वेदाध्ययनातील- संथा देणे... अर्थात वेदाभ्यास शिक्षण/पाठांतर पद्धती.

Submitted by अत्रुप्त आत्मा on 25 March, 2015 - 08:42

खुलासा:- वेदपाठशाळांमधे प्राचीन काळापासून अध्ययन/अध्यापनाची एकच एक अशी, परंपरागत पद्धती रहात आलेली आहे. ही पद्धती फक्त पाठ करून ठेवण्याच्या विषयाकरिताच निर्माण झालेली आहे. हिला सामन्यतः मौखिकी अध्यापन पद्धती असे म्हटले जाते. ह्या पद्धती विषयी खूप जणांच्या मनात कुतुहल,आस्था,चिकित्साभाव इत्यादी असते. आंम्हा पुरोहित मंडळीना काम करत असताना,पाठांतर पाहुन ह्या अनुषंगानी काहि प्रश्नंही विचारले जात असतात. अश्या सर्व प्रश्नकर्त्यांना हा विषय नीट माहिती व्हावा,एव्हढ्याच हेतूने हा सदर लेख येथे देत आहे.

@संथा देणे म्हणजे काय? >> संथा देणे म्हणजे ,वेदपाठ शिकविणारे गुरुजी , समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचे छोटे तुकडे(चरण)पाडून ,वदवून आपल्या मागे घोकायला/म्हणायला सांगतात..याला प्राथमिक अर्थानी संथा-देणे असे म्हटले जाते. यापुढे...(विद्यार्थ्यांनी)संपूर्ण पाठांतर करण्याच्या विशिष्ट पद्धतीला, संथा घालणे अगर संथा म्हणणे ..असे म्हटले जाते. एखादा विषय/याज्ञिकातला प्रयोग/संहितेचा अध्याय (तोंड)पाठ करताना, संथा म्हणण्याचे ४ ट्प्पे असतात.
१) चरणाची संथा(४वेळा) २) अर्धनीची संथा(४वेळा) ३) ऋचेची संथा(४वेळा) ४) गुंडिकेची संथा(४वेळा) = एकंदर १६ संथा.

१)चरणाची संथा:- चरणाच्या संथेत, गुरुजिं..प्रथम समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचा एकेक चरण दोनदा सांगतात.. मग विद्यार्थ्यांनी पोथित बघून तो त्यांच्या मागून ७वेळा घोकायचा. यात म्हणताना चूक झाली,की पुन्हा सुरवात. यात शुद्धअक्षर,जोडाक्षर,त्याचे गुरुत्व,अनुस्वारांचे उच्चार,स्वराघात,र्‍हस्व आणि दीर्घ/प्रदीर्घ-अश्या काना ,मात्रा,वेलांट्या,उकार, विसर्ग आणि त्यांचे तसेच उच्चार ,हे शंभर टक्के शुद्ध होत आहेत की नाहीत? हे गुरुजी कसून तपासत असतात. (कारण एकदा अशुद्ध पाठ झालं..की ती (मेंदूत उमटलेली) प्रींटाऊट,नंतर पुसणं कर्मकठीण असतं.) तर..हे स्तोत्रातले पाडलेले एकेक चरण ७ वेळा घोकत संपूर्ण अध्याय वा स्तोत्र - पूर्ण केलं जातं... ही झाली "चरणाची" पहिली संथा. अश्या चार संथा झाल्या की 'चरण' पूर्ण होतो. ही सगळी संथा गुरुजिंसमक्ष होते. (कारण तेच-मंत्रात अजिबात अशुद्धी राहू नये.)

२)अर्धनीची संथा:- अर्धनीच्या संथेत ,सामान्यतः दोन चरण एकत्र घेऊन..किंवा मंत्राची अर्धी ओळ सात वेळा म्हटली जाते. (काहि वेळा जगतिच्छंदा सारखा,मंत्राचा लांबलचक छंद असेल,तर एका ओळीत ४/४ किंवा अगदी ६/६ चरणंही पाडावे लागतात) आधी चरण डोक्यात-बसलेला असतोच..त्यामुळे इथपासून गुरुजी समोर नसले,तरी चालते. तर.. ही...एकामागून एक ओळ पूर्ण ७ वेळा घोकत ...संपूर्ण अध्याय पूर्ण केला... की अर्धनीची १ संथा झाली...आता अश्याच पुढे अजुन ३ संथा म्हणायच्या..म्हणजे या अर्धनीच्या चार संथा होतात.

३)ऋचेची संथा:- ऋचेच्या संथेत..मागील अर्ध्या ओळीच्या संथेचा पुढचा भाग सुरु होतो..म्हणजे आता २ ओळिंची संपूर्ण ऋचा ,आणि पुढच्या ऋचेचा पहिला चरण(धरुन) ..,तसे ७ वेळा म्हणायचे. यातील पुढच्या ऋचेचा पहिला चरण त्यात घेण्याचे वैशिष्ठ्य असे..की यामुळे संपूर्ण अध्यायातल्या प्रत्येक पहिल्या ऋचेची-दुसर्‍या ऋचेशी गुंफण तयार होते. (कनेक्टींग होते.) ऋचे'तल्या या (पहिल्या)संथेवर,शिकविणार्‍या गुरुजिंचे बारीक लक्ष असते. (कारण तेचः- अशुद्धी आली कींवा मधे कुठे तयार झालेली आहे काय? हे पहाणे.) ह्या ऋचेच्या परत पुढे तीन संथा म्हणायच्या. म्हणजे या ऋचेच्याही एकंदर चार संथा पूर्ण होतात.

४) गुंडीकेची संथा:-..हा शेवटचा, परंतू अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. आता मागील ऋचेच्या संथेनी हीचेच निम्मे काम केलेले असते. पण तरिही.., आता कितीही पाठ येत असले..तरी(यातल्या पहिल्या संथेला) पोथीत पाहूनच..सदर पाठांतराच्या अध्यायाचा एकेक अनुवाक अथवा वर्ग (पॅरेग्राफ) ७/७ वेळा म्हणायचा असतो. आणि तो सगळा अध्याय पूर्ण करायचा असतो. ही झाली गुंडिकेची पहिली संथा.. अश्या अजुन तीन म्हणून ,ह्या गुंडिकेच्या चार संथा पूर्ण करायच्या. या गुंडिकेच्या संथेमधे, साधारणपणे दुसर्‍या किंवा तिसर्‍या संथेपासून ,(आता) विद्यार्थ्याची..इच्छा अगर तयारी-नसली तरी विद्यार्थ्यांनी पोथित न पहाताच ,मान वर करुन संथा म्हणायची असते. कारण त्याशिवाय-पाठ येणे..ही क्रीयाच आकाराला येऊ शकत नाही. अर्थात कोणत्याही सर्व सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याला यातल्या शेवटच्या २ संथांमधे सर्वकाहि बिनचूक तोंडपाठ-येतेच. पण त्याहून(बुद्धिनी) आगे/मागे जे असतील..त्यांना कमी अगर जास्त कष्ट घ्यावे लागतात. तर,अश्या ह्या एकंदर १६ संथा घातल्या की आपल्याला अपेक्षित असलेला पाठांतराचा विषय-तयार होतो.

आता आपण याचे-संकलित..,एका स्तोत्रपाठांतराच्या उदाहरणाद्वारे पाहुया. (हे आणखि डिटेलिंग,विशिष्ट हेतूनी आणि जाणिवपूर्वक करत आहे.)

चरणाची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं,(७वेळा) गौरीपुत्रं विनायकम् ।(७वेळा)
भक्तावासं स्मरेन्नित्यं, (७वेळा)आयुःकामार्थसिद्धये॥(७वेळा)

प्रथमं वक्रतुण्डं च,(७वेळा) एकदन्तं द्वितीयकम् ।(७वेळा)

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं,(७वेळा)गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ (७वेळा).....
असेच प्रत्येक चरण म्हणत स्तोत्राच्या शेवटापर्यंत जायचे असते..मग येथे चरणाची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की चरणाची मुख्य संथा पूर्ण होते.

अर्धनिची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् ।(७वेळा)
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥(७वेळा) ॥

प्रथमं वक्रतुण्डं च, एकदन्तं द्वितीयकम् ।(७वेळा)

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ (७वेळा).....
अशीच प्रत्येक अर्धनि/अर्धी ओळ म्हणत स्तोत्राच्या शेवटापर्यंत जायचे असते..मग येथे अर्धनिची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की अर्धनिची मुख्य संथा पूर्ण होते.

ऋचेची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥..प्रथमं वक्रतुण्डं च(७वेळा)

प्रथमं वक्रतुण्डं च, एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ लम्बोदरं पञ्चमं च(७वेळा).....
अशीच प्रत्येक ऋचा ,पुढल्या ऋचेचा पहिला चरण तिच्यात लावुन म्हणत स्तोत्र एकेक ऋचेनी म्हणत पूर्ण घोकायचे असते..मग येथे ऋचेची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की ऋचेची मुख्य संथा पूर्ण होते.

गुंडिकेची म्हणायची संथा:-
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥ (सुरवात ते शेवट -७वेळा..)
.....असेच सुरवात ते शेवट -७वेळा.. म्हटले,की मग येथे गुंडिकेची एक संथा पूर्ण होते.अश्याच प्रकारे अजुन तिन संथा म्हटल्या,की गुंडिकेची मुख्य संथा पूर्ण होते.

आता आपल्याला आवश्यमेव असा एक प्रश्न पडेल,की "(बुद्धिचा..)इतका बारीक किस पाडून, ही पाठांतर पद्धती तयार होण्या/करण्यामागचे प्रयोजन काय बरे असावे???" Happy

उत्तरः- ज्या काळात ही पद्धती आली/विकसीत झाली.तो काळ लेखनकलेची सुरवातहि न झालेला असा काळ होता. अश्या वेळी आपल्या जिवापाड जपाव्याश्या वाटणार्‍या गोष्टींपैकी, ही मंत्र /काव्य/स्तोत्र जतनाची एक गोष्ट होती. आणि याशिवायंही ,पुढे लेखनकला विकसीत झाल्यावर..जो विषय वारंवार म्हणावा,वापरावा लागणार आहे..त्यासाठी भल्यामोठ्ठ्या पोथ्यांची बाडे बरोबर घेऊन हिंडणे.हे ऋषीमुनिंपासून ते सामन्यजनांपर्यंत सर्वांनाच त्याकाळी सोपे नव्हते. त्याशिवाय पोथ्या पाण्यानि/आगिमुळे,वाळवी/कसर लागण्यापुळे खराब होणे अशिही कारणे होतिच. आणखि म्हणजे, परस्पर विरोधीमतांच्या गटांनी एकमेकाचे लिखित स्वरुपातिल वांङगमय नष्ट करणे,हे ही एक प्रबळ कारण त्याकाळी होतेच...या अश्या सर्व कारणांसाठी हे ज्ञान मुखोद्गत-पाठ ठेवावे लागले असेल.(आमच्याकडला अचुक शब्द म्हणजे-जिवंत ठेवावे लागले असेल.) आणि विशेषतः जर ते जसे च्या तसे पाठ ठेवावे लागले असेल,तर त्याला अशीच तंतोतंत शब्दपाठांतराची पद्धती असायला हवी होती. आणि म्हणुन तसे जर का एकदा पाठ झाले,आणि त्याच्या वारंवार आवृत्या* म्हणुन पाठ ठेवलेही गेले, तर वरिल कारणांनी येणारे नष्टतेचे भय बाळगावे लागत नाही, हे तर निश्चित आहे. (आज आपण हे आपल्याला हव्या त्या सर्व विषयांसाठि, हजारो प्रकारच्या रेकॉर्डिंगच्या साधनांनि करतच असतो. Happy )

आता जसेच्या तसे...म्हणजे काय हो नक्की? तर खाली दिलेले हे गणपतिस्तोत्र पहात पहात ह्या लिंकवर http://mfi.re/listen/zxd8acxaxqxwc2i/ganapatistotra_myself.mp3 जाऊन हे क्लिपिंग ऐका. जेणेकरुन ह्या पद्धतिनी पाठ केले असता,जसेच्या तसे मेंदुत उमटते..म्हणजे काय होते? ते कळणे सहज होइल Happy
(गायकबियक कुणी नाही.. मीच आमच्या(उच्चार)पद्धतिनी म्हटलेलं आहे हां! Wink )
http://mfi.re/listen/zxd8acxaxqxwc2i/ganapatistotra_myself.mp3
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥

.........................................................................................................................

आवृत्ति*:- हा वेदाध्ययनातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. एकदा पाठ झालेला विषय/अध्याय..किमान २ वर्ष तरी दररोज १ आवृत्ती म्हणून जिवंत-ठेवावा लागतो. नाहितर आमच्याकडल्या प्रसिद्ध म्हणी प्रमाणे..तो नवव्या दिवशी नवा-होतो. म्हणजे अक्षरशः पुन्हा संथा-घेऊन शिकण्याच्या पातळीवर येतो. आणि असंही हे सोपं काम नसतच. नुसती ऋग्वेदाची संहिता घेतली..तरी त्यात आठ अष्टके..म्हणजे ६४ अध्याय आहेत. अध्ययन सुरु झाल्यापासून जसजसे पाठांतर वाढत जाइल..तसतसा हा आवृतीचा काळ वाढत जातो. आणि दर दोन वर्षानी समांतर होत रहातो. मग पुढे ब्राम्हण/आरण्यक्/उपनिषदे/शिक्षाचतुष्टय/ज्योतिष(फलज्योतिषवालं नव्हे!)/शास्त्र/निरुक्त असे अनेक ग्रंथोपग्रंथ पचवत, जिवंत ठेवत, अध्ययन करावे लागते..एका वेदाच्या दशग्रंथांच्या अध्ययनाला पहिल्या वर्षाला ६ तास.. इथून सुरवात होऊन..शेवटच्या वर्षाला हा शिक्षण कालावधी १६ ते १८ तासांपर्यंत जाऊन बसतो. म्हणूनच ऋग्वेदाचे दशग्रंथ पूर्ण कंठस्थ (पाठ) होण्याचा कालावधी किमान १२ वर्षे आहे.

पाठांतरातील अग्निदिव्य :- संचार जाणे .. संचार.., हा पाठांतराच्या वाटेतला अटळ सहप्रवासी आहे. आता संचार म्हणजे काय? तर एकसमान किंवा तोच तोच.. शब्द वा मंत्र ,संपूर्ण अध्ययनाच्या विषयांमधे कुठेही वारंवार येणे.. यामुळे काय होते? तर ..एका महारस्त्यावर जवळ जवळ सारखी नावं असलेले दोन फाटे असतील..तर नामसाधर्म्याच्या गोंधळामुळे, माणूस जसा या ऐवजी त्या गावात पोहोचावा. तसे काहिसे, हे सारखे-मंत्र अथवा शब्द करीत असतात. ऋग्वेदाच्या नुसत्या संहितेमधे असे हजारो संचार आहेत. नुसतं त्याच संहितेमधून वेगवेगळे पाच अध्याय व दोन सूक्त एकत्र करून निर्मिलेलं जे पंचसूक्त पवमान आहे..त्यात सुमारे आडिचशे संचार आहेत. बरं.., हे संचार म्हणजे फक्त (समान)शब्द आणि संपूर्ण अथवा अर्ध्या (समान)मंत्राचेच आहेत काय? आणि नुसते तेव्हढेच आहेत काय? तर..तसे नाही. काहि ठिकाणी तर, फक्त या अध्यायात या ओळीत विशिष्ट शब्दावर मात्रा आहे ..आणि एकदम पुढच्या कुठल्या तरी अध्यायात तोच मंत्र पण त्याच ओळिवर विशिष्ट शब्दावर (आता) मात्रा नाही, एव्हढाच फरक आहे. म्हणजे ही पवमानातली गंमत बघा. एके ठिकाणी "शुंभमा ऋतायुभि:" असे आहे,तर दुसरीकडे , "शुंभमानो ऋतायुभि:" असे आहे. परत दोन्ही कडच्या पुढच्या ओळी निसंशय वेगळ्याच असतात. आणि मग जर का हे लक्षात राहिले नाही..तर या अध्यायातून त्या अध्यायात उडी पडते. याच घडणार्‍या प्रकाराला म्हणतात, संचार-जाणे! उदाहरणा दाखल आपण आजुन एक दोन संचार पाहू .. सुदुघाहि-पयस्वती: आणि सुदुघाहि-घृतःश्चुतः.. हा शब्दाचा संचार झाला.हा ही सहज लक्षात रहातो. पण अनुस्वारांचे संचार म्हणजे,मेंदूची शस्त्रक्रीया करतांना जितकं बारीक..आणि नजर न हलता लक्ष ठेवावं लागेल..तसला भयंकर प्रकार. तो असा - पतामांतरिक्षा आणि पवंतामांतरिक्षा - या शब्दातल्या दुसर्‍या अक्षरावर ,म्हणजे व - वर ..प्रथम अनुस्वार नाही आणि नंतर पुढे, तोच अनु-स्वार-झालेला आहे!!! इतका सूक्ष्म फरक लक्षात राहाणे मुश्किल..आणि मग इकडून तिकडच्या आध्यायात उडि पडणे निश्चित! (यातलं पंचसूक्त पवमान..हे पाठ-ठेवायला अत्यंत कर्मकठिण आहे. मला स्वतःला हे पाठ झाल्यापासून सलग तिन महिने याची आवृती ठेवल्यानंतरही..पुढे पुन्हा सलग २ महिने पाठ म्हणताना, रोज २ अथवा ३ संचार-जायचेच! आणि ते ही रोज वेगवेगळे! आज ह्या गल्लीत चुकलो,की उद्या त्या गल्लीत! रामा..शिवा..आणि गोविंदा..बाकि काही नाही! )

आता आपल्या सुप्रसिद्ध रुद्रातला हा शब्दसंचार..,प्रत्यक्षच कसा-जातो..?ते पहा...
(रुद्रामधे, आकरा नमका'चे आणि आकरा चमका'चे असे एकंदर २२अनुवाक आहेत.)

यातल्या नमकाच्या पहिल्या अनुवाकातल्या तिसर्‍या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनुरघोरा पापकाशिनी। आणि पुढची (वेगळी)ओळः- तयानस्तनुवा शंतमया गिरिशंता भिचाकशीहि॥

आता इथून सरळ नमकाच्या दहाव्या अनुवाकातली दुसर्‍या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनु:शिवाविश्वा हभेषजी। आणि पुढची (वेगळी)ओळ:- शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥

आता यात जर का रुद्र म्हणणारा माणूस पहिल्या अनुवाकात , यातेरुद्र शिवातनु च्या पुढे शिवाविश्वा हभेषजी असे चुकून म्हणून गेला..तर त्याची पाठांतर पद्धतीमुळे मेंदूत कोरली गेलेली पुढची ओळ ही दहाव्या अनुवाकातली ,म्हणजे शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥
.., हीच तोंडातून उमटणार. हा गेला संचार! आणि याच्याही अगदी उलट घडून दहाव्या अनुवाकातून पहिल्या अनुवाकात असा उलटंही तो येणार.म्हणजे - संचार जाणार!

आणि कित्तीही कुशाग्र बुद्धिमत्तेचा माणूस असला , तरी संपूर्ण एका वेदातले असे हजारो संचार लक्षात ठेवणं हे सामान्य बुद्धीमत्तेच्या बाहेरचचं काम.. मग हे काम सोप्प व्हावं म्हणून पुढे .. वेदांमधे पद/क्रम/जटा/माला/घन अशी सोय निर्माण करण्यात आली. याचा उचित वापर केला..कि हे संचारचं गाडं आडवं आलं, तरी त्याला नीट उभं करता येतं. (याविषयी पुन्हा केंव्हा तरी असच लिहिन! ) अर्थात, ज्या अध्ययनाचा आधार फक्त आणि फक्त पाठांतर हाच (राहिला)होता, त्या अतीप्राचीन (लेखनकलेची सुरवातही न झालेल्या) कालखंडात अश्या तर्‍हेच्या युक्त्या अथवा सोयी सुचणं, हे ही त्याच मानवी बुद्धीशी सुसंगतच म्हटलं पाहिजे. मग त्याचं समर्थन आजच्या आणि यापुढच्या काळात कोणत्याही पद्धतीनी अगर हेतूनी होवो.

आज हा पाठांतर पद्धतीचा छोटासा आढावा घेणारा लेख लिहुन झाला याचं समाधान एका कारणानी तर आहेच आहे.

१) वेदज्ञान.., हे त्या किंवा आजच्या अथवा पुढच्या काळात उपयोगी/अनुपयोगी .. उपकारक/अनुपकारक..असं कसंही असलं .तरी .. हे ज्ञान पूर्वी आणि आजही पाठ ठेवणारे जे वेदाध्यायी आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेची जाणिव..या लेखनामुळे करवून देता आली.(एरवी..हे नुसतं सांगून शक्य नाही,आणि नसलंही पाहिजे. Happy ) याशिवाय.., जे लोक:- "ह्हॅ!...हे शिकायला काय अक्कल अथवा बुद्धी लागते?" असे (कोणत्याही हेतूने) म्हणतात..त्यांना.. किमान हा लेख वाचल्यानंतर,पुन्हा असं म्हणताना,काहि क्षण थांबून विचार करावा लागेल...
धन्यवाद. Happy
===============================================
पराग दिवेकर..(हिंदू पुरोहित.)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टण्या,

>> उच्चवर्णीय वा ज्यांचे हाती संपत्ती साठली वा ज्ञान साठले ते त्यांच्या जनुकांमुळे/निसर्गदत्त गुणांमुळे होते व
>> ज्यांच्याकडे पक्षी शूद्रादी लोकांकडे असे गुण नसल्यामुळे ते अज्ञानी, रंक, कष्टकरी राहिले असे म्हणायचे आहे का?
>> थेटच म्हणा की.

माझ्या विधानातून हा अर्थ कसा निघतो?

भारतात इंग्रज येण्यापूर्वी भरपूर सुबत्ता होती. अगदी अज्ञानी रंक आणि कष्टकरी देखील खून पिऊन सुखी होता. जनतेला भिकेला लावायचे प्रकार इंग्रजी आमदानीत सुरू झाले. Poverty and un-British Rule या दादाभाई नवरोजींच्या पुस्तकात याची साद्यंत माहिती आहे (मी वाचले नाहीये).

दुसरं म्हणजे अमेरिकेतल्या ६० वैभवशाली कुळांमध्ये असे काय मोठे निसर्गदत्त गुण आहेत? जे उरलेल्या जनतेत नाहीत?

आ.न.,
-गा.पै.

लोकहो

गामा पैलवान चांगल्या धाग्याला विकृत आणि जातीं राजकारणाचे ग्रहण लावु इच्छित आहे. वेदधर्मांच्या आडुन त्यांची टणाटण टिनपाटी वृत्ती दाखवत आहे.त्यांनी जाती आणि इतर विवादास्पद गोष्टी आणल्या आहेतच त्याच बरोबर थोर व्यक्तींचा देखील त्यांच्या प्रतिक्रियेत समाविष्ट करुन त्यांना देखील गोवण्यात आले आहे. जेणेकरुन धागा भरकटुन ब्रिगेडी वगैरे तस्सम वळणावर गेल्यावर त्यांना सोईस्करपणे स्वतःचे श्रेष्ठ कसे याचा प्रचार व्यवस्थित करता येईल. श्री अतृप्त यांनी अतिशय सुंदर रित्या वेद श्लोक यांचे वर्णन आपल्याकरीता लिहिले आहे कृपया मायबोलीकरांनी फक्त त्यांचाच लाभ घ्यावा. आणि गामा नामक प्रकाराला दुर्लक्ष करण्यात यावे.

धन्यवाद

कळावे

लोभ असावा

आ न
केहत कबीर

अतृप्त, रामरक्षेतील संचाराच्या माहितीसाठी धन्यवाद! मला अजून एक प्रश्न लेख वाचताना पडला होता पण विचारू की नको असं वाटत होतं. तुम्ही इतक्या संयमाने उत्तरे देत आहात हे पाहून विचारावा असं वाटलं!
तुम्ही लिहिले आहे की हे सर्व वेदज्ञान पाठांतरापुरते मर्यादित आहे. वेदांचा संस्कृतमधला अर्थ शिकवला जात नाही. पण हे एवढे सगळे श्लोक नुसते पाठ करताना bore होत नाही का? स्वानुभव असा की अर्थ माहिती नसताना काहीही पाठ करणे फार अवघड होऊन बसते! म्हणजे लहानपणी ठीक आहे पण कळत्या वयात नुसते शब्द पाठ कसे करता येऊ शकतात? मी जेव्हा थोडा विचार केला तेव्हा वाटलं की कदाचित पूर्वी संस्कृत हीच बोलीभाषा असेल त्यामुळे वेद पाठ करताना त्याचा वेगळा अर्थ समजून घेण्याची गरज भासली नसेल. पण मग कालांतराने जेव्हा संस्कृत बोलीभाषा राहिली नाही तेव्हा ही निव्वळ पाठांतराची पद्धत कोणालाच कशी खटकली नाही? तुम्ही स्वतः ह्या पद्धतीने शिकला आहात. तुमचा स्वतःचचा अनुभव काय होता?
मला वेदांच्या उपयोगाबद्दल शंका नाही. माझ्यामते (correct me if I am wrong) वेद हे त्या वेळेच्या तत्त्वज्ञानाचा दस्तऐवज आहेत. जरी त्यातील काही तत्वे कालबाह्य झाली असली तरी आपले पूर्वज कसा विचार करत होते ह्या दृष्टीने वेदांचे महत्व आहेच! पण वेद मौखिक पद्धतीने जतन करण्यात काही खास उद्देश आहे का? कारण माणसाला लिहिण्याची साधनं उपलब्ध होऊन आता बराच काळ लोटला! पण तरीही ह्या परंपरेत फारसा बदल झालेला नाही.

रेशीमबागेत काल गांजापार्टी झाली
>>>
बाळू, संघाला तात्विक विरोध जरूर करा. मात्र खोटी बादरायण संबंध जोडून का? त्याने तुमच्याच विरोधाची विश्वासार्हता कमी होते. विचार करा.

इब्लिसांनी काळ्या तमोगुणी गोळ्या साइटची लिंक दिलीच आहे. त्याचाही लाभ घेऊ शकता मनःशांतीसाठी

खोट्या नोटा छापून खपवल्या म्हणून खऱ्या नोटांची किंमत कमी होत नसते.
हे वाक्य छान आहे.
मला माहित आहे की हे ज्यांनी लिहीले ते इथे फारसे लोकप्रिय नाहीत. पण व्यक्तीकडे न पहाता त्यांनी लिहीलेले वाचले नि त्यातून काही चांगले दिसले तर त्याची जरूर दखल घ्यावी.

थोडक्यात, एखादी गोष्ट समजली नाही तर तसे सांगण्याची लाज वाटते म्हणून ती गोष्ट वाईटच आहे, सांगणारा माणूसच वाईट असल्या खोट्या वावड्या उठवायच्या!

अर्थात इथले लोक फक्त वाईट काय हे बघून वैयक्तिक शिव्यागाळी करण्यात जास्त मग्न असतात.

अभ्यास, विचार, शांत डोके यांना आजकाल काही किंमत नाही!

इब्लिसांनी काळ्या तमोगुणी गोळ्या साइटची लिंक दिलीच आहे. त्याचाही लाभ घेऊ शकता मनःशांतीसाठी >> Lol

मी फक्त रेशीमबागेत गांजा पार्टी झाली होती एव्हढंच म्हटलंय. तुमचे गामा पैलवान बरेच दिवसांपासून गांजा, हातभट्टी वगैरे उल्लेख करताहेत याच्याकडे दुर्लक्ष झालेले दिसते. बरं संघाचं नाव घेतलंच आहे तर बलात्कार संदर्भातली आणि एरव्हीची मुक्ताफळे देऊ म्हणता काय ? मोदींना मत दिलं नाही तर पाकिस्तानात जावा. टंच विदेशी बाई आणि तिचा वेडसर मुलगा काय.....

गांजा पार्टी म्हणजे ते नंगे सांधू हातात चिलीम घेऊन जे काही करतात तो कल्पनाविलास असेल तर बदनामी होईल. सध्या तर साधू बिधू सरकार मधे,संसदेत जाऊन बसलेत आणि ते शब्द वापरत आहेत त्यांना असांसदीय म्हणून माबोवर देता येत नाहीय. हXXजादे काय, दस बच्चे पैदा करो काय अजून बरेच आहेत. पण ते खटकत नाहीत.

असं का बरं टण्या ?
की यांना मनःशांतीची गरजच नाही ? काय म्हणता ?

बाळासाहेब, बाळासाहेब...
अहो कुणाकुणाला म्हणून उत्तरं देणार तुम्ही ? आं
आप करे तो प्यार, हम करे तो बलात्कार हेच धोरण आहे हो सध्याचं. घ्या तक्क्या घ्या आणि

Sleeping and dreaming

मी फक्त रेशीमबागेत गांजा पार्टी झाली होती एव्हढंच म्हटलंय. तुमचे गामा पैलवान बरेच दिवसांपासून गांजा, हातभट्टी वगैरे उल्लेख करताहेत याच्याकडे दुर्लक्ष झालेले दिसते. बरं संघाचं नाव घेतलंच आहे तर बलात्कार संदर्भातली आणि एरव्हीची मुक्ताफळे देऊ म्हणता काय ? मोदींना मत दिलं नाही तर पाकिस्तानात जावा. टंच विदेशी बाई आणि तिचा वेडसर मुलगा काय.....

गांजा पार्टी म्हणजे ते नंगे सांधू हातात चिलीम घेऊन जे काही करतात तो कल्पनाविलास असेल तर बदनामी होईल. सध्या तर साधू बिधू सरकार मधे,संसदेत जाऊन बसलेत आणि ते शब्द वापरत आहेत त्यांना असांसदीय म्हणून माबोवर देता येत नाहीय. हXXजादे काय, दस बच्चे पैदा करो काय अजून बरेच आहेत. पण ते खटकत नाहीत.
>>>

मी तुम्हाला संघावर टीका करण्यापासून कुठे रोखतो आहे.
ती साध्वी व गिरिराज किशोर यांची मते व वक्तव्ये असांसदीय व निषेध करण्यालायक आहेतच. मी एव्हडेच म्हटले की जात-पात संदर्भात संघाचे मत ठळक / उघड असताना या धाग्यावर खोटा आरोप करून का क्रेडिबिलिटी घालवता?

असो. जसे संघातल्या लोकांना तेच एकमेव देशभक्त वाटतात तसे असंघीष्ठांना तेच एकमेव सेक्युलर/रॅशनल व थोडा जरी दुसरा विचार करणारे वा संघाच्या एका जरी गोष्टीला चांगले म्हणणारे थेट अस्पृष्य भगवे होतात. विरोध करताना आपण कुठे सीमा ओलांडायची हा ज्याचा त्याचा स्ट्रेटेजीनुसारचा प्रश्न आहे.

आणि गामा 'आमचे' नाहीत.

जात-पात संदर्भात संघाचे मत ठळक / उघड असताना या धाग्यावर खोटा आरोप करून का क्रेडिबिलिटी घालवता? >>> संदर्भ कळाला नाही. कोणते खोटे आरोप ?

जिज्ञासा

@पण हे एवढे सगळे श्लोक नुसते पाठ करताना bore होत नाही का? >>> अहो होणारच कंटाळवाणं. आणि होतंही. फक्त ते पाठशाळेत परस्परांच्या सहवासात आणि पाठांतराच्या अभ्यासाची स्पर्धा वगैरे विद्यार्थी-गुणांमुळे असह्यते पर्यंत जात नाही..इतकच. तसाही आपण आपल्याला कळणारा अभ्यासविषय शिकताना जितके कंटाळतो,त्यापेक्षा हे प्रमाण अधिक नाही. कोणते तरी काम करण्यास्तव स्विकारलेला तो शिक्षणक्रम..तो पूर्ण करणे हे ध्येय्य. बास ..एव्हढी गोष्ट त्या कंटाळ्याला सहन करायला पुरते. पण तुम्ही व्यक्तिगत हेतुनी-उपासनेसाठी यातले पाच दहा विषय पाठ करायला आमच्यात आलात्,तर मात्र खरच कंटाळाल.

@स्वानुभव असा की अर्थ माहिती नसताना काहीही पाठ करणे फार अवघड होऊन बसते! म्हणजे लहानपणी ठीक आहे पण कळत्या वयात नुसते शब्द पाठ कसे करता येऊ शकतात? मी जेव्हा थोडा विचार केला तेव्हा वाटलं की कदाचित पूर्वी संस्कृत हीच बोलीभाषा असेल त्यामुळे वेद पाठ करताना त्याचा वेगळा अर्थ समजून घेण्याची गरज भासली नसेल. >> अगदी बरोबर.

@पण मग कालांतराने जेव्हा संस्कृत बोलीभाषा राहिली नाही तेव्हा ही निव्वळ पाठांतराची पद्धत कोणालाच कशी खटकली नाही? तुम्ही स्वतः ह्या पद्धतीने शिकला आहात. तुमचा स्वतःचचा अनुभव काय होता?>>> खटकुन करणार काय? आपण लोक धर्मप्रांतात उपयुक्ततावाद मानतो कुठे? आजंही पोथी घेऊन रुद्र म्हणणारा,हा तोंडपाठ रुद्र म्हणणार्‍या पेक्षा,(यजमानाला)- कमी पुण्यदायक्, धार्मिक दृष्ट्या -कमअस्सल,आणि व्यावसायिक दृष्ट्या -द्वितीयश्रेणी समजला जातो . ज्याला तोंडपाठ असेल,तो सर्वाधिक योग्य पुरोहित. हीच काय ती माणसाला पुरोहित पद बहाल करण्यातली उच्च कसोटी. आणि (बरेचसे)यजमान लोकं,आजंही ह्याच गोष्टी मानतात.किंवा या व्यतिरिक्त दुसर्‍या मानत नाहीत. तेंव्हा, उपयुक्ततावाद हा घटकच जिथे धर्मप्रांतात समाजविन्मुख ..तिथे ह्या असल्या सुयोग्य खटकाखटकीला दुर्लक्षिलं गेलं,तर त्यात नवल काय?

@मला वेदांच्या उपयोगाबद्दल शंका नाही. माझ्यामते (correct me if I am wrong) वेद हे त्या वेळेच्या तत्त्वज्ञानाचा दस्तऐवज आहेत. जरी त्यातील काही तत्वे कालबाह्य झाली असली तरी आपले पूर्वज कसा विचार करत होते ह्या दृष्टीने वेदांचे महत्व आहेच! >> अतिशय बरोबर मिमांसा आहे.

@पण वेद मौखिक पद्धतीने जतन करण्यात काही खास उद्देश आहे का? कारण माणसाला लिहिण्याची साधनं उपलब्ध होऊन आता बराच काळ लोटला! पण तरीही ह्या परंपरेत फारसा बदल झालेला नाही.>>> आता तर ह्या पाठांतराची गरजंही उरलेली नाही. पण धार्मिकक्षेत्रात हे पटवून सांगायला गेलं,तर खरोखर अपमानित व्हायची वेळ येइल तुमच्यावर..इतकं या पाठांतराला आमच्यात धार्मिक-महत्व आहे. काड्यापेटी ऐवजी लायटरनी निरांजन पेटंवलेलं जसं चालत-नाही ना!, तसच आहे आपल्यातल्या बहुसंख्य धार्मिक प्रजेचं. काड्यापेटीनी निरांजन लावताना हाताची बोटं भाजतात..ते न होता,लायटरमुळे ज्योत सहजंतेनं तेवते.. हा उपयुक्ततावाद आपण गॅस पेटवताना ऐहिक जीवनात जसा सहजतेनं स्विकारतो,तसा तो देवाचं-निरांजन लावण्याच्या धार्मिक घटनेत स्विकारायचा नसतो. तिथे काड्यापेटी धार्मिक आणि लायटर पाखंड मानलं,की मगच तुम्ही खरे संस्कृतीवाले! धर्मरक्षक!!!

.इतकं या पाठांतराला आमच्यात धार्मिक-महत्व आहे. काड्यापेटी ऐवजी लायटरनी निरांजन पेटंवलेलं जसं चालत-नाही ना!, तसच आहे आपल्यातल्या बहुसंख्य धार्मिक प्रजेचं. काड्यापेटीनी निरांजन लावताना हाताची बोटं भाजतात..ते न होता,लायटरमुळे ज्योत सहजंतेनं तेवते.. हा उपयुक्ततावाद आपण गॅस पेटवताना ऐहिक जीवनात जसा सहजतेनं स्विकारतो,तसा तो देवाचं-निरांजन लावण्याच्या धार्मिक घटनेत स्विकारायचा नसतो. तिथे काड्यापेटी धार्मिक आणि लायटर पाखंड मानलं,की मगच तुम्ही खरे संस्कृतीवाले! धर्मरक्षक!!!>> अचूक लिहिलंय. उत्तम परखड आणि मुद्देसूद पोस्ट.

अतृप्त, भारी लिहिता तुम्ही. एकदम परखड.
अजून एक प्रश्न आहे. मला भटजींकडून पुजा करुन घ्यायला नको वाटतं कारण: तुमच्या पतिला नमस्कार करा, त्याच्या आईवडिलांसाठी अमुक प्रार्थना करा, त्यांचा वंश वाढावा म्हणून तमुक मंत्र माझ्यासोबत म्हणा वगैरे पुरुषी अहंकाराच्या प्रथा. त्याऐवजी तुम्ही घरातल्या सगळ्या मोठ्यांसाठी प्रार्थना करा, तुम्हा दोघांचा वंश वाढावा अशी इच्छा असेल तर हा मंत्र म्हणा असे बदल करता येत नहीत का? शिवाय मला नाव विचारलं की माझं नाव-आडनाव सांगते आणि गोत्र विचारलं की माझं सांगते. ते ही चालत नाही. खरं म्हणजे कुणी समानतावादी गुरुजी भेटले तर मला पुजा करुन घ्यायला काही हरकत नाही. पण असे गुरुजी असतात का आणि असे बदल करता येत नाहीत का?

रॉहूचा नागपूर संदर्भ त्यांचेपाशी. तुम्ही खोट्या बातम्यांच्या बाबतीत मला अ‍ॅड्रेस केलेली पोस्ट कुठली ते अजून कळालेलं नाही.

ज्याप्रमाणे सनातन प्रभात, भाजप, विहिंप हे संघाचे नाहीत, गुजरात मधील नरसंहार ही प्रतिक्षीप्त क्रिया होती, बाबरी मशीद ही शिवसेनेच्या सदस्याने पाडली असे संघाचे पवित्रे असू शकतात त्या पुढे रेशीमबागेत गांजापार्ती झाली हे वाक्य संघावर आरोप करण्यासाठी केलंय असे म्हणता येत नाही.

त्यातून गामा पैलवानांना दिलेलं हे उत्तर आहे. त्यांनी जे काही आरंभलं आहे त्याकदे दुर्लक्ष करूनही आणि प्रशासनाला कळवूनही ते थांबले नसल्याने लिहीलंय तसं. यात तिस-या व्यक्तीने मधे पडणं अपेक्षित नसतं. पडलंच तर मग राधेसुता वगैरे स्टाईलचे प्रश्न उपस्थित होतात जे फारच बालीश वाटत असल्याने विचारावेसे वाटत नाहीत. असो.

ब्रह्मांड आठवले यांचा मी नास्तिक आहे असा माझा समज आहे किंवा गण्या डॉट यांचा एण्ड ऑफ इझम हे धागे आवर्जून वर काढले होते. त्यावर पुन्हा कुणीही काहीही न लिहील्याने ते मागे गेले. आता न लिहीणारे अशा धाग्यांवर येणार. एखादा ड्युआयडींच्या नावाने ठणाणा करणार, एखादा अशामुळेच चांगले धागे मागे जातात असा ठणाणा करणारी पोस्ट टाकून शांतपणे झोपी जाणार.

मग गामा ला उत्तरं देत बसलेलं काय वाईट हो ?

@अजून एक प्रश्न आहे. मला भटजींकडून पुजा करुन घ्यायला नको वाटतं कारण: तुमच्या पतिला नमस्कार करा, त्याच्या आईवडिलांसाठी अमुक प्रार्थना करा, त्यांचा वंश वाढावा म्हणून तमुक मंत्र माझ्यासोबत म्हणा वगैरे पुरुषी अहंकाराच्या प्रथा. त्याऐवजी तुम्ही घरातल्या सगळ्या मोठ्यांसाठी प्रार्थना करा, तुम्हा दोघांचा वंश वाढावा अशी इच्छा असेल तर हा मंत्र म्हणा असे बदल करता येत नहीत का?>>> अश्या कारणांची सक्ति करणाराच प्रत्येक पुरोहित आजच्या काळात असेल्,असे नाही. त्या ऐवजी आपल्याला हवा असलेला योग्य (सर्वांसाठीचा..) पर्याय त्याला कामाला-ठरविण्यापूर्वी ऐकवा. व तोच आचरावा लागेल्,अशी सरळ ताकिद द्या. आणि द्यायच्या दक्षिणेच्या मोबदल्यात आपल्याला हवा तो बदल,सर्व्हिस म्हणून पदरी पाडून घ्या. अगदी माझ्यासारख्या विचारापर्यंत पोहोचलेला पुरोहित नसला कोणि...,तरी मिळणार्‍या पैश्याला स्मरुन जो काम करणारा आहे, तो असल्या तात्पुरत्या बदलायला तयार होइलच.

@ शिवाय मला नाव विचारलं की माझं नाव-आडनाव सांगते आणि गोत्र विचारलं की माझं सांगते. ते ही चालत नाही. >>> हे असले आवश्यक बदल स्विकारणारे किंवा त्याला पुरस्करणारे आज तरी किमान एक टक्काच लोक आमच्यात आहेत. कारण??? :- धर्माची दा...........ट अंधःश्रद्धा आणि परंपरावाद्यांचं भय..सामाजिक आणि व्यावसायिकंही.

@खरं म्हणजे कुणी समानतावादी गुरुजी भेटले तर मला पुजा करुन घ्यायला काही हरकत नाही. पण असे गुरुजी असतात का आणि असे बदल करता येत नाहीत का?>>> कसे करता येऊ शकतात, ते वर सांगितलं आहेच. पण या खेरिज तुम्ही समतावादी धोरणांनी बदलवलेला धर्म आचरण करु इच्छिणार्‍यांनी, (आमच्या मागास धर्मपुरोहितांविषयी , कृपया मनात राग न बाळगता..विवेकानी..) प्रींट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचा वापर करुन ,सरळ (ग्राहकांप्रमाणेच) आपल्या इच्छा प्रदर्शित करायला लागा. त्यासाठी रास्त भाषेचा अवलंब करा. एकदा आमच्या पुरोहित मंडळींना जाग-यायला सुरवात झाली..तर हे चित्र बदलायला फार काळ जाणार नाही. आंम्ही पुरोहित मंडळीही तुमच्यासारखिच माणसे आहोत. काहि बरी, काहि वाइट. बर्‍यांना तुम्ही संधी द्या. नैतिक जाणिवांनी सुधारणारे तसे सुधारतील.पोटाच्या जाणिवेनी सुधारणारे हळू हळू-नव्याची सवय लगल्यानी बदलतील. वाइटांसाठी काळ..किंवा कायदा..हे उत्तर असेलच.

अतृप्त, तुमचा प्रतिसाद पटला आणि आवडला देखील! माझं एक आवडतं वाक्य आहे Richard Bach यांच्या a bridge across forever ह्या पुस्तकातलं - "My country when right to be kept right, when wrong to be put right!" ह्या वाक्यात देशाच्या जागी धर्म/व्यवसाय/राज्य काहीही घातलं तरी हे खूप महत्वाचं वाक्य आहे. शिवाय कालानुरूप ज्या गोष्टी बदलत नाहीत त्या लयाला जातात! तुम्ही ज्या पुरोगामी विचारांनी तुमचा व्यवसाय करत आहात ते कौतुकास्पद आहे! May your clan grow stronger!

अतृप्त, तुम्ही भारी लिहिता, सडेतोड आणि परखड.
आणि मूळ विषयसोडून आलेल्या भंपक वादविवादाला आणि चर्चेला, धागा hack करू न देण्याची हातोटी ही उत्तम.
लिहित रहा, वाचायला आवडेल.

धन्यवाद. तुमचा नंबर विपुत देऊन ठेवा. मी बरीच वर्षं तुमच्यासारख्या समानतावादी गुरुजींच्या शोधात होते.

परागशास्त्री दिवेकरांस बालके गामा पैलवानाचा आदरपूर्वक प्रणाम.

आपला इथला संदेश वाचला. काही टिपणी करेन म्हणतो.

१.
>> आता तर ह्या पाठांतराची गरजंही उरलेली नाही. पण धार्मिकक्षेत्रात हे पटवून सांगायला गेलं,तर खरोखर अपमानित
>> व्हायची वेळ येइल तुमच्यावर..इतकं या पाठांतराला आमच्यात धार्मिक-महत्व आहे.

हल्ली गणकयंत्रांमुळे (कॅल्क्युलेटर) तोंडी आकडेमोड करायची गरज भासत नाही. मग शालेय अभ्यासातून अंकगणित हद्दपार करावं का?

२.
>> काड्यापेटी ऐवजी लायटरनी निरांजन पेटंवलेलं जसं चालत-नाही ना!

देवाची उपकरणे सात्विक असावी लागतात. अर्थात, आपत्कालात लायटर चालून जावा. पण अन्यथा काड्यापेटी वापरायला हवी. बऱ्याच पुरोहितांना नियमामागील कारणं माहीत नसतात. पण म्हणून ते बाद करू नयेत असं माझं मत पडतं.

आ.न.,
-गा.पै.

नताशा,

>> मला भटजींकडून पुजा करुन घ्यायला नको वाटतं कारण: ...पुरुषी अहंकाराच्या प्रथा

मला माहितीये ते सांगतो. वैदिक परंपरेत जेव्हा लग्न होतं तेव्हा पतीचं अर्ध पुण्य पत्नीला मिळतं आणि पत्नीचं अर्ध पाप पतीला लागतं. याच्या बदल्यात पत्नीने पतीच्या आज्ञेत ( वा अर्ध्या वचनात) राहावं अशो अपेक्षा असते. तुम्ही ज्याला पुरुषी अहंकाराच्या प्रथा म्हणता त्यामागे हे कारण आहे. हे तुम्हाला पटलं पाहिजे अशी सक्ती नाही. तुम्ही अवैदिक प्रकारे विवाह करू शकता.

आदर्श परिस्थितीत भटजींनी हे तुम्हाला सगळं समजावून सांगायला पाहिजे. पण ते होत नाही. यामागे वेगळी कारणं आहेत.

आ.न.,
-गा.पै.

जिज्ञासा,

>> "My country when right to be kept right, when wrong to be put right!" ह्या वाक्यात देशाच्या जागी
>> धर्म/व्यवसाय/राज्य काहीही घातलं तरी हे खूप महत्वाचं वाक्य आहे.

एकदम चपखल उदाहरण दिलंत तुम्ही. या वाक्यात देशाच्या जागी भारताची राज्यघटना देखील शोभून दिसेल. म्हणूनच भारतीय राज्यघटनेत दुरुस्तीची सोय ठेवली आहे.

मात्र असं असलं तरी घटनेचा मूळ ढाचा बदलता येत नाही. अमुक एक घटनादुरुस्ती मूळ ढाच्याला धक्का लावणारी असेल तर सर्वोच्च न्यायालय आपणहून ती दुरुस्ती फेटाळू शकतं. मूळढाचाप्रणाली ( = basic structure doctrine) ही भारताच्या राज्यशास्त्रातला अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे.

याच धर्तीवर धर्माचीही मूळरचनाप्रणाली विकसित व्हायला हवी. कदाचित ती अगोदरपासून अस्तित्वात असेलही.

आ.न.,
-गा.पै.

इब्लिस,

तुम्ही दिलेला स्रोत बरोबर आहे. मात्र तो प्रामुख्याने आचरणाचा स्रोत आहे. विचारधारेचाही स्रोत आहे, नाही असं नाही, पण कमी प्रमाणावर.

आ.न.,
-गा.पै.

Pages