रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहेत रांगोळ्या.
मी गणपतीत काढलेली रांगोळी.

Image024_0.jpg

वुमन्स डे..
IMG_0650.jpg

वारली..
20140902_190443.jpg

दिवाळीसाठी केलेली प्लास्टीकच्या रांगोळीचा पहिला प्रयत्न..
20141020_223519.jpg20141020_223210.jpg

धन्यवाद कांचन! सुंदर काढलीत रांगोळी! वार्ली अप्रतिम, प्लास्टीकची पण छानच!
स्नु, खुपच ठसठशीत रांगोळ्या, काय सफाई आहे हातात आणि रंग संगती तर क्लास!

सुंदरच आहेत रांगोळ्या.. लहानपणी खुप काढायचो. पाण्यावरची, पाण्याखालची, भुश्यावरची असे अनेक प्रकार काढायचो मी आणि बहीण मिळून. मुंबईत खुप ठिकाणी प्रदर्शने भरायची रांगोळीची. अजूनही भरतात. त्या रांगोळ्या तर हुबेहुब काढलेल्या असतात.

सायली, आम्हा दोघांना आमच्या घरातूनच शह मिळालाय. माझी वहिनी आणि बहिणीची सून दोघी प्रोफेशनल रांगोळी कलाकार आहेत.

सायली , काय सुंदर काढल्या आहेस ग रांगोळ्या.
निपुण आहेस अगदी.
धागा ही छान . मस्त मस्त रांगोळया बघायला मिळतायत.

अरे व्वा.. सायली, खूप सुर्रेख..

कांचन्,स्नू तुमच्या रांगोळ्या ही खूप आवडल्या.. Happy

सायली..
सुरेख रांगोळ्या.. Happy (रेणुकेची तर जोरदार आहे)
सगळ्यांच्याच मस्त एकदम!!

Last diwali_in progress.jpgLast diwali_Aboli.jpg3 warsha aadhi kaali pooja.jpgAlpana_Aboli.jpglast year lakshmi pooja.jpg

ह्या माझ्या काही रांगोळ्या..
ह्यातल्या ज्या फक्त पांढर्या आहेत त्या बंगाली अल्पना आहेत! (तांदुळ रत्रभर भिजवुन मग कमी पाण्यात वाटुन त्याच्या पेस्ट नी कापसाच्या बोळ्याने काढलेल्या)
आणी बाकिच्या संस्कार भारती सारख्या..
(मला संस्कारभारती जमत नाहीत करण बोटांमधे फार फटी आहेत.. सगळी रांगोळी पडते मधुनच) Sad

सगळयाचे आभार...
दिनेश दा! अरे व्वा छानच!
हेमा ताई, वर्षु दी Happy
धनुकली काय सुरेख रांगोळ्या काढल्यास.. अल्पना पण छान. समोर उडीया भाभी राहायच्या त्या गेरुनी रंगवुन मग काढायच्या, ४ , ५ दिवस जशीच्या तशीच रहाते ना रांगोळी.
मला संस्कारभारती जमत नाहीत करण बोटांमधे फार फटी आहेत.. सगळी रांगोळी पडते मधुनच) ++ नाही नाही, खरच छान काढतेस तु.

माझा रांगोळ्या फोन मधे आहेत आणि फोन डब्बा आहे Sad त्यावरुन इथे नाही टाकता येत.
लॅपटॉप मधे व्हायरस आहे त्यामुळे फोन लॅपटॉपला नाही लावता येत Sad

तरी प्रयत्न करेन.
उद्या रांगोळीत लक्ष्मी काढणार Happy

सुंदर रांगोळ्या.. तो रांगोळीचा स्पर्श अजून बोटांना जाणवतोय.
नायजेरियात आम्ही ४ वर्षांपुर्वी दिवाळी साजरी केली होती. तिथे रंग रांगोळी कुठली मिळणार ? मग हळद आणि नीळ
वापरून रांगोळी काढली होती. हे दोन्ही डींकाच्या पाण्यात भिजवले आणि इयर बड्स वापरून रेखाटले. हे दोन्ही मिसळून हिरवा रंगही मिळाला.

टीन क्लास कलेक्शन... वार्ली,चेरी ओन द टॉप Happy धन्यवाद तुझ्यामुळे ३ नविन रांगोळ्या शिकायला मिळाल्यात..

टीना, वारली रांगोळी तर भरतकाम वाटतेय..

आणखी एक आमची लहानपणीची आयडीया. पुर्वी बर्फाच्या लाद्या बैलगाडीवर विकायला यायच्या. त्या लाकडाच्या भुश्यात ठेवलेल्या असायच्या. तो गाडीवाला असा भुसा स्वस्तात देत असे.

तो ओला असतानाच त्याला रांगोळीचे रंग लावायचे आणि मग त्याचा जाड थर देत रांगोळी घालायची. त्याला त्रिमिती आकार देता येत असे. आणि हा ओला भुसा वार्‍याने उडतही नसे.

Pages