लाल भोपळ्याचे सुप (केरळी पद्धतीने)

Submitted by आरती on 4 November, 2014 - 11:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लाल भोपळा पाव किलो.
१ छोटा कांदा,
१ मोठा टोमॅटो,
१ मध्यम आकाराचे गाजर,
२ मोठ्या लसुण पाकळ्या,
१ छोटा चमचा जिरे,
१ छोटा चमचा धणे,
४ मिरे,
साखर, मिठ (चवीप्रमाणे),
२ चमचे तुप / बटर,
५-६ कडीपत्त्याची पाने,
१ हिरवी मीरची,
४ कोथिंबीरीच्या काड्या (मुळं आणि पान काढुन, फक्त काड्या)

क्रमवार पाककृती: 

भोपळ्याची पाठ काढुन घ्यावी. भोपळा, टोमॅटो, गाजर, कांदा सगळ्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करुन घ्याव्या. लसुण सोलुन घ्यावा.
एका खोलगट भांड्यात तुप घेउन तुप तापल्यावर त्यात कडिपत्ता आणि हिरवी मिरची टाकावी. नंतर कांदा आणि लसुण थोडा प्रतुन घ्यावा, कच्चटपणा जाईल इतपतच.
आता त्यात गाजर, टोमॅटो, लाल भोपळ्याच्या फोडी, कोथिंबीरीच्या काड्या, जिरे, धणे, मिरे, साखर, मिठ घालावे. हे सगळे बुडेल इतके पाणी घालावे.
पाण्याला चांगली उकळी आली की गाजराच्या फोडिला टोचुन बघावे (गाजर जास्त कडक असल्याने). मऊ झाले असेल तर पाणी गाळून घेउन बाकी सगळे मिश्रण मिक्सर्मधुन एकजिव करुन घ्यावे.
बाजुला काढलेले पाणी व हे एकजीव केलेले मीश्रण एकत्र करुन एक उकळी आणावी. घट्ट वाटल्यास थोडे अजुन पाणी घालावे.
*
la bho sup.jpg

वाढणी/प्रमाण: 
ज्याला जसे हवे तसे. भोपळ्याचा पदर्थ आहे, आग्रह तरी कसा करणार :)
अधिक टिपा: 

हिरवी मीरची वगळू नका. पाहिजे तर मीरे कमी करा. [याचे नाव 'केरला स्पाईस्ड पंपकीन सुप' असे आहे Happy ]
मुळ कृतीत, लाल ढब्बु मिरची आणि मक्याचे पिठ पण वापरले आहे.
मुळ कृतीत तुपाच्या ऐवजी तेल वापरले आहे आणि कडिपत्ता वापरलेला नाही.

माहितीचा स्रोत: 
एका 'केरला' नावाच्या हॉटेलात प्यायले. मग नेटवर पा.कृ. शोधली. तु.नळीवर सुरुवात फक्त बघितली घटक पदार्थांसाठी. त्यातुनही २ गोष्टी वगळल्या.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आज केलं. मस्तं झालं होतं
मी शाॅर्टकट मारला भोपळा, कांदा, गाजर, टोमॅटो मिरची मिरी मीठ मावेच्या बोलमधे घालूनशिजवलं मिक्सर मधे एकजीव केलं
तुपाच्या फोडणीत लसूण परतून त्यात हे घालून धणे जीरे पावडर घालून उकळी आणली

तुप कमी लागलं असं केल्याने

आरती .......फारच छान आहे हे सूप . आजच करून बघणार.
कालच्या लोकसत्तात अशीच एक रेसिपी आहे. एक डाएटिशिअन जनरलच खाण्यापिण्यावर लिहितात...पण खूप छान गाइड करतात. त्यानी एक रसम पावडर ची रेसिपी सांगितली आहे आणि विविध पदार्थात ती कशी वापरता येईल हे सांगितलं आहे. त्यात त्यांनी लाल भोपळ्याच्या सुपातही ती वापरायला सांगितलं आहे. (अर्थातच ही तुझी रेसिपी खूपच वेगळी आहे)

रसम पावडर नाही पण सांबार मसाला वापरून मी करते लाल भोपळ्याचं सूप. आजच केलयं. मस्त होतं. कांदा, आलं, लसूण तेलावर परतून त्यात भोपळ्याच्या फोडी, सांबार मसाला घालून शिजवयचा. प्युरी करून नारळाचं दूध घालून एक ऊकळी काढायची.

मानुषी, रसम पावडर घालण्याची कल्पना आवडली. टोमॅटोच्या सुपातही चांगली लागेल कधितरी बदल म्हणुन.

सानुलीची पा.कृ पण करुन बघाय्ला हवी. Happy

भोपळ्याकडून एवढी अपेक्षा नव्हती ☺ >> मला पण Happy

मस्तच ! आमच्याकडे लाल भोपळ्याचे सूप एकदम आवडीचे आहे.

हिरवी मिरची, धने, जिरे, कढीपत्ता ह्याने तर चव जास्तच आवडली.

मोडाचे मसूर असले तर ते पण वापरते मी ह्या सूपमधे. लाल भोपळ्याच्या बीयापण भाजून टाकते सूप ऊकळताना.

सानुली फोटो मस्त. रंग अगदी खरपुस भजलेल्या बेसना सारखा आला आहे Happy

लाल भोपळ्याच्या बीयापण भाजून टाकते >> नलिनी, तु आख्खा भोपळा आणतेस की काय ? Happy

आज आमच्याकडे केले आहे. सुनिधीचं तसंपण फार आवडतं सूप आहे.

मी कूकरमध्ये कांदा लसूण लोण्यावर परतून घेते. कांदा म्हणजे सांबार्/पर्ल ओनियन वापरते. ते जरा चवीला जास्त चांगले लागतात. मग त्यात कढीपत्ता, कोथिंबीर टाकून सर्व भाज्या टाकते (टोम्याटो, गाजर, भोपळा) परतून घेऊन पाणी आणी मीठ घालून दोन तीन शिट्ट्ञा काढते. मग ब्लेंडर फिरवला आणि एकदा गाळून घेतलं की सूप तयार.

सुनिधीसाठी त्यामध्येच थोडा भात घालते आणी मग ब्लेंडर फिरवते. म्हणजे सूप घट्टसर पण होतं आणि तिला पोटभर होतं.

आमच्यासाठी उरलेल्या सुपात मनसोक्त रस्सम पावडर घालून उकळी काढायची.

छान झाले होते. भोपळ्याऐवजी स्क्वॅश वापरले. भरपूर केले. दुसर्‍या दिवशी थोडे आळले ते पास्त्यावर घालून खाल्ले Happy

मस्तं झालं हे सुप , मी लाल सिमला मिर्ची पण टाकली :).
कढीपत्त्याच्या चवीमुळे सांबाराच्या जवळची टेस्ट लागत होतीच म्हणून नंतर उकळताना थोडा सांबार मसाला टाकला , अतिशय चविष्ट लागलं :), भाताबरोबर घेतलं !

मस्त रेसिपी .. पहिल्यांदाच कसलाही बदल न करता तंतोतंत फॉलो केली .. अर्थात थोडे अंदाज वापरावेच लागले पाव किलो भोपळा, लहान मोठा मध्यम इत्यादी ..

पण मस्त चव आली .. नेमकी कोथींबीर संपली होती आणि आणायची विसरले .. तर तेव्हढ्या काड्या घालायच्या राहिल्या .. Wink

Pumpkin soup.jpg

मी ही काल हे सूप केलं. एकदम मस्त झालं. टिप्पीकल साऊथी वास येत होता सूपला.

मी १ हिरवी मिरची व २ च मिर्‍या घातल्या तरी बर्‍यापैकी स्पाईसी झालं होतं त्यामुळे हिरवी मिरची + ४ मिर्‍या खूप होतील असं वाटतंय. बाकी पाव किलो भोपळा वगैरे नसेल घेतला मी, सगळं अंदाजपंचे.

मी काल केलं हे सुप....मी थोडं नारळ दुध पण घातलं त्यात....
एकदम मस्त वास न चव....नवरा म्हणाला की हे जरा जरा फिश करी सारखं लागतय ..ही ही ही...
मला मात्र रसम सारखं लागलं...
लाल भोपळा खायची छान सोय झाली.....
आता नेहेमी होणार माझ्याकडे हे...
खुप खुप खुप आभार

फोटो पाहून आताच ओरपावसं वाटतेय, सर्व फोटो जबरदस्त.

१ हिरवी मिरची आणि ४ मिरीदाणे जास्त तिखट होईल असे वाटत नाही, तरी बनवल्यानंतर त्यावर बोलणे उचित होईल.

अरे वा. एकाच सुपाचे किती ते उपयोग. पास्ता, भात, ईडली (सांबार मसाला घालुन) सगळ्यांचेच प्रयोग छान.

फोटो पण मस्त आहेत सगळे.

सशल, पुढच्यावेळी नक्की चार(च) काड्या घालुन कर Wink

करुन बघुन इथे कळवल्या बद्दल सगळ्यांचे आभार.

यम्मी सूप विदाऊट नो बदल.... एक मिरची व ४ मिर्यांनी ... अर्धी मिरची हवी... वरुन मीरपूड घालू शकतो...image_16.jpg

मि पण केले होते, एक्दम मस्त. पण मला नुसते प्यायला नको वाटले. मी टोस्ट बरोबर घेतले. दुसरा हेल्दी ऑप्शन सुचवा Happy

येस. मी पण काल केले होते हे सुप. मस्त झले होते. फक्त मिरचि अर्धीच चालली असती पण मस्त झाले होते. आता नेहमी होईल बहुतेक.

मी तंतोतंत प्रमाण व कृती वापरून केलं. सुरेख चव आली होती, खूप आवडली. आज इकडे खूप थंडी होती, त्यामुळे गरम गरम सूप प्यायला मस्त वाटलं. अगदी किंचीत 'स्पाईसी' (तिखट नाही) वाटलं, पण तेव्हढी 'स्पाईसी' चव हवीच. आवडत असल्यास बटाटा, रताळं, बीट वगैरे भाज्या घालूनही करता येईल. पाककृतीसाठी धन्यवाद Happy

मी फक्त एक लहान मिरची वापरून केलं. एकदम मस्त झालं होतं. माझ्या १६ महिन्याच्या लेकीने मस्त य्म्मी यम्मी करुन खाल्लं.
हा फोटो.
20141119_210129_resized_1.jpg

अगदी किंचीत 'स्पाईसी' (तिखट नाही) वाटलं, पण तेव्हढी 'स्पाईसी' चव हवीच. >> हे वाचुन अगदी छान वाटले Happy

अंजली, फोटो अगदी कल्पक आहे. मस्त आला आहे.

माझ्या १६ महिन्याच्या लेकीने मस्त य्म्मी यम्मी करुन खाल्लं.>> अरे वा मस्तच. फोटो पण छान.

Pages