कोण आहे मराठी चित्रपटसृष्टीचा खर्राखुरा सुपर्रस्टार ??

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 December, 2014 - 11:30

स्वप्निल जोशीचा उल्लेख माझ्या लेखाच्या शिर्षकात मी सुपर्रस्टार असे करताच त्या धाग्यावर तीच चर्चा चालू झालीय. तिच्यावर काही आक्षेप नाही पण तिथे स्वप्निलचे अभिनंदन करणे अपेक्षित होते. तसेच हि चर्चाही काही गैर नाही म्हणून हिला रीतसर वेगळा धागा काढून देतोय.

इथे नुसते मत व्यक्त करू नका तर मत सुद्धा द्या.

मी खाली एकेका पोस्टमध्ये काही कलाकारांची नावे लिहितो जी त्या चर्चेत आली आहेत त्यांना वोट द्या आणि ठरवा काय ते एकदाचे!
वाटल्यास स्वत:च्या नावांचीही भर घाला, बघा आपल्या आवडीचा कलाकार इतरांना आवडतो का किंवा किती आवडतो. Happy

मी तेथीलच चर्चेवरून १२-१३ नावे काढलीत, ती फक्त कृपया एका क्रमात येऊद्या.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके

शरद तळवलकर.. भूमिका विनोदी असो वा गंभीर, अगदी लीलया करणार.
अशोक सराफ, लक्ष्यापेक्षाही मला शरद तळवलकर, राजा गोसावी यांचे सिनेमे आवडतात. राजा गोसावींनी तर नंतर निगेटिव्ह भूमिकाही झकास रंगवल्या होत्या.

मराठीत सुपरस्टार नव्हताच असे कोणालाच वाटत नाही का?

त्यातल्यात्यात जो अधिक गाजला त्याला सुपरस्टारच म्हंटले पाहिजे हा आग्रह कशासाठी?

मराठीत सुपरस्टार नव्हताच असे कोणालाच वाटत नाही का?
>>>>>>>
असे वाटलेय बरेच जणांना हे प्रतिसादात जाणवतेय, तसेच धागाकर्त्यालाही हे मान्य आहेच, फक्त स्वप्नीलच्या धाग्यावरची अवांतर चर्चा त्या विषयाला अनुसरून असलेल्या धाग्यात व्हावी याच हेतूने हा धागा उघडलेला.

असो,
पण मराठीत देखील सुपरस्टार घडला पाहिजे असेही कोणाला वाटत नाही का?

झालाच कोणी, किंवा भेटलाच कोणी सुपरस्टार तर मराठी चित्रपटसृष्टीचा दाही दिशांना दबदबा होण्यास याचा फायदा नाही का होणार?

टाईममधीन मध्ये बसून पन्नास वर्ष मागे गेलो आहे!

अभिनयाला पुरेपूर वाव देणारा मराठी चित्रपट काढण्याची योजना आहे!

हिंदीतील दोन अभिनयसम्राट प्रमुख भूमिकेद्वारे मराठी चित्रपट्सृष्टीत पदार्पण करत आहेत.

भारत भीषण आणि प्रदीपकुमार!

त्यांच्याबरोबर नायिका म्हणून प्रिया राजवंश आणि जाहीदा शेख यांनाही प्रथमच मराठी चित्रपटासाठी करारबद्ध करण्यात आलेले आहे.

चारही प्रमुख कलाकारांच्या यात दुहेरी भूमिका आहेत!>>>>
मग चित्रपटाचं नाव चारशकल ठेवा. आणि प्रेक्षकांच्या मेंदुची शकलं होउद्या.

कुलदीप पवार येस्स. माझ्याही ते आवडीचे. ग्रे शेडही मस्त रंगवायचे आणि विनोदातही धमाल उडवायचे. फेटा बांधून जी अ‍ॅक्टींग करायची ती तर सहीच असायची. लहानपणी माझ्या शेजारचे काका डिट्टो तसेच दिसायचे, जे मला फारसे आवडायचे नाहीत, म्हणून कुलदीप पवारही आवडायचे नाहीत, पण तरीही त्यातूनही आवडू लागलेच. सुर्याला ग्रहण लावलेत तरी कोंबडा उठल्यावर आरवणारच. बाकी स्वप्निल जोशीला आठवे मत पडले आहे Happy

सस्मित ... Proud

निरीक्षक सहमत आहे, पण मग यातून जगात मुर्खांची संख्या जास्त आहे असा निष्कर्ष काढू शकतो का?

या न्यायाने जगदीप (शोलेत हा अमिताभपेक्षा जास्त आवडला होता काही लोकांना), सलमा आगा, मुक्री, धुमाळ, पोपटलाल या सगळ्यांना पण सुपरस्टारच म्हणायला हवं Rofl

या न्यायाने जगदीप (शोलेत हा अमिताभपेक्षा जास्त आवडला होता काही लोकांना)
>>>>>
काही लोकांना! हजारो लोकांना नाही!
अर्थात जगदीप आवडणारे जर अमिताभ आवडणार्‍यांपेक्षा जास्त संख्येने असतील तर नक्कीच जगदीप सुपर्रस्टार झाला... इट्स लॉजिकल!
पण तसे आहे का Happy

हो पण मतदान करणारे लोक जगदीपला मत देते झाले असते तर? तसेच स्वप्नील जोशीचे आहे. इतका अभिनयशून्य नट बघितला नव्हता मराठीत. कदाचित रविंद्र महाजनी असतील तसे. पण नाहीच. हो स्वप्नील जोशी हा न-अभिनयाचा सुपरस्टार आहे. Proud

काही लोकांना! हजारो लोकांना नाही!>>>

काही लोक हे हजारो लोक असू शकतात. शोले किती लोकांनी बघितला होता असा तुमचा अंदाज आहे?

काही लोकांना! हजारो लोकांना नाही!>>>
काही लोक हे हजारो लोक असू शकतात.
>>>>

आपण इथे तुलनात्मक बोलतोय. जेव्हा जगदीप आवडणारे हजारो होतील तेव्हा अमिताभ आवडणारे करोडो झाले असतील Happy
जगदीप आवडणार्‍यांची संख्या अमिताभ आवडणार्‍यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे का कमी हे सांगा. जर जास्त लोकांना अमिताभपेक्षा जगदीप आवडत असेल तर का त्याला सुपरस्टार म्हणू नये ? पॉईंट क्लीअर आहे. पण.. तसे आहे का Happy

आपण इथे तुलनात्मक बोलतोय>> तुम्ही काय वाट्टेलते बोलाल हो Lol

पण पॉइंट असा आहे की वर कुणीतरी कुठेतरी म्हटलंय की हजार लोक येडचापपणाचं समर्थन करत असले तरी तो येडचापपणाच राहतो. म्हणून जगदीप हजारो लोकांना आवडत असला तरी तो चॉईस येडचापच राहतो.

अंकुश चौधरी अगदी आता आतापर्यंत स्वप्निल जोशीच्या मागे होता, पण आता अचानक अंकुश चौधरी फॅन क्लबने स्पर्धेत उडी घेतल्याने सामना रंगतदार होण्याची लक्षणे आहेत.

सही भिडू!! हे तर शाहरूख खान आणि आमीर खान सारखे होतेय.. सुपरस्टारपदाची रस्सीखेच.. मराठी चित्रपटसृष्टीला लवकरच ग्लॅमरस दिवस येणार आहेत!! Happy

मराठी चित्रपट जो पर्यंत १००-२००-३०० कोटी वगैरे खेचत नाहीत तो पर्यंत या सुपरस्टारपणाच्या गप्पा म्हणजे बेडकीने बैलाची स्टाईल मारण्याचा प्रकार आहे Lol

स्वप्निल जोशी होऊ शकतो तर क्रिस गेल, ड्वेन ब्रावो, केव्हीन पीटरसन, मायकेल क्लार्क का नको?

निलेश कुलकर्णी, संजय मांजरेकर हे तर मराठीच!

मायकेल क्लार्क आणि केविन पीटरसन नको. फार उंच नायक मराठीत चालणार नाहीत. प्रेक्षकांची आवड हे मैद्याचं पोतं आहे. ख्रिस गेलला वजन वाढवायला सांगू आपण. पण त्यापेक्षा अर्जुना रणतुंगाच बरा. त्याला पावडर लावली की झालं.

वर आदरणीय गणपत पाटील यांच्या बद्दल लिहीताना चुकून आदरार्थी "त्यांची" टंकण्याऐवजी चुकून एकेरी "त्याची" टंकले गेल्याने संपादित करुन सुधारणा केली आहे.

मराठी चित्रपट जो पर्यंत १००-२००-३०० कोटी वगैरे खेचत नाहीत तो पर्यंत या सुपरस्टारपणाच्या गप्पा म्हणजे बेडकीने बैलाची स्टाईल मारण्याचा प्रकार आहे
>>>>>>

१००-२००-३०० कोटी दिलीपकुमारच्या काळात मिळायचे का?
तेव्हाही तो सुपरस्टार होताच ना!
पैसा हे परिमाण चुकीचे आहे.

१००-२००-३०० कोटी दिलीपकुमारच्या काळात मिळायचे का?>>
Please check inflation into account and do the math, if you can Wink

पैसा हे परिमाण चुकीचे आहे.>>
मग बाकीही परिमाणे चुकीची आहेत.

Pages