विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sri Lanka scored 312 at Sydney against Aus in 46.2 overs;go India!(राजदीप सरदेसाई)>> तुझ्या तोंडात साखर!

जॉन्सनच्या रन्स भारी पडू नयेत राव.
रोहित न धवन क्लिक व्हायला हवेत.
काय ते देव पाण्यात बुडवून ठेवा, स्त्रोत्र म्हणा, लकी टिशर्ट्स घाला, मोक्याच्या सीट्स पकडा. पहिल्या बॉलपासून इनिंग इन्टरेस्टिंग होणार आहे. कोहल्याने कॅच सोडला, आता आज बॅटिंग नाही केली तर बघ.

क्वार्टर नंतरही मी म्हणाअलो होतो मोहित शर्माला बसवून भुवनेश्वरचा धोनीने विचार करावा.
दे टोटली रूईन्ड एफर्ट्स मेड अरलिअर.

३२८ सुरुवातीच्या अपेक्षेहून कमी असले तरी ३१० मधे रोखता आले असते राव , श्या !. बोलिंग च्या मर्यादा साफ दिसल्या आज Sad
शेवटपर्यन्त फिल्डिंग मधे गिव्हप नाही मारला ते आवडलं. तो एक मिस्ड कॅच सोडला तर. अता विकेट्स टिकवणे फार फार महत्त्वाचं. आता चांगलं टार्गेट दिल्यामुळे ऑसी बेकार आक्रमक होणार . फुल्ल ऑफेन्सिव मोडात !

ऑसी बेकार आक्रमक होणार . फुल्ल ऑफेन्सिव मोडात !>> ते असतातच. पण आपण बळं आरेला कारे करायला जाऊ नये, जे उत्तर द्यायचं ते बॅटीने द्यावं. कूल धोनीने मेजर सेशन घ्यायला हवं आहे आता भडकू रोहित, धवन आणि विराटचं.

शेवटच्या कॅच ड्रॉप मुळे १०-१२ रन्स वाढल्या, इतर ३१८ होत्याच तरीही , परतफेड करावी कोहलीने !

पहिल्या दहा ओवर फारच क्रुशिअल आहेत. शेवटच्या दोन ओवर्स हिटिंगचा जास्तं विचार न करता शांतपणे विकेट न गमावता खेळावं. धवनला जास्त स्ट्राईक देण्याचं रोहितचा प्लॅन असावा. ह्या विकेटवर नुसतं ऊभं राहिलं तरी पाच च्या सरासरीनं आरामात रन्स निघणार.
डोन्ट वॉन्ट टू सी विराट इन फर्स्ट ट्वेन्टी ओवर्स.

पण शेवटच्या दोन ओवर्स नी फारच मूड घालवला राव.

पण यादवची एक ओव्हर बाकी असताना मोहितला शेवटची देणे ह्यातील गणित कळले नाही. यादवने त्या आधीच्या दोन्ही ओव्हर्स मध्ये ७-८ धावा देऊन १ बळी मिळवला होता. तर तोच चॉईस असायला हवा होता.

डिज्जे +१. काहीही बडबड करत होता वॉर्न. इकडे इनिंग्स नंतर राऊंड अप असतो लक्षमण वगैरे बरोबर त्यात तो होस्ट पण म्हंटला की वॉर्न जे काही ४००-५०० रन म्हणत होता तसं काही झालं नाही.

आय अग्री स्वरुप. आय विल गिव इंडिया अ शॉट! Happy

४/०

Pages