बागकाम-अमेरीका २०१५

Submitted by स्वाती२ on 27 January, 2015 - 10:36

मंडळी,
नॉर्थ ईस्ट भागात ब्लिझार्डमुळे फुटभर स्नो असताना वसंत ऋतूची स्वप्ने पहात बागकामाचा धागा काढणे काहिसे वेडेपणाचे वाटेल. परंतू या वर्षीचे कॅटलॉग्ज यायला लागलेत. गावातल्या शेतीच्या दुकानात बीयाही आल्यात. तेव्हा उबदार घरात बसून यावर्षीचे बागकामाचे प्लॅनिंग करण्यासाठी धागा सुरु करत आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मध्ये इथेच कुणीतरी गवती चहा रुजवायला त्याच्या काड्या पाण्यात ठेवायला सांगितलेल्या. दुकानात जाडसर काड्या दिसल्या म्हणून (न करता Wink ) पाण्यात ठेवल्या. एक-दीड आठवड्याने खालून बारीक मुळं फुटलेली दिसली. कालच मातीत खोचलंय. तगेल बहुतेक. आयड्यासाठी धन्यवाद. Happy

लोकहो, मदत करा.
आमच्या जास्वंदीच्या झाडावर अचानक काळ्या रंगाची किड यायला लागली आहे. पानांवर, देठांवर, कळ्यांवर आणि फुलाच्याही मागच्या बाजूला, काळे काळे लहान ठिपके आहेत.. चिकटून बसल्यासारखे आहेत.
तर कुठला स्प्रे वगैरे मारायचा का? मी आज उद्यात होम डिपोत जाणार आहेच. पण काही माहिती असल्यास सांगा.

माझ्याकडे एक कोल्टन का कायतरी नावाचं एक इन्डोअर प्लांट आहे त्याची पानं गळून जात होती आणि त्यावर छोटे किडेही दिसत होते म्हणून थोडं तेल आणि थोडा डीश सोप असं मिश्रण करून दोन तीन त्यावर फवारलं. ते किडे गेलेच पण आता नवीन पालवी आली आहे त्याला. तसं काही करून बघ पराग.

पराग, एफिड्स असतील. पाण्याचा फवारा मारुन धूवून काढायचे झाड. साबणाचे पाणी मारायचे किंवा इंसेक्टिसाईडवाला सोप वापरता येइल.

एफिड्स असतील तर स्वातीने सांगितले तसे इंसेक्टिसाईडवाला सोप वापर, नि जर तुला एफिड्स जिवंत दिसले तर सरळ चिमटीत धरून मार. एखादा जरी वाचला तर परत सगळे पाढे पंचावन्न होतात.

मिठाचं पाणी स्प्रे केल्यानं पण जातात हे किडे. मी गेल्या वर्षी आधी मिठाचं पाणी फवारलं २-३ दिवसांच्या फरकानं आणि मग सरळ छाटून टाकली जास्वंद. फॉल येउन घरात घ्यायची वेळ आली तोपर्यंत तिला पुन्हा छान पानं फुटली आणि भर डिसेंबरात फुलं Happy

काही आठवडे बाहेर गेलो होतो. मधल्या काळात शेजारच्या माळ्याला थोडी नजर ठेवायला (आणि काही पिकल्यास घ्यायला) सांगितले होते. परत आल्यावर सहज चक्कर मारली तर टॉमेटॉ, झुकिनी,केल्,पिटुकलं बीट आणि चक्क मिरच्या वगैरे मिळाल्या. आता आणखी झुकिनी येताहेत त्या जरा छोट्या असताना काढीन. फेमस रेस्पि करण्यासाठी.

gharchibaag.jpg

अगं मे का जून पासून आहे ते बीट म्हणून फार आशेने उचकटलं. अजून एक दोन रोपं आहेत तेव्हा थांबेन पण झुकिनीच्या रोपांची पानं इतकी मोठी आहेत की आम्ही मिरचीला पण विसरलो होतो. त्यामुळे इतर रोपांवर परिणाम होत असेल असं वाटतं. आमचं फर्स्ट टाइम बीट आहे (फ्रॉम बीटाचा बिया)

हो ना .. काचेच्या कुंडीत लावले तरी माती ट्रान्स्पॅरन्ट असल्याशिवाय काही कळेल असं वाटत नाही .. Wink

Pages