डीडीएलजेचं गारूड

Submitted by टोच्या on 11 December, 2014 - 08:16

‘कम, फॉल इन लव्ह…’ अशी टॅगलाइन घेऊन आदित्य चोप्रानं निखळ करमणूक करणारी प्रेमकथा आणली आणि तिने अक्षरशः हिंदी चित्रपटांचे भविष्य बदलून टाकले. तो काळ अमिताभ नावाचे वादळ शांत होण्याचा होता. अमिताभने घालून दिलेल्या मार्गावरच चालण्याच्या उद्देशाने तेव्हा अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी यांसारख्या अॅक्शन हिरोंची नव्या दमाची फळी उभी राहिली. नव्वदच्या दशकानंतर हिंदी चित्रपट एकाच वळणाने जात होता. दणकट हिरो, त्याच्यावर झालेला अन्याय, त्यासाठी त्याचे पेटून उठणे, ड्र्ग्जचा व्यवसाय करणारा व्हिलन आणि झाडांभोवती फेर धरून नाचण्यापुरती हिरोईन. दहापैकी नऊ सिनेमांचे कथानक याच प्रकारचे असायचे. त्यामुळेच सुनील शेट्टीसारखा ठोकळाही भाव खाऊन गेला. त्याच दरम्यान शाहरूख, सलमान, आमीर या खान मंडळींचाही स्ट्रगल सुरू होता. चिकने-चोपडे चेहरे आणि सुमार शरीरयष्टी यामुळे तिन्ही खान अॅक्शन हिरो वाटत नव्हते. त्यामुळे सुरुवातीला ते या भाऊगर्दीतलेच एक होते. त्यावेळचे दिग्दर्शकही तसेच. अगदी यश चोप्रांपासून, यश जोहर, राकेश रोशन यांसारखे मोठे दिग्दर्शकही टिपीकल मारधाडीच्याच मार्गाने जात होते. अभिनयात जशी नव्या दमाची पिढी उतरली, तशी दिग्दर्शकांचीही एक नवी फळी तयार होऊ लागली होती. पण तरीही टिपीकल मारधाडीच्या चित्रपटांचा मार्ग सोडून वेगळी वाट चोखाळायची हिंमत कुणी करत नव्हते. ती हिंमत केली आदित्य चोप्राने. यश चोप्रांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्याने दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात प्रेमकथा हाताळली. तोपर्यंत अनेक प्रेमकथा येऊन गेल्या होत्या. मात्र, त्यात तोच तोपणा होता. आदित्यने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ अशा भल्या मोठ्या नावाने ही प्रेमकथा आणली. त्याच्या एक वर्ष आधी आलेला सूरज बडजात्याचा ‘लग्नाची कॅसेट’ म्हणून हिणवला गेलेला ‘हम आपके है कौन’ तुफान चालला होता. बाजीगर, करण-अर्जुन, दिवाना असे तीन-चार हिट सिनेमे नावावर जमा असलेला शाहरूख आणि तोपर्यंत फारसा प्रभाव न दाखवू शकलेली काजोल अशा जोडीला घेऊन आदित्यने आपला ड्रीम प्रोजेक्ट हातात घेतला. तोपर्यंत हिंदी चित्रपटांमधून फारशी न दिसलेली यूरोपातील सुंदर लोकेशन्स, पंजाबमधील सरसों की खेती यामुळे सिनेमाची फ्रेम अगदी फ्रेश झाली होती. जोडीला परदेशात राहणारा गुलछबू नायक आणि भारतीय संस्कारी घरात वाढलेली नायिका यांची तितकीच ताजीतवानी प्रेमकथा. त्यात त्यावेळी फेमस असलेल्या जतीन-ललीत या जोडगोळीचं संगीत आणि उदीत नारायण, कुमार सानू, लतादिदी आणि आशा भोसले यांच्या जादूई आवाजात अजरामर झालेली गाणी. हिंदी सिनेमांतील काही गाणी पहायला चांगली वाटतात, तर काही गाणी फक्त ऐकायलाच चांगली वाटतात. मात्र, डीडीएलजेची गाणी जितकी श्रवणीय होती, तितकीच ती प्रेक्षणीयही होती.
अशी ही प्रेमकथा पडद्यावर आली आणि लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतली. ‘मेहंदी लगा के रखना’ या गाण्यासाठी चार-चार वेळा हा सिनेमा पाहिलेले लोक मी पाहिलेत. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पहावी अशी निखळ प्रेमकथा असल्यामुळे सिनेमागृहातल्या खुर्च्यांच्या रांगाच्या रांगा कुटुंबे, मित्रमंडळींसाठी बुक असायच्या. ‘डीडीएलजे’ मिळाला आणि शाहरूख खान ‘राज’ झाला. या राजनेच त्याला आज ‘किंग खान’ बनवलंय. अन्यथा, शाहरूखही अजय देवगण, अक्षय कुमारच्या पंक्तीत मारधाडीचे सिनेमे करत बसला असता. डीडीएलजेने रोमॅण्टिक लव्ह स्टोरीचे एक युग सुरू केले, जे पुढे ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘हम दिल दे चुके सनम’ यांसारख्या सिनेमांनी पुढे नेले. नव्वदच्या दशकातल्या एका संपूर्ण पिढीवरच ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ने गारूड केलंय. आज सीडी, डीव्हीडी, इंटरनेट, केबल, डझनावारी हिंदी चित्रपट वाहिन्या यामुळे घरोघरी सिनेमे पहायची सोय झाली. हा सिनेमा इतक्या वेळा टीव्हीवर येऊनही प्रत्येक वेळी तो नवा वाटतो.
आज पस्तीशी-चाळीशीत असलेल्या पिढीला आजही या सिनेमामुळे आपले मोरपंखी दिवस आठवतात. सिनेमा येऊन वीस वर्ष उलटून गेलीत. मात्र, या सिनेमातला ताजेपणा कायम आहे. त्यानंतर सिनेमांतही अनेक ट्रेण्ड आले, स्थिरावले आणि पुन्हा बदलले. मात्र, डीडीएलजेच्या लोकप्रियतेत घट झाली नाही. ‘शोले’ न पाहिलेला माणूस भारतात दाखवा, असं म्हटलं जायचं. तसंच ‘डीडीएलजे’ न पाहिलेला माणूस दाखवा, असं म्हणावं लागेल. सुभाष घईंनाही डीडीएलजेची प्रेरणा घेऊन ‘परदेस’ बनवावासा वाटला. रोहित शेट्टीच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये राज-सिम्रनचा रेल्वे सीन, आणि करण जोहरने ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’तून ‘डीडीएलजे’ला दिलेली मानवंदना, ही या सिनेमाने चित्रपटसृष्टीवरही केलेल्या गारूडाची पावतीच. मुंबईतल्या मराठा मंदिर सिनेमागृहातून हा सिनेमा वीस वर्षांनंतर उतरणार आहे, अशा बातम्या माध्यमांमधून येत होत्या. मात्र, सिनेरसिकांच्या मागणीखातर तो न उतरविण्याचा निर्णय यशराज बॅनर्स आणि मराठा मंदिर थिएटरच्या प्रशासनाने घेतला. त्यामुळे रसिकांना याच थिएटरला डीडीएलजेचं आणखी काही वर्ष पहायला मिळणार आहे. तब्बल वीस वर्ष एकाच थिएटरला दररोज सुरू असणारा आणि दर रविवारी हाऊस फुल्लचा बोर्ड झळकणारा हा जगातील ‘न भूतो, न भविष्यति(?)’ असा सिनेमा ठरला आहे, असे मला तरी वाटते. आज १२ डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होऊन वीस वर्ष होत आहेत. हॅट्स ऑफ टू आदित्य चोप्रा अॅण्ड डीडीएलजे टीम.
--

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर जुन्या आर्ट फिल्म जरुर पहा. नसीर, शबाना, स्मिता, अमरीश, ओम पुरी यानी अक्षरशः गाजवला होता तो काळ. अर्थात, मी ते सिनेमे दूरदर्शन वर पाहीले होते. आक्रोश तर मला हॉरर सिनेमा पेक्षा टेरर वाटला होता. नसीरचा मिर्च मसाला, स्मिताचा मन्डी, शबाना-स्मिताचा अर्थ.

शाहरुखचा धागा हायजॅक झाला पण कधीतरी मी पण शाहरुख फॅन होते त्यामुळे मला मनापासुन वाटते की या माणसाने माकड चाळे सोडुन एखादा तरी असा सिनेमा करावा, की ज्यात त्याची आतली अभिनय क्षमता भरभरुन वर येईल. त्याची क्षमता होती, पण सुपरस्टार बनण्याच्या नादात त्यानी ती घालवली हे माझे वै. प्रामाणीक मत आहे.

चाळे कुणाला सुटले आहेत का? अमिताभ बच्चन पासुन ते रणवीर सिंग पर्यंत सगळेच करत आहेत (आठवा बुम, केईएनके) सगळ्यांचीच थेर आहे. वयस्कर झाले तरी कॉलेजात जाणारा तरुणच हवा अर्ध्यावयाची नायिकाच हवी असे बरेच चाळे सगळ्यांनीच केले आहे. त्यामुळे एकालाच झोडपायचे आणि दुसर्‍याला गोंजारायचे हे चुकिचे आहे. एकसुरी अभिनय आणि चित्रपट करणार्‍या अमिताभ बच्चनला अभिनय काय चीज आहे माहीत नाही हे खुद्द नसिरुद्दीन शाह / नाना पाटेकर बोलले आहेत. जस जसे काळ पुढे गेला बच्चनला हिरोपंती सोडुन द्यावी लागली आणि चरित्र रंगवायला सुरुवात केली तेव्हा कुठे ताकदवान रोल मिळायला सुरुवात झाली.

आयडीयली, सगळेच!!! पण किमान ८०% सिनेमा तरी पाहिल्याशिवाय असे मत ठोकण हे केवळ हास्यास्पद आहे.
>>>>>>>>
अशक्य आहे हे विधान!
सचिन चांगला फलंदाज आहे हे समजायला त्याची ८० टक्के कारकिर्द बघायला हवी सारखे वाटतेय.
असो, तरी हिंदीतले सारेच किंवा बरेच पाहिले आहेत. त्याच्यात एक अदाकारी आहे, नो डाऊट. पण त्याला अभिनय नाही म्हणता येत. वेशभूषा आणि रंगरंगोटी करून जी व्यक्तीरेखा उभारले जाते त्याला अभिनय नाही म्हणत, तर व्यक्तीरेखा देहबोली आणि लकबीतून उभारली गेली पाहिजे. तसेच त्या रंगरंगोटीत तो एक्स्प्रेशन्स दाखवायलाही कमी पडतो वा इतर वेळीही त्याला ते जमत नाही. सद्मा चित्रपटासारखे ओवरअ‍ॅक्टींग होते, चेहरा वेडावाकडाच जास्त होतो. पुष्पकमध्येही त्याने जेमतेमच अभिनय दाखवला, जिथे खरे तर त्याचाच सारा खेळ होता. अर्थात तो अगदीच सामान्य आहे असे नाही, पण ओवररेटेड आहे.

@ ऋन्मेऽऽष

<< आपल्याकडे लोक कमल हसन सारख्या रंगरंगोटी करून कर्तब दाखवणार्‍यालाही महान अभिनेता समजतात, त्याचे आपण काही करू शकत नाही, प्रत्येकाचे निकष. >>

कमल हसन यांस ते महान अभिनेता होते असे भूतकाळवाचक वाक्यात लिहायला लागावे अशी आज परिस्थिती आहे. त्यांचे अप्पू राजा, मेयरसाब, चाची चारसौबीस हिंदुस्थानी इथवरचे चित्रपट अभिनय + रंगरंगोटी दोन्हीचे अफलातून मिश्रण होते. बॉम्बे एक्स्प्रेस, दशावतार या चित्रपटांमध्ये अभिनय कापरासारखा उडून गेला आणि उरली फक्त रंगरंगोटी. विश्वरूपम् पाहायची इच्छाच झाली नाही. असो. त्यामुळे ऋन्मेऽऽष यांनी कमल हासन यांचे केवळ अलीकडल्या काळातले चित्रपट पाहून भाष्य केले असेल असे वाटते. परंतु त्याचवेळी त्यांनी हेदेखील लक्षात घ्यावे की इतर प्रतिसादकांनी त्यांचे जुने चित्रपट देखील पाह्यले असल्याने ते आपल्या विधानास कडाडून विरोध करण्याची शक्यता आहे.

चेतनजी,
रंगरंगोटीने आणलेली लकाकी जास्त वेळ नाही राहत, आतले मटेरीअल उघडे पडतेच. त्या चित्रपटातही ती रंगरंगोटी काढल्यावर त्याचे जे रूप असायचे त्यात त्याचा काही विशेष करीश्मा नाही जाणवायचा किंवा सकस अभिनय नसायचा त्यात..

कमल हस्सन च्या अभिनयाला ऋन्मेऽऽष च्याच काय कोणाच्याच पोचपावतीची गरज नसावी. खेदाची गोष्ट एव्हढीच आहे कि त्यांनी ज्या सिनेमांच्या जोरावर कमल हस्सनबद्दल शंका घेतल्या आहेत ते नेमके त्याचे गिमिक असलेले सिनेमे आहेत.

Banging Head on Computer Keyboard photo BangingHeadAgainstKeyboardStreetSig.gif ही घ्या रश्मी ,याच दिवसासाठी मागुन घेतली होती . अरे बापरे ! ज्यांच्याकडुन मागितली होती तेही आहेत या सगळ्यांच्यात .ते धागे काढ्णारे त्यांचे तर धागेच गायब व्हायला हवेत. नक्की शाहरुख चे फॅन आहात का????विषय भलतीकडे नेण्यात मास्टर आहेत सगळेच. डीडीएलजे वर बोला कुणीतरी...

असेही शाखाचे माकडचाळे तेव्हाही डोक्यात गेले होते आणि नंतर त्याने अजिर्ण होईपर्यंत तेच केले... > Happy Happy

दिवाकर देशमुख @
मस्त लिंक ,छान लिहिलय लेखिकेने आणि रोजा ची आठवण पण मस्त..:स्मित:

@ रश्मी.. | 12 December, 2014 - 17:42 नवीन

<< ओ चेतन आमी एवडे बी म्हातारे झालो न्हाईत ना वो अजून. कायतरीच बोलताय बगा. >>

आपण वृद्ध आहात असे माझे विधान नसून चि. ऋन्मेऽऽष हे तुलनेने नव्या पिढीचे प्रतिनिधी आहेत असे मला म्हणावयाचे होते. असो.

चि. ऋन्मेऽऽष हे तुलनेने नव्या पिढीचे प्रतिनिधी आहेत असे मला म्हणावयाचे होते. Lol चि. चा अर्थ चेतनजी काय अपेक्षित आहे.

बेफि, आपल्या मुलीचं फुकटात लग्न होत असेल तर अशा वेळी कोण बाप म्हणणार नाही जी ले अपनी जिंदगी Lol

वैय्यक्तिक मतः हा सिनेमा अत्यंत बंडल आहे.

डीडी एल जे डोळ्याला खूप छन वाटतो. आणि त्याची गाणी पण. चालत्या गाडीतून हात देण्याचा सीन अक्षरशः बेंचमार्क बनला.
शाहरुख गोड दिसतो या चित्रपटात . पण शाहरुखचा राजू बन गया जंटलमन आणि कभी हा कभी ना मधला अभिनय जास्त खरा वाटतो.

चेतन.:हहगलो: नशीब, नुसतेच चि. म्हणालात.... मी तर त्याला बाळ केलय.:खोखो:

सिनी धन्यवाद.:स्मित:

टोच्या.:फिदी: " हे राम " भारीये

कोकम, तुम्हाला हा सिनेमा आवडला नाही ते कळालं Happy
तुमच्या मताचा आदर आहे. आय होप केवळ तुम्हाला तो सिनेमा आवडला नाही हे सांगायला सिनेमाचा पाणौतरा करणार्‍या हजार गोष्टींची हजार पोस्टरे तुम्ही टाकणार नाही Happy

पुर्वीचे सगळेच सिनेमे अ आणि अ होते. अगदी शोले देखील... तिथे हा कसा अपवाद असेल? Happy

Riya. To movie bandal aani murkha aahe hi goshta spashta Astana me hajar poshti ka taku?

बघा ना रश्मी, चांगलं शांत बसलेल्या माणसाला उचकवतात. आता मी म्हणून गप्प बसतो (हाहा).
पण असता एखादा तिरसट तर या सिनेमाची पिसं काढणारा लेखच छापला असता की नाही? Wink

गाडीत घेण्याच्या लॉजिक वरुन आठवले.चेन्नाई एक्सप्रेस मधे शाहरुख इतक्या लोकांना एकापाठोपाठ हात देऊन चालत्या (वेग वाढणार्‍या बरंका) गाडीत कसे घेतो हे भयंकर विनोदी आणि अ आणि अ आहे.

आदरणीय प्रिय रियाताई

आपली नम्रपणे केलेली विनंती विचाराधीन आहे, आणि त्यावर सकारात्मक विचार करावा असेही मनी आहे - पण पण पण - >> आय होप केवळ तुम्हाला तो सिनेमा आवडला नाही हे सांगायला सिनेमाचा पाणौतरा करणार्‍या हजार गोष्टींची हजार पोस्टरे तुम्ही टाकणार नाही>>

हे वाक्य आमच्या कोमल मनांस व त्याहून कमकुवत हृदयास लागले असून त्यामुळे पुढे काय होईल त्याची आम्ही हमी देऊ शकत नाही. Wink

Pages