'चांदोबा'तील हार, गजरे आणि माटुंगा मार्केट

Submitted by मामी on 14 November, 2014 - 22:49

'चांदोबा' मासिकातील चित्रे फारच भन्नाट असायची. एक अदभूत जग होतं ते. वेगळ्याच प्रकारचे पेहराव, दागिने, चेहर्‍याची ठेवण असलेली पात्रं त्या चित्रांतून दिसत. त्याचबरोबर देवादिकांनी घातलेले मोठ्ठे आणि विविध प्रकारचे फुलांचे हार असत. चित्रातल्या बायका भरपूर गजरे माळलेल्या दिसत. चांदोबातील या चित्रांवर दाक्षिणात्य ठसा होता.

तेच ते 'चांदोबा'तले हार माटुंग्याच्या बाजारात बघायला मिळतात. अतिशय आकर्षक आणि नक्षीदार रचना केलेले हे हार बघून त्या कलाकारांचं कौतुकच वाटतं. काही हार तर खास दाक्षिणात्य स्टाईलचे - हे भलेमोठ्ठे. माणसापेक्षाही जास्त उंचीचे.

नविन नविन शक्कल लढवून फुलांच्या अत्यंत सुरेख रचना करून किती सुंदर सुंदर हार बनवले आहेत पहा :

(सर्व प्रचि त्या त्या दुकानदारांची परवानगी घेऊनच घेतली आहेत.)

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

माणसापेक्षाही उंच हार :

प्रचि ७

ताडाच्या पात्यांपासून बनवलेले हे झुंबर :

प्रचि ८

हार, गुच्छं, झुंबरं आणि खाली पात्यांचीच बनवलेली चटई :

प्रचि ९

अजून झुंबरं. सुकलेल्या पात्यांपासूनही बनवली आहेत :

प्रचि १०

जरा जवळून बघुयात. हार कसे गुंफले आहेत ते बघा. गुलाबाच्या पाकळ्यांत मोगर्‍याची फुलं, फुलांच्या रंगांचा, गुलाबाच्या पाकळ्यांच्या शेडिंगचा खुबीनं वापर करून किती मस्त रंगसंगती साधली आहे. तीच फुलं घेऊन प्रत्येक हाराला वेगळं रुप दिलंय. कमाल आहे की नाही!

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

भरतनाट्यमच्या वेळी डोक्यात घालतात ती वेणी :

प्रचि १५

पात्यांपासून बनवलेले हार :

प्रचि १६

ही एक वेगळीच रचना - ताडाच्या पात्यांचीच आहे.

प्रचि १७

हे हातावर मोजून विकण्याचे गजरे. यातही किती छान रंगसंगती आहे.

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

माटुंगा मार्केटमधली दाक्षिणात्य भाजीचा स्टॉल :

प्रचि २३

प्रचि २४

टॅपिओका आणि केळीचे गाभे :

प्रचि २५

ही मुळं कसली ते माहित नाही. नाव सांगितलं त्या माणसानं पण कळलं नाही.

प्रचि २६

बाळ कांदे :

प्रचि २७

खाऊचा स्टॉल :

प्रचि २८

गोड अप्पम :

प्रचि २९

हलवा, पापड (अप्पलम) आणि वेफर्स :

प्रचि ३०

लाल उकडे तांदूळ :

प्रचि ३१

केरळी परकर पोलकं

प्रचि ३२

लेटेस्ट फेरीतून अजून काही

ताडपातींपासून बनवलेली अजून दोन डेकोरेशन्स

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कण्हेर हार- गजरे कशातही वापरत नाहीत. त्यांची शोभा फक्त झाडावरच असते.>>>>शुगोल, ती कण्हेरच आहे. pink Nerium oleander या नावाने सर्च करा आणि इमेजेस पहा. मामीच्या प्रचि २० मध्ये गुलाबी कण्हेरच आहे. Happy

हि मी कण्हेरच्याच कळ्यांनी/फुलांनी (शेवटची गुलाबी) केलेली रांगोळी:

व्वा.. मस्त बाजारपेठ आहे..
ते बाळ कांदे खुप गुळचट असतात ना? इकडे मद्रासी दुकानात मिळतात,,
भरत नाटयमची वेणी काय मस्त आहे... ताडीच्या झाडाचे वेगवेगळे प्रकार मस्तच.

गुलाबी फुलं मला काही ठिकाणी चक्क गुलाबी अबोली की कोरांटी असल्यासारखी दिसताहेत.

कण्हेरही आहेच.

जिप्सी, धन्यवाद त्या नावाकरता आणि त्या सुरेख रांगोळी करता.

खूप सुंदर फोटो! मजा आली बघायला.

मामी, १३ नंबराच्या फोटोतला माणूस खुन्नस खाऊन बघतोय. काय केलंत? Proud

चांदोब्याचा उल्लेख झाल्यावर तिथल्या इमेजेस शोधून बघितल्या.. अगदी असेच हार दिसले.

नल्लीज समोरच्या मणीज लंच होममध्ये अप्रतिम थाली मिळते. केवळ रु. ६०/- ला. तो स्टॉलवाला आमचाही आवडता.>>>>>>>> +१
नल्लीज च्या वर माझं ऑफीस होतं.

हार सगळेच छान आहेत पण ऑर्कीडचा हार आणि हिरवा ताडाच्या पात्यांचा हार खुपच सुंदर आहे. बाकी खाऊचा स्टॉल भारीच ,प्रचि २८ त्यात दिसणारी राजेरी केळी(देशी केळी) आहेत ती वजनावर विकत मिळतात आणि प्रचि २५ बहुतेक तो रताळ्याचा प्रकार असावा.पण ते लाल फळ कोणी सांगु शकेल का कोणते आहे.

मला साउथ इंडिया बद्दल कायम सॉफ्ट कॉर्नर आहे.त्यांचे पदार्थ, चित्रपट, पेहेराव ,गजरे,फुलांचा वापर ,टेंम्पल ज्वेलरी आणि आर माधवन. Happy

ताडपातीपासून बनवलेलं शेवटच्या प्रचितलं डेकोरशन एका ओणमच्या वेळी केरळी मित्र मैत्रिणींनी बनायला शिकवलं होतं. अर्थात त्यासाठी माझ्या हातून अगोदर बऱ्याच ताडपाती धारातीर्थी पडल्या होत्या! Lol
दक्षिणेकडे वेणीत जशी फुले गुंफतो तसे बनवलेले वळेसर/ गुंफलेले हारही मिळतात. अगदी घट्ट वीण. टपोरी, ताजी शेवंती, अबोली किंवा मल्लिगे आणि त्यांचे असे नेत्रसुखद हार!
बंगलोरच्या बनशंकरी व जयनगरच्या फुलबाजारात इतके सुंदर सुंदर हार बघितलेत!
कमळांचे हार, तुळशीचे हार, चाफ्याचे हार, चंदन व गुलाबाचे हार. एका कोणत्यातरी देवीला लिंबांचा हार अर्पण करतात तिथे. फार सुरेख दिसतो. वेलदोडे, लवंगा, सुकी अंजिरे, बदाम, पिस्ते, काजू, चारोळ्या वगैरे वापरून लोकानी बनवलेले हार पाहिले आहेत. पण ते विकायला नसतात बहुधा.
अशोकाची / आंब्याची पाने व झेंडूच्या फुलांच्या तोरणवजा माळा, मल्लिगे व गुलाबांचे नाजूक हार हेही तिथे मिळतात.
काही दाक्षिणात्य हारांमध्ये मध्यात चकचकीत गोंडावजा एक घनगोलगट्टू असतो. अशा एका घनगोलाला उलगडून पाहिले तर तो चक्क कांदा निघाला! हारात कांदा या कल्पनेने मलाच घेरी येऊन कांदा हुंगवायची गरज निर्माण झाली!! Lol

Lol अकु.

मी एका लग्नात नवरा नवरीनी वेलचीचे हार घातलेले पाहिलेत. कारण नवर्याचा वेलचीचा wholesale चा बिझिनेस आहे.

खूपच सुरेख आहेत छायाचित्रं. तमीलनाडू मधे पाहीले होते असे हार. तिकडे तीन महीने न सुकणारी फुलं असतात त्यांचा वापर होतो अशा हारांमधे.
( चांदोबा एका तमीळ की तेलुगू माणसाने सुरू केला ना ? बी नागीरेड्डी. बहुतेक ते फिल्म निर्माते होते).

मस्त धागा. आवडाला. Happy

ताडपातींपासून बनवलेली अजून दोन डेकोरेशन्स>> ताडपातीपेक्षा मला ती खाली लटकवलेली कणसे मला केवडयाची वाटत आहेत. जाणकार काय म्हणतात.

वा काय सुरेख फोटो सगळे... छानच कल्पकता हार गुंतणार्‍यांची... या दसर्‍याला आमच्या बॉसनी दरवाज्यावर ते ताडपातीचं तोरण लावलं होत.. कसलं छान दिसत होतं.. कधीच पाहिलं न्हवत... जरा वेगळेपण गोंड्याच्या तोरणांपेक्षा.. Happy

मामी, मला तुम्ही दिलेल्या चांदोबाची ( ऑनलाईन ) लिंक हवी आहे. अजून कोणीतरी ( नाव आठवत नाही ) दिलेली किशोर मासिकाची पण लिंक हवी आहे, प्लीज जमेल तेव्हा शोधुन द्या. बाकी कोणाला माहीत असेल तर त्यांना आणी मामींना आगाऊ धन्यवाद !

हायला काय सही धागा आहे मामी! कसा काय मिसला मी?
आमच्या गोरेगावच्या भाजी मार्केट मध्ये पण एक दोन साउथ इंडियन भाज्या, लोणची मसाले, खाउ यांचा स्टॉल आहे. सद्ध्या भाजी मंडई चं रि डेव्हलपमेंट चालू आहे त्यामुळे सगळंच रिकामं आहे. त्यात लॉकडाउन ! आता कधी जाणं होणार गोरेगाव वेस्ट ला काय माहित.

मस्त मस्त.... हा धागा आधी का नाही बघितला माहीत नाही.

चांदोबातील स्त्रिया, त्यांच्या त्या लांब वेण्यांच्या शेपट्या, आणि डोक्यावरचे ते भरगच्च गजरे, एक बाई किमान डझनभर गजरे तरी माळत असणार. चित्रकार कोण होते देव जाणे पण सगळ्या बायका साक्षात पद्मिनी आणि वैजयंती.

गुलाबाच्या पाकळ्या गुंफून कसले सुंदर हार बनवलेत. कण्हेरीला आपण भाव देत नाहीत पण त्याचे गजरे व हार मी तिकडे दादरला पण बघितले होते.

मेला मधली अर्चना पुरणसिंग बघा(गुगल इमेजेस सर्च मध्ये पाहिली तरी चालेल),तिचे कपडे दागिने पाहून नक्की चांदोबा मधली राजकन्या आठवेल.
Screenshot_2020-08-10-17-01-29-172_com.google.android.youtube.jpg

वाह !

या फुलांनी प्रसन्न केला दिवस. खूप सुंदर फोटो.

माटुंगा म्हणजे मुंबईतील सौदेंडिया. अगदी त्रिची किंवा चेन्नईला आल्याचा फील देणारा भाग. ह्या फुलबाजारात एक फेरी, तिथल्या दक्षिणी देवळाला भेट आणि मग रामाश्रय, आर्य भवन, मैसूर कॅफे, उडुपी रामानायक यांच्यापैकी एकाकडे खादाडी+फिल्टर कापी हा आवडता कार्यक्रम.

प्र चि २६ .....कूर्का मुळे आहेत
... बरोब्बर.

>>>>काय सुंदर सफर. मला नाव वाचून वाटल कि लेख असावा.पण काय सुंदर फोटो बघायला मिळाले.
+१०१
सुरेख फोटो!!!

Pages