बागकाम-अमेरीका २०१५

Submitted by स्वाती२ on 27 January, 2015 - 10:36

मंडळी,
नॉर्थ ईस्ट भागात ब्लिझार्डमुळे फुटभर स्नो असताना वसंत ऋतूची स्वप्ने पहात बागकामाचा धागा काढणे काहिसे वेडेपणाचे वाटेल. परंतू या वर्षीचे कॅटलॉग्ज यायला लागलेत. गावातल्या शेतीच्या दुकानात बीयाही आल्यात. तेव्हा उबदार घरात बसून यावर्षीचे बागकामाचे प्लॅनिंग करण्यासाठी धागा सुरु करत आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती, लिलीज फोटोज सुंदर. सुरेख रंग आहेत. माझ्या जुन्या घरी गर्द लाल रंगाच्या होत्या. लाल आणि पिवळ्याचं हळद कुंकू काँबीनेशन केलं होतं.

ईथे अजुन तसा उन्हाळा नाहि चालु झाला - अजुनहि रात्रि थन्डि असते. बागेतिल काहि Lilies n Dahlies च्या प्रती

IMG_5423.jpgIMG_5488.jpgIMG_5417.jpgIMG_5415.jpgIMG_5491.jpg

सायो झेन्डूसाठि काय करावे? मी जमिनिमध्ये आणि कुन्डिमध्ये दोन्हि ठिकाणि लावला. कुन्डिमध्ये छान आलाय पण जमिनिमध्ये तेवधा वाढत नाहि.

माझ्याकडे लिली आणल्यानंतर एकदम पाच सहा फुलं येऊन गेली. मग रिपॉटींग केली त्यानंतर फुलं बिलं काही आलेलीच नाहीत. माकाचु?
झेंडुला भरपूर पाणी लागतं. एखाद दिवस जर सकाळी पाणी घातलं नाही तर अगदीच कोमेजतं रोप.

लिलि कुन्डिमध्ये आहे का? लिलि perennial असल्याने जमिनित लावलेली उत्तम!! कुन्डिमध्ये असेल तर कुन्डि winter मध्ये घरात आणून ठेवावि.

सायो, लिलीज चा ब्लूमिंग पिरियड पण ट्युलिप्स किंवा तत्सम फुलांसारखा शॉर्ट् असतो. एकदा फुलल्या की २-३ आठवडे टिकतात. पण एका झाडाला पुन्हा पुन्हा फुले येत नाहीत एका वर्षात. एकदा येऊन गेली ना तुझी? मग आता पुढच्या वर्षी या वेळी येणार Happy

२४ फुलं एकावेळी ? सहीये! आमच्या कडे ६/७ असतात. पण कुंडी छोटी आहे. कालच झेंडू मोठ्या कुंडीत शिफ्ट केला.

सायो, डेलिया फुलला. उद्या टाकेन फोटो Happy

आत्ता समरमध्ये कुठली फुलझाडं लावावीत? स्प्रिंगमधली गेली आता आणि बल्ब लावायला वेळ आहे.

एन्डलेस समर हायड्रॅन्जिआ, हिबिस्कस चे टाइप्स आणि नॉक आउट रोझेस मस्त होतील. पार फॉल पर्यन्त फुले येत रहातात.

काल हॉट्ट डे चा मुहुर्त बघून दोन तास बागेत काम केलं. तुळशीची इतकी रोपं आली होती की तण काढून फेकावं तशी काढून टाकली Sad

अरारा, हापिसात देशि लोक नाहीयेत का ? त्यांना वाटायची तुळस .

बाई, माझ्या मित्राला म्हणावं त्याने दिलेल्या रातराणीला फुलं आलीत यंदा ( एकदाची) . काल संध्याकाळी वीडिंग करत होतो तर मस्त सुगंध एकदम!

तुमच्या मित्रानं दिलेल्या रातराणीला क्रिसमस काळात फुलं आली आणि आता मात्र नुसतीच वाढतेय चहुबाजूंनी. काल शेवटी काटछाट केली.

शोनू, अक्षरशः शेकड्यानं उगवलीत रोपं. प्रत्येक कुंडीत पाच-पन्नास. मी यंदा नवी काही लावली नाहीत झाडं. ६-७ कुंड्या रिकाम्याच पडल्यात- विंडो बॉक्सेस पण आहेत त्यात. मग काय उगवलीत भरपूर.

देवळात नेऊन दे - पेपरकप मधे १-२ , १-२ घालून.

काल अंगणातून शुगर मेपल अन सिकॅमोर ची प्रत्येकी दीड दोनशे अन ट्युलिप पॉप्लरची पन्नास एक रोपं उखडून फेकलीत. Sad
एक ट्री नर्सरी चालू केली असती तर किती पैसे मिळाले असते

सायो, लिलीज चा ब्लूमिंग पिरियड पण ट्युलिप्स किंवा तत्सम फुलांसारखा शॉर्ट् असतो. एकदा फुलल्या की २-३ आठवडे टिकतात. पण एका झाडाला पुन्हा पुन्हा फुले येत नाहीत एका वर्षात. एकदा येऊन गेली ना तुझी? मग आता पुढच्या वर्षी या वेळी येणार >> तुला हवे असतील तर डबल ब्लूम होणार्‍या लिलीज मिळतात आजकल. ऑनलाईन शोधाव्या लागतील फक्त.

मै, बर्‍याच काऊंटींमधे हिबिस्कस हे बॅन्ड आहे. रोज ऑफ शॅरॉन चालते. तेंव्हा जमिनीत लावण्या आधी चेक कर.

स्वाती२, तुम्ही मागच्यापानावर लसणाची माहिती दिली आहे. मोठ्या कुंडीत लेट फॉलला लसूण लावून कुंडी पूर्ण विंटर बाहेर ठेवायची ना ? एक गड्डा पुरला तर किती लसूण येतो पुढच्यावर्षी ?

मैत्रेयी, आम्ही साधं आपलं नेहमीचं जास्वंद आणलं.. ही झाडं नव्हती.

मैत्रेयी, रोझ ऑफ शरॉन वूडी श्रब आणि थंडीत जावून पुन्हा येणारी हर्बॅशिअस ते हार्डी हिबिस्कस. जिनस एकच.

Pages