कोण आहे मराठी चित्रपटसृष्टीचा खर्राखुरा सुपर्रस्टार ??

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 December, 2014 - 11:30

स्वप्निल जोशीचा उल्लेख माझ्या लेखाच्या शिर्षकात मी सुपर्रस्टार असे करताच त्या धाग्यावर तीच चर्चा चालू झालीय. तिच्यावर काही आक्षेप नाही पण तिथे स्वप्निलचे अभिनंदन करणे अपेक्षित होते. तसेच हि चर्चाही काही गैर नाही म्हणून हिला रीतसर वेगळा धागा काढून देतोय.

इथे नुसते मत व्यक्त करू नका तर मत सुद्धा द्या.

मी खाली एकेका पोस्टमध्ये काही कलाकारांची नावे लिहितो जी त्या चर्चेत आली आहेत त्यांना वोट द्या आणि ठरवा काय ते एकदाचे!
वाटल्यास स्वत:च्या नावांचीही भर घाला, बघा आपल्या आवडीचा कलाकार इतरांना आवडतो का किंवा किती आवडतो. Happy

मी तेथीलच चर्चेवरून १२-१३ नावे काढलीत, ती फक्त कृपया एका क्रमात येऊद्या.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नरेश माने, हो, ती पोस्ट आपली वाचली होती. रात्री मग नाईलाजाने अवांतर चर्चा थोपवायला काढावा लागला धागा. मात्र यातून हे देखील दाखवायचे होते की मराठीत कोणालाही सुपर्रस्टार असे म्हणता येणार नाहीच, तर मग मी ट्विटरने लोकप्रियतेचा निकष लावत स्वप्निलचे अकाऊंट वेरीफाय केले तर त्याला त्या निमित्ताने मी सुपर्रस्टार म्हटल्यास हरकत काय. ज्या पदावर ईतर कोणाचाही हक्क नव्हताच तर कोणाच्या भावना दुखवायला नकोतच मुळात.

>>>

ट्वीटर हा लोकप्रियतेचा निकष आहे?
जे कलाकार ट्वीटरवर नाहीत परंतु अफाट लोकप्रिय आहेत (आणि होते) त्यांचं काय?

मराठीतले पहिले निर्विवाद सुपरस्टार राजाभाऊ गोसावीच
अजुनही रमेश देव हयात आहेत त्यांना विचारा हवे तर
नंतरच्या काळात अनेकजण आल्याने विभागणी झाली,
अनेकांना फारसे आवडत नसले तरी मध्यंतरीच्या काळात दादा आणि लक्ष्याचा नंबर वरचा होता.
सद्ध्या एक जितेन्द्र जोशी सोडला तर कोणीच भारी वाटलेले नाही.

लक्ष्या, होय
माझ्याही अनुभवानुसार अशोक सराफ हे जरी तुलनेत ताकदीचे कलाकार असले आणि विविध भुमिका साकारल्या असल्या तरी एकाच साच्यातील भुमिका करणार्‍या लक्ष्याची लोकप्रियता जास्त होती.. आजही तो आपल्यात नाहीये असे वाटतच नाही..

सुपरस्टारची एका वाक्यात व्याख्या- जो चित्रपटातील भुमिकेपेक्षा मोठा होतो, नेहमीच.. तो सुपरस्टार!

आता या अंगाने विचार करा.

रजनीकांत जन्माने मराठीच कि . मग या विश्वातला सगळ्यात मोठा सुपर स्टार जर मराठी असेल तर हा धागा प्रयोजन less . जय रजनीकांत , जय लिंगा

आधी ते सुपर्रस्टारचं सुपरस्टार करा जरा! नको त्या जागी फाटल्यासारखा आवाज वाटतो तो! >> Rofl

सुपरस्टार हे बहुदा पॉप्युलरीटी आणि ग्लॅम च्या हिशोबाने लिहीलंय... नाहीतर कसलेल्या अभिनेत्यांना स्टारडमच्या चकचकाटाशी देणंघेणं नसतं! ते कुठल्याही साच्यात ओतले तरी आखीव रेखीव ठाशीव कलाकृतीच छापणार!
मला सुपरस्टार्स पेक्षा अभिनेते आवडतात!
मोहन आगाशे, निळू फुले, प्रभाकर पणशीकर, डॉ. श्रीराम लागू, नाना पाटेकर, विक्रम गोखले, गिरीश कर्नाड, सुधीर जोशी, दिलीप प्रभावळकर, दादा कोंडके, मोहन जोशी, किशोर कदम (सौमित्र), संदीप कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, जितेंद्र जोशी, विनय आपटे...
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे गंभीर भुमिकांतून जास्त आवडले.

<< शाहरूख खानचा मराठी चित्रपटसृष्टीशी काय संबंध? >>

त्याने मराठीत काहीच काम केले नाही हे त्याचे मराठी चित्रपटसृष्टीवर अनंत उपकार आहेत.

चेतनजी,
येस्स असे म्हणू शकतो, त्यामुळे इतरांना वाव मिळाला..
आता वरचच बघा ना, मी उदाहरणात शाहरूख खान बरोबरच संजीवकुमार, दिलीपकुमार, अमिताभ वगैरेही नावे घेतली होती, पण स्पार्टाकस यांनी नेमकेच शाहरूखचेच उचलून धरले, कारण त्याचे नाव इतरांच्या नावाला सहज झाकोळून टाकते हे फॅक्ट आहे Happy

बाकी शाहरूखही सुपर्रस्टार आहे हाच काय तो त्याचा या धाग्याशी संबंध, तरी आपण चर्चा मराठी कलाकारांवरच करूया.

>>त्याने मराठीत काहीच काम केले नाही हे त्याचे मराठी चित्रपटसृष्टीवर अनंत उपकार आहेत. Rofl
>>येस्स असे म्हणू शकतो, त्यामुळे इतरांना वाव मिळाला.. Rofl
वॉव फारच मजा आहे इकडे.

कारण त्याचे नाव इतरांच्या नावाला सहज झाकोळून टाकते हे फॅक्ट आहे >>> नाही, कारण फक्त त्याचेच नाव त्यात खटकते अनेकांना. दिलीप, अमिताभ ला झाकोळून टाकण्याएवढा मोठा झाला नाही तो अजून. अमिताभ त्याच्याकडे बघून "द मास्क" मधले वाक्य म्हणेल, आणि माझ्यासारख्या दोघांच्याही चाहत्यांना ते पटेलः
"You are good, son. Real good. But as long as I am around you will always be the second best" Happy
(आणि खुद्द दिलीप अमिताभला म्हंटला, तर अमिताभच्या अनेक चाहत्यांनाही त्याचे वाईट वाटणार नाही)

शाहरूख खानचं महत्व काहीच नाही असं नाही. त्याच्या सारख्या अभिनेत्यांमुळे अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, कमल हसन किंवा सुपरस्टार असूनही नम्र असणारे रजनीकांत हे ग्रेट का आहेत हे कळू लागतं.

सुपरस्टारची एका वाक्यात व्याख्या- जो चित्रपटातील भुमिकेपेक्षा मोठा होतो, नेहमीच.. तो सुपरस्टार!
>>>

याचाच दुसरा अर्थ :-

जो भूमिकेत न शिरता स्वतः म्हणूनच वावरतो असा जो तो (भावेप्रयोग!).

अभिनेत्याचं काम भूमिका साकारणं असतं, सुपरस्टार म्हणवून घेत पाट्या टाकणं नाही.

फारेण्ड,
अर्धसहमती,
अमिताभ हा नक्कीच आजवरचा सर्वात मोठा सुपरस्टार आहे हे मी सुद्धा आधी दुसर्‍या धाग्यावर म्हणालोच आहे., किंबहुना त्याच्या डॉनचा रिमेक बनवण्यासारखा मुर्खपणा शाहरूखचा दुसरा नसावा असेही लिहिलेच.
पण शाहरूखचे नाव त्या यादीत खटकते या बाबत असहमत.
जेव्हा सुपरस्टारचा विषय निघणार तेव्हा दिलीपकुमार, राजेश खन्ना, अमिताभ करत पुढचे नाव शाहरूखचे ओघाने येणारच..

स्पार्टाकस,
सुपर्रस्टारपदाबद्दलची चर्चा करताना आपली गाडी अभिनयावरच अडकली तर कसे चालेल.
दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, एकत्र असतीलच असे नाही.
बाकी जो पाट्या टाकतो तो कधीच सुपर्रस्टार म्हणून ओळखला जाऊ शकत नाही.
सुपर्रस्टार साठी त्याची स्टाईलच त्याचा अभिनय असतो..

(हिट देणे या निकषावर ज्युबिली स्टार राजेंद्रकुमारला कसे विसरता ?)
शाहरूख खानची तुलना फक्त त्याच्याशीच होऊ शकते.

हिट देणे हा एवढाच निकष नसतो, म्हणून तर राजेंद्रकुमारला सुपरस्टार्र न बोलता जुयुबिली स्टार म्हटले गेले होते.

अन्यथा मध्यंतरी अक्की उर्फ अक्षयकुमार पण दणादण हिट देत सुटलेला, एकेकाळी आपल्या गोंद्या उर्प्फ गोविंदा द्यायचा, हल्ली सल्लू उर्फ सलमान देतो..

सुपरस्टार ही टर्म ज्याला पहिल्यांदा वापरली गेली त्याच्या नावाशिवायचं चर्चा चालू आहे काय?? राजेश खन्ना सारखा कुणी सुपरस्टार मराठीत झाला नाही. मान्य करून मोकळ व्हाव. बैल बघितलेल्या बेडकीची गोष्ट कुठे सापडेल??

राजेंद्र कुमार सुपरस्टार होताच. तोच काय विश्वजीत आणि भारत भूषण त्यांच्या काळात सुपरस्टारच होते.

जुबिलीस्टार म्हणजे सुपरस्टारपेक्षा मोठा!

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सुपर्स्टार पदावर दावा एकेकाळी अलकाकुबलने देखील सांगितला होता. तिचे नाव वरच्या यादीत कुठंच का नाही?

तोच काय विश्वजीत आणि भारत भूषण त्यांच्या काळात सुपरस्टारच होते. >>>>>कोसळलो.......
आणि हो भारत भुषण नाही भारत भीषण (मायबोलीवर असा उल्लेख आला आहे). बाकी तुम्ही प्रदिप कुमार सारख्या रत्नाला यातुन वगळल्याबद्द्ल णिषेढ Biggrin

आवर्जुन ज्याचा सिनेमा पहायला जावा असा अभिनेता १९९० न.तर तरी मराठीत झाला नाही.... दोन-तीन वर्षाच्या सुगीला सुपरस्टारपद बहाल करण्यात अर्थ नाही.... कुणा एकाला सुपरस्टार म्हणून डोक्यावर घेऊन स्टाईलच्या नावाखाली तो करेल ते माकडचाळे सहन न करण्याचा सुज्ञपणा मराठी रसिकात आला आहे असे म्हणायला काही हरकत नाही!

मागे एकदा कोथरुडमधल्या एका सोसायटीत जंगी दारू पार्टी झाली होती. नंतर एक नटी दारू पिऊन पार्किंग मधे धावत सुटलेली आणि पार्टीतली काही पुरुष मंडळी, ज्यात कलाकारच होते, भलत्या हेतूने तिच्या मागे धावत होते त्याची आठवण झाली. कोण बरे ती नटी? Wink

कमाल करत आहात लोकहो, जर धाग्याच्या शिर्षकात सुपर्रस्टार आहे, धागा त्या संदर्भात आहे, तर शाहरूख आपसूकच येणारच ना ..

शाहरुखचं नाव घेऊ नकोस रे ऋन्मेष प्लिज>>>
रीया 'पालथा घडा' आणि 'पाणी' ह्याबद्द्ल मराठीतली एक उत्कृष्ठ म्ह्ण तुला माहिती आहे काय?.. Light 1

मजा येतेय वाचायला, तूम्ही लोकांनी जयश्री गडकरची लोकप्रियता बघितली नसेल. तिचा पहिलाच चित्रपट सांगत्ये ऐका.. आणि एक गाव बारा भानगडी यांनी विक्रम केले होते ( त्या काळात प्रसिद्धीची साधने मर्यादीत होती. )

पिंजरा मधे ती असती तर त्यानेही विक्रम केले असते, असे कोल्हापूरात बोलत असत.

मला मराठीतले एक लेखक आठवले ( सध्या ते या जगात नाहीत ) त्यांना अश्याच टॉप टेन याद्या करायची खोड होती.. फक्त त्या शीर्षकामागे "माझ्या मते " असे लिहायला विसरत असत.

आता मला पण शाहरुख हेट क्लबात जावंस वाटायला लागलय Sad
इतक्या वर्षात जे कोणालाही जमलं नाही ते ॠन्मेष ने करून दाखवलं Uhoh

त्यापेक्षा मी शाहरुख फॅन्स हेट क्लबात जाते.

देवा वाचव माझ्या शाहरुखला या ऋन्मेष पासून Angry

दिनेशदा +१

सूर्यकांत आणि जयश्री गडकर ही प्रचंड गाजलेली जोडी होती मराठी चित्रपट सृष्टीतील.
तब्बल वीस ते पंचवीस सुपरहीट पिक्चर या जोडीने दिले होते. त्या बाबतीत त्यांनी राज कपूर - नर्गीस (१६ चित्रपट) यांनाही मागे टाकलं होतं असं वाचल्याचं आठवतं.

रीया | 29 December, 2014 - 03:06

राग
शाहरुखचं नाव घेऊ नकोस रे ऋन्मेष प्लिज राग

>>>>> खरंच ऋन्मेष. त्या पीके च्या धाग्यावर शाहरुखला आणून तु जो गोंधळ घातलास त्यावेळी खूप पेशन्स ठेऊन प्रतिक्रिया द्यायचं टाळलं होतं. पण इथेही तेच. खरंच आवर आता.

आणि प्लीज त्या स्वप्नीलची तुलना शाहरुखशी करु नकोस (त्या स्वप्निल जोशी च्या धाग्यावर जाउन टंकायचा कंटाळा आलाय म्हणून हे इथेच)

हो स्पार्टाकस, २५० च्या वर चित्रपट ( मराठी आणि हिंदी ) तिच्या नावावर आहेत. तिने काही मालिकांतही भुमिका केल्या तसेच दिग्दर्शनही केले. रंगभुमीवर ती आल्याचे मला आठवत नाही. ( आशा काळे, अलका कुबल, सीमा, पद्मा चव्हाण, कानन कौशल, मधु कांबीकर या अभिनेत्री तसेच अरुण सरनाईक, अशोक सराफ, नाना पाटेकर, लक्ष्मीकांत बेर्डे, रमेश देव वगैरे कलाकार एकाचवेळी चित्रपट व नाटक करत होते. )

निकाल खालील प्रमाणे.. आता पर्यंतचा..

जुन्या पिढीतील सुपरस्टार
....

अशोकमामा सराफ - ३०
नाना पाटेकर - १९
दिलीप प्रभावळकर - १५
लक्ष्मीकांत बेर्डे - ११
प्रशांत दामले - ९
दादा कोंडके - ९
राजा गोसावी - ४
अजिंक्य देव - ३
मोहन आगाशे - २

..........................................................
-----------------------------------------------

नव्या पिढीतील सुपरस्टार
.......

स्वप्निल जोशी - ७
मकरंद अनासपुरे - ५
अंकुश चौधरी - ४
भरत जाधव - ३
जितेंद्र जोशी - २
श्रेयस तळपदे - १
रितेश देशमुख - ०

..........................................................
-----------------------------------------------

आतापर्यंतच्या मतदानानुसार

जुन्या पिढीत - अशोकमामा सराफ
आजच्या पिढीचा सुपर्रस्टार - स्वप्निल जोशी.

ऑलटाईम - अशोकमामा सराफ

९९

१००

Pages