विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
(फक्त क्वार्टर फायनल म्हणा)
(फक्त क्वार्टर फायनल म्हणा)
यू आर नो डिफरंट हायझेनबर्ग!
यू आर नो डिफरंट हायझेनबर्ग! >> हे अनुमान कसे काढले बुवा तुम्ही.
मी आजिबात पॅरानॉईड नसून अतिशय कॉन्फिडन्ट आहे टीमच्या परफॉर्मन्स बद्दल. कोहली गंडला म्हणण्यापेक्षा त्या एका बॉलला अनुभव खाती टाकून तो अजून शहाणा झाला असे मी बघतो.
धोनीने जडेजा आणि रोहित ला टीममध्ये ठेवले आहे तर ते एकतर डीझर्विंग तरी आहेत किंवा ह्या घडीला त्यांच्यापेक्षा चांगला चॉईस धोणीकडे नाहीये ह्यावरही मला विश्वास आहे. जोगिंदर शर्मा, ईशांत शर्मा, युवराज ह्यांच्यावर कठीणसमयी विश्वास टाकून त्याला चांगली पारख करता येते हे त्याने दाखवून दिले आहे.
प्रत्यक्ष स्किल्स कितपत लागू होतात ही बाब नगण्य ठरते. >>
नवीन मौका
नवीन मौका ad!
https://www.facebook.com/video.php?v=625719987572544&fref=nf
थॅन्कु बेफीकीर.. चुकुन सेमि
थॅन्कु बेफीकीर.. चुकुन सेमि फायनल लिहिले..
Quater Final Result
1) SA vs Sl - SA win
2) BAN VS IND - IND WIN
3) AUS VS PAK - AUS WIN
4) NZ VS WI - NZ WIN
SEMI FINAL RESULT
1ST SEMI : : - IND VS AUS : - IND WIN
2ND SEMI : : :- SA VS NZ - NZ WIN
FINAL RESULT
NZ VS IND
IND WON THE WORLD CUP 2015 2ND Continuously. . . . . .
मी माझ्या कडून निकाल जाहीर केला वरील निकालाचा सत्य घटनेशी काही सम्बंध नाही









वरील घटना सत्य ठरल्यास निव्वळ योगायोग समजावा
धोनीने जडेजा आणि रोहित ला
धोनीने जडेजा आणि रोहित ला टीममध्ये ठेवले आहे तर ते एकतर डीझर्विंग तरी आहेत किंवा ह्या घडीला त्यांच्यापेक्षा चांगला चॉईस धोणीकडे नाहीये ह्यावरही मला विश्वास आहे >> बरोबर ! मी क्रिकेटच्या बाफावर ह्याबद्दल धोनी कसा विचार करतो हे लिहिले होते. रसप ह्यांचे जडेजाबद्दलचे विधान टाळ्या घेण्यासाठी उत्तम आहे पण त्याच्या जागी कोण ? ह्याचे उत्तर (बरोबरच्या १५ मधील) अक्षर पटेल हे १००% ठामपणे नाहिये तोवर जडेजा हेच उत्तर असणार हे सरळ आहे. (उद्या पटेल ला घेतले नि मॅच हरले तर 'धोनीला अक्कल नाहि का ?' की अशा मह्त्वाच्या सामन्यांसाठी अननुभवी खेळाडूंना घेतो असे इथे कोणी तरी लिहिल(च) ).
तीच गोष्ट रोहित ची. त्याला बसवला तर रायुडू येणार. रायुडू हा भयंकर गुणी खेळाडू होता (ICL मधे जाण्यापूर्वी ) सध्या तो निव्वळ बॅकअप आहे. रोहित जर खेळला तर जे करू शकतो ते रायुडू नक्की करू शकत नाही (रायुडू जे काम चोखपणे बजावू शकतो ते करणारे कोहली, रहाणे, धवन असे तीन जण आहेत. There is no value addition with Rayudu). परत रायुडूला आत आणायचे तर राहाणेला ओपन करावे लागेल ज्याने नीट बस्तान बसलेली middle order disturb होईल. धोनीने स्पष्टपणे सांगितलेय कि "रोहित धावा काढत नसला तरी he is middling the ball very well so it is matter of time." ह्यातून रोहितकडून टीम च्या काप अपेक्षा आहेत हे स्पष्ट होतेय. तो क्लच प्लेयर आहे नि त्याच्याकडून त्या(च) अपेक्षा आहेत. बाकीचे सगळे बॅटस्मन नीट क्लिक होत असल्यामूळे रोहित ला carry करणे सहज परवडू शकतेय. (तसेही तो out of form आहे असे म्हणणे धाडसी आहे.)
Bottomline, तीन विश्वचषक (multi-national tournaments) जिंकलेल्या कप्तानाला थोडेफार क्रिकेटमधले कळत असेल असा संशयाचा फायदा देऊन मॅचेस enjoy करा
अहो, कॉमन सेन्स आहे बेफि.
अहो, कॉमन सेन्स आहे बेफि. शर्मा किंवा जाडेजाबाबत कोणी शंका व्यक्त केली तर ते नॉर्मल आहे कारण त्यांनी सातत्याने चुका केलेल्या आहेत. कोहली ह्या आधीच्या मॅच मध्ये चांगला खेळलाय की, त्यामुळे तो गंडू शकतो हे विधान काहीच वॅल्यु नसलेलं आहे कारण हायझनबर्ग म्हणतोय तसं कोणीही गंडु शकतं. त्यात कोहलीचा तो शॉट खुप अॅडवेन्चरस होता असंही काही नव्हतं. इट वॉज जस्ट अॅन अनफॉर्च्युनेट शॉट टू प्ले.
असामी, क्रेक्ट! सध्याच्या घटकेला धोनी सगळ्यात विश्वासार्ह कॅप्टन आहे. त्याचं जजमेंट खुप भारी आहे बर्याच गोष्टींमध्ये. अगदी तो विकेट्स कीप करत असताना बोलत असतो त्यात सुद्धा त्याची हुशारी, अनुभव दिसून येतो. नेमकी मॅच आठवत नाही पण अश्विनला तो दोन वेळा, थोडा पीछे डाल म्हंटला आणि २र्या बॉलला अश्विननी बरोबर तसा टाकला आणि बॅट्समनचा मस्त सोप्पा कॅच गेला धवन की रैना कडे! He is just a smart cricketer!
असामी अतिषय उत्तम पोस्ट!
असामी अतिषय उत्तम पोस्ट! बरोबर धोनी सारखा समतोल विचार करून लिहिले आहे. लोक काय म्हणतात - इकडून पण बोलतात तिकडून पण बोलतात. त्या बाप-मुलगा आणि त्यांच्या गाढवाच्या गोष्टीसारखं.
कोहली ह्या आधीच्या मॅच मध्ये
कोहली ह्या आधीच्या मॅच मध्ये चांगला खेळलाय की, त्यामुळे तो गंडू शकतो हे विधान काहीच वॅल्यु नसलेलं आहे कारण हायझनबर्ग म्हणतोय तसं कोणीही गंडु शकतं. त्यात कोहलीचा तो शॉट खुप अॅडवेन्चरस होता असंही काही नव्हतं. इट वॉज जस्ट अॅन अनफॉर्च्युनेट शॉट टू प्ले. >> +1. कोहली स्टंपवर बॉल चॉप करून आधी बाद झालेला चटकन आठवत नाही, बरेचदा बॉल अपेक्षेपेक्षा खूप खाली राहिल्यामूळे किंवा अधिक वेगात आल्यामूळे खेळाडू असे बाद होतात. horizontal bat ने off stump बाहेरच्या corridor मधले शॉट्स खेळणे हे बॅट्समन च्या confidence चे indicator आहे. कोहली नक्कीच मस्त state of mind मधे आहे हे दिसतेय त्यामूळे don't read too much into that shot.
भारताने कप ऊचलल्यास १०० %
भारताने कप ऊचलल्यास १०० % विनिंग परफॉर्मन्स देणारी पहिली टीम होईल का ही?
ह्या आधी कोणी ग्रूप स्टेज मधल्या सगळ्या मॅचेस जिंकून कप घेतला आहे का?
ऑस्ट्रेलिया नी केले आहे ना
ऑस्ट्रेलिया नी केले आहे ना ते!
ऑस्ट्रेलिया नी केले आहे ना
ऑस्ट्रेलिया नी केले आहे ना ते! >> +१. २००७ मधे. बहुधा २००४ पण केलय. २००४ चे नीट आठवत नाही त्यात काही मॅचेस सोडून दिल्या होत्या झिंबाव्वेमधल्या त्यांनी.
१९९६ श्रीलंका
१९९६ श्रीलंका
आजची मॅच जिंकायला आपल्याला
आजची मॅच जिंकायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही पण ऑसीजबरोबर जिंकणं कठीण वाटतय
माझ्या मते
सेमीफायनल
भारत वि. ऑस्ट्रेलिया - विजेता ऑस्ट्रेलिया. भारताची बॉलिंग त्यांना या मॅचमध्ये त्रासदायक ठरणार आहे
आफ्रिका वि. न्यूझीलंड - विजेता आफ्रिका. न्यूझीलंडची बॅटिंग मकलम सोडता कमकुवत वाटते आहे.
फायनल
ऑस्ट्रेलिया वि आफ्रिका ---> विजेता ऑस्ट्रेलिया
त्रिशंकु, आत्ता बोल्लात परत
त्रिशंकु, आत्ता बोल्लात परत बोलू नका! वर्ना अंजाम अच्छा नही होगा!

जोक्स अपार्ट, ऑस्ट्रेलिया आणि किविजना एक होम ग्राऊंड सोडलं तर आपल्यापेक्षा फार वेगळ्या टीम वाटत नाहीत मला. दे ऑल हॅव देअर शेअर ऑफ पोटेन्शियल प्रॉबलेम्स.
आठवले २००७ आणि २००४ सुद्धा.
आठवले २००७ आणि २००४ सुद्धा.
न्यूझीलंडची बॅटिंग मकलम सोडता कमकुवत वाटते आहे. >> हो त्यांची बॅटींग अनटेस्टेड आहे असे मला पण वाटते. प्रेशर खाली ती वाईट कोसळू शकते. मॅक्युलम, टेलर, अँडरसन बेभरवश्याचे आहेत. गप्टील, विल्यम्सन आणि ईलियट थोडे शांत डोक्याने खेळतात पण चांगल्या बोलिंग विरुद्ध मोठी धावसंख्या ऊभी करण्यासाठी त्यांचा अजून म्हणावा तेवढा कस लागलेला नाही.
ऑस्ट्र्लियाविरूद्ध क्लार्क आणि स्मिथ कडे आपल्या विजयाची चावी असेल. भारता विरुद्ध स्मिथ त्याच्या अंगात एजाज अहमद संचारल्या सारखा खेळतो. त्यांची विकेट जेवढ्या लवकर काढता येईल तेवढी आपली विजयाची शक्यता एक्स्पोनेंशिअली वाढू शकते, पण हे बोलणे सोपे करणे महा अवघड प्रकार आहे. स्टार्कला आपले लोक कसे तोंड देतात तेही बघणं ईट्रेस्टिंग असेल. आयपीएल मुळे वॉर्नर, मॅक्सवेल, वॉट्सन ओपन कार्ड्स आहेत, त्यांच्यासाठी धोणीकडे योजना असली पाहिजे.
पाकिस्तानने त्यांना टफ फाईट दिली तर त्यांच्या ताकदीचा चांगला अंदाज करता येईल. पाकिस्तान २३०-२४० पर्यंत मजल मारू शकेल असं वाटतंय.
असाम्या धोनीच्या जजमेन्ट
असाम्या
धोनीच्या जजमेन्ट बद्दल कोणालाच राग नाही आणि सरजीना पर्याय सध्या नाही हे सर्वानाच मान्य आहे.
पण हे सर्व सोडुन गेले पाच वर्षात फक्त CSK चे खेळाडु पुढे यावेत म्हणुन बाकी कोणत्याही पर्यायाना जास्त डेव्हलप होउ दिले नाही हे पण खरे आहे.
धोनीला बोलुन काय फायदा?
रोहित बद्दल तुझे मत एक्दम मान्य आहे. मीच मागे म्हणाले की एक सामना तो आपल्याला नक्की जिन्कुन
देइल.
भारताचा प्रॉब्लेम एका वाक्यात सान्गायचा तर आपल्याकडे खुप बॅटिन्ग ऑलराउन्डर आहेत पण बदललेल्या एक्
दिवसीय नियमा मुळे आपल्याला बॉलिन्ग ऑलराउन्डर्ची गरज आहे.
पाकिस्तानने त्यांना टफ फाईट
पाकिस्तानने त्यांना टफ फाईट दिली तर त्यांच्या ताकदीचा चांगला अंदाज करता येईल. पाकिस्तान २३०-२४० पर्यंत मजल मारू शकेल असं वाटतंय.>>>>> भारी प्वाईट! आपल्या पबलिकनी अख्खी बसून नीट बघितली पाहिजे ही मॅच.
India vs NZ finale , India
India vs NZ finale , India winning , that's what I want to see
जोक्स अपार्ट, ऑस्ट्रेलिया आणि
जोक्स अपार्ट, ऑस्ट्रेलिया आणि किविजना एक होम ग्राऊंड सोडलं तर आपल्यापेक्षा फार वेगळ्या टीम वाटत नाहीत मला. >> बुवा माझ्या मते त्यांच्या टीम नक्कीच आपल्या टीमपेक्षा वेगळ्या आहेत, कारण
त्या दोघांकडे लेफ्ट आर्म सीमर्स आणि नवीन बॉल डेडली स्वींग करू शकणारे साऊथी सारखे राईट आर्म क्विक आहेत. बघा तुम्ही लेफ्ट आर्म आणि स्वींग ह्या नॉक आऊट स्टेज मध्ये हे फॅक्टर्स किती कमाल घडवतात ते. आणि ह्याच मुळे २३०-२५० करून सुद्धा पाकिस्तान ऑसीजन रियाझच्या जीवावर ट्फ फाईट देईल असे मला वाटते.
सिडनी अणि एमसीजी वर सिक्सची रिस्क ईतर ग्राऊंडस्पेक्षा कैन पटींनी जास्त आहे, तीन आणि चार वर जोर हवा.
India vs NZ finale , India
India vs NZ finale , India winning , that's what I want to see >> +१०००
मला पण ऑस्ट्रेलियाची सगळ्यात
मला पण ऑस्ट्रेलियाची सगळ्यात जास्त भिती आहे! समहाऊ न्यूझीलन्ड ला आपण हारवू असं वाटतं!!
दीपांजली | 18 March, 2015 -
दीपांजली | 18 March, 2015 - 13:31 नवीन
India vs NZ finale , India winning , that's what I want to see
>>
आय विश दॅट टु.
न्युझीलन्ड सध्या भयन्कर फॉर्म मध्ये आहे!
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=6SRQQ1jdBJw
ताजी मौका अॅड!!! एक गर्ल फॅन पण आली ह्यावेळी.
पण हे सर्व सोडुन गेले पाच
पण हे सर्व सोडुन गेले पाच वर्षात फक्त CSK चे खेळाडु पुढे यावेत म्हणुन बाकी कोणत्याही पर्यायाना जास्त डेव्हलप होउ दिले नाही हे पण खरे आहे. >> म्हणजे नक्की काय केले ? CSK सुरू झाले तेंव्हा धोनी नि रैना होते. जडेजा, मोहित नंतर त्यांनी विकत घेतले. अश्विनला CSK ने उचललेले domestic circle मधून. तो नि जडेजाला नक्की promote केले. रोहित, धवन, कोहली, रायुडू, शमी, भुवी, यादव, पटेल, बिन्नी हे सगळे CSK बाहेरून खेळतात. तेंव्हा "बाकी कोणत्याही पर्यायाना जास्त डेव्हलप होउ दिले नाही" जरा अती वाटते. CSK मधल्या खेळाडूंना झुकते माप दिले म्हणाल तर ते जास्त योग्य ठरेल. (पण परत धोनी कप्तान असल्यावर त्याने त्याला comfortable असा संघ गोळा केला असेही म्हणता येईल - भारत नि CSK दोन्ही कडे, नाही का ? )
बघा तुम्ही लेफ्ट आर्म आणि स्वींग ह्या नॉक आऊट स्टेज मध्ये हे फॅक्टर्स किती कमाल घडवतात ते. >> +१. फक्त स्टार्क नि जॉहह्न्सन रियाझ पेक्षा अधिक प्रभावी ठरतील असे वाटते.
त्रिशंकु, आत्ता बोल्लात परत
त्रिशंकु, आत्ता बोल्लात परत बोलू नका! वर्ना अंजाम अच्छा नही होगा!
हाहा
जोक्स अपार्ट, ऑस्ट्रेलिया आणि किविजना एक होम ग्राऊंड सोडलं तर आपल्यापेक्षा फार वेगळ्या टीम वाटत नाहीत मला. दे ऑल हॅव देअर शेअर ऑफ पोटेन्शियल प्रॉबलेम्स.
बुवा,
आपण जर ऑसीजना सेमिफायनल्ला हरवलं तर मात्र फायनल पण नक्की जिंकू आपण - आफ्रिका येवो किंवा किवीज - असं मला वाटतं.
किवीज त्यांच्या सर्व मॅचेस घरी खेळले आहेत पण फायनल मेल्बर्नला असल्याने देशी पब्लिक तिथे भरपूर असेल सपोर्ट्ला आणि त्याचा आपल्याला फायदा होइल.
अरे आपण आता पर्यंत दुसरी
अरे आपण आता पर्यंत दुसरी बॅटिंग असताना प्रत्येक टीमला बोल आउट केलय ना? त्यांच्याकडे लेफ्ट आर्म सीमर्स असले तरी आपला शमी पण सॉलिड लाईन लेंत टाकत आहे. यादव आणि मोहित शर्माला पण ह्याची लागण झालीच आहे, तेही सातत्याने तशीच बॉलिंग करु पाहत आहे. लेफ्ट आर्म की राईट आर्म हा फरक असला तरी आपलं पबलिक पण चांगलं स्विंग कर्तय आणि आपल्याला रिजल्ट्स पण मिळतायत.
आलं लक्षात त्रिशंकु, मलाही काय माहित काय पण ऑसीज आणि किविज दोघांची भिती वाटत नाही पण साऊथ अफ्रिकेची वाटत होती तर आपण त्यांना अप्रतिम खेळ करुन मोडित काढलं! त्यामुळे आयॅम सुपर्कॉन्फिडंट की आपण जिंकू.
बुवा आज टी व्ही वर ६ पॅक
बुवा
आज टी व्ही वर ६ पॅक दिसणार ना आम्हाला ?
आणि लुन्गी डान्स पण पाय्जे मॅच चालु असताना
इंडिया! इंडिया!!! आपणच
इंडिया! इंडिया!!!
आपणच जिंकणार!
हायझेनबर्ग व वैद्यबुवा..
हायझेनबर्ग व वैद्यबुवा.. माझ्या मते कोहली गंडु शकतो याचे स्पष्टीकरण द्यायची काहीच जरुरी नाही, त्याचे टॅलंट( व देहबोली) हे जर त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्द्रीवरुन जर कोणाला समजले नसेल तर ते तुमच्या स्पष्टीकरणाने समजेल असा तुमचा समज कसा झाला?
सॉरी बेफिकीर..पण कोहली गंडु शकतो याने तुम्ही घाबरलात याचेच मला आश्चर्य वाटले.
असामी.. तुझ्या १३:१४ (वेळ) च्या पोस्टीला जोरदार अनुमोदन! तुझे १००% बरोबर आहे.
निलिमा.. तुम्हाला जे वाटते ते वाटणे साहजीकच आहे. असामीने तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिलेच आहे, त्याला अजुन थोडी पुष्टी देउन मी असेही म्हणेन की त्याने ते खेळाडु टीममधे घेउन काय रिझल्ट्स आपल्या संघाला दिले आहेत ते बघा. ते रिझल्ट्स खुपच इंप्रेसिव्ह आहेत.(एकदिवसिय सामन्यांबद्दल म्हणतोय मी) आणी ते ३ जण सोडुन सुद्धा त्याने गेल्या २ वर्षात धवन्,रोहित शर्मा व रहाणेवर सुद्धा.. ते मधे मधे फेल जाउनसुद्धा.. खुप भरवसा ठेवुन... त्यांना लाँग रोप दिला आहे जेणेकरुन संघ चांगला एकजिव होइल. आपण जाउ दे.. पण संघातले सगळे एकमेकांवर विश्वास ठेवुन आहेत हे महत्वाचे.पण तुमचे हे मात्र खर आहे की सध्याच्या नियमांनुसार आपल्याला एक चांगला बोलिंग ऑलराउंडर पाहीजे.. पण आणायचा कुठुन? धोनीला ते माहीत आहे म्हणुनच गेली २-३ वर्षे त्याचे जडेजाला तसे बनवायचा प्रयत्न चालु आहे.
हायझेनबर्ग.. माझ्याही मनात संगाकाराच्या कारकिद्रीबद्दल नितांत आदर आहे. असे खेळाडु जेव्हा पडद्याआड जेव्हा जातात तेव्हा खरच खुप वाइट वाटते. कालची त्याची खेळी शेवटची असु शकेल हे माहीत असल्यामुळे त्याच्या कालच्या अनैसर्गिक खेळीनंतर मलाच कसेसे झाले
वैद्यबुवा.. एकदम बरोबर.. आपले राइट आर्म फास्ट बोलर्ससुद्धा मस्त लाइन आणी लेंग्थ टाकत आहेत आतापर्यंत तरी! हायझेनबर्ग.. साउथ आफ्रिकेकडे पण लेफ्ट आर्म सिमर्स नाहीत पण तरीही ते सेमिफायनल मधे आले आहेत! आणी समजा ऑस्ट्रेलिया व न्युझिलंड जर जिंकले तर त्यांचे होम फिल्ड अॅड्व्हांटेज हे त्याचे कारण असेल अस मला वाटत.
अरे असामी ची पोस्ट वाचलीच
अरे असामी ची पोस्ट वाचलीच नाही दुसरी. काहीतरी गैरसमज झाला आहे. मी लिहिलेले
_____________
पण हे सर्व सोडुन गेले पाच वर्षात फक्त CSK चे खेळाडु पुढे यावेत म्हणुन बाकी कोणत्याही पर्यायाना जास्त डेव्हलप होउ दिले नाही हे पण खरे आहे.
धोनीला बोलुन काय फायदा?
____________
म्हणजे यात धोनीचा काय दोष? तो पुर्वीच्या निवड समितीचा दोष.
निवड समितीने रोहित रहाणेला लॉन्ग रोप दिला हे मात्र मला बरोबर पटले नाही कारण त्यानी लॉन्ग रोप दिला पण जवळ जवळ गेल्या वर्षीपर्यन्त १ सिरीज घ्यायचे पुढ्च्या घ्यायचे नाही, परफॉर्मन्सचा तर संबध नाही.
एकदा ओपनिन्गला पाठवा, एकदा चौथा, एकदा तिसरा तर एकदा सहावा असे केले, मला तर २०१२ पर्यन्त शन्का यायची की रोहित आणि रहाणेला फेल करायला खेळवतायेत की काय?
२०१४ नन्तर मात्र परिस्थिती बदलली आणि या दोघाना खरा चान्स वा लॉन्ग रोप मिळाला असे मला तरी वाटते.
Pages