डीडीएलजेचं गारूड

Submitted by टोच्या on 11 December, 2014 - 08:16

‘कम, फॉल इन लव्ह…’ अशी टॅगलाइन घेऊन आदित्य चोप्रानं निखळ करमणूक करणारी प्रेमकथा आणली आणि तिने अक्षरशः हिंदी चित्रपटांचे भविष्य बदलून टाकले. तो काळ अमिताभ नावाचे वादळ शांत होण्याचा होता. अमिताभने घालून दिलेल्या मार्गावरच चालण्याच्या उद्देशाने तेव्हा अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी यांसारख्या अॅक्शन हिरोंची नव्या दमाची फळी उभी राहिली. नव्वदच्या दशकानंतर हिंदी चित्रपट एकाच वळणाने जात होता. दणकट हिरो, त्याच्यावर झालेला अन्याय, त्यासाठी त्याचे पेटून उठणे, ड्र्ग्जचा व्यवसाय करणारा व्हिलन आणि झाडांभोवती फेर धरून नाचण्यापुरती हिरोईन. दहापैकी नऊ सिनेमांचे कथानक याच प्रकारचे असायचे. त्यामुळेच सुनील शेट्टीसारखा ठोकळाही भाव खाऊन गेला. त्याच दरम्यान शाहरूख, सलमान, आमीर या खान मंडळींचाही स्ट्रगल सुरू होता. चिकने-चोपडे चेहरे आणि सुमार शरीरयष्टी यामुळे तिन्ही खान अॅक्शन हिरो वाटत नव्हते. त्यामुळे सुरुवातीला ते या भाऊगर्दीतलेच एक होते. त्यावेळचे दिग्दर्शकही तसेच. अगदी यश चोप्रांपासून, यश जोहर, राकेश रोशन यांसारखे मोठे दिग्दर्शकही टिपीकल मारधाडीच्याच मार्गाने जात होते. अभिनयात जशी नव्या दमाची पिढी उतरली, तशी दिग्दर्शकांचीही एक नवी फळी तयार होऊ लागली होती. पण तरीही टिपीकल मारधाडीच्या चित्रपटांचा मार्ग सोडून वेगळी वाट चोखाळायची हिंमत कुणी करत नव्हते. ती हिंमत केली आदित्य चोप्राने. यश चोप्रांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्याने दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात प्रेमकथा हाताळली. तोपर्यंत अनेक प्रेमकथा येऊन गेल्या होत्या. मात्र, त्यात तोच तोपणा होता. आदित्यने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ अशा भल्या मोठ्या नावाने ही प्रेमकथा आणली. त्याच्या एक वर्ष आधी आलेला सूरज बडजात्याचा ‘लग्नाची कॅसेट’ म्हणून हिणवला गेलेला ‘हम आपके है कौन’ तुफान चालला होता. बाजीगर, करण-अर्जुन, दिवाना असे तीन-चार हिट सिनेमे नावावर जमा असलेला शाहरूख आणि तोपर्यंत फारसा प्रभाव न दाखवू शकलेली काजोल अशा जोडीला घेऊन आदित्यने आपला ड्रीम प्रोजेक्ट हातात घेतला. तोपर्यंत हिंदी चित्रपटांमधून फारशी न दिसलेली यूरोपातील सुंदर लोकेशन्स, पंजाबमधील सरसों की खेती यामुळे सिनेमाची फ्रेम अगदी फ्रेश झाली होती. जोडीला परदेशात राहणारा गुलछबू नायक आणि भारतीय संस्कारी घरात वाढलेली नायिका यांची तितकीच ताजीतवानी प्रेमकथा. त्यात त्यावेळी फेमस असलेल्या जतीन-ललीत या जोडगोळीचं संगीत आणि उदीत नारायण, कुमार सानू, लतादिदी आणि आशा भोसले यांच्या जादूई आवाजात अजरामर झालेली गाणी. हिंदी सिनेमांतील काही गाणी पहायला चांगली वाटतात, तर काही गाणी फक्त ऐकायलाच चांगली वाटतात. मात्र, डीडीएलजेची गाणी जितकी श्रवणीय होती, तितकीच ती प्रेक्षणीयही होती.
अशी ही प्रेमकथा पडद्यावर आली आणि लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतली. ‘मेहंदी लगा के रखना’ या गाण्यासाठी चार-चार वेळा हा सिनेमा पाहिलेले लोक मी पाहिलेत. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पहावी अशी निखळ प्रेमकथा असल्यामुळे सिनेमागृहातल्या खुर्च्यांच्या रांगाच्या रांगा कुटुंबे, मित्रमंडळींसाठी बुक असायच्या. ‘डीडीएलजे’ मिळाला आणि शाहरूख खान ‘राज’ झाला. या राजनेच त्याला आज ‘किंग खान’ बनवलंय. अन्यथा, शाहरूखही अजय देवगण, अक्षय कुमारच्या पंक्तीत मारधाडीचे सिनेमे करत बसला असता. डीडीएलजेने रोमॅण्टिक लव्ह स्टोरीचे एक युग सुरू केले, जे पुढे ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘हम दिल दे चुके सनम’ यांसारख्या सिनेमांनी पुढे नेले. नव्वदच्या दशकातल्या एका संपूर्ण पिढीवरच ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ने गारूड केलंय. आज सीडी, डीव्हीडी, इंटरनेट, केबल, डझनावारी हिंदी चित्रपट वाहिन्या यामुळे घरोघरी सिनेमे पहायची सोय झाली. हा सिनेमा इतक्या वेळा टीव्हीवर येऊनही प्रत्येक वेळी तो नवा वाटतो.
आज पस्तीशी-चाळीशीत असलेल्या पिढीला आजही या सिनेमामुळे आपले मोरपंखी दिवस आठवतात. सिनेमा येऊन वीस वर्ष उलटून गेलीत. मात्र, या सिनेमातला ताजेपणा कायम आहे. त्यानंतर सिनेमांतही अनेक ट्रेण्ड आले, स्थिरावले आणि पुन्हा बदलले. मात्र, डीडीएलजेच्या लोकप्रियतेत घट झाली नाही. ‘शोले’ न पाहिलेला माणूस भारतात दाखवा, असं म्हटलं जायचं. तसंच ‘डीडीएलजे’ न पाहिलेला माणूस दाखवा, असं म्हणावं लागेल. सुभाष घईंनाही डीडीएलजेची प्रेरणा घेऊन ‘परदेस’ बनवावासा वाटला. रोहित शेट्टीच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये राज-सिम्रनचा रेल्वे सीन, आणि करण जोहरने ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’तून ‘डीडीएलजे’ला दिलेली मानवंदना, ही या सिनेमाने चित्रपटसृष्टीवरही केलेल्या गारूडाची पावतीच. मुंबईतल्या मराठा मंदिर सिनेमागृहातून हा सिनेमा वीस वर्षांनंतर उतरणार आहे, अशा बातम्या माध्यमांमधून येत होत्या. मात्र, सिनेरसिकांच्या मागणीखातर तो न उतरविण्याचा निर्णय यशराज बॅनर्स आणि मराठा मंदिर थिएटरच्या प्रशासनाने घेतला. त्यामुळे रसिकांना याच थिएटरला डीडीएलजेचं आणखी काही वर्ष पहायला मिळणार आहे. तब्बल वीस वर्ष एकाच थिएटरला दररोज सुरू असणारा आणि दर रविवारी हाऊस फुल्लचा बोर्ड झळकणारा हा जगातील ‘न भूतो, न भविष्यति(?)’ असा सिनेमा ठरला आहे, असे मला तरी वाटते. आज १२ डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होऊन वीस वर्ष होत आहेत. हॅट्स ऑफ टू आदित्य चोप्रा अॅण्ड डीडीएलजे टीम.
--

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधीतरी मी पण शाहरुख फॅन होते त्यामुळे मला मनापासुन वाटते की या माणसाने माकड चाळे सोडुन एखादा तरी असा सिनेमा करावा, की ज्यात त्याची आतली अभिनय क्षमता भरभरुन वर येईल. त्याची क्षमता होती, पण सुपरस्टार बनण्याच्या नादात त्यानी ती घालवली हे माझे वै. प्रामाणीक मत आहे.+१

सचिन हा क्रिकेटमधील शारूख आहे असा निष्कर्श काढू शकतो>>>>. असले निष्कर्ष तूच काढ भाऊ. मी कधी तरी सचीनला मैदानावर किन्वा इतरत्र माकडचाळे करताना पाहिले नाही किन्वा कुठल्याच कन्ट्रोव्हर्सी मध्ये अडकताना / अडकलेला बघीतले नाहीये. उगाच तुलना कशाला त्याच्याशी? कहा राजा भोज आणी गन्गु तेली?

मी चेन्नई ला जा असे म्हणले कारण इथे बसुन तू त्याचे ( शाहरुखचे ) कौतुक करतोयस, हेच कौतुक तू चेन्नईला जाऊन कमल शी तुलना करताना ती चार चौघात करुन बघ. लोक तुला येड्यात काढतील. तू अजून बच्चा आहेस, उगाच कमल, अमिताभ सारख्याना शाहरुखच्या पन्क्तीत बसवुच नकोस. खुद्द शाहरुख सुद्धा मान्य करेल की तो या दोघान्च्या तुलनेत कमी आहे. मी आधीच म्हणले आहे की शाहरुख जवळ चान्गली अभिनय क्षमता असताना देखील तो स्वदेस सारखे चान्गले सिनेमे आता करु धजत नाही,, याला कारण तो स्वतःला या भूमिकान्पेक्षाही श्रेष्ठ समजतो.

त्याला प्रियदर्शन सारखे दिग्दर्शक हवेत, जे कलाकाराच्या आतला कलाकार हेरतात आणी त्याला वाव देतात. हेराफेरी ( नवा ) पाहीलास ना? ज्यात अक्षयकुमार आणी सुनिल शेट्टी सारखे अ‍ॅक्शन हिरो सुद्धा दर्जेदार कॉमेडी करु शकतात हे सिद्ध झालेय.

अमिताभचा डॉन बघ आणी शाहरुखचा नवीन डॉन बघ, ( बघीतला असशील तरी तू मान्य करणार नाहीस, उगाच त्याच्या बाजूने दे दणादण पोस्टी टाकुन त्याची बाजू मात्र लावुन धरशील हेच खरे). आणी मग तुलना कर ह.

चेतन, तुमची पोस्ट मस्त आहे, पण बाबाजी ते मान्य करणार नाहीत.:स्मित:

कोहलीची तूलना सचीन बरोबर? कोणी केली? कधी?

सचिन स्वतः एकदा म्हणाला की माझी रेकॉर्ड मोडण्याची क्षमता रोहीत आणि विराट मध्ये आहे. हे त्यावरुन ठरले का?

शाहरूख - फौजी, डर, बाझीगर आणि राजू बन गया जंटलमन नंतर थेट स्वदेश आणि चक दे मध्ये आवडला.

मी कधी तरी सचीनला मैदानावर किन्वा इतरत्र माकडचाळे करताना पाहिले नाही किन्वा कुठल्याच कन्ट्रोव्हर्सी मध्ये अडकताना / अडकलेला बघीतले नाहीये. उगाच तुलना कशाला त्याच्याशी? कहा राजा भोज आणी गन्गु तेली?
>>>>>>>>>>>>
निकष चुकत आहेत, मी त्यांची तुलना त्यांची लोकप्रियता, स्टारडम, आणि आपापल्या क्षेत्रातील नंबर वन असणे यावर केली आहे.
तरीगी आपण सचिनला कुठल्याच कन्ट्रोव्हर्सी मध्ये अडकताना पाहिले नसले तरी ते तसे नाहीये, तो बरेच कन्ट्रोव्हर्सी मध्ये अडकला आहे, पण असो, तो या धाग्याचा विषय नाही.

..

हेच कौतुक तू चेन्नईला जाऊन कमल शी तुलना करताना ती चार चौघात करुन बघ. लोक तुला येड्यात काढतील.
>>>>>
एक्झॆक्टली, चेन्नईचे लोक येड्यात काढतील असेच आपल्याला वाटते यातच सारे आले.. व्यक्तीपूजा.. त्यांच्या येड्यात काढण्याने मला फरक पडण्याचा काही संबंध येत नाही..
अगदीच सांगायचे झाल्यास पृथ्वी हि सुर्याभोवती फिरते हे सर्वप्रथम सांगणार्‍यालाही वेड्यातच काढले गेले होते कारण इतरांची सूर्य पृथ्वीबोबती फिरतो यावर श्रद्धा होती.. तर अश्याच श्रद्धाळू लोकांनी मला वेड्यात काढल्याने मला काहीही फरक पडू नये..

....

तू अजून बच्चा आहेस,
>>>>>
थॅंक्स फॉर कॉम्प्लीमेंट.. मेरे त्वचासे मेरे उमर का पताही नही चलता Happy

..

उगाच कमल, अमिताभ सारख्याना शाहरुखच्या पन्क्तीत बसवुच नकोस. खुद्द शाहरुख सुद्धा मान्य करेल की तो या दोघान्च्या तुलनेत कमी आहे.
>>>>>>>
हा शाहरूखचा विनम्रपणा झाला !!

...

अमिताभचा डॉन बघ आणी शाहरुखचा नवीन डॉन बघ, ( बघीतला असशील तरी तू मान्य करणार नाहीस, उगाच त्याच्या बाजूने दे दणादण पोस्टी टाकुन त्याची बाजू मात्र लावुन धरशील हेच खरे). आणी मग तुलना कर ह.
>>>>>>
माझाच अजरामर डायलॉग धागा बघा. त्यात मी स्वत: लिहिले आहे की शाहरूखने अमिताभचा डॉन करून चूक केली कारण त्या ऎक्शनपटात त्या तोडीची संवादफेक तो नाही करू शकत.. मी हे कबूल करू शकतो कारण मी व्यक्तीपूजक नाही.. चाहता आहे..

पण याउलट आपन कधीच अमिताभ-आमीर, सलमान-आमीर, सलमान-अक्षय वगैरे वगैरे मध्ये नंबर वन कोण वा सुपर्रस्टार कोण अश्या तुलना कधी करत नाही वा ऐकल्या नाहीत.. कारण उघड आहे, कोणालाही त्या पदावर आपला दावा सांगायचा असेल तर त्याला शाहरूखलाच त्या पदावरून पायउतार करावे लागणार.. >>>

यातून अमिताभला वगळ. अमिताभ लोकप्रिय झाल्यानंतर तो जोपर्यंत लीड रोल्स करत होता तोपर्यंत नवीन यशस्वी येणार्‍या प्रत्येक कलाकाराची, एवढेच नव्हे तर त्याच्या आधीपासून लोकप्रिय असणार्‍या प्रत्येक कलाकाराची तुलना कायम अमिताभशीच झालेली आहे. दुसरे म्हणजे शाहरूखची तुलना तू ज्या कलाकारांशी वरती केली आहेस त्यातील जे त्याच्या समकालीन आहेत (लीड रोल्स मधे) त्यांच्याशी ठीक आहे. अमिताभ ची पिढी वेगळी आहे.

सचिन शी तुलनाही चुकीची आहे कारण सचिन इतकी जेंडर, पिढी, क्लासेस-मासेस, भाषा ई. भेदून जाणारी लोकप्रियता शाहरूखची नाही.

तसेही इतर कुणीही विषय काढला नसताना प्रथम स्वतःच कमल हसनशी तुलना करायची आणि नंतर म्हणायचे <आणि आता शाहरूखची तुलना कमल हसनशी...> हा प्रकार म्हणजे उच्चीचा आहे. आता सचिन तेंडुलकरचा मुद्दाही तुम्हीच काढलेला आहे, तेव्हा पुढे काही पानांनंतर " आता शाहरुखची तुलना सचिनशी सुद्धा होते " हेही म्हणायला मोकळे. Rofl तुम्ही सोडून कोणीही इथे त्यांची तुलना करतच नाहीये, किंबहुना तशी तुलना होऊच शकत नाही, हेच सांगतायत हाच तर मुद्दा आहे.

एक अभिनेता म्हणून शाहरूख खान साठी त्याचं शा.खा. असणंच सगळ्यात वाईट गोष्ट आहे. आपल्या प्रतिमेच्या जाळ्यात अडकणं कोणत्याही अभिनेत्यासाठी मारक असतं. तेच नेमकं झालं आहे. जे अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीत खूप छान मांडल होतं. व्यावसायिक चित्रपटांत नायकावर फार मोठं ओझं असतं. सुदैवाने बिग बी ना एक छान सेकंड इनिंग मिळाली आहे जिच्यात त्यांच्यातल्या अभिनेत्याला वाव देणारे रोल्स (नायकाच्या दडपणाशिवाय) त्यांना मिळत आहेत (उदा. पा, ब्लॅक, चीनी कम).
अभिनेता पाण्यासारखा असावा लागतो. जो रंग टाकाल त्या रंगाचा होऊ शकणारा. शा. खा. सदैव आपला स्वतःचा रंग घेऊन वावरतो. गेल्या अनेक वर्षांपासून शा.खा. आपल्या प्रत्येक सिनेमात शा.खा.च दिसतो Sad राज आणि राहुलच्या प्रतिमेतून बाहेरच पडू शकत नाहीये तो. आणि त्याहून वाईट म्हणजे चोप्रा, करण जोहर, रोहित शेट्टी आणि फराह खान सारख्या केवळ व्यावसायिक आणि गल्लाभरू सिनेमे करणाऱ्या लोकांबरोबरच सिनेमे करतो आहे. ज्या ज्या वेळी त्याने वेगळ्या लोकांबरोबर काम केले त्यावेळी त्याच्यात अभिनय क्षमता आहे हे कळून येते - दिल से, स्वदेस, चक दे ई.

आमिर खान: आमिर बराच हुशार आणि प्रयोगशील अभिनेता आहे. चांगला दिग्दर्शक देखिल आहे. सरफरोश, थ्री इडियट्स, रंग दे, लगान, दिल चाहता है, तारे जमीन पर प्रत्येक ठिकाणी तो आपल्या भूमिकेला न्याय देतो..आमिरच दिसत राहात नाही! आणि मुख्य म्हणजे तो रिस्क घ्यायला घाबरत नाही. म्हणूनच तो सत्यमेव जयते सारखा प्रयोग करू शकतो.

सलमान खान: सलमानला त्याचे चाहते देखिल अभिनेता म्हणून बघायला जात नाहीत. तो हिरो आहे! अभिनय वै. त्याचा प्रांत नाही. सगळ्या खानावळीत तो सगळ्यात जास्त देखणा आहे! आणि आपल्या lover boy ते macho man ह्या दोन क्षमतांमध्ये बसेल इतकी व्हरायटी देत असतो.

बाकी रजनीकांत, कमल हसन सारख्या अभिनेत्यांशी शा.खा.ची तुलना व्यर्थ आहे. रोबोटमध्ये रजनीकांत यांनी दोन्ही रोल्स इतक्या ताकदीने रंगवले आहेत की दोघे वेगळी व्यक्तिमत्व आहेत हे कळत राहात. शा.खा. असता तर त्याने ह्या दोन्ही रोल्सची नक्की वाट लावली असती.

ऋन्मेऽऽष, तुमच्यासारख्या चाह्त्यांमुळे शा.खा. मधला अभिनेता गायब झाला आहे. त्याला अभिनय करायची गरजच नाही. दिसायला तर किती गोड आहे (खळी) आणि किती छान पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याच्यात. पण आता कसा रोगट दिसतो Sad सिक्स पॅक काय एट पॅक काय?? त्याचे सर्व बिनडोक माकडचाळे त्याचे चाहते डोक्यावर घेतात. किंग खान ह्या pedestal वरून उतरून अभिनेता म्हणून रिस्क घेणं त्याला शक्य होत नाहीये. I hate him for what he has done to himself! देवाच्या कृपेने त्याला जर बिग बी सारखी सेकंड इनिंग मिळाली आणि तेव्हा त्याने पुन्हा आपल्यातल्या अभिनेत्याला वाव देणारे रोल्स केले तरच मला तो पुन्हा आवडेल.

बाकी शाहरूख मलाही आवडतोच, व तो शतकी धागे निघण्याइतका लोकप्रिय व चांगला अभिनेताही आहे असेच मला वाटते. He deserves his position today. पण त्याला भारी ठरवताना इतरांना डिसमिस करण्याची गरज नाही.

बाकी शाहरूख मलाही आवडतोच, व तो शतकी धागे निघण्याइतका लोकप्रिय व चांगला अभिनेताही आहे असेच मला वाटते. He deserves his position today. पण त्याला भारी ठरवताना इतरांना डिसमिस करण्याची गरज नाही. .. >> +१

पण याउलट आपन कधीच अमिताभ-आमीर, सलमान-आमीर, सलमान-अक्षय वगैरे वगैरे मध्ये नंबर वन कोण वा सुपर्रस्टार कोण अश्या तुलना कधी करत नाही वा ऐकल्या नाहीत.. कारण उघड आहे, कोणालाही त्या पदावर आपला दावा सांगायचा असेल तर त्याला शाहरूखलाच त्या पदावरून पायउतार करावे लागणार.. >>>>>

शाहरूख खान हा सुपरस्टार आहे हे त्याचे फॅन्स, तो स्वतः आणि काही ठराविक पत्रकार सोडून कोणी मानतं का?
अमिताभ, आमिर, सलमान, फार काय कमल हसन आणि रजनीकांत यांना आणि त्यांच्या फॅन्सना 'आम्ही सुपरस्टार आहोत हो...' हे दवंडी पिटून सांगायची कधीच वेळ आली नाही यातच सगळं आलं.

मी नव्हते शाहरुख फॅन वगैरे अगदी .पण त्याचे जवळपास सगळे चित्रपट पाहिले आहेत. तो आवडतो यात त्याचा चार्म असु शकतो किंवा हिरोईन्स आणि सर्वच स्त्रीयांना देणारा रिस्पेक्ट असो (ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन) व त्याचं पर्फेक्ट जंटलमन असणे असो .यस बॉस आणि कभी हा कभी ना मधे त्याचा अभिनय मस्तच होता.

बाकी शाहरूख मलाही आवडतोच, व तो शतकी धागे निघण्याइतका लोकप्रिय व चांगला अभिनेताही आहे असेच मला वाटते. He deserves his position today. पण त्याला भारी ठरवताना इतरांना डिसमिस करण्याची गरज नाही. + २ Happy

बाकी शाहरूख मलाही आवडतोच, व तो शतकी धागे निघण्याइतका लोकप्रिय व चांगला अभिनेताही आहे असेच मला वाटते. He deserves his position today. पण त्याला भारी ठरवताना इतरांना डिसमिस करण्याची गरज नाही. .. >> +१<<< माझेपन +१.

सचिन आणि शाहरूख इतकी बिनडोक तुलना आजवर पाहिलेली नाही. सचिन क्रिकेट खेळतो. शाहरूख खान सिनेमात काम करतो. तुलना समाप्त!!

>>>एक अभिनेता म्हणून शाहरूख खान साठी त्याचं शा.खा. असणंच सगळ्यात वाईट गोष्ट आहे. आपल्या प्रतिमेच्या जाळ्यात अडकणं कोणत्याही अभिनेत्यासाठी मारक असतं. तेच नेमकं झालं आहे<<<

जिज्ञासा, सहमत आहे.

शाहरुख खान (फौजी ही मालिका आणि बाजीगर, डर, कभी हां कभी ना, दिवाना, हे चार चित्रपट सोडून) कधीच आवडला नाही. पण ह्या वैयक्तीक मताचा प्रभाव प्रतिसादावर पडू न देण्याचा प्रयत्न करत असे लिहितो की अमिताभ, नसिरउद्दिन, संजीवकुमार व अश्या अनेक आजीमाजी अभिनेत्यांशी त्याची तुलना करणे हे कठिण काम आहे. तुलना करायचीच झाली तर लोकप्रियतेची होऊ शकेल व त्यासंदर्भात जिज्ञासांचे वरील विधान वाचले जावे. शाहरुखची लोकप्रियता त्याच्यातील वैविध्ययुक्त अभिनेत्याच्या जीवावर उठली. हा भागही निराळा आहे की पूर्वीच्या काळी लोकांना जी लोकप्रियता मिळत असे (पूर्वीच्या म्हणजे साधारणपणे इसवीसन २००० पर्यंत वगैरे) ती बर्‍याच अंशी रसिकांनी प्रत्यक्ष चित्रपट (व तोही वारंवार) पाहिल्यामुळे मिळत असे. त्यानंतरच्या काळातील लोकप्रियता ही टीव्हीवरील वारंवार होणारे शोज, अ‍ॅवॉर्ड फंक्शनमधील डान्सेस / सूत्रसंचालने, मीडियाने केलेला भडिमार अश्या अनेक कारणांनी वाढण्याचे प्रमाणही वाढले. (एक वरवर असंबद्ध वाटू शकेल असे उदाहरणः अर्चना पूर्णसिंग किंवा नवज्योत सिद्धू आज घराघरातील अगदी वय वर्षे पाच ते पंच्याऐंशी कोणालाही माहीत असण्यामागे हाच टीव्ही कारणीभूत आहे. अन्यथा अर्चना पूरणसिंग एक सुमार अभिनेत्री होती आणि सिद्धू एक ठीकठाक फलंदाज).

तेव्हा शाहरुखची तुलना लोकप्रियता हा निकष सोडून इतर अनेक निकषांवर कोणाशी केलीच जाऊ शकत नाही. ती लोकप्रियतेच्या निकषावर थेट राजेश खन्नाशी किंवा शम्मी कपूरशी केलेली बरी! (फक्त लोकप्रियतेच्या निकषावर असे म्हणत आहे. त्यातही राजेश खन्ना त्याला 'य' वेळा भारी पडेलच).

बाकी अमिताभ चाहत्यांनीही हे लक्षात ठेवायला हरकत नाही की नव्वदचे दशक सुरू व्हायच्या आधीपर्यंत अमिताभ, राजेश खन्ना, नसिरउद्दिन ह्या तिघांची तुलना वारंवार दिलीप कुमारशी केली जात असे. पाकिस्तान आणि दिलीप कुमार ह्यांचे प्रत्यक्ष नाते काही का असेनात, तो महान अभिनेता आहे आणि नीट पाहिले तर अमिताभने कैकवेळा त्याच्या देहबोलीचे अनुकरण केलेले आहे हे आढळेलही!

बाकी शाहरूख मलाही आवडतोच, व तो शतकी धागे निघण्याइतका लोकप्रिय व चांगला अभिनेताही आहे असेच मला वाटते. He deserves his position today. पण त्याला भारी ठरवताना इतरांना डिसमिस करण्याची गरज नाही. .. >> +१

माझा पण प्लस वन Happy

मुळात इथे अभिनयाबाबत मी कमल हसन फार काही दर्जेदार नाही हे विधान करताच कोणीतरी शाहरूख माझा लाडका म्हणून त्याचा अभिनय काढला आणि कमल हसन विरुद्ध शाहरूख सुरू झाले. आणि यातही मी शाहरूखच्या अभिनयाचे कौतुक न करता त्याची स्ट्रेंथ त्याचा एक्स फॅक्टर आहे असेच म्हटले.

सचिनची तुलना नंदिनी म्हणतात तशी बिनडोकच असती पण मुळात ती तुलना नसून दोघे कसे आपापल्या क्षेत्रात सरस आहेत असे ते साम्य दाखवले आहे.

शाहरूखची अमिताभशी किंवा आमीरशी तुलना तर आज मी केली नसून ती होत राहते. आणि त्यात गैर आहे असेही नाही. मुळात या तुलना प्रत्येक क्षेत्रात होतच असतात.
यासाठी संदर्भ म्हणून फारेण्ड यांचे वरचेच विधान डकवतो,
<<अमिताभ लोकप्रिय झाल्यानंतर तो जोपर्यंत लीड रोल्स करत होता तोपर्यंत नवीन यशस्वी येणार्‍या प्रत्येक कलाकाराची, एवढेच नव्हे तर त्याच्या आधीपासून लोकप्रिय असणार्‍या प्रत्येक कलाकाराची तुलना कायम अमिताभशीच झालेली आह<<

त्यामुळे नेमके आज ऋन्मेषने शाहरूखची तुलना कोणा कलाकाराशी करता तो कसा चुकीचा झाला हे नाही समजले Happy

शाहरूख खान हा सुपरस्टार आहे हे त्याचे फॅन्स, तो स्वतः आणि काही ठराविक पत्रकार सोडून कोणी मानतं का?
>>>>>>

त्याच्या फॅन्सची संख्या अमाप असताना ईतर कोणी मानायची गरज काय?
मुळात सुपर्रस्टार हे पद फॅन्सच देतात ती काही डिग्री नाही आहे जे कागदाच्या चिटोर्‍यावर लिहून द्यावे. Happy

ऋन्मेऽऽष, तुमच्यासारख्या चाह्त्यांमुळे शा.खा. मधला अभिनेता गायब झाला आहे.
>>>>>>>>
शक्य आहे.

पण मुळात एखाद्या हिरोसाठी अभिनय हिच सर्वात महत्वाची कला आहे हे कोणी आणि कशाच्या बेसिसवर ठरवले?
साध्य किंवा हेतू काय आहे, तर रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणे. मग ते अभिनय करून करा किंवा नाचगाणी करून किंवा नुसतीच स्टाईल मारून.. अरे हो, काही जणांच्या मते "माकडचाळे" करून.. झाल्यास हरकत काय?
ते मनोरंजन नेहमी अभिनयाच्या मार्फतच झाले पाहिजे हा हट्ट का?
जर त्याचा पडद्यावरचा वावर त्याच्या चाहत्यांसाठी आल्हाददायक असेल तर ते मोअर दॅन पुरेसे नाही का?

बेसिक प्रश्न आहे, शाहरूखलाच नाही तर कोणत्याही हिरोला लागू. Happy

जर त्याचा पडद्यावरचा वावर त्याच्या चाहत्यांसाठी आल्हाददायक असेल तर ते मोअर दॅन पुरेसे नाही का?>>>>> हे लॉजिक आजवर सलमान देवानंदच्या चाह्त्यांनीसुद्ध वापरले नाही. तुमच्या बुद्धीलाच सलाम.

ऐसे फॅन्स हो तो दुष्मनोंकी जरूरत ही क्या शाहरूख!!!

हे लॉजिक आजवर सलमान देवानंदच्या चाह्त्यांनीसुद्ध वापरले नाही.
>>>>>>>
वापरले हेच लॉजिक, फक्त कबूल नाही केले ईतकेच!
पण सलमानचे चाहते वाह भाई वाह भाई करत कबूलही करतातच की...

ऋन्मेऽऽष यांनी तिकडे देवेन वर्मांच्या http://www.maayboli.com/node/51852 या धाग्यावर दोन प्रतिसादांमधून शाहरुख खान यांना आणलं आहे. आता त्या धाग्याचंही शतक पार पाडायची जबाबदारी ऋन्मेऽऽष यांच्यावर आपसुकच येत आहे.

चेतन....
तुम्ही दिलेल्या लिन्क मधील च एक प्रतिसाद लय आवडला...डकवतो इथे...

कोकम | 15 December, 2014 - 11:44
When Vaijayantimala was asked about both Devdas movies, her answer meant a lot.

She said, "Dilip Saab played Devdas, and Shahrukh Khan played Shahrukh Khan".

Khallas

Lol

प्रसन्न,
सुरवातीचे मोजके दोन-तीन पिक्चर आणि काही प्रमाणात स्वदेस सोडला तर हेच तर चालू आहे ना?

ऐसे फॅन्स हो तो दुष्मनोंकी जरूरत ही क्या शाहरूख!!!
>>
+१

>>>

आपण सारे इथे आपापली मते मांडतो, कोणी शाहरूखला सल्ले देत नाही की तो ते घेत नाही.. तो तेच करणार जे त्याला आवडते, जे योग्य वाटते.

अवांतर - शाहरूखला अभिनयाचा सल्ला देणार्‍यांनो, हाच सल्ला तुम्ही रजनीकांत यांना देऊ शकाल का? त्यांनीही आर्ट फिल्म कराव्यात का? करायला हव्या होत्या का?

शाहरूखला अभिनयाचा सल्ला देणार्‍यांनो, हाच सल्ला तुम्ही रजनीकांत यांना देऊ शकाल का? त्यांनीही आर्ट फिल्म कराव्यात का? करायला हव्या होत्या का? >>> डीडीएलजे रजनीकांतने केलाय का?

Pages