लाल भोपळ्याचे सुप (केरळी पद्धतीने)

Submitted by आरती on 4 November, 2014 - 11:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लाल भोपळा पाव किलो.
१ छोटा कांदा,
१ मोठा टोमॅटो,
१ मध्यम आकाराचे गाजर,
२ मोठ्या लसुण पाकळ्या,
१ छोटा चमचा जिरे,
१ छोटा चमचा धणे,
४ मिरे,
साखर, मिठ (चवीप्रमाणे),
२ चमचे तुप / बटर,
५-६ कडीपत्त्याची पाने,
१ हिरवी मीरची,
४ कोथिंबीरीच्या काड्या (मुळं आणि पान काढुन, फक्त काड्या)

क्रमवार पाककृती: 

भोपळ्याची पाठ काढुन घ्यावी. भोपळा, टोमॅटो, गाजर, कांदा सगळ्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करुन घ्याव्या. लसुण सोलुन घ्यावा.
एका खोलगट भांड्यात तुप घेउन तुप तापल्यावर त्यात कडिपत्ता आणि हिरवी मिरची टाकावी. नंतर कांदा आणि लसुण थोडा प्रतुन घ्यावा, कच्चटपणा जाईल इतपतच.
आता त्यात गाजर, टोमॅटो, लाल भोपळ्याच्या फोडी, कोथिंबीरीच्या काड्या, जिरे, धणे, मिरे, साखर, मिठ घालावे. हे सगळे बुडेल इतके पाणी घालावे.
पाण्याला चांगली उकळी आली की गाजराच्या फोडिला टोचुन बघावे (गाजर जास्त कडक असल्याने). मऊ झाले असेल तर पाणी गाळून घेउन बाकी सगळे मिश्रण मिक्सर्मधुन एकजिव करुन घ्यावे.
बाजुला काढलेले पाणी व हे एकजीव केलेले मीश्रण एकत्र करुन एक उकळी आणावी. घट्ट वाटल्यास थोडे अजुन पाणी घालावे.
*
la bho sup.jpg

वाढणी/प्रमाण: 
ज्याला जसे हवे तसे. भोपळ्याचा पदर्थ आहे, आग्रह तरी कसा करणार :)
अधिक टिपा: 

हिरवी मीरची वगळू नका. पाहिजे तर मीरे कमी करा. [याचे नाव 'केरला स्पाईस्ड पंपकीन सुप' असे आहे Happy ]
मुळ कृतीत, लाल ढब्बु मिरची आणि मक्याचे पिठ पण वापरले आहे.
मुळ कृतीत तुपाच्या ऐवजी तेल वापरले आहे आणि कडिपत्ता वापरलेला नाही.

माहितीचा स्रोत: 
एका 'केरला' नावाच्या हॉटेलात प्यायले. मग नेटवर पा.कृ. शोधली. तु.नळीवर सुरुवात फक्त बघितली घटक पदार्थांसाठी. त्यातुनही २ गोष्टी वगळल्या.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Yesterday did it for the second time ☺ loved it once again. Easy n tasty soup .

आज केले होते हे सूप. मस्त झाले. माझ्या स्पॅनिश मैत्रिणीला फारच आवडले. सूपबरोबर (तिने) घरी केलेला फोकाचिया खाल्ला. एकूण काँबिनेशन झकास लागले.
मिरची वगळली पण घालायला पाहिजे होती असे वाटले.

आज करून पाहिलं हे सूप. ऑसम लागतं. धने-जिरे स्वाद एक नंबर! Happy

घरात लसूण नव्हतं. त्यामुळे ते नाही घातलं. तेलावर लाल मिरची घातली. आणि वाटताना ती काढून टाकली. कारण आमच्या घरात तिखटाला फारच सेन्सिटिव्ह पब्लिक आहे सगळं.

आज फायनली या सुपाचा नंबर लागला. स्वादिष्ट व पोटभरीचं सूप झालं. सोबत गार्लिक चीज टोस्ट. उदरभरण मस्त झाले!

फोटू काढताना चमकदार फ्लॅश उडलाय त्याबद्दल माफी!

IMG_20141126_193702.jpg

सगळ्यांना आवडतंय. लवकरच करायला हवं.

अकुच्या सुपाचा फोटो 'अंड्याच्या बलकाचा क्लोज अप' म्हणूनपण खपेल. Proud Light 1

मृण्मयी Lol खरंच तो अंडे बलक सदृश सोनेरी धम्म फोटो पाहून मी सूपची चव परत एकदा घेऊन पाहिली!! Biggrin

केलं Happy खुप आवडलं. मी सगळं कुकरात ढकललं, भोपळा (बटर नट स्क्वॉश) पाठीसहित. उकडल्यावर भोपळा कोरायला सोपं होतं, आधी साल काढण्यापेक्षा. त्यातच हँड ब्लेंडर फिरवुन उकळी काढली. मिरची भाज्या उकडल्यावर काढुन टाकली Happy
नेहमी करणार.

image_23.jpgमी पण केल हे मागच्याच विकमधे! मी लाल सिमला मिरची,टोमॅटो ही घातला , छान दाट सुप होते, बरोबर गार्लिक ब्रेड घेतला की मिल होइल.फोटो टाकते नन्तर!

मी भोपळा लाल कॅप्सिकम, कांदा, १ लसुन पाकळी, १ हिरवी मिरची बेक करुन मिक्सर मधुन काढल. मस्त सुप झाल. हव असेल तर मिक्सर मधेच शेवटी थोड चिझ घालुन काढल तर छान लागत.

हिट झालेल सुप Thanksgiving डिनरला. गाजर नव्हते म्हणून टाकले नाही. पण त्याने काही फरक पडला नाही.

मी दुपारी बनवल. सन्ध्याकाळ पर्यन्त मिर्ची आणि मिर्‍याची टेस्ट मस्त उतरलेली.

आवडलं . उद्याच करण्यात येईल अस आत्ता तरी वाटतंय Happy
<<वाढणी/प्रमाण:
ज्याला जसे हवे तसे. भोपळ्याचा पदर्थ आहे, आग्रह तरी कसा करणार :)>> हे भारीच

मी पण हे सुप काल केल .. खुप छान झाले होते .. त्याच त्याच टोमॉटो , पालक सुप चा नाहितरी कंटाळा आला होताच.. .. नवरा आणि विशेषतः लेकी ला खुप आवडले..
फोटो का ढायचा राहून गेला पण कलर ही खुप मस्त आला होता. Happy
आरती, धन्यवाद Happy

ऑर्किड, सुप्रभात, सुजा, माधुरी

धन्यवाद Happy

सशल, फोटो खुपच छान आला आहे. किन्वा सॅलॅड मधे काय काय घालतेस सांगणार का ?

आरती, धन्यवाद ..

किन्वा सॅलॅड मध्ये रंगीत भोपळ्या मिरच्या, लाल कांदा, स्कॅलियन्स् , काकडी, चेरी टोमॅटोज्, पार्सली घातले होते .. आधी केलेल्या एका सॅलॅड चं ड्रेसींग (थोडं ऑरेन्ज ज्यूस, बाल्सामिक व्हिनिगर, ऑलिव्ह ऑइल, मध, सॉल्ट, पेपर) थोडं शिल्लक होतं ते आणि जास्तीचं ऑलिव्ह ऑइल, सॉल्ट, पेपर असं काय काय हाताला लागेल ते घातलं होतं .. Happy

आज हे सूप केल होत. मस्त यम्मी चव आहे. आणि मुख्यत सोप आहे बनवायला .नेहमीच्या वापरातले पदार्थ असल्याने फारशी खटपट करावी लागत नाही. रात्रीच्या जेवणासाठी मस्त पोटभरिचा पदार्थ आहे . झटपट होणारा

रेसिपीकरता धन्यवाद आरती !

IMG_20151016_220449.jpg

Pages