किशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद, गंमतजंमत - आपलं भावविश्व व्यापून टाकलेली मासिकं

Submitted by मामी on 12 August, 2014 - 02:43

शालेय जीवनात शत्रुपक्षातील पुस्तकांबरोबरच अत्यंत जिव्हाळ्यानं वाचली जाणारी मित्रपक्षातील मासिकं होती. किशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद वगैरे अनेक मासिकांनी अपरीमित आनंद दिला आहे. आपल्या या लाडक्या मित्रांच्या आठवणी इथे जागवूयात.

विशेष सुचना : कृपया कोणत्याही मासिकातील उतारा इथे जसाच्या तसा लिहू नये.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किशोर, चंपक, ठकठक, फुलबाग, चांदोबा हे तर अगदी नियमित वाचायला मिळत. सुदैवाने माझ्या लहानपणी मला स्वतःचे एक कपाट होते आणि दर पंधरा दिवसांनी सगळी पुस्तके काढून पुन्हा व्यवस्थित लावणे हे खूप आवडीचे काम असायचे.

ठकठक मधल्या अनेक स्पर्धा मी जिंकल्या. ठिपके जोडून चित्र बनवणे, अपूर्ण चित्र पूर्ण करणे, अपूर्ण चित्रकथा पूर्ण करणे अशा अनेक स्पर्धा असत. बक्षीस म्हणून पुस्तके मिळत.
बन्या विशेषतः जास्त आवडीचा होता. त्यात एकदा त्याचे वडील त्याला शर्ट आणून देतात तेंव्हा तो वडिलांना म्हणतो, हा शर्ट माझ्या त्वचे पेक्षा घट्ट आहे कारण त्वचा शरीरावर असताना मला हालचाल करता येत होती आता शर्टमुळे जमत नाही.
राजीव तांबे यांचे सदर मात्र जरा कठीण वाटायचे पण आता त्यातले खूप प्रसंग आठवतात.

चांदोबा विषयी तर लोकांनी भरभरून लिहिलेच आहे. त्यामधील चित्रे हा एका लेखाचा विषय होईल. चांदोबा मधील विक्रम वेताळ हे का कुणास ठाऊक पण मला आवडत नव्हते, पण हळूहळू आवडायला लागले.

कधी कधी टॉनिक सुद्धा वाचले जाई याचे काही विशेषांक होते खासकरून स्वातंत्र्य की देशभक्ती विशेषांक चागलाच लक्षात आहे. बाबू गेनू , शिरीषकुमार यांच्या कथा चटका लाऊन गेल्या होत्या.

श्यामची आई न वाचल्याबद्दल अनेकदा तीर्थरुपांनी येथेच्छ धुलाई केलेली आहे.

श्यामची आई न वाचल्याबद्दल अनेकदा तीर्थरुपांनी येथेच्छ धुलाई केलेली आहे.

नवीन Submitted by सूक्ष्मजीव on 11 August, 2020 - >> अरेरे. श्यामची आई त्यांना कळली होती का? त्या माऊलीचा थोडा तरी गुण घेतला नाही त्यांनी. जगाला प्रेम अर्पावे सांगणारे साने गुरूजी उगाचच घडले नव्हते.

चांदोबा आहे का कुणाकडे
आम्ही कोरोना पाळतो
त्यामुळे काहीघरबयसल्या मिळाले तर बरे
म्हणून विचारले

Pages