कोण आहे मराठी चित्रपटसृष्टीचा खर्राखुरा सुपर्रस्टार ??

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 December, 2014 - 11:30

स्वप्निल जोशीचा उल्लेख माझ्या लेखाच्या शिर्षकात मी सुपर्रस्टार असे करताच त्या धाग्यावर तीच चर्चा चालू झालीय. तिच्यावर काही आक्षेप नाही पण तिथे स्वप्निलचे अभिनंदन करणे अपेक्षित होते. तसेच हि चर्चाही काही गैर नाही म्हणून हिला रीतसर वेगळा धागा काढून देतोय.

इथे नुसते मत व्यक्त करू नका तर मत सुद्धा द्या.

मी खाली एकेका पोस्टमध्ये काही कलाकारांची नावे लिहितो जी त्या चर्चेत आली आहेत त्यांना वोट द्या आणि ठरवा काय ते एकदाचे!
वाटल्यास स्वत:च्या नावांचीही भर घाला, बघा आपल्या आवडीचा कलाकार इतरांना आवडतो का किंवा किती आवडतो. Happy

मी तेथीलच चर्चेवरून १२-१३ नावे काढलीत, ती फक्त कृपया एका क्रमात येऊद्या.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुणे च का ?>>

तुम्ही खर्च देणार असाल तर न्यूयॉर्क किंवा लंडनमध्ये करु सोहळा! मला काय! स्पॉन्सर आणून दया म्हणजे झालं!

का पॅरिसमध्ये करुयात. तिथे रुन्मेषला अतिरेक्यांशी चर्चा करायला पाठवलं तर थोडया वेळाने ते रडत रडत येतील..आम्ही सरेंडर करतो..तुम्ही म्हणाल ते ऐकतो..पण याला आवरा..आम्हाला जेलमध्ये टाका हवं तर पण याच्या गर्लफ्रेन्ड, शाहरुख आणि एमएनसीच्या पुडयांपासून वाचवा Happy

मला एमएनसी काय जगातल्या कुठल्याही व्यवसायात काम मिळू शकते असे माझे मित्र म्हणतात कारण मी माझ्या सर्कल मध्ये जुगाड बादशाह म्हणून ओळखला जातो.

ते असो, पण खरेच हे ईंटरेस्टींग आहे, राजेश खन्नाची कमाई विरुद्ध शाहरूखची कमाई.. शाहरूख सहज सर्वांनाच मात देतो इथे!

त्याचा मुंबईतील मन्नत बंगला हे एक मुंबई दर्शन पॅकेजमधील प्रेक्षणीय स्थळ आहे!

शाखा दुबईत बिल्डर आहे, चित्रपट निर्माता आहे नि तुलना दोन काळातील अभिनेत्यांची नाही करू शकत आपण!

अजय देवगण मराठीत सिनेमा काढणार आहे आणि तोच हिरोचे काम करणार आहे असे समजते. सिंघमचा रिमेक असेल का तो?

मराठीत सिंघम काढायला कष्ट पडू नयेत फारसे. आता माझी सटकली. आता मला राग आला. हा डायलॉग तिथेही काही बदल न करता चालेल.

अजय देवगणला कसे सगळे विसरले?>>> आठवण येण्यासारखं काही झालं नाही म्हणुन

देवगण
आठवण

र्‍हाईम करुन र्‍हायले तुमी

पैसा कमाई प्रसिद्धी हे क्षुल्लक आहे.
शाहरूख हे नाव आज एक ब्रांड आहे, ज्याची तुलना क्रिकेटर सचिन तेंडुलकर याच्याशीच होऊ शकते.
तुर्तास एवढेच विधान बोलत रजा घेतो. सविस्तर मुद्दा गरज भासल्यास विस्कटेलच.

पैसा कमाई प्रसिद्धी हे क्षुल्लक आहे.>>

याचाच अर्थ शाखा हा एक अत्यंत क्षुल्लक नट आहे.

त्याचा मुंबईतील मन्नत बंगला हे एक मुंबई दर्शन पॅकेजमधील प्रेक्षणीय स्थळ आहे!>>>>.विलासराव देशमुखान्कडुन अगदी स्वस्तात मिळवली होती ती जागा. त्यावरुन बरेच वाद झाले होते. जिथे १०० कोटी किम्मत होती तिथे अगदी कमीत कमी किमतीत मिळाली ती जागा शाखाला. बाकी गरीब लोकाना म्हाडा मध्ये लॉटरी मुश्किलीने लागते, तिथे धनाढ्याना कवडीमोल किमतीत जमिनी मिळतात.

देशमुख भाऊ. वस्तुस्थिती बहुतेक तुम्हाला त्रासदायक ठरते, आम्हाला नाही.:फिदी: कारण भाजपा भ्रष्ट्र नाहीये असे मी कधीच म्हणलेले नाहीये, आणी म्हणणार पण नाही. पण कायेना, कॉन्गीना वस्तुस्थितीच सहन होत नाही आणी सान्गता येत नाही असे होते.:फिदी:

Pages