एन जे हिवाळी गटग फेब्रुअरी २०१५

Submitted by वैद्यबुवा on 22 January, 2015 - 09:37
ठिकाण/पत्ता: 
डॉन होजे रेस्टॉरंट. Address: East Hanover Center, 200 New Jersey 10 #7, East Hanover, NJ 07936 Phone:(973) 781-0155 होम डिपो, इस्ट हॅनोवर टाकलं जि पि एस मध्ये तरी चालेल. त्याच स्ट्रिप मॉल मध्ये आहे हे रेस्टॉरंट.
माहितीचा स्रोत: 
स्वानुभव
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 14, 2015 - 12:00 to 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बायका मुलांना पण घेऊन या. >>>> आता काक्वा म्हणाला असतात तर त्या तिथेच असतील.. बायका कुठून आणू...:????
Proud

बायका कुठून आणू...:????
आता हे मला काय विचारता? मी नेहेमी तिकडे बायका घेऊन हिंडत असतो असे वाटले की काय तुम्हाला? अहो माझी बायको सुद्धा माझ्याबरोबर येत नाहीये. इतर बायकांचे काय विचारता?

बघा इकडे तिकडे तुमच्या दक्षिण जर्सीत. तिथे काय मिळेल नि काय नाही सांगता येत. कुळथाचे पीठ (म्हणजे काय कुणास ठाउक) पण मिळते म्हणे. असले जिथे मिळते तिथे बायका काय नक्कीच मिळतील!

हल्ली कुळथाच्या पिठावर बायका फुकट मिळण्याचे दिवस गेले (म्हणजे मागे पडले).... तुमच्या काळी वेगळं होतं म्हणे.. Proud

मी नेहेमी तिकडे बायका घेऊन हिंडत असतो <<< बायका नाही पण बाटल्या... नेहमीप्रमाणे Proud

मुद्द्याचे बोला - येताय का?
बायका, बाटल्या, कुळथाचे पीठ काही नाही आणले तरी चालेल.
तुमच्या काळी वेगळं होतं म्हणे.. ते तर मलाहि माहित नाही. कुळथाचे पीठ म्हणजे काय हेच माहित नसल्याने ते आणायचा प्रश्नच नाही.

मुद्द्याचे सांगून झालेच आहे.. आता फक्त TRP वाढवतोय.. Happy

कुळिथ = हुलगे = घोडेका दाना = Horse Gram हे एक धान्य असते. भरपूर Protein असलेले हे एक धान्य असून कोकणामधे प्रेमाने खाल्ले जाते. त्याचे पिठले केल्यास डाळीच्या पीठापेक्षा जास्त खमंग आणि चविष्ट होते..
शिंडे कडे याच्या शेंगोळ्या केल्या जातात..

अभिनंदन आहे तुम्हा लोकांचं इतक्या एक्स्र्टीम वेदरला खास जमताय. म्हणजे रोज हापिसला जाणं वगैरे असतं मान्य पण विकांताला हा प्लान म्हणजे. आगे बढो (आम्हाला थोडीच यायचंय ;))

अवांतर - पुर्वी सरसकट फेब्रुवारी म्हटलं जायचं ते आजकाल फेब्रुअरी (आणि मे बी जानेवारी जानुअरी वगैरे) झालंय का? आणखी कुठेतरी हेच वाचलं. Happy

>>
दुपारी ३ पासून सुरू होणार आहे स्नो. बकाबका गिळून घरचा रस्ता धरावा लागेल.>> ऐसा जीटीजी भी कोई जीटीजी है लल्लू?

अरे ते तीन म्हंटलं की आरामात ४-५ वाजतातच. तरीही सेफटीच्या दॄष्टीनी लवकर निघणेच योग्य आहे. फक्त मग वेळेत किंवा थोडं वेळेआधी यायला जमताय का बघा. मै, सिंडरेलाच त्यातल्या त्यात लांबून येणार आहेत.

नाही ना, माझा तोच जरा प्रॉब्लेम आहे. सानिकाचा बास्केटबॉल गेम आहे, तो चुकवता येत नाहिये आणि तो झाल्यावर निघायचे म्हणजे मला निघायलाच १२ वाजणार आहेत. माझा विचार होता की उशीरा पोहोचलो तर डाय्रेक्ट सायोकडे जावे चहा ला Happy पण लवकर निघायचे ठरत असेल तर अवघडच होईल माझं येणं.

ठीक आहे मग १२:३० चा टाईम ठेवू सध्या. जे जमतील ते जमतील जेवायला नाहीतर थेट सायो कडेही येता येइल.
ज्यांना १२:३० ला काही प्राबलेम नाहीये त्यांनी वेळेत या मात्र.
विताई, एबाबा, रोबो, झक्की, सायो, बाई. १२:३० शार्प! Happy

भाई, दिवस बदलला तर मग कधी कधी सगळच बारगळतं एकदम.

बुवांनी माझं नाव लिहीलं नाही म्हणजे मी येउ नये अशी त्यांची इच्छा आहे का? बरं नाही तर नाही. आम्ही शिट्टीत गटग करू आमचं आमचं.

अवो, तुमचं आणि मैचं नाव नाहीये त्यात मुद्दाम. थोडक्यात तुम्हाला उशीरा येण्याची सवलत देणेत येत आहे. Happy
त्यात नाव टाकलं अन तुमी वेळेत नाही आलात तर मग शिक्षा म्हणून (सगळ्यांचं) बिल भरावं लागल! चालेल का? Proud

साडेबाराला पोचायचं आणि आमच्याकडून पंधरा मिनिटं लागतील. निघण्याआधी चहा पिऊ म्हणालीस तर बारापर्यंत ये. 'बारा वाजता कुठे चहा पिणार!' असं म्हणालीस तर मग सव्वाबारापर्यंत ये. 'ब्रेकफास्ट एकत्रच करू' म्हणालीस तर साडेआठपर्यंत ये. 'माझ्याच्याने नाही बाई सकाळी सकाळी ड्रायव्हिंग होत' असं म्हणालीस तर आदल्या रात्री पोच. म्याच बघायची म्हणालीस तर त्या रात्री रहा. Proud

Pages