घराजवळ एक हॉटेल आहे. साधंसंच. तिथले कटलेट मला जाम आवडतात. परवा मी माझे आवडते 'कटलेट' खात असताना एक मित्र आला. मी त्याला म्हटलं की 'तूही घे, मस्त असतात.' पण त्याने नाही म्हटलं.
नंतर माझं खाऊन झाल्यावर म्हणाला की, 'तुला माहित आहे का हॉटेलात कटलेट कसे बनवतात ?'
मी म्हटलं, 'नाही !'
'इतर भाज्या वगैरे बनवताना गॅस शेगडीजवळ जे सांडलेलं असतं ना ? ते गोळा करतात अन् देतात 'कटलेट' म्हणून शिजवून. आणि तुझ्यासारखे मूर्ख मस्त मिटक्या मारत खातात !'
हे खरं की खोटं, माहित नाही. पण आता मी आयुष्यात कधी 'कटलेट' हा प्रकार खाऊ शकणार नाही. काय सांगावं ! भटारखान्याच्या बंद दरवाज्याआड काय काय चालत असेल ! आपण शुद्धतेची खात्री मानून जे खातो, त्याच्याकडून किमान स्वच्छतेची अपेक्षा करावी, इतपत तरी त्याची योग्यता असेल का ?
अपेक्षा ! खरं तर अपेक्षा करणंच कधी कधी चूक असतं. इतकेच चोचले असतील तर जावंच कशाला थेटरात ? सॉरी.. हॉटेलात !
Actually थेटरात पण. हो ना ! 'मैं हूँ ना' आवडला म्हणून 'ओम शांती ओम' पाहिला. ठीक वाटला. तरी 'तीस मार खान' पाहिला. भंकस वाटला. त्या नंतरही मी अपेक्षा ठेवली की फराह खान भावापेक्षा बरी असेल आणि 'हॅपी न्यू इअर' पाहिला.
तर काही इंग्रजी सिनेमांच्या भटारखान्यात जमिनीवर सांडलेलं, पाय पडलेलं खरकटं कथानक आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'मैं हूँ ना', 'चक दे इंडिया' वगैरे बनवताना शेगडीबाहेर जे सांडलं होतं ते गोळा करून संवादाचे कटलेट्स माझ्यासमोर आले. गेल्या कित्येक सिनेमांत निव्वळ धांगडधिंगा शिजवताना विशाल-शेखरकडून जे ओघळ उतरून खरपुड्या झाल्या होत्या, त्यांची गाणी बनवलीत.
खरं तर गेल्या काही काळापासून, खास करून धूम -३ नंतर आमीर खान जाम डोक्यात जायला लागला आहे. सलमान खान तर इतका दाक्षिणात्य झाला आहे की आता त्याच्या तोंडी हिंदी डायलॉग (जे त्याला असंही येतच नाही) अजिबातच शोभेनासे झालेत. त्यामुळे आत्ता कुठे मला खानांतला शाहरुखच त्यातल्या त्यात बरा आहे असं वाटायला लागलं होतं. म्हणून हा 'क्रॅपी न्यू इअर' बघायला गेलो, तर 'जतहैंजा'चा ओंगळवाणा गेट-अप शिजवून झाल्यावर जी बरबट भांड्यांना राहिली होती, ती थापलेला अगदी रोगट दिसणारा शाहरुख समोर आला.
बरं हे सगळं तब्बल तीन तास सहन करावं लागलं. कटलेटवर कटलेट, कटलेटवर कटलेट डोक्यावर थापत जाऊन डोक्याचं भलं मोठं भजं झालं आणि पायाच्या करंगळीच्या नखापर्यंत तेलकट ओघळ घेऊन मी जेव्हा घरी परतलो, तेव्हा मी परत आल्यासारखा परतलेला नव्हे तर कढईत परतल्यासारखा परतलेला दिसत होतो.
मित्राने कटलेटची रेसिपी माझं खाऊन झाल्यावर सांगितली, पण मी ती चूक करणार नाही. म्हणून मी फराह खानच्या कटलेटची रेसिपी आधीच सांगून ठेवतो.
उदरनिर्वाहासाठी 'स्ट्रीट फाईट्स' करणारा 'चार्ली' (शाहरुख) वडिलांना - मनोहरला - (अनुपम खेर) त्यांच्या हाय एंड तिजोऱ्या बनवण्याच्या धंद्यात फसवणाऱ्या चरण ग्रोव्हर (जॅकी श्रॉफ) चा वचपा काढण्यासाठी आसुसलेला असतो. वडिलांचे मित्र टॅमी (बोमन इराणी) आणि जॅग (सोनू सूद) सुद्धा त्याच बदल्याच्या आगीत होरपळत असतात. ती संधी त्यांना मिळते. ग्रोव्हरने ३०० कोटीचे हीरे, मनोहरकडून घेतलेल्या 'शालीमार' तिजोरीत ठेवले असतात. ही तिजोरी लुटायचा प्लान बनवला जातो. पण तिजोरी लुटण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात.
१. तिथपर्यंत जाणे फक्त ग्रोव्हर व त्याचा मुलगा विकी( अभिषेक बच्चन)लाच शक्य असते. म्हणून विकीचा डुप्लिकेट नंदूला उचललं जातं.
२. तिजोरीभोवती असलेलं लेजर किरणांचे संरक्षक कडं भेदायला एक हॅकरही हवा असतो म्हणून अजून एक मेंबर 'रोहन' (विवान शाह) हा (बहुतेक) जॅगचा पुतण्या (की भाचा) टीममध्ये घेतला जातो.
जिथे हीरे ठेवलेले असतात तिथे 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप' होणार असते. मग डान्स शिकवण्यासाठी मोहिनी (दीपिका) हेरली जाते.
अशी ही सहा जणांची टीम बनते. ती आचरट चाळे करून वात आणते.
फक्त हा आचरटपणाच जर त्यांनी ग्रोव्हरसोबत केला असता, तरी त्याने त्यांना स्वत: होऊन ३०० कोटीचे हीरे दिले असते आणि माफीही मागितली असती. पण त्यांना त्याला वात आणायचा नसतो, तर त्याची वाट लावायची असते म्हणून ते तसं न करता चोरीच करायचं ठरवतात. त्या चोरीचं पुढे काय होणार, 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप'चं काय होणार, हे सगळं आपल्याकडे बॉलीवूडी कटलेट्सचा तगडा अनुभव असल्याने कुठलाही आश्चर्याचा धक्का वगैरे देत नाही.
विनोद म्हणून नंदूला हुकमी उलटी करणारा दाखवणं, हा विनोदाचा ओकारी आणणारा किळसवाणा प्रकार आणि 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप' बोलताना तोंडावर हात फिरवणं, तोंडात ब्रश केल्यासारखं बोट फिरवणं वगैरे तर पांचटपणाचा कळसच होता ! एकंदरीतच विनोदाचे सगळेच प्रयत्न एक तर केविलवाणे किंवा हिणकस आहेत.
झगमगाट आणि भडक रंगांची उधळण काही जणांचे डोळे सुखावते, दीपवते. मला तर ते पैश्याचं विकृत प्रदर्शन वाटलं. सौंदर्याला मेक अप आणि दागदागिन्यांनी मढवल्यासारखं मला वाटलं नाही, तर त्याच्या बोज्याखाली दबल्यासारखं वाटलं.
ओरिजिनल असलं, नसलं तरी एक बरं कथानक होतं. पण केवळ ढिसाळ हाताळणी आणि प्रदर्शनाच्या आहारी गेलेली कल्पकता ह्यामुळे तीन तासाचं वाटोळं होतं.
'मनवा लागे..' आणि 'इंडियावाले' ही दोन गाणी फक्त मुखड्यात छान आहेत. त्यानंतर विशाल-शेखर 'ये रे माझ्या मागल्या' करत नेहमीचीच ओढाताण किंवा धिंगाणा करतात.
कोरड्या दुपारच्या रखरखाटात अचानक कुठूनशी एखादी थंड हवेची झुळूक यावी, तशी अधूनमधून दीपिका दिसते आणि क्षणभराचा दिलासा मिळतो.
बोमन इराणी शेवटी 'बोमन इराणी' आहे, त्यामुळे सगळ्या हाराकीरीतही तो तग धरतोच.
अभिषेक बच्चन कबड्डी आणि फुटबॉलच्या मैदानावरच चांगला अभिनय करत असतो का ?
शाहरुखने सलमान किंवा आमीर बनायचा प्रयत्न न करता शाहरुखच राहावं, असं माझं प्रांजळ मत आहे. पोटावर अठ्ठावीस पॅक्स आणले तरी आधी 'हेल्दी' दिसणं महत्वाचं असतं. सोनू सूद आणि शाहरुख दोघेही ह्या सिनेमात भरपूर अंगप्रदर्शन करतात. पण ते फक्त एकालाच 'शोभतं'.
असो.
थेटरमध्ये उसळलेली गर्दी, हॉलमध्ये शिट्ट्या आणि हाळ्यांचा पाऊस ह्यावरून हे तर निश्चित की कितीही भिकार असलं तरी हे कटलेट 'कोटीचं उड्डाण' करेलच, पण म्हणून त्याला चविष्ट म्हटलंच पाहिजे असं थोडीच आहे ?
रेटिंग - धूम -३ पेक्षा जरासा बरा
http://www.ranjeetparadkar.com/2014/10/movie-review-happy-new-year.html
'तुम्ही गुलाब बघा, काटा नका
'तुम्ही गुलाब बघा, काटा नका बघू' > अहो पण तुम्हाला गुलकंद खायचा असल्यास त्यात काटा टाकणार का तुम्ही ? गुलाबच टाकणार ना
मस्त लिहिलंय!!
चांगला नसणार ही अपेक्शा ठेउन
चांगला नसणार ही अपेक्शा ठेउन बघितला आणि आवडला. एकदा बघण्यासारखा आहे.
परीक्षण व प्रतिक्रिया दोन्ही
परीक्षण व प्रतिक्रिया दोन्ही वाचून एकदा बघायला हरकत नाही असे दिसते. "लॉजिक मधली भोके" सहसा अशा चित्रपटांत भरपूर असतात. पण थिएटरच्या माहौल मधे तीन तास तुमचा टाईमपास केला चित्रपटाने का नाही यावर मला असे चित्रपट आवडतात. त्यामुळेच चेन्नई एक्सप्रेस, सिंघम ई आवडले होते. बहुधा हा ही आवडेल असेल दिसते.
एकदा पाहण्यासारखा आहे .
एकदा पाहण्यासारखा आहे . दिवाळीच्या कोठी सारखा !
डोके बाजूला ठेवून जायचे . धमाल आली . बरेच जण नवे ठेवत होती आधी ,
पण थेटरात तेच जोरात खिदळत होते .
सुरुवातीला शारुख जऱा जास्तच दिसतो मग मजा आहे .
दीपिका मस्त दिसते एकदम ! बमन ,सोनू सूद ,नसीर च्या मुलाचे काम आवडले .
रिया तुला आवडेल ! बिनधास्त जा
छानै परिक्षण. अवांतर: जतहैजा
छानै परिक्षण.
अवांतर: जतहैजा म्हणजे कोणता सिनेमा?
जतहैजा = जब तक है जान?
जतहैजा = जब तक है जान?
मला आवडला. एकत्र बसून बघताना
मला आवडला. एकत्र बसून बघताना मज्जा आली, दिवाळीत आनंद मिळावा हीच अपेक्षा होती आणि ती पूर्ण झाली. बस झाल.
काही चित्रपट धमाल एकत्र बघायचे असतात, काही समविचारी लोकाबरोबर चर्चा करण्यासाठी बघायचे असतात, काही फक्त आपल्याला स्वताला आवडतात म्हणून dvd विकत आणून बघायचे असतात.
हा धमाल आहे.
आणि कधी कंटाळा आला तर परत बघा आणि आठवा कि हा चित्रपट बघताना काय मजा केली होती
एकत्र बसून बघताना मज्जा आली,
एकत्र बसून बघताना मज्जा आली, दिवाळीत आनंद मिळावा हीच अपेक्षा होती आणि ती पूर्ण झाली. बस झाल. निर्मात्या
>> मान्य . बघून आलेल्या बर्याच जणांची प्रतिक्रिया अशीच आहे . हेच निर्मात्यानाही अपेक्षित होत अस दिसतय .
फॅमिलीला घेउन जाउ शकतात
फॅमिलीला घेउन जाउ शकतात चित्रपट बघायला हे मात्र नक्की
फॅमिलीला घेउन जाउ शकतात
फॅमिलीला घेउन जाउ शकतात चित्रपट बघायला हे मात्र नक्की
>>>
अर्थात, शाहरुखचा आहे तिथेच हे आले
असं काही नाही आठवा कभी अलविदा
असं काही नाही
आठवा कभी अलविदा ना कहना!
मी आई बाबा आणि लहान बहिणीसोबत गेलेले. मी स्वतः पण तेंव्हा लहानच होते
कभी अलविदा मी पुर्ण पाहिला
कभी अलविदा मी पुर्ण पाहिला नाही ... त्यात काय होते पण ?
दीपिका सगळ्यात मस्त दिसते ती
दीपिका सगळ्यात मस्त दिसते ती फायनल डेन्स मध्ये
लवेन्डर कलरच्या ड्रेस मध्ये , मेकप ही छान
दीपिका कशी दिसलीय या
दीपिका कशी दिसलीय या चित्रपटात? कुणी सांगेल का?
Straight from FB - दया: सर,
Straight from FB -
दया: सर, ये तो मर गया है।
ACP: तलाशी लो इसकी।
दया: जेब में कुछ है, सर ये तो Happy New Year का टिकट है।
ACP: इसका मतलब समझे दया, आत्महत्या है यह।
Straight from FB - " Happy
Straight from FB -
" Happy New Year must be Farah Khan's idea of Revenge against SRK for Slapping her husband Shirish Kunder...!!! "
आता एकदा स्ट्रेट फ्रॉम द
आता एकदा स्ट्रेट फ्रॉम द बॉक्स ऑफिस, असं चित्रपटाचं कलेक्शनही येऊद्या
पहिल्या दिवसाचे कलेक्शन ४४.९७
पहिल्या दिवसाचे कलेक्शन ४४.९७ करोड
दुसर्या दिवसाचे कलेक्शन ३८.५ करोड
तिसर्या दिवसाचे कलेक्शन ४५.७ करोड
-
"तलाश" आणि "जय हो" या चित्रपटाच्या लाईफटाईम एवढा कलेक्शन या तीन दिवसात केलेला आहे
म्हणजे, आमीरचा फ्लॉप +
म्हणजे,
आमीरचा फ्लॉप + सलमानचा फ्लॉप < शाहरुखचा सुपरफ्लॉप
दि.दे. - तलाश पेक्षा थ्री
दि.दे. - तलाश पेक्षा थ्री इडियट्स शी तुलना करायला हवी (कारण तलाश टिपीकल मसाला नव्हता), व जय हो पेक्षा दबंग-२ शी (कारण जय हो कमर्शियली सुद्धा पडला असेच समजले जाते ना?). याचे उत्पन्न तरीही जास्त असेलच, कारण या पठडीतील नवीन आलेला जवळजवळ प्रत्येक चित्रपट आधीच्यांपेक्षा जास्त कमावतो. बँग बँग ने ही कमावले म्हणे. चित्रपट कसा आहे हे वर्ड ऑफ माउथ ने लोकापर्यंत पोहोचायच्या आत २०० कोटी गाठलेले असतात. That's the real heist here
लोकसंख्या भरपूर आहे..
लोकसंख्या भरपूर आहे.. प्रकाशवाणी वर जाहीरात बरीच होते.. 'वाईट आहे' म्हटले तरी 'काय वाईट आहे ते एकदा बघू' म्हणून बरेच लोक जातात.. आणि तिकीटे स्वस्त नाहीत. २०० रुपये तिकीट म्हटले आणि १ कोटी लोकानी बघितला ... झाले २०० कोटी...
Straight from FB - दया: सर,
Straight from FB -
दया: सर, ये तो मर गया है।
ACP: तलाशी लो इसकी।
दया: जेब में कुछ है, सर ये तो Happy New Year का टिकट है।
ACP: इसका मतलब समझे दया, आत्महत्या है यह।
>> पुराना है यह
वैसेभी इंटरटेनमेंट देखता तो आत्महत्या करने की जरूरत ही नही होती
धन्यवाद रणजित , बर झाल रिव्यु
धन्यवाद रणजित , बर झाल रिव्यु टंकलास
फूकट ३ तास घालवून वीकेंड खराब केला असता नायतर
तसेही ह्या खान लोकांचे शिनेमे चॅनलवरच आल्यावरच बघतो हल्ली. नुसता कचरा झालाय .
copy (WhatsApp ) + paste
copy (WhatsApp ) + paste (मा.बो.)
चंद्रमोहन शर्मा उर्फ़ चार्ली (शाहरुख ख़ान) के पिता मनोहर (अनुपम खेर) मज़बूत तिजोरी बनाने के माहिर थे. लेकिन चरण ग्रोवर (जैकी श्रॉफ़) उन्हें एक हीरों की चोरी में फंसा कर जेल करवा देता है जहां वो खुदकुशी कर लेते हैं. चार्ली चरण ग्रोवर से बदला लेने का प्लान बनाता है. इस प्लान के मुताबिक उसे चरण ग्रोवर के तीन सौ करोड़ के हीरे चुरानेहैं जो दुबई की एक मज़बूत तिजोरी में रखे हैं. चार्ली अपनी एक टीम चुनता है जिसमें तिजोरी खोलने का एक्सपर्ट (बमन ईरानी), कंप्यूटर हैकर (विवान शाह) और एक्स्लोसिव एक्सपर्ट (सोनू सूद) है. फिर इस टीम में नंदू भिड़े (अभिषेक बच्चन) को शामिल किया जाता है क्योंकि वो चरण ग्रोवर के बेटे का हमशक्ल है.
हीरों की इस चोरी में सबसे बड़ी मुश्किल ये है कि जिस दिन हीरे दुबई में आने वाले हैं उसी दिन वहां वर्ल्ड डांस चैंपियनशिप का फिनाले हैं.
चार्ली पूरी टीम के साथ इस डांस चैंपियनशिप में हिस्सा लेने का फैसला करता है. इस चैंपियनशिप के बहाने कोई उन पर चोर होने का शक नहीं करेगा. इस काम के लिए वो बार डांसर मोहिनी (दीपिका पदुकोण) को अपनी डांस टीचर बनाते हैं. अंत में वो ना सिर्फ बड़ी आसानी से हीरे चुराते हैं बल्कि वर्ल्ड डांस चैंपियनशिप भी जीतते हैं.
Happy New Year!!! मत देखना....अत्यंत घटिया एवं बोर पिक्चर हैं ।
अत्यंत घटिया एवं बोर पिक्चर
अत्यंत घटिया एवं बोर पिक्चर हैं । > छान भाषा आहे.
Happy New Year!!! मत देखना> उशिरा सांगितले चित्रपटाने २०० चा आकडा पार केला

http://aajtak.intoday.in/stor
http://aajtak.intoday.in/story/special-article-on-shahrukh-khan-on-his-b...
चांगला लेख
copy (WhatsApp ) >>>>>> हि
copy (WhatsApp )
>>>>>>
हि शाहरूखचीच निगेटीव्ह पब्लिसिटीची चाल आहे. मस्त स्टोरी सांगून जाहिरात करायची आणि शेवटाला उगाच बोर आहे सांगायचे. अन्यथा कोणत्या चित्रपटाच्या वेळी असे मेसेज फिरताना पाहिलेय. आजच्या तारखेला राजकारणात #-# आणि बॉलीवूडमध्ये एसआरके हे मार्केटींगचे बाप आहेत.
आज पाहिला. प्रचंड
आज पाहिला. प्रचंड प्रेडिक्टेबल आहे. भलतासलता मेलोड्रामा टाळला असता तर अजून आवडला असता.
दीपिका, विवान आणि अभिषेकची कामं आवडली. सोनू सूदचंही काम अफाट आहे. बोमन नेहमीप्रमाणेच आहे. शाहरूखला वाया घालवलाय. विवानकडून भविष्यात अपेक्षा करायला हरकत नाही.
मला ती हॅलिपॅडवरची मारामारी लै बोर झाली. त्याची काही गरज पण नव्हती. उग्गाच टाईमपास.
पण!!!!! लॉजिकली कैच्याकै झोल आहेत. पैकी अनुपम खेरसोबत इतकावेळ काम करणारा आणी शालिमार सक्सेसफुली टेस्ट कराणार्या बोमन इराणी आणि सोनू सूदला जॅकी ओळखत नाही? चार्ली त्याला माहित नसतो? तो विकीचा डुप्लिकेट स्टेजवर दणाणा नाचतोय, लोकं बोंबा मारतायत आणि विकीला त्याचा कुणी डुप्लिकेट अस्तित्वात आहे हे समजतच नाही? चॅम्पियनशिप ट्रॉप्फीचं वर्णन ऐकल्यावर हिरे परत कसे आणले ते सांगायला शेवटच्या सीनपर्यंत थांबायची गरज नव्हती. खरंतर उलट (आईसवालं प्रकरण) दाखवलं अस्तं तर अजून भन्नाट वाटलं असतं. इंडिया आणि देशप्रेमाची फोडणी पार करपली आहे. उगाच घुसडल्यासारखं वाटातं.
फराहच्या पिक्चरमध्ये छोटे छोटे मोमेण्टस मस्त घेतलेले असतात. सोनूचा "सनी डान्स", डुप्लिकेट नमोंनी दिलेल्या शुभेच्छा, वॉकीटॉ़ई कानाला लवोन हॅलो करणे वगैरे.
साजिद खानच्या सेटवर रंगांचे बॉम्ब फोडायला एक्स आर्मी मॅन ठेवलेला असतो (असं फराह म्हणतेय) हाऊ अबाऊट अ स्क्रीन्प्ले राईटर हू कॅन रीड अॅन्ड राईट?
नंदू कुठल्याही अँगलनं "भिडे" वाटत नाही.
गाण्ञांमध्ये फक्त मनवा लागे गाणं आवडलं पण ते पिक्चरमध्ये अजिबात सूट होत नाही. बाकीचे डान्स नंबर सारखेच वाटतात. (विशाल शेखर आता जागे व्हा!!)
शाह्रऊखनं स्वतःछ्याच जुन्या पिक्चरवर जोक करणं चेन्नई एक्स्प्रेसमध्ये आवडलं होतं, यावेळी बोर झालं. या नॉस्टॅल्जियामध्ले स्टार रमले की त्यांची उतरण सुरू झाली असं मानायचं का? उलट खरंतर नंदूला सीनीअर बच्चनचे डायलॉग द्यायल हवे होते. मज्जा आली असती.
एकंदरीत माझं मत वन टाईम वॉच.
हॅप्पी बर्थ डे शाहरूख
हॅप्पी बर्थ डे शाहरूख
Pages