्ञान.., हे त्या किंवा आजच्या अथवा पुढच्या काळात उपयोगी/अनुपयोगी .. उपकारक/अनुपकारक..असं कसंही असलं .तरी .. हे ज्ञान पूर्वी आणि आजही पाठ ठेवणारे जे वेदाध्यायी आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेची जाणिव..या लेखनामुळे करवून देता आली.(एरवी..हे नुसतं सांगून शक्य नाही,आणि नसलंही पाहिजे. Happy ) याशिवाय.., जे लोक:- "ह्हॅ!...हे शिकायला काय अक्कल अथवा बुद्धी लागते?" असे (कोणत्याही हेतूने) म्हणतात..त्यांना.. किमान हा लेख वाचल्यानंतर,पुन्हा असं म्हणताना,काहि क्षण थांबून विचार करावा लागेल...
धन्यवाद. Happy
===============================================
पराग दिवेकर..(हिंदू पुरोहित.)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाळू पैराजम्पे, विहिप भाजपा सगळे संघ परिवार संस्था आहेत हे कुणीच नाकारत नाही. पण सनातन प्रभात संघ परिवार संस्था आहे हे तुम्ही लिहिण हां खोडसालपणा आहे. बाकी तुमची मर्जी आहेच.

गापै तेवढे काड्यापेटी सात्विक का आणि लायटर तामसी का ते पैन सांगा की. आमच्या अकलेत भर पडेल

काड्यापेटी सात्विक का?
>> अहो, एवढं कळत नाही, गापै म्हणतायत म्हणून.
आता काही गुरुजींना यज्ञ पेटवायला काडेपेटी चालत नाही. ते चकमक पाडून ठिणगी कापसावर घेऊन मग ती कुंडात
टाकतात, असेही पाहिलेले आहे.

गा.पै. >> तुमचा काही संमंध नसताना तुम्ही प्रतिउत्तरांचि खैरात झोडताय. कृपया हे बंद करा. तसेच या पुढे वेद,धर्म सारख्या (तुमच्याच मति प्रमाणे) सोवळ्या आणि सात्विक विषयां वरची उत्तरं सत्व गुणि ताडपत्रांवर लिहून पाठवा . तमोगुणी संगणक यंत्राचा , अंतरजाल सेवेचा वापर करू नका.
आणि वेदाध्याय़िंचि आज्ञा ऐकायचाच धर्म पाळता ना? मग या धग्यावर गप्प बसा. बघू आता धर्म किती पाळता ते!

@ टण्या तुम्हाला ताणायंचच असेल तर
रॉबीनहुड आणि माझा प्रतिसाद एकत्र करून तुम्ही खोटं पसरवू नये असं जे लिहीलेलं आहे त्यातून माझ्या कुठल्या प्रतिसादातून काय खोटं प्सरवण्यात आलं ते समजलेलं नाही. तुम्हाला माझ्या एका वाक्याचं स्पष्टीकरणही दिलेलं आहे.

तुमच्या प्रतिसादातल्या संघाची जातधर्मावर असलेली मतं माहीत असताना याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कारण ती मतं काय आहेत हे तुम्ही सांगणं अपेक्षित आहे. ज्या अर्थी गामा पैलवानांना विषयांतर होत अस्सल्या कारणाने वरील प्रतिसाद दिलेले आहेत त्या कारणाने तुमच्या प्रतिसादांना याच धाग्यावर उत्तरं देऊन तो अधिक भरकटू नये या कारणाने उत्तर देण्याचं टाळत होतो. तुम्ही संघासारख्या एक्स्ट्रीमिस्ट संस्थेचे सदस्य असाल असे तुमचे इतर लिखाण वाचून वाटत नाही. तुमचं जे लिखाण वाचून तुमचं कौतुक केलं आहे तो टण्या वेगळाच राहील. केवळ संघाचा आहे म्हणून तुमची क्रेडीबिलिटी माझ्यासाठी संपणार नाही. मात्र संघाचा उल्लेख आल्याबरोबर तुम्ही देखील इतरांप्रमाणेच प्रतिक्रिया देत आहात याचे आताशा नवल वाटेनासे झालेले आहे. पूर्वीच्या राजवटीत कमरेखाली टीका करणारे लोक आता फेकू म्हटलं की चिडतात हे सर्वांना माहीत आहे. तसंच या धाग्यावर झालेलं आहे. तुम्हाला ते दिसत नसल्याने या विषयावर आता तुम्हाला उत्तर मिळणार नाही. मळा जे लिहायचं ते मी लिहीत असतो. संघाच्या लोकांकडून क्रेडीबिलिटीच्या सर्टीफिकेट्सची मला आवश्यकता नाही.

तुम्हाला संघ जातभेद पाळत नाही असं जे सुचवायचं आहे तो भाग माझ्या कुठल्या प्रतिसादाला धरून आहे आणि का आहे हे जमल्यास कळवा. बाकी या विषयावर तुम्ही वेगळी चर्चा सुरू करू शकता. त्यावर वाटले तर मत देईन.

@अतृप्त गुर्जी >> विषयांतराबद्दल माफी असावी.

गुरुजी, तुमच्या वेदाध्ययनाच्या चांगल्या धाग्याची वाट लागत्ये... असो. कलियुग आहे, हे होणारच.

>>> स्वानुभव असा की अर्थ माहिती नसताना काहीही पाठ करणे फार अवघड होऊन बसते! <<<<
शंका बरोबर आहे, पण जरा वेगळे उदाहरण देतो, हल्लीची दोनचार वर्षाची पोरे कानावर पडणार्‍या वाद्यांच्या अगम्य गोधळातील अगम्य इंग्रजी/हिंदी/मराठि शब्दांची भेसळ असलेली बिनाअर्थाची शब्द रचना त्याच तालासुरात(?) पाठ म्हणून दाखवतात, ते काय त्यांना त्याचा अर्थ कळतो म्हणून? जरा मागे गेलात तर त्याकाळची ल्हानसान पोरेपोरी हिंदी शिनुमातील यच्चयावत प्यारभरी/दर्दभरी गाणी ऐकुन ऐकुन पाठ झालेली म्हणायचे, ते काय त्यांना प्यार वा दर्द होत होता म्हणून का? इतकेच काय तर टीव्हीवर वेगवेगळ्या शोज मध्ये आईबापान्नी घातले म्हणुन कोणत्याही हिंदी/मराठी शृंगारिक गाण्यावर/लावणीवर नाचणार्‍या चारपाच वर्षांच्या पोरी त्यांना शृंगारातले "शष्प" तरी कळते म्हणुन का नाचत असतात? तस्सेच हे आहे.......
हाती घेतलेल्या विषयात इंटरेस्ट/आवड असेल वा नसेल, पण त्या बद्दल मनात जर तिरस्कार उद्भवू दिला नाही, तर तो तो विषय नक्किच आत्मसात होऊ शकतो, भले अर्थ कळेल वा न कळेल.
तसेही पहिली ते दहाव्वी पर्यंत आम्ही शिकलेल्या भुमिती/बीजगणितातील एकाही संज्ञेचा अर्थ जीवनात कसा वापरावा हे आम्हाला तेव्हाही कळले नव्हते, आजही नाही. तरी आम्हाला ते तेव्हा शिकून "मार्क्स" मिळवावेच लागले ना?
तर अशी उदाहरणे, जी खर तर पायात खुपलेल्या बाभळीच्या काट्याप्रमाणे बोचली पाहिजेत ते आपल्याबाबतीत होत नाही इतके आपण बधीर झालो आहोत, मात्र "धर्मविषयक" कोणतीही बाब असली, तर तिची मात्र (अनुभवाविण) काठाकाठाने चिकित्सा करीत बसायला आपण सदैव तयार असतो. असो. हा देखिल मनुष्य स्वभाव आहे.
आशा आहे की पाठांतराबाबत कंटाळा का येत नसावा हे तुम्हाला उमगले असेल.
या व्यतिरिक्त, संथा देणार्‍याचे उच्चार, लय-ठेका, सामुहिक उच्चारणाचे स्वरांचे गारुड, इत्यादी इतरही अनेक कारणे आहेत ज्यामुळे कंटाळा येत नाही.
गुरुजी याबाबत अधिक प्रकाश टाकू शकतील.

atrupt, lol. First time, I am very haapy with gama's logic. Bcz if i dont want my husband's punya and dont want to give my paap to him then i can very well skip those traditions. Problem solved.

>>>> ल्लिंब्यआ , तु दिलेली उदहरणे पोर्कट अहेत. <<<< LOL
कावळ्या, ही उदाहरणे पोरकट असणारच, गेल्या पाचदहा वर्षातीलच तर आहेत अनुभवातील.
जख्खड म्हातारी उदाहरणे द्यायची तर श्रूति:स्मृतिपुराणे चाळुन त्यातली द्यावी लागतील, पण श्रूति:स्मृतिपुराणे तुम्हाला "त्याज्य" ना! मग काय करणार? Wink
बाकी उदाहरणे पोर्कट असोत वा जख्खड म्हातारी असोत, माझी पोर्कट उदाहरणेही अचूकच आहेत! Proud

पतीचं पाप आणि पत्नीचं पुण्य याची काय भागिदारी सांगितलीये गामाशास्त्रामधे? की बाप्याच्या जन्माला येऊन पतीची सगळी पापे धुतली गेलीत आणि बाईच्या जन्माला येऊन पत्नीची पुण्ये गायब झालीत? कैत्तरी उत्तरे...

आता हे आत्मारावांसाठी.. (गामाने उत्तरे देऊ नयेत. वाचली जाणार नाहीत.)
१. विधुर पुरूष बायकोऐवजी 'कडोसरीला सुपारी लावून'(असे वाचले आहे.) सर्व धार्मिक कृत्ये करू शकतो. तोच अधिकार विधवा स्त्रीला नाही असे सांगितले जाते. ते का वगैरे बाजूला राहूदेत पण पुरोहित मंडळी आता या गोष्टीकडे कसे बघतात?

२. कुठलीही पुजा अर्चा करताना शुद्ध आचाराने करावी म्हणतात. ते पटण्यासारखे आहे. पण शुद्ध या संकल्पनेमधे घोळ आहे. माझ्यामते खोटे बोलणे हे शुद्ध आचाराच्या विरूद्ध जाते. पण ते बोलावे लागते. माझ्यासारख्या अनेक बाया आहेत ज्यांचा विटाळ पाळणे या जुनाट समजुतीवर कणभरही विश्वास नाही. शास्त्रीयदृष्ट्या त्यामधे काहीही तथ्य नाही अशी माझी (अनेकींची) खात्री आहे. पुजेच्या वेळेला पुजा करणारीची वा घरातल्या अन्य कुणाची तारीख येणे हे काही नवलाचे नाही. देवाधर्माच्या कारणांसाठी गोळ्या घेऊन तारखा अ‍ॅडजस्ट करणे हा शरीरावर केलेला अत्याचार आहे असे गायनॅक्स सांगतात आणि माझा त्यांच्यावर जास्त विश्वास आहे. पुरोहित लोक पुजेला येऊन निर्लज्जासारखे 'कुणाची पाळी नाही ना?' असे विचारताना मी ऐकले आहे आणि त्यावर नाही असे खोटे उत्तरही दिले आहे. कारण ती वेळ चर्चा करून समजावण्याची नाही आणि समोरची व्यक्ती चर्चेने समजणारीही नाही हे पक्के माहित आहे.
अश्या वेळेला पाळी असून पुजेमधे बसणे याची मला कणभर टोचणी लागत नाही पण खोटे बोलून पुजेला बसावे लागले याची टोचणी नक्कीच लागते.
मी माझ्या घरात छोट्यामोठ्या पुजा करायच्या तर पुस्तक वाचून स्वतःच करते. तेवढे संस्कृत आईने शिकवलेय. पण सगळ्या ठिकाणी हे होत नाही.
पुरोहित लोकांच्यात या संदर्भात काय म्हणले जाते?

३. मला माझे लग्न विधीवतच करायचे होते पण त्यातले महत्वाचे व आजच्या काळाला अनुसरून असलेले विधी निवडूनच. त्यासाठी मी थोडेफार वाचन केले. राजवाड्यांच्या 'भारतीय विवाह संस्थेचा इतिहास' पासून इतर बरेच. या पुस्तकाने माझे बरेच शिक्षण केले. नवर्‍याचे आडनाव लावायचे नाही या माझ्या निश्चयाला त्या पुस्तकातून अजून पुष्टी मिळाली. पण तरी आजच्या संदर्भाने वैदीक पद्धतीचे विधी आणि त्या श्लोकांचे अर्थ, प्रबोधिनी पद्धतीचे विधी व अर्थ हे सगळे समजून घेतले.
दोघांच्या आईवडिलांनी कार्यासाठी आणि आपापल्या मुलांच्या पुढच्या आयुष्यासाठी प्रार्थना करणे व आशिर्वाद मागणे (पुण्याहवाचन), नातिचरामीची शपथ घेणे, आपल्या आयुष्यासाठी नवीन जोडप्याने आशिर्वाद मागणे (लाजाहोम), आपल्या आयुष्यात मी दगडासारखी कणखर राहून तुझा व आपल्या कुटुंबाचा आधार बनेन हे सांगणे (अश्मारोहण), आयुष्यातल्या सात महत्वाच्या गोष्टींमधे -अन्न, संपत्ती, ताकद, आनंद, सर्व ऋतू एकत्र अनुभवणे, संतती आणि मैत्र- एकमेकांच्या बरोबर असण्याची शपथ घेत त्यासाठी आशिर्वाद मागणे (सप्तपदी) हे विधी पटले.
हे एवढेच विधी व हार घालणे करायचे अशी आमची दोघांची इच्छा होती.
प्रबोधिनी पद्धतीत हे शक्य होते. पण आम्ही बुक केलेल्या हॉलमधे त्यांचे ठरलेले गुरूजी वगैरे अशी काहीतरी भानगड होती. मग वैदीक पद्धतीने करायचे तर कन्यादान, गौरीहार, कानपिळी, सूनमुख वगैरे गोष्टीही होत्या. कन्यादान सोडून बाकीच्या गोष्टी एकवेळ ठिक होत्या पण वैदीक वाल्या गुरूजींनी कन्यादान काढून टाकायला नकार दिला. सगळाच मोठा बखेडा व्हायची चिन्हे दिसत होती आणि आईला माझी भूमिका पटत असली तरी तिची तब्येत इतकी नाजूक होती की तिच्यात बखेड्याला सामोरे जायची ताकद नव्हती. त्यामुळे मी माझे दान करायला होकार दिला. Sad

तर खटकलेले मुद्दे म्हणजे ही कार्यालयाबरोबर तयार केलेली मोनोपॉली आणि हा कन्यादान नावाच्या अत्यंत वाईट प्रकाराचा आग्रह.
इथे तुमचे आणि पुरोहितवृंदाचे काय म्हणणे आहे?

(गामा, लिंब्या वगैरेंनी कष्ट घेऊ नयेत उत्तरे द्यायचे!)

इतकेच काय तर टीव्हीवर वेगवेगळ्या शोज मध्ये आईबापान्नी घातले म्हणुन कोणत्याही हिंदी/मराठी शृंगारिक गाण्यावर/लावणीवर नाचणार्‍या चारपाच वर्षांच्या पोरी त्यांना शृंगारातले "शष्प" तरी कळते म्हणुन का नाचत असतात? तस्सेच ...
<<

डोळे निवले! कान तृप्त झाले!!

अहह! कसली प्रासादिक वाणी आहे!!

लिंबाजीरामा, तुमच्या जिव्हेवर साक्षात सरस्वती नृत्य करते आहे असा भास झाला क्षणभर.

>>>> मुद्दा बरोबर असला तरी त्याचा इथे काय संबंध लिंब्या? <<<<
अग नीरजे, तू सगळा धागा नै का वाचलास? आधी कुणीतरी पाठांतर/घोकंपट्टीसंबंधी तो ठळक केलेला प्रश्न विचारला आहे, धाग्याच्या विषयाला धरूनच, मग म्हणुन माझ्यामते अजुनही एका प्रकारचे असलेले उत्तर दिले.
उत्तराचे सूत्र असे की "अर्थ समजो वा ना समजो, पाठांतर होऊ शकते, होते, केले जाते"
उगाच हिंदू वैदिकांना "नावे ठेवण्याकरता" अशा शंकांचा उपयोग तिर्‍हाइतांना होऊ नये, व अर्थ न समजता मंत्र म्हणता तरी कसे वगैरे बालिश आक्षेप तिर्‍हाइतांकडून निघू नयेत म्हणुन ते सविस्तर उत्तर दिले. Happy

>>> लिंबाजीरामा, तुमच्या जिव्हेवर साक्षात सरस्वती नृत्य करते आहे असा भास झाला क्षणभर. <<<<
कैच्य्याकैच काय इब्लिसा? माझ्या गरीब बिचार्‍या जिव्हेचा काय संबंध इथे?
हां, आता "कुणी अतृप्त आत्मावगैरे माझ्या हाताच्या बोटांचे पाय करुन कीबोर्डवर नाचलाय" असे म्हणाला असतास तर ते एक वेळ खपले अस्ते... Wink Proud
आम्हाला परमपूज्य असलेल्या देवी सरस्वतीला कशाला मधे आणतोस? Sad

अरे त्या 'लिंक 'पिसाट मामा पैलवानाच्या काय नादी लागता ?

आपली चर्चा चालू द्यात.
नीधप याना १००% अनुमोदन...

@१.विधुर पुरूष बायकोऐवजी 'कडोसरीला सुपारी लावून'(असे वाचले आहे.) सर्व धार्मिक कृत्ये करू शकतो. तोच अधिकार विधवा स्त्रीला नाही असे सांगितले जाते. ते का वगैरे बाजूला राहूदेत पण पुरोहित मंडळी आता या गोष्टीकडे कसे बघतात?>>> जसे बहुसंख्येचे मन बघते तसेच बघतात..असं मला प्राथमिक उत्तर द्याव लागेल. पण ही गोष्ट सुद्धा,एव्हढीच सुटी सांगुन थांबता येणार नाही. अगदी प्राचीन काळापासून ब्राम्हण समाजातला आर्थिक दृष्ट्या जो गरीब वर्ग आहे..तोच या पौरोहित्याच्या क्षेत्रात सर्वाधिक कार्यरत रहात आलेला आहे. पैश्यानी येणारं ऐश्वर्य कालगतीनुसार अनेकदा आलं...गेलं ही! पण या माझ्या वर्गाचं मनाचं ऐश्वर्य असं कधी आलच नाही. आधुनिक काळातंही ज्या गोष्टी बदलाव्या लागल्या त्याही धर्माचे आधार-शोधल्या आणि लावल्याशिवाय बदलल्या गेल्या नाहीत. शुद्ध बौद्धिक मनाने,आणि फक्त ऐहिक नितीला प्रमाण मानुन- "हे आमचं प्राचीन तत्वज्ञान पुरुषबुद्धीप्रेरित-स्वार्थावर आधारीत होतं,त्याची आंम्हालाहि आता लाज वाटते..म्हणून ते आंम्ही सोडतो आहोत..आणि त्या जागी जे खर्‍याखुय्रा नितीला/मानवतेला अनुकुल असेल..असं काहितरी त्याजागी घेतो आहोत" अशी भुमीकाच घेणं आमच्याकडून झालेलं नाही. जे काहि झालेलं आहे..ते अत्यंत अंधुक आहे,आणि त्याचाही प्रकाश समाजानी पुढे पसरवायला मनापासून हातभार लावलेला नाही. प्रथा/रुढींवर भरपूर प्रहार झाले.पण मूळबीज कधिही बदललं गेलेलं नाही... आणि ते बदलायला गेलो,तर आमच्या पाठिशी कोणी उभं राहिल का? (आम्म्ही जगू का?) अशी साधार भिती आमचे मनात वसत आलेली आहे. त्यामुळे ,दृष्टिकोन बदलेले अनेक लोक (५०टक्के तरी..) आमच्यात आजंही आहेत. (आधुनिक काळाचेही संस्कार ,त्यांच्या माझ्या अंतर्मनाला कसे चुकावे?) पण ते असे उघड बोलायला भितात.. मी धर्मामधे जे चूक आणि अनैतिक आहे..आत्मघातक आहे...ते तसे आहेच! ,म्हणून ठामपणे शड्डू ठोकून उभा रहातो..याला कारण माझ्या अंतर्मनाला वि.दा.सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ निबंधांचा आणि त्यांच्या रत्नागिरितील हिंदूसमाजक्रांतीच्या समग्र कार्याचा मोलाचा आशिर्वाद मिळालेला आहे. त्याखेरिज या कृतीला..आपल्या मराठी अमराठी लोकांच्या बदलत्या मनांनेही ताकद दिलेली आहे. अर्थात .. आजच्या काळात सुधारणावाद्यांच्या वैचारिक हल्ल्यानी व्यथीत होऊन चिडलेली मने(पुरोहित/यजमान..दोघांचिही) हे सगळं कळत असूनही बदलाला विरोधी जातात..हे ही त्याबरोबरच एक प्रखरसत्य वास्तव आहेच.

२. कुठलीही पुजा अर्चा करताना शुद्ध आचाराने करावी म्हणतात. ते पटण्यासारखे आहे. पण शुद्ध या संकल्पनेमधे घोळ आहे. >>> अगदी बरोबर.. आहेच घोळ.अगदी ब्रम्हघोळ आहे. आपण आपल्या केवळ मानवि बुद्धिनिकषांनी खरं आणि खोट्याची जी व्याख्या गृहीत धरत असतो..आणि त्यावरच श्रद्धा ठेवून व्यवहारात वागत असतो..ती धर्मशास्त्रातल्या-खर्‍या/खोट्याच्या विरोधी ,विसंगत अशी कशिही असू शकते..नव्हे असतेच असते. जगातल्या हरेक धर्मातलं खोटं..हे ऐहिकात खरोखर खरं असतं..आणि धर्मातलं खरं हे ऐहिकात खोटच खोटं असतं..याखेरिज काहि गोष्टी मूळ धर्मव्यवस्थेला पूरक असतील,अथवा बाधक नसतील..तर त्या जश्याच्या तश्या स्विकारलेल्या/टिकवलेल्याही असतात.पण त्यांची अवस्था एका बाहुल्या सारखि असते. वापरात आलं तर बाहुला तो राजा..नै आला तर डोंबार्‍याचं माकड!

@माझ्यामते खोटे बोलणे हे शुद्ध आचाराच्या विरूद्ध जाते. पण ते बोलावे लागते. माझ्यासारख्या अनेक बाया आहेत ज्यांचा विटाळ पाळणे या जुनाट समजुतीवर कणभरही विश्वास नाही. शास्त्रीयदृष्ट्या त्यामधे काहीही तथ्य नाही अशी माझी (अनेकींची) खात्री आहे. पुजेच्या वेळेला पुजा करणारीची वा घरातल्या अन्य कुणाची तारीख येणे हे काही नवलाचे नाही. देवाधर्माच्या कारणांसाठी गोळ्या घेऊन तारखा अ‍ॅडजस्ट करणे हा शरीरावर केलेला अत्याचार आहे असे गायनॅक्स सांगतात आणि माझा त्यांच्यावर जास्त विश्वास आहे.>>> अगदी खरं आणि बरोबर आहे हे..मला ह्या गोष्टी (माझ्यापुरत्या..) मान्यच आहेत.यातलं सगळं खरं मला स्पष्ट झाल्यानंतर..मी त्या स्विकारलेल्याही आहेत. मी माझ्याकडून धर्मकृत्य करवुन घेत असताना ,आपणहुन याला कधिही आडवा गेलेलो नाही. उलट (या भूमिकेला अनुकुल असलेल्या) यजमान घरात कोणी इतर आडवे जाऊ लागले,तर त्यांच्या समोर जाऊन मात्र जरूर उभा राहिलेलो आहे. पण पुन्हा एकदा हे सांगतो..कि माझ्यासारखे या वर्तनाला-आलेले आमच्या मराठी पुरोहितात तरी साधारण पाच टक्केच आहेत. कारण???? :- प्रबोधनाचा प्रकाश,या उरलेल्यांपर्यंत पोहोचवला गेलेला नाही,अगर तो पोहोचला नाही..किंवा तो प्रकाश आला..तर ते त्याला भिऊन,अज्ञानानी अथवा क्रोधानी- उन समजून..जाणुन बुजुन छत्री घेऊन आणि काळाकुट्ट गॉगल घालुनच उभे रहातात..याला मी काय करावे? Sad (मी हे सगळं आमच्यातल्या लोकांशी वादविवादात शांततेनी बोलतो,तर मलाच अंनिसचा-गुर्जी वगैरे म्हणतात..अजुनंही! Sad )

@पुरोहित लोक पुजेला येऊन निर्लज्जासारखे 'कुणाची पाळी नाही ना?' असे विचारताना मी ऐकले आहे. >> असं विचारणार्‍यांमधे सर्वच जण निर्लज्ज नाहित/नसतात/असू शकत नाहित.. हे आधी नम्रपणे स्पष्ट करतो. काहि अज्ञानी आणि जबरदस्त अंधःश्रद्ध आहेत.काहि वांड आहेत..त्यांना सरळ करविण्यासाठी लोकमानसाच्या सकारात्मक दबावाचं भय आवश्यक आहे...आणि याहुन जे गुंड किंवा हुकुमशाही मनोवृतीचे आहेत..त्यांना कायद्याचा बडगाच निर्माण करावा लागणार आहे. त्यासाठी धर्मभोळ्या यजमान वर्गाऐवजी पुरोगामी आणि सुधारणावादी यजमान वर्गानी काहि करणं अपेक्षित आहे..

@आणि त्यावर नाही असे खोटे उत्तरही दिले आहे. कारण ती वेळ चर्चा करून समजावण्याची नाही आणि समोरची व्यक्ती चर्चेने समजणारीही नाही हे पक्के माहित आहे.
अश्या वेळेला पाळी असून पुजेमधे बसणे याची मला कणभर टोचणी लागत नाही पण खोटे बोलून पुजेला बसावे लागले याची टोचणी नक्कीच लागते.>>> इथे गफलत आहे..लक्षात घ्या..की तुम्ही जे खोटे बोलत आहात..ते तुमच्या मुळे नव्हे..हे पहिलं. आणि पुजेला बसताना नियम म्हणून तुम्हाला जे खरं-सांगितलं गेलेलं आहे...ते तुमच्या अंतर्मनाला, खोटंच आहे.. हे फक्त मान्य झालय,पण स्विकारलं गेलेलं नाही ,म्हणून त्या कथित खोटं बोललं गेलेल्याची टोचणी लागतीये-हे दुसरं! थोडक्यात.. अशी शस्त्रक्रीया करण्यासाठी तशी सुरी वापराविच लागते..तिला हिंसा कशाला मानायचे? उलट तोच पवित्र धर्म आहे/ असला पाहिजे..बाकि कुणिही मानला नाही..तरि!

@३. मला माझे लग्न विधीवतच करायचे होते 'पण त्यातले............अशी आमची' दोघांची इच्छा होती.प्रबोधिनी पद्धतीत हे शक्य होते. पण आम्ही बुक केलेल्या हॉलमधे त्यांचे ठरलेले गुरूजी वगैरे अशी काहीतरी भानगड होती. (>> ते हल्लिचे कार्यालयातल्या पॅकेजचे गुरुजी!..असो.) मग वैदीक पद्धतीने करायचे तर कन्यादान, गौरीहार, कानपिळी, सूनमुख वगैरे गोष्टीही होत्या. कन्यादान सोडून बाकीच्या गोष्टी एकवेळ ठिक होत्या पण वैदीक वाल्या गुरूजींनी कन्यादान काढून टाकायला नकार दिला. सगळाच मोठा बखेडा व्हायची चिन्हे दिसत होती आणि आईला माझी भूमिका पटत असली तरी तिची तब्येत इतकी नाजूक होती की तिच्यात बखेड्याला सामोरे जायची ताकद नव्हती. त्यामुळे मी माझे दान करायला होकार दिला. तर खटकलेले मुद्दे म्हणजे ही कार्यालयाबरोबर तयार केलेली मोनोपॉली आणि हा कन्यादान नावाच्या अत्यंत वाईट प्रकाराचा आग्रह.
इथे तुमचे आणि पुरोहितवृंदाचे काय म्हणणे आहे? >> पुरोहितवृंदाचे म्हणणे मी तुम्हाला (निदान..या प्रसंगापुरते तरी!) नाहि सांगू शकणार. किंबहुना मी त्यांच्या पुराणमतवादी आचरणाची बरीचशी कारणमिमांसा वर केलेली आहे..ज्यातुन तुम्हाला हे आकलन होइलंही..पण , मी माझे म्हणणे काय आहे? हे मात्र नक्की सांगू शकेन. (मात्र यात थोडी माझी हिस्ट्री सांगावी लागेल,त्या शिवाय- हे असे का?- ते स्पष्ट होणार नाही..आणि ते स्पष्ट होणे माझ्या बाकिच्या व्यवसायबांधवांच्या-मागासतेच्या अवस्थास्पष्टिकरणाकरता आवश्यक आहे.)
मी १९९७ पासून हे काम करत आहे.तसेच माझ्या घरात पौरोहित्याची गेल्या सहापिढ्यामधे परंपरा नाही. त्यामुळेच सामान्य धर्मसंस्कारी वातावरणात मी वाढलेलो आहे. शिवाय मी मनानी मागास मनोवृत्तीचा जन्मजात नाही,असेही असेल कदाचित. त्यामुळे व्यवसायातील पहिली काहि वर्षे गेल्यावर ..मलाही हे प्रश्न आपल्या सर्वसामान्यांप्रमाणेच पडत होते. समोरंही येत होते. मी पु.लं.चा परिपूर्ण फॅन असल्याने त्यांची सर्व पुस्तकंही या काळात वाचत होतो. त्यापैकी त्यांच्या वैचारिक लेखनानी मन बरच प्रभावित झालेलं होतं .आणि तेंव्हाच कुठेतरी अशी खुणगाठ बसली गेली असेल,की मी त्यानंतर पौरोहित्यातल्या या पारंपारिक सरधोपट मार्गानी जाइनासा झालो. अनेक श्रद्धा उडाल्या/उखडल्या,अनेक नव्याही त्याजागी प्रतिष्ठित झाल्या. पुढे सावरकर,नरहर कुरुंदकर,दाभोळकर,डॉ.आ.ह.साळुंखे असे अनेक समिक्षक/विरोधक/टीकाकार वाचुन झाले. आधी मन चिडलं,नंतर शांत झालं.ही प्रक्रीयाही या दरम्यान घडुन गेली. याखेरिज माझं मनंही मला आधिपासूनच या कन्या-दाना सारख्या सगळ्याच समताविरोधी(खरं म्हणजे विषमता प्रसारक..म्हणायला हवे!) अनैतिक गोष्टींच्या बाजूने उभे राहू देत नव्हते. हे ही एक प्रबळ कारण होतच. अश्या सर्व घटनांमुळे मी माझ्या धर्मातल्या या गोष्टींच्या बाजुने पूर्वीही नव्हतो,आजही नाही..आणि यापुढे असण्याचा तर आता काहि प्रश्नच नाही. आता फक्त, "मी यजमानांकडे इथे जसा बोलतो,तसा वागतो किंवा वागू शकतो काय???" एव्हढ्या एका महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं,की मगच यामागचा शेवटचा आणि आवश्यमेव असा एक कंगोरा स्पष्ट होऊन ,हे उत्तर पूर्ण होइल. मी यजमनांकडे आजंही सगळीकडे सर्वस्वी असा वागू शकत नाही,कारण हिंदू पुरोहित ही पोस्ट (मला हवे ते..) अधिकार-बजावून घेऊ शकण्याच्या पातळीचीच नाही. हे प्रमुख कारण! आणि याशिवाय जो काहि माझ्यासारख्याचा आधिकार मानला जातो,तो प्रस्थापित धर्ममूल्यांना धरुन बजावला जातो आहे का नाही? हे आजमावणारा पुष्कळ मोठा वर्ग आजही अस्तित्वात आहे. तिथे मी हतबल आहे. तिथे मला ठरलेली पाटी टाकून-बाहेर पडावं लागतं. त्यामधे ज्या लोकांना ही आधुनिक मूल्य ऐकू जाण्याचा संभव आहे,असं मला जाणवतं,अश्यांना ती मी गेली दहा वर्ष जे मार्ग त्यावेळी उपयुक्त असतील त्या मार्गानी ऐकवतंही आहे. आणि कृतीत आणवता येणं शक्य असेल्,तर आणवतंही आहे. जे स्वतःहून अश्या खर्‍या बदलाची मागणी करतात,त्यांच्यासाठी तर मी हे,अत्यंतिक आनंदानी करतो आहे.. परंतू अश्यांचं प्रमाण अत्यल्प आहे. आणि याखेरिज एक वर्ग असा आहे,की ज्याला ह्यापैकी कुठल्याच गोष्टीशी काहिही देणंघेणं नाही.. यांच्या बाबतीत मात्र माझा नाइलाजच रहाणार आहे. Sad

लोकहो...या प्रतिसादा निमित्तानी,शेवटी एकच कळकळीची विनंती अगदी मनापासून करतो आहे. ही विनंती जे लोक, धर्मातला फोल आणि लबाड पणा कळल्यामुळे धर्मावर चिडलेले आहेत..अगर धर्म फेकून द्यायला उद्युक्त झालेले आहेत, आणि ज्यांनी धर्म फेकूनंही दिलेला आहे,अश्या सर्वांसाठी आहे. आपल्याला यातलं बरं वाइट काय आहे? हे कळलं. आपल्या मुलाबाळांनाही आपण ते सांगत शिकवत असाल..जे आवश्य आहेच. पण फक्त वाइट काय आहे? एव्हढच सांगून थांबु नका,त्या जागी या धर्मव्यवस्थेत चांगलं काय आणावं लागेल हे ही पहा/सांगा..ते आणण्याचं कृतीशील व्रत त्यांना हाती द्या. कारण अनिती,विषमता,अंधःश्रद्धा -या गोष्टी फेकून दिल्यानीच फक्त प्रश्न संपत नाही,तर इथून तो खर्‍या अर्थानी-सुरु होतो. बालवयामधे, तुमच्या माझ्या मनावर जे चांगल्या,खोट्या,खर्‍या,उपकारक,अनुपकारक्,अपकारक..अश्या अनेक प्रकारच्या श्रद्धांचं धर्म,संस्कृती,परंपरांच्या माध्यमातून कंडिशनिंग झालेलं आहे..आणि आपल्या मनाला ते त्रास-होइपर्यंत चिकटून राहिलेलं आहे..त्याच्या जागी नव्या नितिमय सद्मूल्यात्मक श्रद्धांचं अजुन एक कंडिशनिंग आपल्याला करवून घेणं आवश्यक आहे. आणि मुलांना जुनं वाइट म्हणजे काय? हे स्पष्टपणे सांगून झाल्यावरंही..त्यांना श्रद्धेची जीवन जगण्यासाठी गरज आहे,असे -दिसत असेल तर , अगदी ठामपणे या नवमूल्यात्मक श्रद्धांचं कंडिशनिंग करावं आणि करावंच लागणार आहे. (जसे की, महिलेच्या हातून पौरोहित्यपद अगर यजमानपद भुषविले जाणे.सोयरसुतक अगर पाळी आलेली असतानाही धर्मकार्य पार पाडणे. महिला यजमानाच्याही हातून मृताचे दिवस-करणे,अगर विवाह/उपनयन संस्कारंही घडविणे)
आता या नवमूल्यात्मक श्रद्धा म्हणजे अजुन एक नवा धर्मग्रंथ निर्माण करायचा काय? हा कळीचा प्रश्न आपल्यापुढे उभा राहणार आहे..पण त्याची काहिएक आवश्यकता नाही,असं मला आज वाटतं. मूळ धर्मात जिथे जिथे विषमतेचा/अनितीचा कोणत्याही छोट्याश्या अंगानि देखिल प्रचार प्रसार दिसला,तर तो धुडकावून अगर दुर्लक्षून त्या जागी मानवि समतेचा आणि नितीचा व्यवहार/विधी आणणं..हाच तो नवा धर्म. एकदा स्वतःच्याच धर्मात हस्तक्षेप करून ,योग्य व आवश्यक बदल धर्मपुरोहितांकडे ,(आणि अन्यत्रंही )ठणकावून मागायची आणि करायची सवय बहुसंख्य समाजमनाला लागली,आणि पटली... की काहि प्रश्न सुटतील,काहि सोपेही होत जातील. आणि जे होणार नाहीत..त्यांच्यासाठी आपणच कायदा आणायची भाषा करु शकू... ! __/\__

जबरदस्त !!
तुम्ही जसे आहात तसे स्विकारायला कुणालाही अडचण येऊ नये. अतिशय नितळ भूमिका मांडताहात. आरशासारखे स्वच्छ आहात अंतर्बाह्य.

अतृप्त, तुमचे सगळे लिखाण आणि प्रतिसाद अतिशय आवडले. तुमची चपखल, संयमी आणि मुद्देसूद भाषा खरोखर वाखाणण्यायोग्य आहे. तुम्हाला मनापासून प्रणाम Happy

आत्माराव, छान विवेचन करताय.
मला वाटतं आता हा भाग आणि प्रश्नोत्तरे संपवून पुढे जावं.
कारण या पुढच्या मालिकेत वेळोवेळी या किंवा अश्या प्रश्नांची लेखाच्या ओघात उत्तरे येवून गेली आहेत.
तसेच त्या त्या भागावर त्या त्या वेळी योग्य ती चर्चा करता येईलच.
या लेखाचा विषयच असा आहे की फोडले तर कितीही फाटे फुटतील.
तुमच्या लेखनाची गाडी मालिकेतल्या याच भागावर कित्येक दिवस अडकून पडू शकते.

मला वाटतं तुम्ही आता लोकांना आत्मचिंतनासाठी वेळ देऊन पुढच्या भागाकडे वळा.

अतृप्त गुरूजी , मूळ लेख आणि धाग्यात आलेले तुमचे प्रतिसाद सर्वच आवडल. ज्या संयमाने तर्कशुद्ध पोस्ट्स टाकत आहात ते सर्वच आवडल. मनापासून _/\_
तुमच्यासारखे लोक साऱ्या धर्मात असले पाहिजेत. धर्माच्या नावावर चालेल दुहीच राजकारण संपून जाईल मग.

बाकी गामांच्या पाप पुण्यावाल्या पोस्टिने हहपुवा. नवर्याला सांगेन म्हणते बायको मुळे तुझ अर्ध पूण्य (!?) कमी झाल ते

@ बाकी गामांच्या पाप पुण्यावाल्या पोस्टिने हहपुवा. नवर्याला सांगेन
म्हणते बायको मुळे तुझ अर्ध पूण्य (!?) कमी झाल त>> Lol

Pages