Submitted by फेबु on 13 August, 2014 - 15:07
रामदेव बाबा यांची पतंजली ची प्रोडक्ट ऑनलाईन मागवता येतात का?असतील तर कुठून मागवता येतील?
पतंजली ची कुठली प्रोडक्टस चांगली आहेत ?तुम्ही वापरता का?अन आपला अनुभव काय आहे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तो रामदेव सगळ्यांना उल्लू
तो रामदेव सगळ्यांना उल्लू बनवतो तेव्हा यांच्या कल्चरचा अपमान होत नाही?
रामदेव + त्याच्यासारखेच अनेक बुवा बाबा.
अशी जाहिरात केल्यास
अशी जाहिरात केल्यास तुरुंगवास घडवला पाहिजे.
माझा एक बाळबोध प्रश्न. ते ऑर्थो...... या नावाखाली कोणतेही औषध अशा प्रकारे आयुष कडून तपासून सत्यापित केलेले असेते का? त्याची तर जाहिरात जावेद अख्तर पासून सगळे कराता ते!!!!
रामू म्हणजे आयुर्वेद असं काही
रामू म्हणजे आयुर्वेद असं काही समीकरण आहे का? त्याच्या औषधाला विरोध म्हणजे आयुर्वेदाला विरोध नसून मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्याच्या प्रवृत्तीला केलेला विरोध आहे.
आयुर्वेदात शिलाजीत नावाचा सध्या दुर्मिळ झालेला पदार्थ वापरला जातो जो हिमालयात ठराविक ठिकाणी ठराविक काळातच पर्वत माथ्यावरून मिळवला जातो . थोडंफार शिलाजीत मिळवायला काय मेहनत करावी लागते ते खालील विडिओ पाहून ठरवा
https://www.youtube.com/watch?v=EDibeR0rHKQ
आता आपला हा बाबा बघा, त्याच्या कारखान्यात टनाने शिलाजीत बनवून फक्त ८५ रुपयात २०ग्राम डबीत विकतोय
https://www.youtube.com/watch?v=JeymuHV2XDk
शहाण्या माणसाला जास्त सांगायची गरज नाही. त्याची भस्मे आणि बाकी औषधे पण कशी भंकस आहेत ते दाखवून देता येईल पण तेवढा वेळ नाही. मुळात आयुर्वेद श्रेष्ठ असले तरी औषधी निर्मितीत क्वालिटी कंट्रोल ची बोंब आहे आणि त्यात बाबाजींच्या औषधांचा तर विषयच नको. कोरोनावरील संभाव्य आयुर्वेदिक उपचारांसाठी आयुर्वेदात एकसे बढकर एक ग्रंथ वाचनालयांत धूळ खात पडलेत त्यात सापडतील. प्रत्येक ग्रंथातील ज्वर-श्वास-कास हि प्रकरणे वाचली तरी भरपूर औषधे सापडतील. प्रत्येक औषधात काय घटक आहेत?किती प्रमाणात आहेत? त्या प्रत्येकाचे फायदे/तोटे काय ?असा सर्वंकष अभ्यास करता येईल. ते नाही शक्य झाले तर एखाद्या अनुभवी वैद्याकडून ही माहिती मिळू शकेल.
हा बाबा आधीच इतका बोढका आहे की याची पिसे काढायला काही शिल्लक नाही आता. कोरोनील कोरोनावरील उपाय नसून बाबाजीचा ठुल्लू आहे
All medicines on Corona are
All medicines on Corona are on trial & error basis HCQ etc. Patanjali can sale it as immunity booster instead of Covid 19 cure. God knows it may work also.
चाललं तर त्यात नवल ते काय?
चाललं तर त्यात नवल ते काय?
लक्षणे नसणारे, सौंम्य लक्षणे असणारे उपचाराशिवायही बरे होतात.
औषधं त्रास कमी होण्यासाठी देतात.
जिद्दू ,बाबाबद्दल नेमकं
जिद्दू ,बाबाबद्दल नेमकं लिहिलंत.
तसे तर 'हिमालयात मिळणाऱ्या
तसे तर 'हिमालयात मिळणाऱ्या अति दुर्मिळ हर्ब ला मास प्रोड्युस करून नाक्या नाक्या वर पेस्ट विकणाऱ्या दुसऱ्या कंपनी वर पण कारवाई व्हायला हवी.
मुळात असे दावे कोणीही, कोणत्याही औषध कंपनीने करू नये म्हणून व्यवस्थित सर्व केस कव्हर करणाऱ्या गाईडलाईन हव्यात, त्या वेळोवेळी तपासल्या जायला हव्यात.
बाबा पूर्ण देव आहेत असं मी म्हणत नाहीये.पण या घटना आजूबाजूला नॉन बाबा ब्रँड मध्येही घडत आहे त्याकडेही दृष्टी जावी.
हिंदू, आयुर्वेद म्हणून काहीही दावे डोक्यावर उचलणे चूक आणि हिंदू, आयुर्वेद म्हणून प्रत्येक गोष्टी कडे शंकेने बघणेही चूक.
पतंजली ने रास्त किमतीत अनेक गोष्टी आणल्या आहेत, त्या गरीब आणि कॉस्ट सेव्हिंग वाल्या घरोघरी वापरल्या जातात.
चुकीच्या प्रॉडक्ट वर, दाव्यावर अवश्य कारवाई व्हावी पण 100% बाब बॅशिंग, बाबा प्रॉडक्ट बॅशिंग होऊ नये.
अनु , हो मोजक्या कम्पन्या
अनु , हो मोजक्या कम्पन्या सोडल्या तर सर्वांची हीच गत आहे. पण हा बाबा नेक्स्ट लेव्हल प्लेअर असल्याने त्याला बॅश नाही केलं तर बाकीच्यांचे पण फावेल. प्रियांका पाठक यांनी मोठी मेहनत घेऊन Godman to Tycoon: The Untold Story of Baba Ramdev हे पुस्तक लिहलं होतं पण बाबाने त्यावर बंदी आणली. त्यात बऱ्याच करामती दिल्यात ह्या बाबाच्या . पुस्तक जरी नाही मिळालं तरी गुगलवर त्यातील काही सन्दर्भ वाचायला मिळतील पुस्तकाच्या परीक्षणात.
नक्कीच.
नक्कीच.
त्यांच्या सर्व इललिगल आणि घातक प्रॉडक्टस वर बंदी आणावी.(उगीच फॉलोअर्स वाढले म्हणून काहीही दावे करून काहीही खपवलं असं करू नये..) जाहिरातीत 'भरोसेमंद कँसर बरा' वगैरे दावे होतात त्यावरही कारवाई व्हावी.
काही लोक पातांजलीवर तुटुन
काही लोक पातांजलीवर तुटुन पडले आहेत. पण खालील दावे पण चूकीचेच वाटतात आणि वर्षानुवर्ष केले जात आहेत. त्याबद्दल कोणी अवाक्षरही काढ्ले नाही. कारण त्या़ कंपन्या विदेशातील आहेत. त्यांचे सर्व जणू बरोबरच असते. उदा.
फेअरनेस क्रीमने त्वचा गोरी होते..
हॉर्लेक्स प्याल्याने ऊंची वाढते
मेग्गी मुलांसाठी नूडल हेल्दी आणि फास्ट फूड पर्याय आहे
मार्केटिंगसाठी राष्ट्रवाद,
मार्केटिंगसाठी राष्ट्रवाद, कपालभाती ने ९५% आजार बरे होतात, मधूमेह बरा करणारी वनौषधी, cure for homosexuality ते पेट्रोल ३० रुपयांना मिळेल आणि एक रुपया पन्नास डॉलरला असं सांगणारा बाबा इतर कोणाही पेक्षा अधिक डेंजरस आहे.
https://m.facebook.com/story
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2561426087443710&id=10519557... एका हातात धरलेल्या
मोबाइलने होणाऱ्या रेडिएशन मुळे दुसरा हात अधू होतो.
तुळशीचं पान रेडिएशनला प्रतिबंध करतं
'डोळस 'पणा बाळगला पाहीजे. मी
'डोळस 'पणा बाळगला पाहीजे. मी स्वतः आस्थाच्यानलवर रामदेवबाबांचे कारेक्रम बघुन योगासने व प्राणायाम शिकलो. त्यापासुन मला खूपच फायदा झाला. पातांजलीचे काही उत्पादने वापरुन पाहीली. जी चांगली वाटली ती पुन्हा घेतली, जी आवडली नाही, ती टाळली. मला वाटते, सर्व कंपन्याबाबतही हाच नियम लावावा. विनाकारण कोणामागे लागून आपला वेळ व उर्जा वाया घालऊ नये.
जिद्दू , मस्त प्रतिसाद!
जिद्दू , मस्त प्रतिसाद!
बाबाजीका ठुल्लू
बाबाजीका ठुल्लू
बाकी काहीही असो
बाकी काहीही असो
कोलगेट आणि पेपसोडन्ट पेक्षा मेस्वक पेस्ट मस्त आहे
डाबर ची पण छान आहे
पतंजली नाही आवडली
https://www.theweek.in/news
https://www.theweek.in/news/biz-tech/2020/06/25/allopathic-drug-used-in-...
पतंजली च्या कोरोनील च्या क्लिनिकल ट्रायल्स दरम्यात रुग्णांवर अलोपॅथिक औषधे वापरली गेली??
चुकीचे अशास्त्रीय दावे जगभर
चुकीचे अशास्त्रीय दावे जगभर केले जातात प्रस्थापित सायन्स मध्ये .
दावे केलेल्या संख्येपैकी फक्त 18 टक्के दावे योग्य पुरावा आणि अभ्यास करून केले ले असतात बाकी सर्व दिशाभूल करणारे अपुऱ्या अभ्यास वर आधारित अशास्त्रीय असतात.
पुरावे म्हणून भलत्याच प्रयोगाचे पुरावे भलत्याच ठिकाणी वापरले जातात.
एवढं भोंगळ कारभार सायन्स मध्ये जगभर चालू आहे.
त्या मध्ये एक रामदेव बाबा बस एवढेच म्हणू शकतो.
औषध पाजून त्या माणसाला कोरोना
औषध पाजून त्या माणसाला कोरोना रुगणसेवेत कामावर ठेवा महिनाभर ppe सूट किंवा मास्क न घालता.
Try करायला काही हरकत नाही.
Try करायला काही हरकत नाही.
रामदेव बाबा चे औषध म्हणजे चुकीचे च असणार हे कोण ठरवतो आहे.
कोणी हुशार व्यक्ती हे ठरवत नाही तर समाज मध्यम वर पडीक असलेले टपोरी ठरवत आहेत.
त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही.
पतंजली चे भारतातील मार्केट खूप मोठे आहे ते उगाचच आहे का.
प्रोडक्ट चांगल्या दर्जाचे नसते तर लोकांनी पैसे देवून विकत घेतले असते का.
खिक्क!!
खिक्क!!
औषध सापडल्याचा दावा झाला की जगभरात भारतमातेची मान अभिमानाने वर होते.
तो दावा खोटा होता कळले की देशाची बेइज्जती वगैरे होत नाही, फक्त जगभरात चालते असेच, रामदेव बाबांचे काय मोठेसे... इतकीच रिऍक्शन असते.
कोणत्याही कंपनीचा दावा खोटा आहे असे सिद्ध झाले की तिला माफी मागावी लागते, दंड भरावा लागतो, प्रोडक्ट मागे घ्यावे लागते.
पतंजली ला असे काही होत नाही.
त्यात काय मोठेसे!!
गोरे करणाऱ्या,हाडे मजबूत
गोरे करणाऱ्या,हाडे मजबूत करणाऱ्या,दात किडणे पासून वाचावणाऱ्या,90 km/ ltr mileage देणाऱ्या किती कंपन्या नी माफी मागितली आहे आणि दंड भरला आहे.
ही यादी खूप मोठी आहे.
हमखास गर्भ धारणा होईल असे
हमखास गर्भ धारणा होईल असे सांगून किती तरी लोक फसली जातात.
हे सर्व डॉक्टर च करतात.
किती डॉक्टर नी दंड भरलाय.
Corona वयस्कर माणसांना च होईल
Corona वयस्कर माणसांना च होईल तरुण तंदुरुस्त लोकांना होणार नाही.
तरुण आणि तंदुरुस्त पण गेले corona mule.
तापमान वाढले की व्हायरस कमजोर पडेल.
अमक्या च रक्त गट असणाऱ्या लोकांना धोका जास्त आहे.
O rakt गटाला धोका नाही.
मास्क लावायचा की नाही .
लावायचा तर कोणी.
किती तरी प्रकारात जगभरात उलटसुलट माहिती देणारे प्रस्थापित संशोधक च होते.
किती जण तुरुंगात आहेत.
हेमंत, पतंजलीने आणिबाणीसदृश
हेमंत, पतंजलीने आणिबाणीसदृश परिस्थितीचा फायदा उचलून पैसे कमवण्यासाठी कोरोना इलाजाचा दावा केला आहे ज्यामुळे हा धागा ट्रेंडिंग होतोय. तुम्ही सांगितलेले मुद्दे जरी खरे असले तरी तो प्रत्येक मुद्दा वेगळ्या धाग्याचा विषय आहे. पतंजली च्या औषधाला लोक विरोध करत आहेत म्हणजे बाकीच्या विदेशी औषधे किंवा ब्रॅण्ड्सना समर्थन देत आहे असा नाही तो मुद्दा. वड्याच तेल वांग्यावर का काढता? तुम्ही कोरोनील जरूर वापरा पण कोणी त्याचा मुद्देसूद विरोध करत असेल तर त्यांना त्यांचा मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. इथे येणारे सर्व सुशिक्षित असून कोणते प्रॉडक्ट वाईट आणि कोणते चांगले हे त्यांचे ते ठरवतील.
इथे कोणी मुसक्या बांधून
इथे कोणी मुसक्या बांधून कोरोनील दिलंय का कोणाला? समजा, औषध नसलं आणि नुसतं placebo effect मुळे कोणाला बरं वाटलं तर काय पंचाईत आहे? जे एक औषध सध्या सरकारने मान्य केले आहे त्याने माणूस गरेन्टिड बरा होतोच का? परवा मला कळलं एका video मुळे कळलं की पुण्यातील नामवंत खाजगी रुग्णालतील फेमस डॉक्टर जलनेती promote करणार आहेत अजून काही दिवस त्यांना जलनेतीचे positive results मिळत राहिले तर,शोध निबंध इत्यादी लिहून.
(No subject)
गई भैंस पानी में
गई भैंस पानी में
>>>>>>>>
>>>>>>>>
Corona वयस्कर माणसांना च होईल तरुण तंदुरुस्त लोकांना होणार नाही.
तरुण आणि तंदुरुस्त पण गेले corona mule.
तापमान वाढले की व्हायरस कमजोर पडेल.
अमक्या च रक्त गट असणाऱ्या लोकांना धोका जास्त आहे.
O rakt गटाला धोका नाही.
मास्क लावायचा की नाही .
लावायचा तर कोणी.
किती तरी प्रकारात जगभरात उलटसुलट माहिती देणारे प्रस्थापित संशोधक च होते.>>>>
हो, कोरोना विषाणू नवीन आहे, आत्तापर्यंत त्याची काहीच माहिती नाहीये, त्या त्या वेळेपर्यंत जी माहिती समोर येत होती, त्या वर आधारभूत निरीक्षणाने संशोधक माहिती देत होते , केलेल्या दाव्याच्या विरुद्ध जाणारी माहिती समोर आली तर जुने निष्कर्ष मोडीत काढून नवी माहिती देत होते.
याची तुलना जर कोणी , एका औषधांची ट्रायल चालू असताना रुग्णाला दुसरे औषध देणे, आणि रुग्ण बरा झाला तर पाहिल्या औषधांचा प्रभाव आहे असे सांगून ते औषध बाजारात आणणे, याच्याशी करत असेल तर कठीण आहे.
>>>>प्लासीबो इफेक्ट ने बरे वाटले तर काय वाईट आहे>>>
रस्त्या किनारीचे तंबू वाले हकीम, गल्लो गल्ली उगवलेले आयुर्वेदाचार्य, जिवंत मासा खायला घालून दमा बरा करणारे, गोमूत्र प्यायला देऊन रोग बरे करणारे, गेला बाजार बंगाली बाबा पण या सगळ्यांना शिक्षित लोकांकडून सुद्धा उदार आश्रय का मिळतो याचे रहस्य मज उलगडले.
>>>>औषध नसलं आणि नुसतं
>>>>औषध नसलं आणि नुसतं placebo effect मुळे कोणाला बरं वाटलं तर काय पंचाईत आहे>>>>>
कम्पनी ते औषध नाही असे म्हणत असेल तर काहीच पंचाईत नाहीये.
सरकार ने दिलेल्या परवान्याचा गैरवापर करून /चुकीचा अर्थ लावून, एक कम्पनी एक रसायन बाजारात आणते आहे, ज्याला ते करोना वरचे औषध म्हणतायत,
यातला सिरिअसनेस लक्षात येत नाहीये का तुमच्या??
Pages