२०१४ फॉल/विंटर नॉर्थ इस्ट गटग

Submitted by वैद्यबुवा on 28 October, 2014 - 08:34
ठिकाण/पत्ता: 
मैजी पांडेजींचे घर.

टाळकी

वैद्यबुवा - १ (बटाटे वडे, रंपा)
मैत्रेयी - ४
सायो -१
सिंडरेला -१
बाईमाणूस - २.५
बाई - १
अनिलभाई - १

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, November 29, 2014 - 11:30 to 18:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहसा लाँग विकेंसला पबलिकचे प्लॅन असतात त्यामुळे कितपत जमेल माहित नाही.

बरोबर आहे. आमच्याकडे मुलगा मुलगी जावई येत असल्याने जमणार नाही. नंतरच्या शनिवारी जर कुठे ब्रिज टूर्नामेंट नसेल तर विचार करता येईल.

२९ नोव्हेंबरला आहे गटग. त्याच्या पुढच्या विकेंडला तुम्हांला जमून काय उपयोग झक्की? गाडी निघेल बाराची. येताय का?

गटग आहे ना नक्की? मेन्यूचा काय पत्ता? लवकर काय ते ठरवा म्हणजे मी या विकेंडलाच करून ठेवेन. मसाले बिसाले मुरतील झक्क आठवडाभर. Proud
वृंदाताई, एबाबांना कळवलंय का?

अरे पण ते दाल बाटीचं काय झालं ? ते नक्की जमणार असेल तर बाकी मेनू त्याला सुटेबल करू ना !! दाबेली, उंधोयू , कढी खिचडी वगैरे Happy (कढी आणि खिचडी करण्याचे माझ्या डोक्यात पण होतं)

गुज्जू मेन्यु ठिके. पण बववर काट नको प्लीजच.
रेडिओ पुलाव्/मभा/ खिचडी आणेन. नो प्रॉब्लेम्स.. कढीही आणू शकेन पण सांडायची भिती.

श्री, आधी लिहिलय की. बट्टाट्टा वडा. Lol

मला काय ते फायनल सांगा तुम्ही दोघी रॉक पेपर सिजर करुन. Proud

हसुबेन पुढच्या वीक एंडच्या आर्डरी घेणार नाहीत. वंदना बेन दाल-बाटी करते म्हणाली आहे. तिला देते ऑर्डर.

साधारण माणशी तीन बाट्या सांगू का?

दोन पुरतील बहुतेक. फार बसतील असं वाटतंय.
मी दाबेली केलेली नाही कधी म्हणून मला त्या दिवशीकरता प्रयोग नको वाटतायत. तेव्हा मला जे झेपेल ते सांगा. कढी/खिचडी हवी तर आणते. घट्ट झाकणाच्या डब्यात घालून आणली तर सांडायची भिती नाही. आयत्या वेळी पातेल्यात गरम करता येईल.

गुज्जू मेन्यू का? सहीये !!
चुरमा लाडू न्या की कोणीतरी.. त्या 'झुपडी'तले भारी होते..
किंवा मग मोहनथाळ, मुगाच्या डाळीच्या शिरा..
आणि तुरीया पात्रा, ठेपले नाही का? Happy

चनस, तुला काय करायच्यात नसत्या चौकशा? आम्ही थोर मोठी मंडळी तुला सांगू तिथे हजर व्हायचं, आम्ही गप्पा मारत असताना गपचूप टिव्हि वर छोटा भीम बघत बसायचं, जेवायला हाक मारली की गप येऊन गिळायचं अन परत टिव्ही कडे वळायचं, समजलं? Lol

बरं बरं Lol .. पण मला टॉम अँड जेरी आवडतं.. ते नाही लावलतं तर भ्य्य्याआआ.. Proud
माझी आईपण कधी ओरडली नाहीयं माझ्यावर असं Proud

मी आणू का दाबेली?(ब. वडा आणि दाबेली खूप बटाटा होणार नाही ना ? + जोडीला दाल-बाटी मधली दाल आहेच )

सायो कढी राईस कुकर मध्ये आणता येईल.. वरुन सेफ्टी साठी plastic wrap पेपर लाव .. नाही सांडत आणि गरम कराय्ला पण सोपे पडते स्वानुभव..

Pages