किशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद, गंमतजंमत - आपलं भावविश्व व्यापून टाकलेली मासिकं

Submitted by मामी on 12 August, 2014 - 02:43

शालेय जीवनात शत्रुपक्षातील पुस्तकांबरोबरच अत्यंत जिव्हाळ्यानं वाचली जाणारी मित्रपक्षातील मासिकं होती. किशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद वगैरे अनेक मासिकांनी अपरीमित आनंद दिला आहे. आपल्या या लाडक्या मित्रांच्या आठवणी इथे जागवूयात.

विशेष सुचना : कृपया कोणत्याही मासिकातील उतारा इथे जसाच्या तसा लिहू नये.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरदा
<विको, तेच ते पुस्तक - डाकूंची टोळी आणि बालवीर (शैलजा राजे). मस्त होतं एकदम. शेवटी मढ आयलंडच्या बंगल्यातून सुटका होते असं काही तरी होतं. बांद्रा बॅन्डस्टॅन्ड, वाळकेश्वर, मढ वगैरे नावं पहिल्यांदाच त्या गोष्टीमुळे कळली.>
बरोबर तेच ते पुस्तक मला काही केल्या नाव आठवेना.
परत वाचायला मिळाल तर मस्त वाटेल!

इथे उल्लेखलेल्या पुस्तकांव्यतिरिक्त मिशा नावाचं एक रशियन मासिक(मराठी कि हिंदीतून आता नीटसं आठवत नाही ) यायचं. माझ्या वडिलांनी ते वर्गणी भरून माझ्यासाठी चालू केलं होतं. ते खूप सुंदर होतं. त्यात सुंदर चित्रं आणि लहान मुलांच्या गोष्टी वगैरे असत. मला खूप आवडायचं. पण तिथे रशियात क्रांती झाली, त्यासुमारास यायचं बंद झालं Sad

https://saintelmosfire.wordpress.com/tag/russian-childrens-magazine/

अवांतर :

बोबो, मिशा वरून आठवलं की ते १९८० च्या मॉस्को ओलिंपिकचं बोधप्रतिक (मॅस्कॉट) होतं.

आ.न.,
-गा.पै.

गामा.... मॉस्को ऑलिंपिक वर एक चित्रपट आला होता. तो मुंबईतल्या थिएटरमधे दाखवलाही जात होता.
पण त्याला प्रेक्षकच नव्हते. डोअर किपर्स येणार्‍या जाणार्‍यांना आग्रह करून बोलावत असत, हे मी प्रत्यक्ष बघितलंय.

चांदोबाच्या दोन आठवणी .
दुसरीत होतो . गोष्टी वाचता येत नव्हत्या .सहामाही परीक्षा झाली होती आणि दिवाळीची सुटी लागण्याअगोदर शुक्रवार शनिवार भाकड होते हे शुक्रवारी वर्गात कळलं . नुसती टंगळमंगळ करत दिवस गेला .शनिवारी घरातले दहा बारा चांदोबे शाळेत नेले .वर्गात हजेरी झाल्यावर गुरुजींना दाखवले .मुलांनी कल्ला केला .गुरुजींनी त्यातल्या गोष्टी वाचून दाखवल्या .एका तळ्यातल्या कुरुप बदकाच्या पिलाची गोष्ट त्यातलीच एक .

आठवीत असतांना सायन बस डेपोजवळच्या भाटिया वाचनालयात बसून गुजरातीतला चांदोबा वाचून गुजराती शिकलो .

मॉस्को ऑलिंपिक वर एक चित्रपट आला होता. तो मुंबईतल्या थिएटरमधे दाखवलाही जात होता.>> मॉस्को ८०. पुण्यात तो सिनेमा अलका टॉकीजमधे हाउसफुल चालल्याचं आठवतंय. Happy

कुमार मासिकात एक 'यती यक्षपुत्र' म्ह्णून कथा होती, बहुतेक थोडीशी Peter Pan वरून घेतलेली. एक राजकुमारी कुठेतरी दूरच्या ग्रहावर अडकते आणि तिला सोडवायला काही मुले आणि त्यांची ताई (हिचं नाव वंदना होतं) जातात. एक यती नावाचा यक्षकुमार त्यांना मदत करतो अशी काहीशी कथा होती. कुणाला आठवतेय का ती?

तसंच 'आनंद' म्हणूनही एक अजून एक मासिक असायचं. त्यातली एक 'गुब्बू' म्हणून दीर्घकथाही अतिप्रिय होती. गुब्बू हा धनगर मुलगा, राज्यावर पाळत ठेवणार्‍या शत्रुदेशाच्या हेरांना पकडून देतो, त्यात त्याची वेशांतर केलेल्या राजकुमाराशीही दोस्ती जमते अशी कथा होती.

या कथा आता परत वाचायला मिळाल्या तर्...आहाहा Happy

चांदोबा वाचायला खूप आवडायचं. मोठे मोठे राजवाडे, सुंदर साड्यांमधल्या राजकन्या या मला नेहमी कांजीवरम मधल्या श्रीदेवी आणि जयप्रदा सारख्याच वाटायच्या.
बाकी मात्र मी हिंदी कॉमिकसच वाचलेले आठवतात. चंपक- ऑल टाइम फेवरेट.
मधु मुसकान मधला डॅडिजी ( खूपच मजेदार होता, त्याला राग आला की त्याच्या कानातुन धूर निघायचा आणि गुरर्रर किट किट असा काहीतरी गुरगुरायचा.)
अजुन काही आवडीचे कॉमिक्स म्हणजे पिंकी, चाचा चौधरी आणि साबु, बिल्लु. पिंकी तर फारच क्यूट होती. अजुन एका कुठल्यातरी पुस्तकात सुपन्दि म्हणून एक पात्र होतं.... फारच कार्टून.

जुने अंक पुन्हा मिळवून प्रिंट नाही का करता येत? त्या त्या मासिकाच्या ऑफिसमध्ये जुने अंक असतील ना?

<<<त्यात भा.रा. भागवतांच्या काही फार सुरेख गोष्टी होत्या. एक 'गड आला आणि सिंहही आला' अशी होती. मुलांच्या वाढदिवसाला त्यांचे वडील नाना त्यांना ट्रेझर हंटला पाठवतात आणि मग बर्थडे गिफ्टच्या शोधात मुलं सिंहगडावर पोचतात, तिथे त्यांना पुस्तकांचा खजिना गवसतो अशी गोष्ट. >>>
यातले नाना मुलांना एक मंत्र म्हणायला सांगतात..... खजिन्या मला पाव आणि मुलं ते म्हणून दरवाजा उघडतात तर त्यांना पाव (Bread) मिळतो. मुल रागावतात पण त्यांना भूकही लागलेली असते...
हे वाचल्याच आठवतय.... तेव्हा मलाही नानांचा राग आलेला...
बादवे घरी काही किशोर आहेत बाईंडिंग केलेले. आता काढुन वाचतो...
आमचे चौदावे वर्षही आहे. अक्कू बक्कूची दिवाळी आहे...

हसल्यावर तोंडातून हिरे माणकं पडणारी गुणी मुलगी आणि चिडल्यावर तोंडातून विंचू पडणारी तिची दुष्ट बहिण अशीही एक गोष्ट आठवतेय...
आणि पिशी मावशीची कविता...
पिशी मावशी भजीच खाते
तिला न लागे कधीच झारा
तळणी मध्ये घालून बोटे
भजी काढते तेरा बारा...

खूषखबर ! खूषखबर !! खूषखबर !!!

किशोर मासिक डिजिटायझेशन लोकार्पण

सांगताना अत्यंत आनंद होतो आहे की, मागील ४६ वर्षे मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बालभारतीचे प्रकाशन असलेल्या किशोर मासिकाचे आजवरचे सर्व अंक आता डिजिटल रुपात ऑनलाइन मोफत उपलब्ध झाले आहेत. नाशिक येथे झालेल्या भव्य सोहळ्यात शालेय शिक्षण मंत्री मा. विनोद तावडे यांच्या हस्ते ३० हजार पानांच्या या दस्तऐवजाचे लोकार्पण करण्यात आले. या निमित्ताने बालसाहित्याचा मोठा खजाना किशोरप्रेमी वाचकांसाठी खुला झाला आहे. बुकगंगाच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून हा प्रकल्प कुठलाही मोबदला न घेता पूर्ण करण्यात आला. दर्जेदार बालसाहित्य आणि अनेक दिग्गज चित्रकारांच्या कलाकृतीचा आनंद या माध्यमातून घेता येणार आहे.
किशोर चे जुने अंक आणि त्यातील निवडक लेखांची सूची

वैनिल, इथे सांगितल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद. बालभारती आणि ह्या उपक्रमाला हात लागलेल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी तर शब्द नाहीत _____/\_____ !!!
माझ्याकडे माझ्या मोठ्या भावंडांकडून आलेले ७८-८०-८२ सालच्या आसपासचे किशोरचे अंक होते. त्यात भा.रा. भागवतांनी लिहिलेल्या आणि इतरही अनेक अतिशय सुरेख कथा होत्या. माझ्या लहानपणीच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग आहेत त्या कथा. ते अंक ( आमच्या परवानगीशिवाय ! ) दान करण्यात आल्याने त्या कथा वाचणे अशक्य झाले होते. ते सगळे अंक त्या लिंकवर बघून आनंदाने वेड लागायचे तेवढे शिल्लक आहे Happy

८२ च्या दिवाळी अंकात विस्मरणात गेलेल्या 'जौळ' आणि 'फुलवा' ह्या दोन कथा दिसल्या ( फुलवाला जोडून एक लाडीची गोष्टही आठवली. शहरातल्या आजारी मुलीच्या सोबतीला -मदतीला आणली गेलेली एक निरोगी, ठणठणीत खेडूत मुलगी. फुलवासारखी ती सुद्धा विजया वाड ह्यांनीच लिहिली असेल का ? )
'गड आला आणि सिंहही आला' शोधतेय पण नाही सापडली अजून. कुणाला सापडल्यास सांगा.

भा.रा. भागवतांच्या काही फार सुरेख गोष्टी होत्या. एक 'गड आला आणि सिंहही आला' अशी होती. मुलांच्या वाढदिवसाला त्यांचे वडील नाना त्यांना ट्रेझर हंटला पाठवतात आणि मग बर्थडे गिफ्टच्या शोधात मुलं सिंहगडावर पोचतात, तिथे त्यांना पुस्तकांचा खजिना गवसतो अशी गोष्ट. >>>
यातले नाना मुलांना एक मंत्र म्हणायला सांगतात..... खजिन्या मला पाव आणि मुलं ते म्हणून दरवाजा उघडतात तर त्यांना पाव (Bread) मिळतो
माझ्याकडे सुदधा होतं हे. बाकी भा. रा. भागवतांचे सगळेचं अनुवाद म्हणजे मेजवानीचं

गड आला आणि सिंहही आला' शोधतेय पण नाही सापडली अजून. कुणाला सापडल्यास सांगा.>>>

शोधत आहे पण अजून सापडली नाही. कोणाला मिळाल्यास् कोणत्या अंकात आहे ते कळवा.

मी कुठल्यातरी एका धाग्यावर उल्लेख केला होता की कुठलीतरी थरारक पाणबुडीशी संबंधित गोष्टीची मालिका किशोरमध्ये चालू होती पण मधले अंक गहाळ असल्याने मला ती अर्धवटच वाचायला मिळाली. नंतर योगायोगाने लायब्ररीत अचानक ते पुस्तक गवसले.

तर ती दीर्घकथा म्हणजे बहुतेक प्रकाश प्रभू ह्यांनी लिहिलेली 'सागरकैद'. फेब्रुवारी १९७९ पासून सुरु होतेय ही मालिका !

याय !!! 'गड आला आणि सिंहही आला' सापडली..... नोव्हेंबर १९८० - दिवाळीअंक

मीही कालच भेट दिली ebalbharati ला आणि खरंच आता खूप मोठा खजिना सापडल्याचा आनंद झाला आहे. परीक्षा संपल्यावर वाचून काढायला मोठे साहित्य भांडार सापडले.

Feb 1979 पासून सुरु झालेली प्रकाश प्रभूंची 'सागरकैद' म्हणजेच सायन्स फिक्शनचे जनक Jules Verne यांच्या सुप्रसिद्ध 20000 Leagues Under The Sea चा मराठी अनुवाद...
खरंच अद्भुत आहे की मी मूळ इंग्रजी कथा वाचली होती आणि मला त्याचा मराठी अनुवाद हवा होता, तो किशोरमुळे आणि मायबोलीकरांमुळेच शेवटी मिळाला! खूप खूप धन्यवाद!!

याय !!! 'गड आला आणि सिंहही आला' सापडली..... नोव्हेंबर १९८० - दिवाळीअंक>>>

धन्यवाद!!! काय मजा आली परत वाचताना!!
अनेक दिग्गज लेखकांनी किशोरला योगदान दिले आहे. आता सावकाश वाचून काढणार. मी वाचलेले बहुतेक किशोर अंक दिवाळी अंकच आहेत. कारण आमच्या आजोळी किशोर येत असे आणि दिवाळी भेटीत फराळाच्या आधी आम्ही किशोरचा फडशा पाडायचो Happy

कुमार, आनंद ही मासिकेही लाडकी होती. त्यांचंही असं डिजिटायझेशन झालं तर काय बहार येईल Happy

आज सकाळीच पेप्रात बात्मी वाच्लीवती. हिथं दायरेक लिंक! भारी. भुक्मार्कून ठेव्ल्य. वाचीन सवडीनं...

मलाही परवाच ही लिंक मिळाली आणि गेले दोन दिवस journey into the past चालू आहे...Feeling amazing!
आमच्याकडे पण ७६-८२ तले सर्व किशोर प्रत्येक वर्षाचे १२ एकत्र बाईंड केलेले होते...कित्येक वर्ष! मग ते लायब्ररीला डोनेट केले. आता परत तो खजिना हाती लागल्याने अतिशय आनंद झालाय.

ते सगळे अंक त्या लिंकवर बघून आनंदाने वेड लागायचे तेवढे शिल्लक आहे Happy >>> +१००
खुपच आनंद झालाय किशोर चे अंक बघुन

खुपच छान धागा.
मनापासून आभार.
किशोर च्या लिंक साठी देखिल.

इन्टरनेट वर चांदोबा चे देखिल अनेक अंक आहेत. सर्च केल्यास नक्की सापडतील.

Pages