‘कम, फॉल इन लव्ह…’ अशी टॅगलाइन घेऊन आदित्य चोप्रानं निखळ करमणूक करणारी प्रेमकथा आणली आणि तिने अक्षरशः हिंदी चित्रपटांचे भविष्य बदलून टाकले. तो काळ अमिताभ नावाचे वादळ शांत होण्याचा होता. अमिताभने घालून दिलेल्या मार्गावरच चालण्याच्या उद्देशाने तेव्हा अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी यांसारख्या अॅक्शन हिरोंची नव्या दमाची फळी उभी राहिली. नव्वदच्या दशकानंतर हिंदी चित्रपट एकाच वळणाने जात होता. दणकट हिरो, त्याच्यावर झालेला अन्याय, त्यासाठी त्याचे पेटून उठणे, ड्र्ग्जचा व्यवसाय करणारा व्हिलन आणि झाडांभोवती फेर धरून नाचण्यापुरती हिरोईन. दहापैकी नऊ सिनेमांचे कथानक याच प्रकारचे असायचे. त्यामुळेच सुनील शेट्टीसारखा ठोकळाही भाव खाऊन गेला. त्याच दरम्यान शाहरूख, सलमान, आमीर या खान मंडळींचाही स्ट्रगल सुरू होता. चिकने-चोपडे चेहरे आणि सुमार शरीरयष्टी यामुळे तिन्ही खान अॅक्शन हिरो वाटत नव्हते. त्यामुळे सुरुवातीला ते या भाऊगर्दीतलेच एक होते. त्यावेळचे दिग्दर्शकही तसेच. अगदी यश चोप्रांपासून, यश जोहर, राकेश रोशन यांसारखे मोठे दिग्दर्शकही टिपीकल मारधाडीच्याच मार्गाने जात होते. अभिनयात जशी नव्या दमाची पिढी उतरली, तशी दिग्दर्शकांचीही एक नवी फळी तयार होऊ लागली होती. पण तरीही टिपीकल मारधाडीच्या चित्रपटांचा मार्ग सोडून वेगळी वाट चोखाळायची हिंमत कुणी करत नव्हते. ती हिंमत केली आदित्य चोप्राने. यश चोप्रांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्याने दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात प्रेमकथा हाताळली. तोपर्यंत अनेक प्रेमकथा येऊन गेल्या होत्या. मात्र, त्यात तोच तोपणा होता. आदित्यने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ अशा भल्या मोठ्या नावाने ही प्रेमकथा आणली. त्याच्या एक वर्ष आधी आलेला सूरज बडजात्याचा ‘लग्नाची कॅसेट’ म्हणून हिणवला गेलेला ‘हम आपके है कौन’ तुफान चालला होता. बाजीगर, करण-अर्जुन, दिवाना असे तीन-चार हिट सिनेमे नावावर जमा असलेला शाहरूख आणि तोपर्यंत फारसा प्रभाव न दाखवू शकलेली काजोल अशा जोडीला घेऊन आदित्यने आपला ड्रीम प्रोजेक्ट हातात घेतला. तोपर्यंत हिंदी चित्रपटांमधून फारशी न दिसलेली यूरोपातील सुंदर लोकेशन्स, पंजाबमधील सरसों की खेती यामुळे सिनेमाची फ्रेम अगदी फ्रेश झाली होती. जोडीला परदेशात राहणारा गुलछबू नायक आणि भारतीय संस्कारी घरात वाढलेली नायिका यांची तितकीच ताजीतवानी प्रेमकथा. त्यात त्यावेळी फेमस असलेल्या जतीन-ललीत या जोडगोळीचं संगीत आणि उदीत नारायण, कुमार सानू, लतादिदी आणि आशा भोसले यांच्या जादूई आवाजात अजरामर झालेली गाणी. हिंदी सिनेमांतील काही गाणी पहायला चांगली वाटतात, तर काही गाणी फक्त ऐकायलाच चांगली वाटतात. मात्र, डीडीएलजेची गाणी जितकी श्रवणीय होती, तितकीच ती प्रेक्षणीयही होती.
अशी ही प्रेमकथा पडद्यावर आली आणि लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतली. ‘मेहंदी लगा के रखना’ या गाण्यासाठी चार-चार वेळा हा सिनेमा पाहिलेले लोक मी पाहिलेत. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पहावी अशी निखळ प्रेमकथा असल्यामुळे सिनेमागृहातल्या खुर्च्यांच्या रांगाच्या रांगा कुटुंबे, मित्रमंडळींसाठी बुक असायच्या. ‘डीडीएलजे’ मिळाला आणि शाहरूख खान ‘राज’ झाला. या राजनेच त्याला आज ‘किंग खान’ बनवलंय. अन्यथा, शाहरूखही अजय देवगण, अक्षय कुमारच्या पंक्तीत मारधाडीचे सिनेमे करत बसला असता. डीडीएलजेने रोमॅण्टिक लव्ह स्टोरीचे एक युग सुरू केले, जे पुढे ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘हम दिल दे चुके सनम’ यांसारख्या सिनेमांनी पुढे नेले. नव्वदच्या दशकातल्या एका संपूर्ण पिढीवरच ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ने गारूड केलंय. आज सीडी, डीव्हीडी, इंटरनेट, केबल, डझनावारी हिंदी चित्रपट वाहिन्या यामुळे घरोघरी सिनेमे पहायची सोय झाली. हा सिनेमा इतक्या वेळा टीव्हीवर येऊनही प्रत्येक वेळी तो नवा वाटतो.
आज पस्तीशी-चाळीशीत असलेल्या पिढीला आजही या सिनेमामुळे आपले मोरपंखी दिवस आठवतात. सिनेमा येऊन वीस वर्ष उलटून गेलीत. मात्र, या सिनेमातला ताजेपणा कायम आहे. त्यानंतर सिनेमांतही अनेक ट्रेण्ड आले, स्थिरावले आणि पुन्हा बदलले. मात्र, डीडीएलजेच्या लोकप्रियतेत घट झाली नाही. ‘शोले’ न पाहिलेला माणूस भारतात दाखवा, असं म्हटलं जायचं. तसंच ‘डीडीएलजे’ न पाहिलेला माणूस दाखवा, असं म्हणावं लागेल. सुभाष घईंनाही डीडीएलजेची प्रेरणा घेऊन ‘परदेस’ बनवावासा वाटला. रोहित शेट्टीच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये राज-सिम्रनचा रेल्वे सीन, आणि करण जोहरने ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’तून ‘डीडीएलजे’ला दिलेली मानवंदना, ही या सिनेमाने चित्रपटसृष्टीवरही केलेल्या गारूडाची पावतीच. मुंबईतल्या मराठा मंदिर सिनेमागृहातून हा सिनेमा वीस वर्षांनंतर उतरणार आहे, अशा बातम्या माध्यमांमधून येत होत्या. मात्र, सिनेरसिकांच्या मागणीखातर तो न उतरविण्याचा निर्णय यशराज बॅनर्स आणि मराठा मंदिर थिएटरच्या प्रशासनाने घेतला. त्यामुळे रसिकांना याच थिएटरला डीडीएलजेचं आणखी काही वर्ष पहायला मिळणार आहे. तब्बल वीस वर्ष एकाच थिएटरला दररोज सुरू असणारा आणि दर रविवारी हाऊस फुल्लचा बोर्ड झळकणारा हा जगातील ‘न भूतो, न भविष्यति(?)’ असा सिनेमा ठरला आहे, असे मला तरी वाटते. आज १२ डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होऊन वीस वर्ष होत आहेत. हॅट्स ऑफ टू आदित्य चोप्रा अॅण्ड डीडीएलजे टीम.
--
डीडीएलजेचं गारूड
Submitted by टोच्या on 11 December, 2014 - 08:16
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिनय?
अभिनय?
येस्स अभि नय तो कभी नय.. बाकी
येस्स अभि नय तो कभी नय..
बाकी प्रश्नाचा रोख समजला नाही, व्याकरण चुकले का नेहमीसारखे? अभीनय आहे का?
अरे काय वेळ आहे
अरे काय वेळ आहे लोकांकडे.__/\__
व्याकरण चुकले का
व्याकरण चुकले का नेहमीसारखे?<<<
छे छे, तुमचे काही चुकते का?
न चुकायला मी देव नाहीये (जो
न चुकायला मी देव नाहीये (जो मुळातच नाहीये), फक्त चूक झाली की कबूल करतो ईतकेच!
असो, शाहरूखच्या धाग्यावर माझा विषय नको, ते पातक मला माझ्यावर नको!
दोन दिवसांच्या सुट्टीवरून आलो
दोन दिवसांच्या सुट्टीवरून आलो तर धाग्याने दीडशतक गाठलंय.. क्या बात है..
खरोखर शाहरूखचा चेहरा आता बघवत नाही. आप की अदालतच्या विशेष भागात शाखा, सखा, आखा आले असताना शाहरूखने मुद्दाम रजत शर्माला प्रश्न विचारला, तुझी स्किन खूप छान आहे. काय सिक्रेट आहे आम्हालाही सांग. त्यावर रजतने त्याची जोरदार फिरकी घेतली. म्हणाला, ज्या दोन गोष्टी तू करतोस (सिगारेट, दारू) त्या मी करत नाही. शाहरूख गप्प!
धागा भरकटवण्याची जुनी सवय
धागा भरकटवण्याची जुनी सवय काही जात नाही लोकांची सांगुनही.
हो टोच्याजी शाहरुख ने ह्या दोन गोष्टी सोडायला हव्या होत्या आधीच.पण शाहरुख ला स्वतःची चुक समजली की कुठे गप्प व्हावे हे समजते. म्हणुन तो शाहरुख आहे.
सिगारेट, दारू >>>> व्यसने
सिगारेट, दारू
>>>>
व्यसने महाभारत काळापासून कोणाला चुकलीयत, किंबहुना हे करूनही आज तो फेअर एण्ड लव्हली आणि लक्सच्या जाहिरातीत दिसतो हि खरी कमाल!!!!
ऋन्मेऽऽष भौ.... मानले
ऋन्मेऽऽष भौ....
मानले बाबा....सई बाई ताम्हणकर असोत किंवा शा.खा. असोत, त्यांच्या उत्तम अभिनयाबाबत चांगले म्हण्ट्ले तर हरकत नाही (शा.खा. साठी फक्त, Not applicable to Sai at all), पण त्यांच्या व्यसनाबाबत ही इतके प्रेम दाखवावे हे बरे नव्हे !!
प्रसन्नभाऊ, मी स्वत:
प्रसन्नभाऊ,
मी स्वत: निर्व्यसनी आहे, साधी सुगंधित सुपारी खात नाही.
पण मला व्यसनी माणसांचा तिटकारा वाटत नसून त्यांची दया वाटते.
माझे कैक मित्र आहेत व्यसनी, त्यांचा तेवढ्यासाठी मी राग तर करू शकत नाही ना.
उलट माझ्या त्या मित्रांनी वा शाहरूखनेही व्यसन सोडले तर आनंदच होईल मला.
पण त्यांना हिणवून ते व्यसन सोडत नाहीत हा अनुभव आहे.
असो, हा टोटली वेगळ्या धाग्याचा विषय आहे, सुचवल्याबद्दल धन्यवाद!
तुर्तास इथे मुद्दा हाच आहे की या व्यसनांमुळे खरेच शाहरूख खालावला आहे पण तरीही त्याची दिसण्यातील जादू या वयातही थोडीफार आणि कालपरवापर्यंत बर्यापैकी होतीच. असे नसते तर जाहीरातीत चमकला नसता, पेज थ्री वर झळकला नसता.. मग कौतुक तर बनतेच ना!
लोकहो , ऋन्मेऽऽष शी तुमचे जे
लोकहो ,
ऋन्मेऽऽष शी तुमचे जे काही वाद घालायचे असतील ते घाला पण कारण नसताना शाहरूख खान वर तुटून पडायच काय कारण आहे ?
आता ऋन्मेऽऽष ला तो आवडतो यात त्याचा काय दोष ?
आता ऋन्मेऽऽष ला तो आवडतो यात
आता ऋन्मेऽऽष ला तो आवडतो यात त्याचा काय दोष ?
सत्यप्रिय, मागच्या
सत्यप्रिय,
मागच्या प्रतीसादावरुन<<मला आणि माझ्या मित्राला तरी हा चित्रपट आवडला नाही>> तुम्हाला आणि तुमच्या मित्राला नीट या चित्रपटाची कथा समजली नाही. यात जो काजोल चा होणारा नवरा असतो तो नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे .त्याचे हेतु चांगले नसतात कोणत्याच बाबतीत अगदी फॅक्टरी सुरु करण्याबद्दल असो ,काजोल बद्दल असो किंवा कबुतराला मारण्याच्या प्रसंगातुन लक्शात येते. आणि शाहरुख त्याची ही नीयत ओळखुन असतो.त्यामुळे शाहरुख काजोलच्या होणारया नवरयाशी आधी मैत्री मग विश्वासघात करतो हे जे तुम्ही म्हणताय तसं चुकीचं नाही.तर योग्य आहे.
तुम्हीच लिहिलेला चित्रपट 'कुछ कुछ होता है' चं उदा. घ्या ,या चित्रपटात सलमान हा पॉझिटिव्ह(कॅरेक्टर) असतो. शाहरुखला माहीत पडल्यावर की काजोलचे सलमानबरोअबर लग्न ठरले आहे तेव्हा.तो सलमान आणि काजोल च्या मधुन बाजुला होतो ,पण सलमानच शेवटी शाहरुख आणि काजोलला एकत्र आणतो . तेव्हा त्या चित्रपटात सलमान हिरो ठरतो .शाहरुखही. कोणीच कोणाचा विश्वास घात करत नाही ,जो पर्यंत नीयत चांगली असते .
आता परत एकदा नव्याने डीडीएल्जे पहा ,आवडेल तुम्हालाही, तुनळी वर आहे.
नाही हा, शाहरूख असाच करतो,
नाही हा, शाहरूख असाच करतो, परदेशमध्येही मित्राची होणारी बायको पळवून झालेय त्याचे..
शाहरूखला अभिनयाचा सल्ला
शाहरूखला अभिनयाचा सल्ला देणार्यांनो, हाच सल्ला तुम्ही रजनीकांत यांना देऊ शकाल का? त्यांनीही आर्ट फिल्म कराव्यात का? करायला हव्या होत्या का? >> रजनिकान्थ चे बालाचंदरच्या बरोबर केलेले सिनेमे हे आर्ट फिल्म पेक्षा वेगळे नव्हते. रजनीकांत हा "स्टार" झाला असला तरी त्याच्या अॅक्टींग अॅबिलिटी बद्दल कोणी प्रश्न विचारलेला आठावत नाही रे आधी.
रजनीकांत हा "स्टार" झाला असला
रजनीकांत हा "स्टार" झाला असला तरी त्याच्या अॅक्टींग अॅबिलिटी बद्दल कोणी प्रश्न विचारलेला आठावत नाही रे आधी.
>>>>>
एक्झॅक्टली, त्याला गरज नाही असे गृहीत धरूनच आपण चालतो.
पण त्याच्याही सुपरड्युपरस्टार होण्यामागे अभिनयाचा हात किती आहे..
डिटेल मधून नंतर लिहितो, चला आता ऑफिस सुटले, पण रजनीकांतचे नाव/मुद्दा पुढे टाळून न गेल्याबद्दल धन्यवाद..
>>>एक्झॅक्टली, त्याला गरज
>>>एक्झॅक्टली, त्याला गरज नाही असे गृहीत धरूनच आपण चालतो.
पण त्याच्याही सुपरड्युपरस्टार होण्यामागे अभिनयाचा हात किती आहे..<<<
रजनीकांत उत्कृष्ट अभिनेता आहे.
अवांतर - मला आता नेमका मूळ मुद्दा काय होता हेच आठवत नाही आहे. वाद आहे कशावर नक्की?
मला वाटते ऋन्मेष तुम्ही
मला वाटते ऋन्मेष तुम्ही शाहरुख खा ह्या विषयावर एक स्वतंत्र धागा काढावात.
मला वाटते ऋन्मेष तुम्ही
मला वाटते ऋन्मेष तुम्ही शाहरुख खा ह्या विषयावर एक स्वतंत्र धागा काढावात. >> +१
मला प्रतिसाद द्यायला आवडेल
मला फक्त इतकेच माहीत आहे हा
मला फक्त इतकेच माहीत आहे हा धागा डीडीएलजे या चित्रपटावर आहे. फक्त शाहरुख वर नाही ,त्यामुळे चित्रपटावर प्रतीसाद यायला हवेत.
या चित्रपटातील सगळ्यांची कामे सुंदर आहेत .अगदी काजोलच्या लहान बहिणीचे काम केलेल्या चुटकी म्हणजे पूजा रुपारेल हिचे ही. काही विनोदी सीनही छान आहेत .अप्रतीम रीत्या परदेशात चित्रीत केलेला चित्रपट आणि पंजाबी संस्कृती व वातावरणाचा योग्य असा मिलाफ या चित्रटात केला आहे. योग्य रीत्या बांधुन प्रीज़ेन्ट केलेला हा चित्रपट म्हणुनच क्लासिक आणि अविस्मरणीय वाटतो मलातरी.
या सिनेमातील ‘घर आजा परदेसी’
या सिनेमातील ‘घर आजा परदेसी’ हे तुकड्या तुकड्यांतून येणारं गाणंही कथा पुढे सरकवत नेतं. गाणं अप्रतिम. कुणी गायलंय माहित नाही. पण मला हे गाणं खूप आवडतं.
फरिदा जलाल या चित्रपटाच्या
फरिदा जलाल या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी कधीच इंग्लंडला गेली नाही
त्यांचे घराचा सेट मुंबईतच असल्याने त्यांना तिथे जावे लागले नाही.
टोच्या ते गाणे मनप्रीत आणी
टोच्या ते गाणे मनप्रीत आणी पामेला चोप्राने म्हणलेय. पामेला चोप्रा ही यश चोप्रा यान्ची पत्नी. ती गायिका पण आहे.
http://en.wikipedia.org/wiki/
http://en.wikipedia.org/wiki/Pamela_Chopra
घर आज परदेसी गाणं मनप्रीत कौर
घर आज परदेसी गाणं मनप्रीत कौर आणि पामेला चोप्रा ह्यांनी गायलं आहे.
रजनीकांत उत्कृष्ट अभिनेता
रजनीकांत उत्कृष्ट अभिनेता आहे.
>>>>>>>>>
ओके म्हणजे त्यानेही शाहरूख सारखे आपल्या अभिनयाला वाव दिला नसावा, कारण फारसा बघण्यात नाही आला अभिनय..
हिंदितल्या अंधा कानून मध्ये मात्र धमाल उडवली होती..
ओके म्हणजे त्यानेही शाहरूख
ओके म्हणजे त्यानेही शाहरूख सारखे आपल्या अभिनयाला वाव दिला नसावा, कारण फारसा बघण्यात नाही आला अभिनय..>>आँ?? किमान चालबाज नाही बघितला का?
रण फारसा बघण्यात नाही आला
रण फारसा बघण्यात नाही आला अभिनय..>> काय?? काय व्याख्या काय आहे तुमच्या अभिनयाची?
ओके म्हणजे त्यानेही शाहरूख
ओके म्हणजे त्यानेही शाहरूख सारखे आपल्या अभिनयाला वाव दिला नसावा, कारण फारसा बघण्यात नाही आला अभिनय.. >> देवा ! वर नाव दिलय ना कि कोणाच्या सिनेमामधे त्याचा "अभिनय" बघता येईल ते. 'फक्त तू बघितलेले सिनेमे' एव्हढ्यावर तू एखाद्याची अभिनय क्षमता जोखणार का ? तुला असे चुकूनही वाटत नाही का ठाम मते पब्लिक फोरमवर टाकायच्या अगोदर थोडा तरी रिसर्च करायला हवा. गेल्या आठवड्यामधे कमला हस्सन बद्दल तेच, हा आठवडा रजनीचा, पुढच्या आठ्वड्यासाठी माम्मुटि कि मोहनलाल ?
चिरंजीव ऋन्मेष, आपण बघितलेले
चिरंजीव ऋन्मेष,
आपण बघितलेले चित्रपट हाच कोणाचीही अभिनयक्षमता जोखण्याचा निकष हे आधी डोक्यातून काढून टाका. अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालंच, तर अमिताभ, रजनीकांत, कमल् हसन, मोहनलाल, नसीर, नाना पाटेकर, ओम पुरी, दिलीप प्रभावळकर, अमरापूरकर, अमरीश पुरी हे तुलनेने १९८० नंतरचे आणि जुन्या पिढीतले बलराज सहानी, दिलीपकुमार, राज कपूर या सर्वांच्या तुलनेत शाहरुख खान कुठेच उभा राहणार नाही. प्रामाणिकपणे सांगायचंच झालं तर आजच्या अभिनेत्यांपैकी आमिर खान, रणबीर कपूर, अभय देओलने केल्या तितक्याही वेगवेगळ्या भूमिका त्याने कधी केल्या नाहीत.
Pages