बागकाम-अमेरीका २०१५

Submitted by स्वाती२ on 27 January, 2015 - 10:36

मंडळी,
नॉर्थ ईस्ट भागात ब्लिझार्डमुळे फुटभर स्नो असताना वसंत ऋतूची स्वप्ने पहात बागकामाचा धागा काढणे काहिसे वेडेपणाचे वाटेल. परंतू या वर्षीचे कॅटलॉग्ज यायला लागलेत. गावातल्या शेतीच्या दुकानात बीयाही आल्यात. तेव्हा उबदार घरात बसून यावर्षीचे बागकामाचे प्लॅनिंग करण्यासाठी धागा सुरु करत आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पराग तो कोंब आहे, तो बाहेर ठेव. पण कंद (कंद शब्द बरोबर नाहिये, पण रिझ्मो ला काय म्हणतात ते देव जाणे), ३-५ इंच जमिनीखाली हवा असे नक्की बघ. होम डिपोट मधला असेल तर जायंट किंवा डीश डेलिया आहे का नसेल तर भारतातल्या अ‍ॅस्टरएव्हढी असतात फुले. बेगोनिया लाव मिळाले तर. ती फुले फॉल पर्यंत येत असतात.

लसूण फॉलमधे लावायचा. पुढल्या फॉलमधे तयार तयार होतो काढायला.
मी ग्रो लाईट खाली बीबामची रोपं तयार केलेत. जोडीला पालक आणि लेट्युस जागा होती म्हणून. या विकेंडला मटार, पालक, लेट्युस बागेत लावणार.

लसूण फॉल मध्ये खरंच मस्त होतो सप्टेंबर, ऑक्टोबर्मध्ये लावला कि जूनच्या शेवटी काढायचा. मी लावलाय या वर्षी, पात तरी छान दिसतेय, होपफुली लसूणकांदा पण छान होईल. यावर्षीचं कंपोस्टही मस्त झालंय. पण माश्याच दिसत नाहीत कुठे, खुप फुलझाडं पण लावलीयेत. यंदा नवीन एप्रिकॉटचं झाड घेतलंय पण किटकं नसतील तर उपयोग नाही. Sad
एप्रिकॉटचं झाड स्वपरागीकरण करतं कां?

ओके.. पण तो नक्की कोंबच आहे ना असा प्रश्न पडलाय.>>
तो कोंब आहे. मागच्या वर्षी मी जे डेलिया लावले होते त्याला सुरुवातीला असेच कोंब आले होते

लसूण जमिनीत लावायचा फॉलमधे. उशीरा लावायचा. फॉल बल्ब तसे. हिरवे कोंब वसंतात आले पाहिजेत. मग फॉलमधे कांदे तयार होतील. कुन्डीत लावता येतो पण मोठी कुंडी हवी मुळं वाढायला. आणि चांगले ड्रेनेज, भरपूर सूर्यप्रकाश.

कंद होम डेपोतून आणला.. त्या कंदातून ते लाल फुटलं होतं. आम्हांला कळेना की ते मुळ आहे की कोंब.. मुळ असेल तर ते गाडावं लागेल ना?

Happy कंदातुन जर काय फुटत असेल तर तो नेहमी कोंबच असतो. इथे भारतातही नुसते कांदे आणुन ठेवले तरी त्यांना कोंब फुटतात जी त्याची पाने असतात.

(रच्याकने, कोंब की मूळ हे ओळखता येत नाहीये तरी बागकाम करण्याचा उत्साह Light 1 )

कोंब की मूळ हे ओळखता येत नाहीये तरी बागकाम करण्याचा उत्साह >>>> Lol म्हणून तर उत्साह.. म्हणजे असं अज्ञान बाहेर पाजळायला नको.. Proud

रच्याकने,
कुंडीत लावलेल्या ट्युलिप बल्बना फुल आलं !!!! अजून दोन कळ्या पण आहेत..
हा बघा फोटो...

IMG_5506 - Copy.JPG

भारतात उगवले ?? काय सांगतेस ? मागे आमच्या इथे एकांनी नेले होते पण त्याला फार काय काय करावं लागलं होतं.. टेंपरेचर मेन्टेन वगैरे.

मी डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात गेले होते. त्यांनी ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पेरले. कुंडीत पेरले होते याशिवाय आणखी काही वेगळं केलं नाही. फोटो टाकते जरावेळानं.

ट्युलिप्स फॉलमध्ये जमिनीत कंद (बाबा आणि धाकटा यांनी) लावले होते. आणि मी आणि मोठा आम्ही मिळून यंदा थोड्या गोष्टी बियांपासून लावायचा प्रयत्न करतोय. अजून जमिनीत जायला वेळ आहे. सगळ्यात मोठी रोपं आहेत ती वाटाणे आणि बाकी टॉमेटो, बीट्स आणि रॅडिशेस बघुया कुठवर झेपतंय. पण लावताना मुलाला नावांचे टॅग्ज बनवणे वगैरे कामं दिल्यामुळे एकंदरित बराच वेळ (चांगल्या अर्थाने) गेला.

Tulips2.gifropa2.gif

ट्युलिपची फुलं गेली. आता कळ्या नाहीयेत नवीन. झाडं हिरवी आहेत. तर त्या कंदांचं पुढे काय करायचं ? म्हणजे पानं सुकेपर्यंत थांबायचं का? हेच कंद परत लावता येतात ना पुढच्या वर्षी ?

तसेच ठेव, पाने पिवळी पडेतो किंवा शक्यतो तोडू नकोस. पुढच्या वर्षीची बेगमी सुरू असते. २-३ वर्षांनंतर काढून स्प्लीट केलेस तर अधिक बहर येईल.

हो का ? मला वाटलं की भर उन्हाळ्यात बाहेर ठेवायचे नसतात.. फ्रिजमधे वगैरे ठेवावे लागतात.. !

तू लावलेलेस ते spring bloomers आहेत ते winter hardy असतात त्यामूळे गरज नाही. summer bloomers काढावे लागतात. फ्रिजमधे ठेवण्याबाबत मी तरी फक्त फॉलमधे प्लांट करायचे विसरलो तर ठेवा असे वाचलेले.

मी grand duke of tuscany लावलाय मागच्या वर्षी त्याला अजून एकदाही फुले नाही आली. maid ऑफ orleans लावलेले त्याला २ महिन्यात भरपूर फुले येवून गेली. ह्या २ झाडांची care वेगळी वेगळी असते का? जास्त फुले येण्यासाठी काय करावे?

वेका,
ट्युलिप्स छान दिसतायत. रोपं देखील छान झालेत.

पराग , ट्युलिप्सना मुळं वाढायला जमीन थंड लागते. त्यामुळे झोन ८ आणि त्यापुढे रहात असाल तर सप्टेंबरमधे कंद काढून फ्रीजमधे ठेवावे लागतात. बाकी भागात कंद जमिनीत राहू द्यायचे.

Pages