लुंजी

Submitted by टीना on 19 March, 2015 - 11:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ कैर्‍या ( छिलून छोट्या छोट्या फोडी केलेल्या ),
२ चमचे तेल,
जीर, मोहरी फोडणीसाठी ( सोताच्या मनाने हिंग टाकण्याचा शानपणा करु नये ),
चवीनुसार मीठ ,
पाव चमचा - हळद ,
पाव चमचा - तिखट ,
२ मध्यम आकाराचे गुळाचे खडे ( घरात अगदीच उपलब्ध नसन त जवळच्या किराणा दुकानातुन गुळ घेऊन यावा.. यासाटी घरातल्याच एखाद्या लहान मेंबरवर डोळे काढले तरी काम होऊन जातं ),
पाणी ( प्याचचं घ्यावं.. घरच्यांनी वेळोवेळी दटावल्याचा राग स्वयंपाकावर काढू नये.. आई म्हणते ).

क्रमवार पाककृती: 

१. घरात सर्व सामान / जिन्नस ( धागीय शब्दात ) हायेत की नै पाहून घ्यावं . नसनं त आणून घ्यावं .

२. छोटी कढई किंवा जरमन च एखादं भांड गॅसवर ठेवावं. खालून गॅस सुरु करायला विसरु नये नै त कैच शिजत नै (स्वानुभव).

३. त्यात सांगितलं तेवढ तेल घालाव.

४. गरम झाल्यावर (भांड आणि तेल दोनीबी .. हात लावून पाहू नये.. हवं त सरावलेल्या (स्वयंपाकाला) व्यक्तीला हाताशी (शब्दशः अर्थ घेऊ नये ) घ्याव. ) त्यात मोहरी , जीर्‍याची फोडणी घालावी.

५. तडतडल्यावर त्यात कैरीच्या फोडी (घुईटी असल्यास त्या सकट) टाकाव्या .

६. व्यवस्थित हलवून घेतल्यावर (कैरीच्या फोडी.. इथ कुठलेही अंगइक्षेप करू नये. गैरसमज होतो.. इतरांचा..) त्यात तिखट, मीठ, हळद आणि गुळाचे खडे टाकावे .. त्यानंतर त्यात अर्धी वाटी पियाचं पाणी टाकून झाकण ठेवून ५ ते ७ मिंट शिजू द्यावं..

शिजल्यावरचं खावं ..
ते हे असं दिसतं :

lunji.jpg

वाढणी/प्रमाण: 
डिपेन्ड .. माणसावाणी खाल्ल त ३ ते ४ जणं.. अगोर्‍यावाणी खाल्लं त सकाळ, दुपार, संध्याकाळ यकट्याले पुरते.
अधिक टिपा: 

राजस्थानी प्रकार हाये. संपादन करताना प्रादेशिक च्या ऑप्शन मंदी राजस्थान दिसलं नै म्हणून मारवाडी अस टाकलं.. राजस्थान मदि लय मारवाडी लोकं राह्यते हा आपला समज (गैरसमज) .. संबाळून घ्या.

माहितीचा स्रोत: 
माजी मावशी
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगोर्‍यावाणी मी कैरीचं पण खाते, ..दो कैरीसे मेरा क्या होगा
फोटो, पाकृ, अन्‌ विदर्भीय राजस्तानी रेस्पी भन्नाट

दाद , रश्मी.. लुंगी.. आरारारा 00020468.gif

धनुकली >> इलुशीक कायले चांग्गली डब्बाभर पाठवतु न..: Wink

नंदिनी >> माझ्या आवारातलं झाड म्हणजे बदामी कि बैंगनपल्ली आहे.. चपटी घुई असते त्याची .. खुप्प मोठ्ठा आणि भरपुर गोड आणि गर असणारा आहे.. अश्याची लुंजी खाण्यात मज्जा येत नै.. आंबटगोड असली तरच मज्जा येते.. पण रसासाठी तो आंबा क्लास लागतो.. त्याचा निव्वळ गर काढून मिक्सर मधून काढला तर तो जेली सारखा घट्ट होतो आणि टेस्ट.. आह.. Wink .. पण तुझ्याकडल्यासारख माझ्याकडल झाड सुद्धा मोहोरातच अडकलयं . अगदी छोटे छोटे लागलेत .. आता मधे आलेल्या अवकाळी पावसाने सगळा नासोडा केलाय .. बघु काय अन किती लागतात ते..

मंजूताई >> तुम्ही टेकू दिला आणि पाकॄ टाकली Proud

डीविनिता >> मी तर रोज करते .. आजकाल प्रायॉरिटी सेट नै करता येताय म्हणून मग दळण दळायच Wink .. लुंजी , पन्ह आणि आता त्यात सखुबत्ता पन अॅ ड झालाय Lol

हिम्सकूल >> Lol

बी >> माझ्या आप्पांकडे (यवतमाळला घरी) हनुमान जयंती ला असते अजुनही.. सोबत कैरीची कढी , आलु वांग्याची भाजी , पानगे आणि भात वरण.. अजुन तोंडाला पाणी सुटलं ..

सखुबत्ता केलाय दोन दिवसांपूर्वी ताजा ताजा.. फोटू पन चिटकवला तिथं .. याला लुंजी चा प्रकार नै म्हणता येणार न..एक तर शिजवत नै, दोन त्यात पाणी नै टाकत, तीन त्यात तीळकूट पन नै टाकत .. पण टेस्ट सॉल्लीड्ड आहे सखुबत्ता ची.. आणि लुंजी पेक्षा टिकतो पन जास्त ..

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार .

दिनेशदा >> थांकु Happy .. करवंदाची चटणी करत असते नेहमी .. लुंजी च्या रेसीपी प्रमाणे केली नै कदी.. ट्राय करेन..

मले कवा खाऊ घालतं लुंजी!
का डायरेक रसाळीलेच बलावनार! ! Wink
मस्त रेसीपी आमी याले नै सखुबत्त्याले सप्तकू म्हण्तो जी. Happy

टिने
भारीये गं रेस्पी!
( सोताच्या मनाने हिंग टाकण्याचा शानपणा करु नये )>>>>>>>>>>
हे बरं केलंस, सांगितलस ते.
फार अतीकांदाआलंलसणीचं न खाणारी मी.... अर्थातच हिंगावर जरा जास्तच हात आहे माझा.
फोडणी केली आणि मिसळण्याच्या डब्यात हिंग संपलायसं लक्षात आलं तर डिप्रेशन येतं बघ मला..............

सारीका >> डब्बा पाठवते ग तुझ्या घरी ..

दिनेशदा >> Lol

मानुषी >> तरी मला वाटलचं एखाद दोन लो़कं सापडतीलच इथ म्हणून.. तरी एकान लिवलचं खालून गॅस सुरु करायसाठी .. आता विचार करतेय की बदलून परत संपादीत करु का .. नै त शेगडीवर बसाचा कोणतरी.. आली न आफत मंग Proud

अकोल्यात पुर्वी लग्नामधे लुंजी हमखास असायची. आता माहिती नाही. हनुमान जयंतीला भंडारा असायची तिथेही लुंजी ठेवत.

प्रचंड आवडीचा प्रकार.

बी थूमी बी अकोल्याचे हात काय???
बापा बापा काय आठोन देल्ली राज्येहो!!! खास करुन भारत विद्यालय ग्राउंडावरच्या हनमान मंदराच्या भंडार्यात हा आइटम लै खात जाओ!!! लगन सराई आज बी खेळयागावाच्या ईकुन् असन अन गर्मीत असन थ हमखास राह्यते लुंजी!!!!

आम्ही आपलं कयरीचं गोडं लोणचं म्हणतो. होळीच्या वेळेस कईर्या येउ लागतात बाजारात. तेव्हा हमखास होतं त्या दिवशी. पुरणपोळीबरोबर तोंडी लावणं म्हणून.

कित्ती गोड लिवलंय टीना, लय भारी. Lol

मी कैरी उकडून त्याच्या गराचे सेम ह्याच पद्धतीने करते. पाणी नाही टाकत.

अन्जू .. तुझी पद्धत पन ट्राय केलीय मी.. टेस्ट छान लागते त्याची पन .. पण मला फोडी अक्ख्या लागतात आणि यात एवढ शिजवत पन नै ना.. Happy

काऊ >> ते आंबट गोड कसं लागणार मग .. लुंजी ची मजा त्याच्या आंबट गोड चवीतच आहे Happy

वा मस्तच. तुम्हाला फणस पोळी किंवा फणसाचे सुकवलेले वेफर्स इत्यादी फणसापासुन तयार होणारे पदार्थ कसे करायचे माहित आहेत का ? असल्यास कृपया रेसिपी द्याल का ?

kish24 धन्यवाद .. मी विदर्भातली .. इकड फणसाची फक्त भाजी खातात म्हणून फणसाच्या इतर पदार्थांबाबत मी अडाणी आहे.. तुम्ही इथे असणार्‍या कोकणी आणी पुणेरी लोकांना विचारुन बघा.. ते नक्की मदत करतील.. हव तर पाकॄ चे सभासद असाल तर इतर धाग्यात तुम्हाला हवा तो पदार्थ मिळून जाईल Happy

पिकल्या आंब्याचे करताना फोडणीत आमरस घालुन तिखट मीठ घालतात असे ऐकुन आहे.. मिसळपावावर वाचले होते. गूळ किती घालतात माहीत नाही.

काय मस्त लिहील आहेस गं Biggrin .जिन्नस वाचतानाच लकक्षात आल की सवॆ काही घरात आहेच.त्यामुळे लगेच करून बघणार.

बी >> माझ्या आप्पांकडे (यवतमाळला घरी) हनुमान जयंती ला असते अजुनही.. सोबत कैरीची कढी , आलु वांग्याची भाजी , पानगे आणि भात वरण.. अजुन तोंडाला पाणी सुटलं ..>>>> लागल्या हाती कैरीच्या कढीची पाककृती पण द्या.

टीना,

मस्त रेसिपी! करुन बघण्यात येईल. Happy
छिलून छोट्या छोट्या फोडी केलेल्या >> इथे सुरुवातीलाच तुला फुल्ल मार्कं. कित्ती दिवसांनी हा शब्द ऐकला. लहानपणी विदर्भ, नांदेड, हिमायतनगर भागात चक्कर झाली की हमखास ऐकायला मिळायचा Proud
जरमन च एखादं भांड >> भारी. लहानपणी होती, आताही आईकडे एखादं असेल Happy

Pages