विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय एफरटलेस विन ! १८ ओवर्स मधे फक्त!! मी लवकर उठून बघू म्हटलं तर ५ पण ओवर्स बघायला नाही मिळाल्या !! आता न्यूझीलन्ड ला हरवून सा. अफ्रिका येणार का फायनल ला Happy

आमचे कॉपी पेस्टः

भारताला सर्वाधिक चान्सेस आहेत असे वाटत आहे:

प्रोव्हायडेडः

१. पाकिस्तान परत भेटायला नको
२. टॉस जिंकला तर प्रथम फलंदाजीच घ्यायला हवी, मैदान कोणतेही असो!
३. 'मी संघात का आहे' हे जडेजाने फक्त तीन वेळा सिद्ध करावे.
४. टॉस हरलो तर धोनीने जडेजाच्यानंतर फलंदाजीस यावे
५. श्रीलंका हरावी.
===============================================

पाचव्या अटीची पूर्तता झाली.

आता न्यूझीलन्ड ला हरवून सा. अफ्रिका येणार का फायनल ला
>>>>>>>>

एवढे सोपे नाहीये ते ... कारण त्यांना न्यूझीलंड नाही वेस्टईंडिजला हरवावे लागेल..

असो,
आज गेले ते पैसे गेले .. विंडीजवर मी दुप्पट पैसे लावून आजच्या तिपटीने वसूल करेन..

अरारा बरं झालं मी लंकेवर पैसे नाही लावले ते >>>>> यात बरं झालं वगैरे काही नसते रांव, पैसे गेल्याशिवाय येत नाही, किंबहुना ४ जातात तेव्हाच ८ येतात .. फक्त मोठा मोठा गेम खेळायची धमक ठेवायची.. एकेकाळी आम्ही नरेपार्कातील जत्रा अशीच लुटून यायचो.. असो, इथे विषयांतर नको, वेगळ्या धाग्यात पुन्हा कधीतरी..

तसेही आता पुढचा सामना भारत-बांग्लादेश आहे, त्यावर नाही खेळणार..
कारण जिथे भावना लागलेल्या असतात तिथे पैसे लावायचे नसतात..

तुमच्या प्रतिसादांंमधून हळूहळू आयुष्य जगण्यासाठी आवश्यक अश्या मूल्यांचे प्रशिक्षण मिळत आहे. धन्यवाद!

इथे विषयांतर नको, वेगळ्या धाग्यात पुन्हा कधीतरी..

तसेही आता पुढचा सामना भारत-बांग्लादेश आहे, त्यावर नाही खेळणार..
कारण जिथे भावना लागलेल्या असतात तिथे पैसे लावायचे नसतात..

>>
ऋन्मेऽऽष ,
You may love him or hate him, but you can’t ignore him Happy

>> तुमच्या प्रतिसादांंमधून हळूहळू आयुष्य जगण्यासाठी आवश्यक अश्या मूल्यांचे प्रशिक्षण मिळत आहे
कुणाच्या? Uhoh

>> चिमण, तुम्हाला का प्रश्न पडावा?
सवय लागलीये बघ प्रश्न पडायची Wink त्याचं काये! मी बरेच दिवसांनी यायला लागलोय त्यामुळे जास्त पडतात.

वन डाऊन, थ्री टू गो. पण श्रीलंका एकदम बेकार हरली.

ऋन्मेष, पोलिस तुझ्या मागावरती आहेत.;)

लंक स्टेन, अ‍ॅबॉट आणि मार्केल मुळे अडकली आणि मग फिरकीला विकेट देऊन गडगडली.. संगकारा कोषात गेला ते फारच वाईट झालं त्यांच्यासाठी.. एकदम तेंडुलकर आठवला तेव्हा.. तो पण कधी कधी असाच कोषात जायचा आणि मग पार वाट लागायची..

भारत-बांग्लादेश आहे, त्यावर नाही खेळणार..
कारण जिथे भावना लागलेल्या असतात तिथे पैसे लावायचे नसतात.. >>>>>> १००% सहमत

संगकारा कोषात गेला म्हणताय पण आफ्रिकेने जयवर्धने नि मॅत्थ्यु कॅचिंग मिड विकेट वर उचलले ते जास्त नडले खर तर. Lanka routed by spin by South Africa, that is the irony indeed.

विश्वचषकात सर्वाधिक शतक झळकवण्याचा सचिनचा रेकॉर्ड सध्यापुरता तरी वाचला. परंतु डिव्हिलिअर्स ने आता पर्यंत ४ शतके लावली आहे. आणि दोन मॅचेस बाकी आहेत Wink

वाजत आले साडेपाच.. आता घरी..
पण उद्या आपल्या सामन्यासाठी सुट्टी टाकलीय..

बांग्लादेश म्हणजे जिंकण्यासाठीच बघायचा...
फुल्ल बॉल टू बॉल लाईव्ह बघण्याचे सुख..

मायबोलीवर कदाचित दिवसभरात फिरकता येणार नाही..
जिंकणारच त्यामुळे रात्रीही येणार नाही..
(आपण उद्या जिंकल्यावर परवा पाकिस्तान जिंकावी म्हणून रात्रभर देव पाण्यात ठेवायचा आहे)

तरीही....
जर हरलोच चुकून आपण, तर पिसे काढायला नक्की येणार..
तुर्तास अलविदा ! Happy

Lanka routed by spin by South Africa, that is the irony indeed.>>>> +१!

अगदीच किरकोळीत काढलं बॉ!

बांग्ला असल्यामुळे इतकं पण टेन्शन नाहीये आणि मला खरं सेमीजचची चिंता जास्त वाटते. बांग्लाला अंडर एस्टिमेट करणार नाही धोनी ह्याचीही खात्री आहे.

बळी जरी फिरकीला मिळाले तरीही अप्रतिम गोलंदाजी करून पहिलीं खिंडारं स्टेन, अ‍ॅबॉट व मॉर्केलने पाडली व लंकेवर दबाव आणला, हेंही महत्वाचं. संगकाराने थोडं आधींच ' ओपन अप'' व्हायला हवं होतं; तें न केल्याने त्याने इतरांवरचं दडपण खूपच वाढवलं, असं जाणवलं.[ मर्यादित षटकांच्या सामन्यांत एकाच फलंदाजाला केंद्रस्थानी धरून धांवसंख्या उभारण्याचा बेत आंखला तर तें घातक ठरतं, हाअनुभव नवा नाहीं, विशेश्षतः भारतीयाना !]
<< पटतय तुम्ही जे सांगत आहात आहे ते.. पण एकदम कुंडली किंवा हात हातात घेउन ज्योतिषीच वर्ल्ड कपचे भविष्य सांगत आहे असाच मला एकदम भास झाला तुमचे पोस्ट वाचता वाचता>> निदान आजच्या सामन्यात तरी तसं झालंय, हें खरं. पण तो केवळ योगायोग नसून द.आफ्रिकेच्या आक्रमक मानसिकतेचा तो परिणाम आहे. डुमिनीला नियमित गोलंदाज म्हणून व ताहिरचा नेमका वापर करणं यासाठी जी सकारात्मक, आत्मविश्वासपूर्ण व आक्रमक वृत्ती लागते, ती द.आरिकेने दाखवली व त्याचं फळ त्याना मिळालं !

Pages