विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धोनी सुद्धा अश्विनला आणतो सुरवातीच्या ओवर मध्ये. सीमर्सना एकत नसतील बॅट्समन तर तो आणणारच अश्विनला.

श्रीलंका हरल्याच्या नादात संगाला विसरलात कारे मुलांनो. Happy

वॉटा प्लेअर मॅन, वॉटा प्लेअर !!! टेक अ बाऊ सर!!!

६३ शतके, १४४ अर्धशतके, २५के च्या वर रन्स, कसोटीत जवळपास ६०चा (सचिनपेक्षा जास्त आहे बरे Wink ) वनडेत ४०च्या वर अ‍ॅवरेज, जवळपास ६०० कॅचेस, अविश्वसनीय करियर.

आयसीच्या टेस्ट (१) आणि वन डे (२) रँकिंग मध्ये अव्वल , करियर च्या अत्युच्य शिखरावर असतांना निवृत्ती.. आजी ( आणि माजी सुद्धा :डोमा) खेळाडुंसाठी केवढा मोठा आदर्श ठेऊन जातो आहे हा माणूस.

महेला पण जाणार ना? त्याने घोषणा केली का?

------------

कुसल परेराने खेळलेली पहिली ओवरच लंकेचे थरथरते हात आणि लटपटते पाय दाखवून गेली.
परेरा वॉज अ बॅड बॅड चॉइस टू ओपन द ईनिंग.

मुळात ताहीर हा गोलंदाजच कमालीचा आक्रमक आहे.. याबाबत आश्विन वगैरेशी त्याची तुलनाच नको.. किंबहुना अभावानेच त्याच्यासारखा एटीट्यूड मला हल्लीच्या कुठल्या फिरकी गोलंदाजामध्ये आढळतो.. त्याला 5 ओव्हरमध्ये 50 मारले तरी 6 व्या ओवरला विकेट काढल्यावर त्याचा कट्टर जल्लोष बघा.. एखाद्याला चीड आणेल पण तो हेच दाखवतो की मी यासाठीच संघात आहे.. आणि कॅप्टनलाही तो आक्रमक बनायला भाग पाडतो..मला वापरायची तर आक्रमकपणेच.. अगदी 20-20 मध्येही तो हेच करतो..

लंकेला फाजिल आत्मविश्वास नडला. एक तर आफ्रिकेचे क्नॉकआउट स्टेज मधे रेकॉर्ड खराब होते. वर त्यात त्यांना पाठलाग करणे जमत नाही. अश्यात मॅथ्युने टॉस जिंकल्यावर डिव्हिलिअसचा चेहरा पडला होता. विकेट छान होती. त्यामुळे पहिली बॅटींग कोणीही घेणार होतेच. आत गेल्यावर मॅथ्युच्या मनात काय आले देव जाणे त्याने दिलशान बरोबर नेहमीचा थिरमने ऐवजी परेराला पाठवले. याचाच अर्थ की पहिली बॅटींग मिळाली आहे विकेट छान आहे. मारामारीला सुरुवात करुन मोठे टारगेट उभा करायचे. पण यासगळ्यात त्यांनी आफ्रिकेची बॉलिंग साफ दुर्लक्ष केले.
अ‍ॅबॉट आनि स्टेनला सुरुवातीलाच चांगला बाउंस आणि वेग मिळला. याचाच फायदा उचलुन त्यांनी स्वतःची लाईन परफेक्ट ठेवली. पण दुसरीकडे श्रीलंकेची मानसिकता निव्वळ हाणामारी करण्याची असल्याने विकेट्स जायला सुरुवात झाली. संघकाराने एक बाजु लावुन धरली त्याला वाटले की सुरुवातीचे १५-२० ओव्हर्स फास्टर चालल्यावर स्पिनर विरुध्द वेग वाढवु. परंतु ते काही त्याला जमले नाही उलत स्पिनर्सचे बॉल वळु लागले. आणि पार्टटाईम असणारा डुमिनी देखील जखडुन ठेउ लागला. जर थांबुन पार्टनशिप करायला सुरुवात केली असती तर किमान २००-२२५ स्कोर तरी आरामात झाले असते.

अभावानेच त्याच्यासारखा एटीट्यूड मला हल्लीच्या कुठल्या फिरकी गोलंदाजामध्ये आढळतो.. त्याला 5 ओव्हरमध्ये 50 मारले तरी 6 व्या ओवरला विकेट काढल्यावर त्याचा कट्टर जल्लोष बघा.. एखाद्याला चीड आणेल पण तो हेच दाखवतो की मी यासाठीच संघात आहे..>>>>>> नुसता मोठा जल्लोष केल्यानी काय होतं? हो आणि समोरच्याला चीड आली तर तो यडा आहे असं म्हणेन मी. अश्विन सुद्धा जाम हिमतीचा आणि मुख्य म्हणजे अनुभवी बॉलर आहे. एखाद्या चेंडूला सिक्स मारला तरी पुढच्या चेंडूला तो फ्लाईट द्यायला आजिबात घाबरत नाही कारण त्याला माहित आहे की त्यानी बॅट्समन फसतो. ताहिर चांगला स्पिनर आहे ह्यात काही वादच नाही आणि मी तुलना करण्यासाठी म्हणून अश्विनचं नाव नाही घेतलं. I was only saying Ashwin will do the same for India what Tahir does for SA.

पण कालची श्रिलन्केची बॅटींग थोडी हारगीरीचीच वाटली. आगोदरच हत्यारे टाकुन मैदानात आले होते. कुठ्लिहि जिगर सेमी जींकन्याची दिसत नव्हती.

परेरा वॉज अ बॅड बॅड चॉइस टू ओपन द ईनिंग.<<< +१

ऋन्मेष, ताहीरबद्दल तुमचा प्रतिसाद वाचला आणि पटला, पण तेवढ्यात खाली बुवांचा प्रतिसाद वाचला आणि तोही पटला. संस्कारक्षम मनोवस्था म्हणतात ती हीच असावी बहुधा Proud

पण वैद्यबुवा - देहबोली व माईंड गेम्समुळे समोरचे बिथरतात हे नाकारता येणार नाही असे वाटते Happy

बेफ़िकीर | 18 March, 2015 - 02:15

१. पाकिस्तान परत भेटायला नको
२. टॉस जिंकला तर प्रथम फलंदाजीच घ्यायला हवी, मैदान कोणतेही असो!
३. 'मी संघात का आहे' हे जडेजाने फक्त तीन वेळा सिद्ध करावे.
४. टॉस हरलो तर धोनीने जडेजाच्यानंतर फलंदाजीस यावे
५. श्रीलंका हरावी.
===============================================

पाचव्या अटीची पूर्तता झाली.

>>

बेफि ३ र्या अटीत रोहितने एकदा, जडेजाने एकदा आणि सर्वान्नी मिळुन एकदा सिद्ध करावे.
रोहित खेळला तर एक मॅच एकटा जिन्कुन देउ शकतो...
पण चान्सेस वाढलेले दिसतायेत.

खरे आहे निलिमा,

पण साखळी सामन्यात तुम्ही काहीही करणार नाही आणि तरीही कर्णधाराच्या पाठिंब्यामुळे बादफेरीत येणार ह्याला काही अर्थ नाही. रोहित शर्माने निदान (कमकुवत संघांविरुद्ध का होईना) दोन खेळ्या बर्‍या केल्या. जडेजानेही एक दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या असतील, पण त्या त्याने घेतल्या नसत्या तरी बहुधा आपण जिंकलो असतोच. जडेजाने स्वतःला सिद्ध करायला'च' हवे आहे अशी आता परिस्थिती आली आहे असे मला वाटते.

(नाहीतर अख्खा भारत युवराजला न निवडल्याबद्दल निषेध व्यक्त करेल) Proud

जडेजाने एकदा > अहो नुसते जाडेजाने २० रन्स जरी काढल्या अथवा २-३ विकेट्स जरी घेतल्या तर गंगेत घोडे न्हाहाले म्हणावे Rofl

कुशल परेरा मला overrated वाटतो. जयसुर्या सारखी बॅटिंग स्टाईल वगैरे कौतुक श्रीलंकेच्या मिडीया ने केलय त्याचं.

जडेजाने स्वतःला सिद्ध करायला'च' हवे आहे अशी आता परिस्थिती आली आहे असे मला वाटते.
>> +१००
रसपने मस्त लिहिलिय "जडेजाच्या सध्याच्या बोलिन्ग बद्दल काय सान्गाव त्याला स्वतः जडेजा पण फोडुन काढु शकेल."

>>>याला स्वतः जडेजा पण फोडुन काढु शकेल<<< Lol

लवकरच भारतियांना ह्या बाबीवर कदाचित विश्वास ठेवावा लागेल की संघ फक्त अकराच जणांचा असल्याने एखाद्याचे अपयशही खूप काही शिकवून जाते.

पण गट फीलिंग - जडेजा विल प्रूव्ह हिमसेल्फ!

(मी आधी म्हंटल्याप्रमाणे रोहित शर्मा आणि जडेजा ही बाद फेरीसाठी राखीव ठेवलेली प्यादी असावीत) Proud

पण वैद्यबुवा - देहबोली व माईंड गेम्समुळे समोरचे बिथरतात हे नाकारता येणार नाही असे वाटते >>>> बिथरतात किंवा बिथरु शकतात हे खरय पण देहबोली आणि गेम्स हे प्रॉडक्ट आहेत अंगी असलेल्या टॅलेंट, अनुभव आणि कॉन्फिडन्सचे. अश्विन थयथय नाचत १०० मिटर पळत जरी नाही गेला विकेट घेतल्यावर तरी त्याची फ्लाईट आणि स्पिन दोन्ही खुप परिणामकारक आहेत. मलाही पुर्वी वाटायचं की पाकिस्तान वाल्यांची देहबोली कसली असते! एकदम बघूनच आपण हारणार असं वाटायचं. आता आजकाल आपली देहबोली तशी असते.

खरे आहे. आपली देहबोली पाकिस्तानसारखी नेमकी नसली तरीही आपली देहबोली जेत्याची आहे हे नक्कीच! Happy

पाकिस्तानबाबत असे व्हायचे की इम्रान, झहीर, मियाँदाद, मलिक आणि अक्रम ह्यांची देहबोली पाहून टीव्ही पाहतानाच वाटू लागायचे की गेली मॅच!

पहिल्या १० ओवर्सच्या पॉवरप्ले मध्ये ८-१० च्या सरासरीने धावा काढायच्या आणि मग ५-६ ची सरासरी ठेवून ३३० बनवायचे हा आधीच्या वर्ल्डकप मध्ये आणि ईतरहीवेळेस चाललेला फॉर्म्युला ह्या वर्ल्डकपमध्ये सपशेल फेल ठरला.
डेथ ओवर्स मध्ये मात्र बर्‍याच संघांनी (अगदी झिंबाब्बे, आयर्लॅड नी चांगल्या टीम विरुद्ध सुद्धा) ८-१० ची सरासरी ठेवण्यात यश मिळवले आहे. थोडक्यात पहिल्या पंधरा ओवर्स मध्ये विकेट टिकवल्या आणि मिडल ऑर्डरने आजिबात रिस्क न घेता ५-६ ची सरासरी ठेवली तर बॅटिंग पॉवर प्ले चा ऊपयोग मोमेंटम सेट करण्यासाठी करून ३००+ चा टप्पा आरामात गाठतो येतो हे भारताने (आणि श्रीलंका व झिंबाब्वेनेसुद्धा) वारंवार दाखवून दिले आहे.
अफ्रिका भारत आणि पाकिस्तानच्या विरुद्ध ईथेच गंडली. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दोघे सुद्धा त्या लो स्कोरिंग मॅच मध्ये ह्याच अ‍ॅनोमलीला बळी पडले असे म्हणता येईल कारण त्याच विकेट वर भारत आणि झिंबाब्वे ने वरचा फॉर्म्युला वापरून ऑलमोस्ट ३०० टच केले होते.
साखळीत टाळलेली हीच चूक श्रीलंकेने एका चांगल्या बोलिंग अ‍ॅटॅक समोर केली आणि त्याचे फळ भोगले. ऊदा. द्यायचे झाले तर श्रीलंका वि अफगाणिस्तान मॅच. २३० काही धावांचा पाठलाग करतांना सुरूवातीच्या ओवर्स मध्ये फटके मारण्याच्या नादात श्रीलंकेने ५० मध्येच ४ विकेट्स गमावल्या होत्या.
रोहित आणि धवनने रनांच्या मागे न लागता (पॉवर प्ले वाया जातोय ह्याचं टेंशन न घेता) काढता विकेट टिकवणे गरजेचे आहे. जशी भारताने सहा मॅचेस मध्ये बॅटिंग पॉवर प्ले मध्ये अजून एकही विकेट गमावलेली नाही (आजकाल कोणी ३५ च्या बॅटिंग पॉवर प्ले घेतांनाही दिसत नाही) तसेच पहिल्या दहा ओवर्समध्ये विकेट टिकवणे फार जिकिरिचे पण मह्त्त्वाचे असणार आहे.

उद्याची मॅच आपण जिंकणार आहोत हे सांगायला कोणा तज्ञाची गरज नाही.

पण अनाकलनीय हुरहुर आहे. स्पेशली आज श्रीलंकेचे जे पानिपत झाले ते पाहून!

दक्षिण आफ्रिका इज ऑल सेट!

हायझेनबर्ग, विकेट टिकवणे तसेही फायद्याचेच आहे की? Happy हे मात्र पटले की पॉवर प्ले च्या षटकांमधील धावसंख्या किंवा धावा ह्यांच्यापेक्षा एन्ड रिझल्ट महत्वाचा!

पण मैदान, प्रतिस्पर्धी, आधीची स्टॅटिस्टिक्स ह्या सगळ्याचा विचार न करताही विकेट्स टिकवायला हव्यात!

कोहलीबद्दल सगळ्यांचे काय मत आहे ते कृपया समजेल का?

कोहली ज्या बॉलवर बाद झाला तो बॉल पाहून आता भीती वाटू लागली आहे.

विशेषतः शर्मा किंवा धवन ह्यांच्यापैकी कोणी पहिल्या पाच षटकात गेले तर!

कोहलीनी स्टंपवर मारून घेतला बॉल. खुप दुर्दैवी असा शॉट होता.

हायझनबर्ग, आय टोटली अग्री. आपण दोन वेळा चेज करताना हे दाखवून दिलय की आधी विकेट टिकवून ठेवली तर स्टेडिली अ‍ॅक्सलरेट करत लक्ष्य गाठता येते. मला माहित नाही हा रोहित शर्मा का बरं वरुन फटके मारायला जातो! त्याला क्लियर सुचना कशा काय नाहीयेत की पहिल्या १०-१५ ओवर तरी आजिबात रिस्क घ्यायचं काम नाहीये!
३०० गाठले तरी डिफेंडेबल टोटल होते आणि दर वेळी ३७५ रन करता येतील अशी सुरवात करायची काहीच गरज नाहीये.

आज दक्षिण आफ्रिकेने १८ षटकांत किती धावा केल्या?

मागे लिहिल्याप्रमाणे, आपण एकदातरी ४०० करायला हव्यात. (ह्या विश्वचषकात)

३०० पुरेश्या वाटत नाहीत. Happy

विशेषतः बाद फेरीत!

विकेट टिकल्या तर अगदी सहज होऊ शकतात. बॅट्समनांनी जम बसवला पाहिजे आधी. शर्मा अ‍ॅन्ड धवन रियली रियली नीड टू पुट इन अ‍ॅट लिस्ट १२५ अ‍ॅन्ड देन वी आर सेट! पुढे संकटकाल वगैरे ही भानगडच नको च्यामारी! शेवट्चे १० ओवर राहिलेले असताना धोनी-रैना ही जोडी पाहिजे. धुव्वा!

ही वॉज सरप्राईझ्ड!

बॉल असा असेल असे त्याला वाटलेले नव्हते असे फेशिअल एक्स्प्रेशन्सवरून वाटण्यापेक्षाही प्रत्यक्ष बॉलचा रिप्ले पाहून वाटले.

कोहली गंडू शकतो.

आपण सगळे रोहित आणि जडेजाबद्दल बोलतो, त्यांना स्वतःलाही ते समजत असेलच की Proud

फिल्डिंग गंडलीय का थोडीशी? Uhoh

आज दक्षिण आफ्रिकेने १८ षटकांत किती धावा केल्या? >> अफ्रिकेच्या फायर पॉवर बॅटिंग आणि कत्तलबाज बॉलिंग समोर आपल्याला ३००+ रन्स बनवायचे आहेत हे प्रेशर घेऊन मैदानात ऊतरणे आणि सेमीज मध्ये जाण्यासाठी १० विकेट्स घेऊन फक्त १३३ रन्स बनावायचे आहेतही रिलिफ घेऊन मैदानात ऊतरणे ह्या दोन सिच्युएशन्सची तुलना केली तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे ऊत्तर मिळेल.

बॉल असा असेल असे त्याला वाटलेले नव्हते असे फेशिअल एक्स्प्रेशन्सवरून वाटण्यापेक्षाही प्रत्यक्ष बॉलचा रिप्ले पाहून वाटले. >> बाऊंसर बॉल आहे असे वाटून सचिनने डक केले आणि तो एल बी डब्लू झाला.
चांगल्या आणि सेट बॅट्समनचाही अंदाज चुकू शकतो. तो बॉल सोडून त्याच्या बाकी खेळावरून तुम्हाला त्याच्या पर्फॉमन्सचा भरोसा वाटत नसेल तर अवघड आहे. ईन दॅट केस द ओनली प्लेअर यू कॅन ट्र्स्ट ईज 'द ट्वेल्थ मॅन'.

यू आर नो डिफरंट हायझेनबर्ग!

Happy

>>>सेमीज मध्ये जाण्यासाठी फ्क्त १३३ रन्स बनावायचे आहेत <<< हे कोण म्हणते आहे? Uhoh

>>>तो बॉल सोडून त्याच्या बाकी खेळावरून तुम्हाला त्याच्या पर्फॉमन्सचा भरोसा वाटत नसेल तर अवघड आहे. ईन दॅट केस द ओनली प्लेअर यू कॅन ट्र्स्ट ईज 'द ट्वेल्थ मॅन'.<<<

कोहली गंडू शकतो हे प्रतिस्पर्ध्यांसाठी खूप आहे. टेक्निकॅलिटीज तुम्ही आणि आम्ही खूप डिस्कस करू. तिथे सगळे माईंड गेम्सवर चालते. तिथे प्रेशर घेतले जाते किंवा घातले जाते. प्रत्यक्ष स्किल्स कितपत लागू होतात ही बाब नगण्य ठरते.

आजची दक्षिण आफ्रिकेची कामगिरी पाहिल्यावर पुढच्या तीन 'उपांत्यपूर्व फेर्‍या' कश्या होतील असे तुम्हाला वाटते?

>>>१० विकेट्स घेऊन फक्त १३३ रन्स बनावायचे आहेत<<<

ओह, व्हेरी सॉरी! Happy

१० विकेट्स १३२ मध्ये घेण्याची क्षमता?

Happy

आज दक्षिण आफ्रिका जे काही करून गेली त्याचा दबाव पुढच्या प्रत्येक संघावर येणार आहे. कर्णधाराने संघाला दिलेल्या टीप्समध्ये ह्या बाबीचा उल्लेख अपरिहार्य असणार आहे. टॉसला अनन्यसाधारण महत्व मिळणार आहे (जे आधीही म्हणालो होतो Proud :दिवा:). यादव, शमी, मोहित बर्‍यापैकी पिटले जाऊ शकतातसुद्धा. अश्विन आणि जडेजा ब्रेक थ्रू मिळवण्याच्या क्षमतेचे ठरतील. विशफुल थिंकिंग बाजूला सारण्याची वेळ आलेली आहे. Happy

Pages