क्रॅपी न्यू इअर - (Movie review - Happy New Year)

Submitted by रसप on 26 October, 2014 - 01:56

घराजवळ एक हॉटेल आहे. साधंसंच. तिथले कटलेट मला जाम आवडतात. परवा मी माझे आवडते 'कटलेट' खात असताना एक मित्र आला. मी त्याला म्हटलं की 'तूही घे, मस्त असतात.' पण त्याने नाही म्हटलं.
नंतर माझं खाऊन झाल्यावर म्हणाला की, 'तुला माहित आहे का हॉटेलात कटलेट कसे बनवतात ?'
मी म्हटलं, 'नाही !'
'इतर भाज्या वगैरे बनवताना गॅस शेगडीजवळ जे सांडलेलं असतं ना ? ते गोळा करतात अन् देतात 'कटलेट' म्हणून शिजवून. आणि तुझ्यासारखे मूर्ख मस्त मिटक्या मारत खातात !'
हे खरं की खोटं, माहित नाही. पण आता मी आयुष्यात कधी 'कटलेट' हा प्रकार खाऊ शकणार नाही. काय सांगावं ! भटारखान्याच्या बंद दरवाज्याआड काय काय चालत असेल ! आपण शुद्धतेची खात्री मानून जे खातो, त्याच्याकडून किमान स्वच्छतेची अपेक्षा करावी, इतपत तरी त्याची योग्यता असेल का ?
अपेक्षा ! खरं तर अपेक्षा करणंच कधी कधी चूक असतं. इतकेच चोचले असतील तर जावंच कशाला थेटरात ? सॉरी.. हॉटेलात !
Actually थेटरात पण. हो ना ! 'मैं हूँ ना' आवडला म्हणून 'ओम शांती ओम' पाहिला. ठीक वाटला. तरी 'तीस मार खान' पाहिला. भंकस वाटला. त्या नंतरही मी अपेक्षा ठेवली की फराह खान भावापेक्षा बरी असेल आणि 'हॅपी न्यू इअर' पाहिला.
तर काही इंग्रजी सिनेमांच्या भटारखान्यात जमिनीवर सांडलेलं, पाय पडलेलं खरकटं कथानक आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'मैं हूँ ना', 'चक दे इंडिया' वगैरे बनवताना शेगडीबाहेर जे सांडलं होतं ते गोळा करून संवादाचे कटलेट्स माझ्यासमोर आले. गेल्या कित्येक सिनेमांत निव्वळ धांगडधिंगा शिजवताना विशाल-शेखरकडून जे ओघळ उतरून खरपुड्या झाल्या होत्या, त्यांची गाणी बनवलीत.
खरं तर गेल्या काही काळापासून, खास करून धूम -३ नंतर आमीर खान जाम डोक्यात जायला लागला आहे. सलमान खान तर इतका दाक्षिणात्य झाला आहे की आता त्याच्या तोंडी हिंदी डायलॉग (जे त्याला असंही येतच नाही) अजिबातच शोभेनासे झालेत. त्यामुळे आत्ता कुठे मला खानांतला शाहरुखच त्यातल्या त्यात बरा आहे असं वाटायला लागलं होतं. म्हणून हा 'क्रॅपी न्यू इअर' बघायला गेलो, तर 'जतहैंजा'चा ओंगळवाणा गेट-अप शिजवून झाल्यावर जी बरबट भांड्यांना राहिली होती, ती थापलेला अगदी रोगट दिसणारा शाहरुख समोर आला.
बरं हे सगळं तब्बल तीन तास सहन करावं लागलं. कटलेटवर कटलेट, कटलेटवर कटलेट डोक्यावर थापत जाऊन डोक्याचं भलं मोठं भजं झालं आणि पायाच्या करंगळीच्या नखापर्यंत तेलकट ओघळ घेऊन मी जेव्हा घरी परतलो, तेव्हा मी परत आल्यासारखा परतलेला नव्हे तर कढईत परतल्यासारखा परतलेला दिसत होतो.

मित्राने कटलेटची रेसिपी माझं खाऊन झाल्यावर सांगितली, पण मी ती चूक करणार नाही. म्हणून मी फराह खानच्या कटलेटची रेसिपी आधीच सांगून ठेवतो.

उदरनिर्वाहासाठी 'स्ट्रीट फाईट्स' करणारा 'चार्ली' (शाहरुख) वडिलांना - मनोहरला - (अनुपम खेर) त्यांच्या हाय एंड तिजोऱ्या बनवण्याच्या धंद्यात फसवणाऱ्या चरण ग्रोव्हर (जॅकी श्रॉफ) चा वचपा काढण्यासाठी आसुसलेला असतो. वडिलांचे मित्र टॅमी (बोमन इराणी) आणि जॅग (सोनू सूद) सुद्धा त्याच बदल्याच्या आगीत होरपळत असतात. ती संधी त्यांना मिळते. ग्रोव्हरने ३०० कोटीचे हीरे, मनोहरकडून घेतलेल्या 'शालीमार' तिजोरीत ठेवले असतात. ही तिजोरी लुटायचा प्लान बनवला जातो. पण तिजोरी लुटण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात.
१. तिथपर्यंत जाणे फक्त ग्रोव्हर व त्याचा मुलगा विकी( अभिषेक बच्चन)लाच शक्य असते. म्हणून विकीचा डुप्लिकेट नंदूला उचललं जातं.
२. तिजोरीभोवती असलेलं लेजर किरणांचे संरक्षक कडं भेदायला एक हॅकरही हवा असतो म्हणून अजून एक मेंबर 'रोहन' (विवान शाह) हा (बहुतेक) जॅगचा पुतण्या (की भाचा) टीममध्ये घेतला जातो.
जिथे हीरे ठेवलेले असतात तिथे 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप' होणार असते. मग डान्स शिकवण्यासाठी मोहिनी (दीपिका) हेरली जाते.
अशी ही सहा जणांची टीम बनते. ती आचरट चाळे करून वात आणते.

फक्त हा आचरटपणाच जर त्यांनी ग्रोव्हरसोबत केला असता, तरी त्याने त्यांना स्वत: होऊन ३०० कोटीचे हीरे दिले असते आणि माफीही मागितली असती. पण त्यांना त्याला वात आणायचा नसतो, तर त्याची वाट लावायची असते म्हणून ते तसं न करता चोरीच करायचं ठरवतात. त्या चोरीचं पुढे काय होणार, 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप'चं काय होणार, हे सगळं आपल्याकडे बॉलीवूडी कटलेट्सचा तगडा अनुभव असल्याने कुठलाही आश्चर्याचा धक्का वगैरे देत नाही.

Happy-New-Year-movie-image.jpg

विनोद म्हणून नंदूला हुकमी उलटी करणारा दाखवणं, हा विनोदाचा ओकारी आणणारा किळसवाणा प्रकार आणि 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप' बोलताना तोंडावर हात फिरवणं, तोंडात ब्रश केल्यासारखं बोट फिरवणं वगैरे तर पांचटपणाचा कळसच होता ! एकंदरीतच विनोदाचे सगळेच प्रयत्न एक तर केविलवाणे किंवा हिणकस आहेत.
झगमगाट आणि भडक रंगांची उधळण काही जणांचे डोळे सुखावते, दीपवते. मला तर ते पैश्याचं विकृत प्रदर्शन वाटलं. सौंदर्याला मेक अप आणि दागदागिन्यांनी मढवल्यासारखं मला वाटलं नाही, तर त्याच्या बोज्याखाली दबल्यासारखं वाटलं.

ओरिजिनल असलं, नसलं तरी एक बरं कथानक होतं. पण केवळ ढिसाळ हाताळणी आणि प्रदर्शनाच्या आहारी गेलेली कल्पकता ह्यामुळे तीन तासाचं वाटोळं होतं.
'मनवा लागे..' आणि 'इंडियावाले' ही दोन गाणी फक्त मुखड्यात छान आहेत. त्यानंतर विशाल-शेखर 'ये रे माझ्या मागल्या' करत नेहमीचीच ओढाताण किंवा धिंगाणा करतात.

कोरड्या दुपारच्या रखरखाटात अचानक कुठूनशी एखादी थंड हवेची झुळूक यावी, तशी अधूनमधून दीपिका दिसते आणि क्षणभराचा दिलासा मिळतो.
बोमन इराणी शेवटी 'बोमन इराणी' आहे, त्यामुळे सगळ्या हाराकीरीतही तो तग धरतोच.
अभिषेक बच्चन कबड्डी आणि फुटबॉलच्या मैदानावरच चांगला अभिनय करत असतो का ?
शाहरुखने सलमान किंवा आमीर बनायचा प्रयत्न न करता शाहरुखच राहावं, असं माझं प्रांजळ मत आहे. पोटावर अठ्ठावीस पॅक्स आणले तरी आधी 'हेल्दी' दिसणं महत्वाचं असतं. सोनू सूद आणि शाहरुख दोघेही ह्या सिनेमात भरपूर अंगप्रदर्शन करतात. पण ते फक्त एकालाच 'शोभतं'.

असो.
थेटरमध्ये उसळलेली गर्दी, हॉलमध्ये शिट्ट्या आणि हाळ्यांचा पाऊस ह्यावरून हे तर निश्चित की कितीही भिकार असलं तरी हे कटलेट 'कोटीचं उड्डाण' करेलच, पण म्हणून त्याला चविष्ट म्हटलंच पाहिजे असं थोडीच आहे ?

रेटिंग - धूम -३ पेक्षा जरासा बरा
http://www.ranjeetparadkar.com/2014/10/movie-review-happy-new-year.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सबटायटल्स मुक बधिरांना लवकर वाचता येत असतील. कारण ते लवकर शिकतात त्यांचे कोऑर्डीनेशन उत्तम असते

दिवाकर, बॉडीचं सोडा हो. चेहरा बघा. बिग बॉसमध्ये टीव्हीवर क्लोजपमध्ये चेहरा बघा. सीरीयसली त्याचा चेहरा उरलेल्या दोघांपेक्षा चांगला दिसतोय

(बॉडी स्पेशल इफेक्टने दाखवतात असा सोशल मीडीयावर फिरणारा मेसेज तसाही खोटाच आहे. विश्वास नसेल तर बिग बॉसमधले त्याचे टाईट टीशर्ट असतात तेव्हा बघा.

चेहरा बघा. बिग बॉसमध्ये टीव्हीवर क्लोजपमध्ये चेहरा बघा. >
त्यासाठी त्याने काय काय उपाय केले आहेत माहीती आहेत ना ? कित्येक सर्जरी केली आहे. त्याचेच साईड इफेक्ट्स झालेत जबडा देखील बिचार्याला उघडता येत नाही. इंजेक्शन्स घेत असतो. काय उपयोग असल्या सौंदर्याचा ?

राहिले बॉडीचे तर हे चित्र बघा कळेल Happy इथे देखील टाईट टिशर्टच आहे

IMG-20140513-WA0004.jpg

चेन्नई एक्सप्रेस च्या जवळ पास जातो का? की ओम शांती ओम सारखा आहे ? की जतहैजा? >>

मै हू ना अन ओशओ लेव्हलचा . चेन्नई मधे एक विलक्षण एनर्जी होती , ती नाहिये यात .

चेहरा बघा. बिग बॉसमध्ये टीव्हीवर क्लोजपमध्ये चेहरा बघा >>
पिऊन तर्र झाल्यासारखा दिसतो चेहरा. पुर्वी छान दिसायचा.

दिवाकर देशमुख,
मी मध्यंतरी व्हॉटसपवर सलमानचे वनविहार करतानाचे काही फोटो पाहिलेत, उघडा होता आणि खाली अर्धी डेनिम चड्डी. मस्सल टस्सल तर्राट फुगलेलेच होते. स्पेशल इफेक्ट वगैरे नाही. तसेच हृतिक वगैरेनी त्याच्याकडूनच टिप्स घेऊन बॉड्या बनवल्यात असेही वाचनात आलेले.
पण येस्स सर्जरी, ईजेक्शन, शरीरसौष्टव सेलेबल ठेवण्याची धडपड आणि साईडैफेक्ट्स हे कबूल.
पण भाईंना सर्व माफ आहे Proud

माहीत आहे पण सलमान असो या शाहरुख आमिर असो. आता त्यांचे वय राहिले नाही त्यामुळे अश्या वयात या प्रकारची बॉडी बनवताना त्रास तर होतोच वर हवा तसा इफेक्ट येण्याकरीता बाकीच्या गोष्टी देखील कराव्या लागतात. त्याने शरीरावर प्रतिकुल परिणाम होतो. आता या सगळ्यांनी काय अ‍ॅर्नॉल्ड आणि द रॉक सारखे अगदी १४-१५ वर्षापासुन तर व्यायामाला सुरुवात केली नसेलच. ते हवे तेव्हा शरीर वाढवु शकतात आणि हवे तसे बदल करुन आणु शकतात. उदा. हर्क्युलस मधे द रॉक ने अचाट बॉडी बनवली होती. पण आपले लोक अचानक बेढब शरीराला काही महिन्यातच सुडौल बनवायला गेले की असे काही साईड इफेक्ट्स होतात ज्यांचा परिणाम गंभीर होतो. उदा. सलमानच्या जबड्याचे दुखणे.

अरनॉल्ड फार मोठी तुलना झाली.
पण येस्स, मूळातच भारतीयांची कदकाठी पाहता सोसेल तितकेच पोसावे.
सलमानची पहिली बॉडी बहुधा वीरगती सिनेमापासूनची. त्या आधी लुख्खासुक्खाच पण क्यूट होता. ओ ओ जानेजाना मध्येही उघडा नाचताना आवडलाच पण हल्ली नाही सलमान त्याच्या बॉडीशॉडीसाठी आवडत.
असो, शारुख मात्र उग्गाच उग्गाच उग्गाच या ट्रॅकवर चाल्लाय Sad

इशा, अजुन नाही गं Happy
पाहीन लवकरच Happy

मै हु ना मला आवडलेला Happy
ओशाओ पण आवडलेला Happy

मला आवडेलच!!!!!!!!

अमा, सोनू सूद बाद मे पेहले शाहरुख :डोळ्यात बदाम असलेली वॉट्सअप वरली बाहुली:

सलमानच्या जबड्याचे दुखणे<<< नाही, सलमानला मध्यंतरी एक वेगळाच मायग्रेनचा त्रास झाला होता, त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली. ते इंजेक्शनशी संबंधित नव्हते (तसंही तो इंजेक्शन घेत नाही, याची माझ्याक्डे हमखास माहित आहे! Proud )

सलमान साधारण वीस वर्षापासून बॉडी बिल्डिंगमध्ये आहे, पण त्याने ही बॉडी निव्वळ स्टीरॉइड्स घेऊन बनवलेली नाही . शाहरूख आणि आमिरनं मात्र खूप उशीरा बॉडी बिल्डिंगकडे लक्ष दिलंय आणी त्याचा परिणाम तब्बेतीवर झालेला स्पष्ट दिसत आहे. त्या वयाच्या अभिनेत्यांमध्ये खरोखरचा फिट आणि हेल्दी अभिनेता म्हणजे अक्षय कुमार.

मध्यंतरी, 'बँग बँग'च्या प्रमोशनसाठी हृतिक आणि कतरिना स्टार स्पोर्ट्सवर आले होते. तेव्हा कुठलीशी चॅम्पियनशिप सुरु होती, बहुतेक CLT20 असावी. तेव्हा शोच्या अँकरने हृतिकला त्याच्या जबरदस्त बॉडीचं गुपित' विचारलं की, 'कुछ टिप्स दो, बॉडी बिल्डींग के लिये!'
त्यावर हृतिकने म्हटलं होतं.... 'कुछ अलग नहीं हैं, हम सब को वो पता हैं.. Just stay healthy. Thats it !'

सलमान साधारण वीस वर्षापासून बॉडी बिल्डिंगमध्ये आहे, पण त्याने ही बॉडी निव्वळ स्टीरॉइड्स घेऊन बनवलेली नाही . शाहरूख आणि आमिरनं मात्र खूप उशीरा बॉडी बिल्डिंगकडे लक्ष दिलंय आणी त्याचा परिणाम तब्बेतीवर झालेला स्पष्ट दिसत आहे. त्या वयाच्या अभिनेत्यांमध्ये खरोखरचा फिट आणि हेल्दी अभिनेता म्हणजे अक्षय कुमार.>>>>१००% राईट

रिया, मला जाम आवडली शाहरूखची व्यक्तीरेखा या सिनेमातली- चार्ली. तुला सेन्ट परसेन्ट आवडेलच Happy

आणि नंतर सिनेमा संपताना एक गाणं आहे, ते शेवटपर्यंत बघ. शाहरूखचा सर्वात धाकटा मुलगाही दिसतो. भारीच गोड आहे Happy

आमीर फिट दिसतो या तिघांत असं आपलं माझं मत.

तसे ही तिघे खान व सैफ सुद्धा तसे बुटके आहेत त्यामुळे ते काही फार भरदार बिल्डर दिसत नाहीत थोडी उंची पाहिजे उदा: सोनू सूद! किंवा रॉक. शारुक तर डोळे मिचमिचे करून दीपूचा काकाच शोभत होता. त्यात दीपू त्याहून उंच पण ह्या सिनेमात ती कुठेही त्याच्यापेक्षा उंच दाखविली नाही. स्वतः प्रोड्यूसर असल्याने तो हे सर्व करू शकतो.

जोकर/ तीसमारखां च्या प्रमोशनच्या वेळी फराबाई म्हटल्या होत्या की मुलांसाठी एक शाश्वत ठेवा म्हणून आम्ही नवरा बायको सिनेमे बनवून ठेवत आहोत. - प्रत्येक वेळी सिनेमा रिलीज झाला की राइट्स असल्याने मुलांना पैसे मिळू शकतील ह्या अर्थाने!!!!!

मुले सज्ञान झाली की काय होईल ते समोरच आहे. तो कुंदर दिसत नाही सध्या कपाटात लपविला वाट्ते त्यास.

रसप, शाहरूख त्याच्या वयाचा असताना क्युटच दिसत असेल Uhoh
५० व्या वर्षी तुझी ही अपेक्षा आहे का की तो त्याच्या मुलासारखा क्युट दिसावा? Uhoh

मनवा लागे या गाण्यात दिपीका जितकी सुंदर सोज्ज्वळ गोड्ड क्युट दिसली आहे की अजुन कुठल्याच गाण्यात दिसली नसेल

रसप, शाहरूख त्याच्या वयाचा असताना क्युटच दिसत >>> फेसबूकवर शाहरूखच्या लहानपणीचा आणि अबरामचा आताचा फोटो पाहिला. बाप बेटे शेमटूशेम दिसतात. आर्यन खान पण लहानपणी क्युट दिसायचा, आता गौरीतोंड्या झालाय.

शाहरूख सलमान आणि आमिर तिघांनीही आता आपण पन्नाशीला आलो एवढं मान्य केलं तरी बास म्हणायची वेळ आली आहे. Proud

शाहरूख सलमान आणि आमिर तिघांनीही आता आपण पन्नाशीला आलो एवढं मान्य केलं तरी बास म्हणायची वेळ आली आहे. फिदीफिदी

>> नंदिनी , माझ्या मते तेच सगळ्यात अवघड असाव . धर्मेंद्र , राजेश खन्नापासून अगदी अमिताभला देखील ते जमल नाही . अगदी त्यानेही अतिशय भिकार चित्रपट केलेत ,

रसप आणि चेतनजी,
आजचा सुर्य मावळायच्या आधी धागा शतकाकडे झेपावतोय.
हा शाहरुख नामाचा महिमा. आणि काल मला हेच आणि एवढेच बोलायचे होते.

अवांतर - शाहरूखबरोबर इतर दोन खान फ्री येतात याचाही पुन्हा अनुभव आला Wink

रिया,

क्युट दिसावा अशी अजिबात अपेक्षा नाही. फक्त स्वच्छ दिसावा, इतकंच. घाणेरडी, निवडुंगी दाढी, विस्कटलेले केस, लालसर पुटं चढलेले दात, न शोभणारी बॉडी बिल्डींग हे सगळं तर अव्हॉईडेबल आहेच की !

Pages