खमंग काकडी रायता...

Submitted by p_r_a_जो on 12 September, 2014 - 03:18
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्यः-
कोवळ्या काकड्या,
घट्ट ताजे दहि,
साय,
सैंधव मीठ,
फोडणीची मिरची (ठेचुन / मिक्सर मधुन काढुन घेणे),
सजावटी साठी डाळिंबाचे दाणे.

क्रमवार पाककृती: 

क्रुती:-
काकड्या छान कोचवून घाव्या, फोडणीची मिरची (ठेचुन / मिक्सर मधुन काढुन घेणे)
एका मोठ्या बाऊल मधे घट्ट दहि छान फेटुन घ्यावे व त्यात साय, सैंधव मीठ चांगले मिसळुन घेणे.
कोचवलेली काकडी त्यात घाला, ठेचुन घेतलेली फोडणीची मिरची घाला आणि शेवटी डाळिंबाचे दाणे घालून सजवा.

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी ३ काकड्या घाव्यात.
अधिक टिपा: 

ठेचुन घेतलेल्या फोडणीच्या मिरचीमुळे एक छान चव येते. सैंधव मीठ असल्यामुळे पाचकही आहे. वाट्लंच तर चाट मसाला हि घालु शकता. पुलाव, बिर्याणी असेल तर जोडीला ऊत्तम.

माहितीचा स्रोत: 
स्वतः करुन पाहिले.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राजो छान आहे रेसिपी.
आम्ही काकडीच्या किसात दही, शेंगदाणा कुट, मिठ किंचीत साखर घालून खमंग काकडी करतो. आजच करणार होते पण वेळ नाही मिळाला.

फोदनि चि मिर्चि म्हनजे काय >>>> फोडणीची मिरची म्हणजे घातलेली असते. बाजारात तयार मीळु शकेल. काहि लोक याला मिरचीचे लोणचे असेही म्हणतात.