कोण आहे मराठी चित्रपटसृष्टीचा खर्राखुरा सुपर्रस्टार ??

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 December, 2014 - 11:30

स्वप्निल जोशीचा उल्लेख माझ्या लेखाच्या शिर्षकात मी सुपर्रस्टार असे करताच त्या धाग्यावर तीच चर्चा चालू झालीय. तिच्यावर काही आक्षेप नाही पण तिथे स्वप्निलचे अभिनंदन करणे अपेक्षित होते. तसेच हि चर्चाही काही गैर नाही म्हणून हिला रीतसर वेगळा धागा काढून देतोय.

इथे नुसते मत व्यक्त करू नका तर मत सुद्धा द्या.

मी खाली एकेका पोस्टमध्ये काही कलाकारांची नावे लिहितो जी त्या चर्चेत आली आहेत त्यांना वोट द्या आणि ठरवा काय ते एकदाचे!
वाटल्यास स्वत:च्या नावांचीही भर घाला, बघा आपल्या आवडीचा कलाकार इतरांना आवडतो का किंवा किती आवडतो. Happy

मी तेथीलच चर्चेवरून १२-१३ नावे काढलीत, ती फक्त कृपया एका क्रमात येऊद्या.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेडकीने बैलाची स्टाईल मारण्याचा प्रकार आहे > बरोबर आजकाल काहींची भाषणे बघुन तेच वाटते

मग बरोबर काये ते पण लिहा.>>भलेभले शोधत आहेत, आपण किस पेड की पत्ती!

अरे बाबा, सलमा आगाचा सिनेमा आला तेव्हा अनेकांना वाटलं होतं प्रति-लता मंगेशकर आली आहे. त्यापुढे ही सोने-पितळ तूलना बरीच.

Please check inflation into account and do the math, if you can
>
आधीच काहीतरी ईंग्लिशमध्ये लिहिता, त्यावर गणितात शिरायला सांगता.
पण तरी मला नाही वाटत तेव्हाचे कलाकार / चित्रपट इतके कमावत असतील.
त्यांची तेव्हाची समाजातील आर्थिक पत बघून अंदाज बांधता येतो ना.

and do the math, if you can>>>>> बापरे. त्यापेक्षा स्वजो सुपरस्टार आहे हे मान्य करावे झाले.

अस्सं कस्सं? गणीतात शिरलंच पाहीजे.

बाकी एम.एन.सी.तलं इंग्रजी काय योग्यतेचं असेल याची कल्पना आली.
चला मराठीत सांगतो. चलनवाढीचा दर लक्षात घेता तेव्हाची कमाई ही आजच्या कमाईत रुपांतरित केली तर समजेल आणि सिद्ध होईल मी काय म्हणत आहे ते.

थोडीफार आवड आहे.
आणि आहो वर धागाकर्तेच म्हणालेत, आकडे बोलके असतात वगैरे वगैरे. आता आकडे दिले तर बगल देत आहेत.

राजेश खन्ना दोनशे करोड रूपडे सोडून गेला म्हणे, मग ते कसे कमावले?
>>>>>>
राजेश खन्नाने अभिनय सोडून जमाना उलटला. २०० करोड हल्ली सोडून गेला. त्यामुळे अभिनयावर काय किती कमावले हे नाही सांगू शकत. बाकी त्यांची पुर्ण फॅमिली या क्षेत्रात होती. आजची पिढी देखील होती. कोणाचा वाटा किती हे आपण कसे सांगणार.

चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार कोण आहेत माहीत नाही पण माबोचे सुपरस्टार आपणच आहात. तुमचा_अभिषेक, अंड्या व रुन्मेष या तिहेरी रोलमध्ये सहजतेने वावरत आहात. रुन्मेष हे काल्पनिक पात्र सत्यच असावे इतक्या ताकदीने उभे केले आहे. स्वतःचे खरे वय लपवून रुन्मेष या पात्राचं लहान वय व बालिशपणा ज्या पध्दतीने दाखवू शकला आहात ते पाहून थ्री इडियट्समधला कॉलेजकुमार आमिर किंवा दिपिका-अनुष्काबरोबर तरुण भूमिका करायला धडपडणारा शाहरुखही तोंडात बोटे घालतील. 'गर्लफ्रेन्ड' या काल्पनिक पात्राला तर या सिनेमात एकही संवाद व सीन नसताना तुम्ही हेही पात्र खरंच असावं अशी लोकांची समजूत करुन देऊ शकला आहात.
तुमच्या या अभिनयकौशल्यासाठी तुम्हाला मायबोलीच्या काल्पनिक असोसिएशनतर्फे बेस्ट अ‍ॅक्टर २०१४ साठी नामांकन दिले जात आहे. पारितोषिक वितरण सोहळा पुणे येथे लवकरच आयोजित केला जाईल.

आता

आणि आहो वर धागाकर्तेच म्हणालेत, आकडे बोलके असतात वगैरे वगैरे. आता आकडे दिले तर बगल देत आहेत.
>>>>>>>
तुम्ही आकडे नाही तर गणिती फॊर्मुले देत आहात, किंबहुना ते ही न देता इन्फ्लेशन वगैरे मेथड सांगत आहात.
यावरून आकडे काढून दिलेत तर स्वागतच आहे.

यावरून आकडे काढून दिलेत तर स्वागतच आहे.>>

एम.एन.सीत काम करणार्‍यांना एवढंही जमत नसेल तर.......................

Pages