२०१४ फॉल/विंटर नॉर्थ इस्ट गटग

Submitted by वैद्यबुवा on 28 October, 2014 - 08:34
ठिकाण/पत्ता: 
मैजी पांडेजींचे घर.

टाळकी

वैद्यबुवा - १ (बटाटे वडे, रंपा)
मैत्रेयी - ४
सायो -१
सिंडरेला -१
बाईमाणूस - २.५
बाई - १
अनिलभाई - १

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, November 29, 2014 - 11:30 to 18:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला बोल्या सुरु करा.
(सगळं मलाच बघावं लागतय! पुर्वी असं नव्हतं. मी फक्त म्हणजे फक्त ड्रायवर्की करायचो!)

धन्यवाद पराग. मी डिफॉल्ट पाहिलाच नाही.
तुझं वाक्य लक्ष्याच्या टोन मध्ये आहे असं वाटलं. Proud

तुझं वाक्य लक्ष्याच्या टोन मध्ये आहे असं वाटलं. >>>> अरे वा नेजल टोनमध्ये का ? मग ते अरें वाँ वाँ वाँ.. असं हवं होतं.. Happy

आमंत्रणाबद्दल थँक्यू सिंडे. पण थँक्स्गिव्हिंग वीकएंड म्हणजे विमानांना तौबा गर्दी. कस्सं जमाय्यच्चं?

अरे मी ते २९ नोवेंबर तारिख सहज एक तारिख घ्यायची म्हणून घेतली. सहसा लाँग विकेंसला पबलिकचे प्लॅन असतात त्यामुळे कितपत जमेल माहित नाही. Happy

च्च! गटग आहे म्हणून मी तिकिट क्यान्सल केलं आणि आता म्हणे सहज म्हणून तारिख घेतली. आता नुस्कान भरपाई द्या.

सिंडे... थँक्स गिव्हिंगचं काहीच नक्की नाही.. त्यामुळे येणं शक्य नाही ह्यावेळी..

ह्या कोण हवाहवाई येणार आहेत यंदा? Happy

मी मागच्यावेळी वाचत होते त्यावरून "भगवती" परत येताहेत म्हंजे त्यांना तुम्ही रॅगिंग वगैरे न करता नीट जेऊन-खाऊन-पिऊन पाठवलं दिसतंय...

खा लेको मटार उसळ, टर्की (विथ क्रॅनबेरी चटणी बिटणी) बिर्की Happy

त्या लाँग वीकेंडला जर्सीत येण्याचा प्लॅन बनतोय बहूतेक. प्लॅन नक्की झाल्यावर नाव नोंदणी करतो.
झक्की येणार आहेत का? कुठे आहेत आजकाल, दिसत नाहीत माबोवर.

थँक्स गिविंगला बेस्ट बाय किंवा टार्गेटच्या लाईनीत ऊभं राहून गटग करूयात की, फायदेशीर होईल सगळ्यांनाच. Wink

अरेरे नको ते ब्लॅक फ्रायडे गटग.. अशा वेळी नेमकं शॉपिंग लिस्टवर काहीही नसतं.
भाई, ही देवनागरी हवाहवाई आहे, इंग्लिश नव्हे.. नंतर म्हणाल आधी का नाही सांगितलं.

सेना, मी पण "त्या" उसगावात नाहीये नाहीतर नक्की गेले असते...

तू "या" उसगावात ये की..मग करू आपण गटग.. Happy

वेका,

उसगावात आलो तरी माझे काम ह्युस्टनमध्ये.
तेंव्हा तुला भेटायचे म्हणजे पार पलिकडच्या बाजूला वळून यावे लागेल.
येईन येईन. उसगावात आलो तर नक्की येईन. Happy

भाई, ही देवनागरी हवाहवाई आहे, इंग्लिश नव्हे.. नंतर म्हणाल आधी का नाही सांगितलं. >> अरे प्रोफाईल तर सेम वाटते.

प्रत्येक वेळी नोंदणी करून येतात सुद्धा. वृतांत तेवढा लिहायचं टाळतात. झालंच तर आपल्या त्या आणि ह्या पण हजेरी लावतातच.

चनसने अजून नाव नोंदवलं नाहीये.
भाई, विकु, झक्की, देसाई- लवकर नाव नोंदवा तरच एकावर एक वडा फ्री मिळेल. मुदत उद्या रात्रीपर्यंत.

अरे वेणूचं काय? मेणू आधी वेणू नको का ठरवायला?
मै गायब आहे सध्या. (फक्त माझा मेंटल ब्लॉक काढायला दर्शन दिलं मगाशी) Proud

ह्या वेळी कोणीतरी "बट्टाटा वडा" गाणं म्हणा! Lol

Pages