विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या ऑस्ट्रेलियाच्या विकेट बघून त्यांनाही काळजी वाटली पाहिजे थोडी. आपले फिल्डर इतके कच्चे नाहीत त्यामुळे आपण ब्रेकथु मिळवू नक्की. शमी, यादव, शर्मा ह्यांनी प्रयत्नांची शर्थ केली पाहिजे.

क्रिस गेल चालला >> बोल्ट नि साउथी समोर पाठ्दुखीने ग्रस्त गेल चालणे कठीण वाटते.खर तर किवी चा कच्चा दुवा आहे अँडरसन. तो पाचवा बॉलर आहे नि त्याची बोलिंग प्रेशर मधे आली तर सहावे म्हणजे विल्यिमसनसारखे सगळे पार्ट टायमर आहेत. वेस्ट इंडीजला फायदा उठवता येईल का हे बघायचे. त्यांची स्वतःची स्थिती काही फारशी वेगळी आहे असे नाही अर्थात.

मकल्लम पेक्षाही विल्यिमसन कळीचा खेळाडू असेल. तो जबरदस्त फॉर्ममधे आहे नि त्याच्या पाठीमागे असण्यामूळे मकल्लम वेड्यासारखा खेळू शकतोय.

सव्वादोनशे च्या आसपास रन्स करून रियाझ च्या जोरावर पाकी ऑसीजना टफ देईल असे मी परवा म्हणालो होतो. वॉट्सन आणि मॅक्सवेलचे कॅचेस घेतले असते तर रियाझने फार मजा आणली होती मॅच मध्ये.

शेवटी क्लार्क म्हणाला ते खूपच पटले, पाकी लोक मॅच (दोन्ही साईडने Wink )फिरवण्यात अतिशय वाकबगार आहेत. त्यांना व्यवस्थित ट्रिगर केले तर ते ईमाने ईतबारे मॅच व्यवस्थित आपल्या हातामध्ये देऊन जातात. सेल्फ डिस्ट्र्क्शन मध्ये पाकचा हात अफ्रिका आणि विंडिजही धरू शकणार नाही.

अनुभवाची कमतरता खूप प्रकर्षाने दिसून आली. सगळे पाकी मोठे फटके मारण्याच्या (कश्यासाठी?) प्रयत्नात बाद झाले. हाफिज सईद नसण्याचे आणि युनिस खानला डावलण्याचे फळ भोगले पाकिस्तानने, तो मिसबाह बरोबर पाय रोऊन मोठी भागिदारी करू शकला असता.
सर्फराज सारख्या फ्लूक (सध्यातरी) प्लेअरच्या खांद्यावर मणामणाचे ओझे टाकून त्यांनी त्याची नॅचरल खेळी करण्याची क्षमताच मारून टाकली. मी बॉलर म्हणून टीम मध्ये आहे हा अफ्रिदीचा दावा एवढा जबरदस्त ऊध्वस्त झाला (५७ ओवर्स ३०० च्या आसपास रन्स आणि फक्त २ विकेट्स ) की मागच्या वर्ल्डकपच्या स्टार (माझ्यामते तो ही फ्लूक होता) पर्फॉर्मन्स नंतर अकमल आणि तोच खरे तर पाकिस्तान टीमच्या वर्ल्डकप मोहिमेतल्या (अफ्रिकेची मॅच वगळता जी अफ्रिदी सोडून ईतर बॉलर्स ने जिंकून दिली) एकंदर खराब प्रदर्शनासाठी जबाबदार आहेत. अफ्रिदीने कायमचा रामराम केला किंवा त्याला नारळ दिला तर नवल वाटू नये. दोघांचे डेड वेत कॅरी करणे पाकिस्तानला महागात पडले. युनिस सारख्या गुणी प्लेअरची कारकीर्द अशी संपावी ह्याबद्दल जरा वाईट वाटले. ऊमर अकमलचे ऑलरेडी भावाच्या वाटेवर मार्गाक्रमण चालू झाले आहे.

रियाझचे भवितव्य मात्र ऊज्वल आहे. वय जास्त आहे त्याचे त्यामुळे तो किती खेळेल माहित नाही पण फिटनेस टिकवल्यास आणि थोडी बरी बॅटिंगही करू शकत असल्याने तो अक्रमची जागा घेऊ शकेन.
वकार युनुस कोच पेक्षा फक्त बॉलिंग कोच होता की काय असे वाटते. बॉलिंगने कात टाकली पण बॅटिंग आणि हिरव्या मैदानांवर अतिशय जरूरीच्या फ्लिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये पाकी ईतर टीम्सच्या तुलनेत अनुकमे खूपच नवशिकी आणि मागास वाटली.

बोल्ट नि साउथी समोर पाठ्दुखीने ग्रस्त गेल चालणे कठीण वाटते.खर तर किवी चा कच्चा दुवा आहे अँडरसन. तो पाचवा बॉलर आहे नि त्याची बोलिंग प्रेशर मधे आली तर सहावे म्हणजे विल्यिमसनसारखे सगळे पार्ट टायमर आहेत. वेस्ट इंडीजला फायदा उठवता येईल का हे बघायचे. त्यांची स्वतःची स्थिती काही फारशी वेगळी आहे असे नाही अर्थात. >>>>>

विलिअम्स, अँडरसन हे किमान १५ ओव्हर नंतर येतात. तो पर्यंत गेल टिकला पाहिजे Wink

http://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/Pak-vs-Aus/article...
ऑस्ट्रेलियाविरूद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले असले तरी पाकिस्तानने एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. पाकिस्तानचे सर्व १० गडी आजच्या सामन्यात झेलबाद झाले. यामुळे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिकवेळा सर्व गडी झेलबाद होण्याचा विक्रमही पाकिस्तानच्या नावापुढे लिहिला गेला आहे

हायझेनबर्ग तुमचे विष्लेशण पटले.

मला पण वाटले की मिस्बाह होता तो पर्यंत (२० वी ओव्हर) काही फार वेगळा स्कोर नव्हता आपला आणि त्यांचा. पण पुढे टिकून खेळण्याऐवजी त्यांनी विकेट्स फेकल्या. नाही तर अजुन ५०-६० रन्स नक्कीच झाल्या असत्या आणि ऑसिज वर प्रेशर आले असते.

आज मॅक्सवेलने विकेट्स मोक्ळ्या ठेवून त्याला फॉलो करणार्‍या शॉर्ट बॉलला पुल/हुक करता करता ऐन वेळी पॉईंटच्या डोक्यावरून मारलेली square cut कि square drive कि loft shot अचाट होता. ABD ला हेवा वाटेल असा अगदी. अशा प्रकारे ऐन वेळी शॉट्स बदलायची practice केलेली दिसतेय त्याने.

विलिअम्स, अँडरसन हे किमान १५ ओव्हर नंतर येतात. तो पर्यंत गेल टिकला पाहिजे >> गेलच असे नाही, रसेल, सॅमी वगैरेच्या समोरही बघायला interesting होईल. बांग्लादेशने elliot च्या 2 overs मिळाल्यावर काय केले ते आठवा. (मॅक्लेशान ने वाईट बॉलिंग टाकली अर्थात त्या दिवशी.)

अफ्रिदीने कायमचा रामराम केला किंवा त्या नारळ दिला तर नवल वाटू नये. युनिस सारख्या गुणी प्लेअरची कारकीर्द अशी संपावी ह्याबद्दल जरा वाईट वाटले. ऊमर अकमलचे ऑलरेडी भावाच्या वाटेवर मार्गाक्रमण चालू झाले आहे. >> 'हायझेनबर्ग' आयडी ने अशी विधाने करावीत ? Wink पाकिस्तान टीम असल्यामूळे हे सगळे होउही शकते नि नाहिही होउ शकत. सगळेच uncertain. पुढच्या वर्ल्ड कप मधे अकमल कॅप्टन नि युनिस खान, आफ्रिदी The batsman बरोबर ओपन करतोय वगैरे बघितले तरी आश्चर्य वाटणार नाही. Lol

आजची ठळक बातमी.

पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हक आणि शाहिद आफ्रिदी यांनी एकदिवसीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

पण किती दिवसासाठी हे माहिति नाहि अजुन....rofl.gif. पण मटा तर आता दाखवतोय ही बातमी.. rofl.gif

अरे तो टोटल चुकून मारलेला शॉट होता! आधी तशाच काहीश्या शॉट वर त्याचा कॅच सुटला.
रियाझ्नी चांगला जायबंदी केला होता त्याला आणि त्या वॉट्सनला सुद्धा. लाईन लेंत टाईटम टाईट ठेवली तर त्यांच्यावरही प्रेशर येइल आणि तेही चुका करतील. साऊथ आफ्रिके विरुद्ध आपण तेच केलं.

रियाझचे भवितव्य मात्र ऊज्वल आहे. वय जास्त आहे त्याचे त्यामुळे तो किती खेळेल माहित नाही पण फिटनेस टिकवल्यास आणि थोडी बरी बॅटिंगही करू शकत असल्याने तो अक्रमची जागा घेऊ शकेन.>>>>> +१
खरच वाईट वाटले इतकी जबरी बॉलिंग करत असताना फिल्डरांनी कॅच सोडले तेव्हा.

चुकून तर झालं नाही ते? >> मी परत Drop catch नि तो shot बघितला, दुसर्‍या वेळी तसे वाटले खरे. म्हणजे त्याने स्पेस तयार केली खरी पण पुल खेळण्याएव्हढी जागा न मिळाल्यामूळे काहितरी कट, ड्राईव्हमधे खेळला.

त्यांच्यात निवृत्ती नंतर पण इनिंग खेळल्या जातात. त्यामुळे ..

च्च च्च आता विदेशी टीमला उगाच दोन खर्‍या प्लेअर बरोबर खेळावे लागणार.

मॅक्सवेल, ब्रॅन्डन आणि गेल ह्या तिघांनीही आपल्याला अजून एकदाही तुडवलेले नाही. ती लोकं बरोबर जाळ्यात सापडतात. अगदी २०-३० धावांना तुडवले म्हणत असाल तर वेगळी गोष्ट मी निदान अतिजलद ७०-८० (ओपनर्सचे ) किंवा क्विक ४५-५०. फक्त २० -२२ बॉल मध्ये असे म्हणतोय.

लिहायचा कंटाळा आल्याने न्यूझी टीमच्या बॅटिंगबद्दलचे माझे मागचेच मत कॉपी करत आहे.

न्यूझीलंडची बॅटिंग मकलम सोडता कमकुवत वाटते आहे. >> हो त्यांची बॅटींग अनटेस्टेड आहे असे मला पण वाटते. प्रेशर खाली ती वाईट कोसळू शकते. मॅक्युलम, टेलर, अँडरसन बेभरवश्याचे आहेत. गप्टील, विल्यम्सन आणि ईलियट थोडे शांत डोक्याने खेळतात पण चांगल्या बोलिंग विरुद्ध मोठी धावसंख्या ऊभी करण्यासाठी त्यांचा अजून म्हणावा तेवढा कस लागलेला नाही.

बॉलिंग मात्र जबरदस्त आहे न्यूझीची ह्यात काही वादच नाही. समोरच्याची गाडी स्पीड पकडायला लागली तर विटोरी सारखा ईमर्जन्सी ब्रेक एवढा ईफेक्टिवली काम करतो की बस्स.

विंडिज ही बायपोलार डिसऑर्डर ने ग्रस्त टीम आहे. त्यांच्याबद्दल काहीही अपेक्षित धरायचे किंवा स्टॅट्सचा हवाला द्यायचे झाल्यास त्यांचा डेटा अ‍ॅनालिसिस करणारे मशिन हँङ व्हायचे. स्मिथ सारखा प्लेअर त्यांची ईनिंग ओपन का करतो हे अनाकलनीय आहे. तो १४ वा खेळाडू होण्याच्याही लायकीचा प्लेअर मला वाटत नाही. होल्डर च्या ऑन द फ्लाय डिसिजन घेण्याच्या क्षमतेवर, आणि रसेल च्या ऑलराऊंड परफॉर्मन्स वर त्यांचे ईनिंगचे फिनिशिंग अलिकडे की पलिकडे असे अवलंबून आहे. होल्डरचे सॅमी आणि सॅमी गटातल्या लोकांशी पटत नसेल तर ते एक टीम म्हणून कसे खेळणार. खरे सांगायचे तर विंडिज डू नॉट नीड गेल दे नीड अ टीम.

पुढच्या वर्ल्ड कप मधे अकमल कॅप्टन नि युनिस खान, आफ्रिदी The batsman बरोबर ओपन करतोय वगैरे बघितले तरी आश्चर्य वाटणार नाही >> Lol

केदार
आयपील मुळे गेल, मॅक्युलम, वॉर्नर, वॉट्सन, मॅक्सवेल, टेलर सगळे ओपन कार्डस झाले आहेत आणि आपल्या कडे धोनी हुकुमाचा एक्का, त्याचा ब्रेन त्यांना आजवर पुरून ऊरला आहे. एबी मात्र वरचा क्लास आहे, वैयक्तिक त्याच्या खेळावर कुरघोडी करणे थोडे अवघड आहे पण त्याच्या टीममधल्या ईतर प्लेअर्सकरवी त्याच्यावर प्रेशर टाकता येते.

पुढच्या वर्ल्ड कप मधे अकमल कॅप्टन नि युनिस खान, आफ्रिदी The batsman बरोबर ओपन करतोय वगैरे बघितले तरी आश्चर्य वाटणार नाही >> Lol आणि इंझमाम फिल्डिंग व रनिंग बिटवीन द विकेट कोच का Lol

हायझनबर्ग, चांगलं लिहिलस.

मलाही इतरांसारखच ऑसी आणि किवी दोन्ही टीम खुप जबरदस्त वाटत नाहीयेत आणि खरं सांगायचं तर भारत सुद्धा एक आपली साउथ आफ्रिकेविरुद्ध मॅच वगळता. आपणही चूका केल्या पण समोरच्यांनी आपल्यापेक्षा जास्त केल्या म्हणून जिंकलो आपण. अर्थात गेम हा गेम अस्तो त्यामुळे चुका झाल्या म्हणजेच तुम्ही नीट खेळला नाहीत. आपण जिंकलो खरं पण आपले वीकपॉईंट्स हायलाईट झाले.

शियर डॉमिनन्स असा फक्त आपलाच आणि फक्त तिथेच दिसला अफ्रिकेविरुद्ध कारण अफ्रिकेची टीम तितकी पण बेभरवशाची नाहीये. अ‍ॅज अ टीम आपण सगळ्या तिन्ही फ्रंट्सवर फायर झालो तर आपल्याला कोणाची भिती नाही आणि करंट ट्रॅ़क बघता ते होण्याची शक्यता जास्त आहे.

खरच वाईट वाटले इतकी जबरी बॉलिंग करत असताना फिल्डरांनी कॅच सोडले तेव्हा.
>> +१ त्यातुन ऑसीज उगाज उचकवत होते. विराटला पण ते टर्गेट करु शकतील.
मला वाटते आपण त्याना हरवु ६ पैकी १ तरी मॅच जिन्कु त्यान्च्याविरुद्ध.

अरे ऑसीज त्याला उचकवत होते का? मी ते नाही पाहिलं. मी फक्त रियाझनी शिव्या दिल्या तेव्हा पाहिलं आणि तेव्हाही थोडं आउट ऑफ कॅरॅक्टर वाटलं त्यानी शिवीगाळ करणे पण मला वाटलं कॅच ड्रॉप्मुळे फ्रस्ट्रेट झाल्यामुळे राग काढला असेल ऑसीज वर.

Pages