लांबडा तांदुळ (दिल्ली राईस),
पालक एक जुडी,
लसूण,
खडा मसाला,
दही,
काजु,
मनुका,
ति़खट - मीठ चवीनुसार.
सजावटी साठी : --
ओलं खोबरं,
डाळिंबाचे दाणे,
प्रथम पालक निवडुन थोडा गरम पाण्यातून काढून घ्या. ऊकडुन घेतला तरी चालु शकेल. आता हा पालक मिक्सर मधे छान paste करून घ्या. बाजुला ठेवा.
काजु आणि लसूण खमंग तळून घ्या.
आता एका pan मधे तूपाची फोडणी करा. खडा मसाला घाला. खडा मसाला थोडा भाजुन घेतल्यावर त्यात पालक paste घाला. तळलेले लसूण चुरडुन घाला, काजु घाला व छान परतुन घ्या. आता लांबडा तांदुळ (दिल्ली राईस) धूऊन घाला व ति़खट - मीठ चवीनुसार घालुन छान mix करून घ्या व नंतर थोडे दही घाला. आता पुलाव शिजवायचा आहे तेव्हा प्रमाणानुसार पाणी घाला. (पाणी शक्यतो कमीच घालावे म्हणजे मोकळा होईल.)
२०-२५ मिनिटांमधे पुलाव छान तयार होईल.
सजावट--
ताटात / plate मधे पुलाव वाढा व वर ताजे ओले खोबरे आणि डाळिंबाचे दाणे पसरून घाला. बाजुला लिंबाची चकती ठेवा.
पालका मधून लोह मिळते. शिवाय पालक हा पोषक तसेच रक्त वर्धक आहे. लसुण घातला असल्यामुळे सारक आहे. काकडी रायता किंवा अननस रायता बरोबर असेल तर आणखीन छान चव खुलेल.
पालक हिरवा आणि डाळिंब लाल व खोबरं पांढरं असल्यामुळे छान रंगसंगती दिसते.
छान आहे.. पण १ जुडी पालक १.५
छान आहे.. पण १ जुडी पालक १.५ वाटी तांदुळा साठी जास्त वाटते...
वाह! छान वाटतोय कृतीवरुन पण
वाह! छान वाटतोय कृतीवरुन पण फोटो?
१ जुडी पालक १.५ वाटी तांदुळा
१ जुडी पालक १.५ वाटी तांदुळा साठी जास्त वाटते...>>>> पालक हा जास्ती झाल्यास उग्र वाटु शकतो. म्हणुन १ जुडी मी घेतली होती. पण तरी छान लागला. हवा असेल तर अजून पालक घेऊ शकता.
निल्सन, छान वाटतोय कृतीवरुन
निल्सन,
छान वाटतोय कृतीवरुन पण फोटो? >>>> पुढच्या वेळी नक्कि काढेन आणि डकवीन..