किशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद, गंमतजंमत - आपलं भावविश्व व्यापून टाकलेली मासिकं

Submitted by मामी on 12 August, 2014 - 02:43

शालेय जीवनात शत्रुपक्षातील पुस्तकांबरोबरच अत्यंत जिव्हाळ्यानं वाचली जाणारी मित्रपक्षातील मासिकं होती. किशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद वगैरे अनेक मासिकांनी अपरीमित आनंद दिला आहे. आपल्या या लाडक्या मित्रांच्या आठवणी इथे जागवूयात.

विशेष सुचना : कृपया कोणत्याही मासिकातील उतारा इथे जसाच्या तसा लिहू नये.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छावा हा दिवाळी अंक.
ज्ञान प्रबोधिनीची मासिकं.
किशोर दिवाळीतील शेवटची चित्रकथा.
चंपक दर महिन्याआड का होईना असायचाच.
आताही काही किशोरचे अंक जपून ठेवलेले आहेत.कुणाला हवे असतील तर मेल करु शकतो.

या धाग्याबद्दल धन्यवाद.

मामी काय भन्नाट धागे काढतेस. अगदी जिव्हाळ्याचा विषय, पण आताफारसे आठवत नाही.

एकच लक्षात आहे. किशोर मधे एक गोष्ट होती, एक मुलगा उठत नसतो झोपेतून म्हणून आई त्याला डिरेक्टली बाथरूमच्या नळाखाली बसवते वगैरे. मग नंतर तो म्हणतो मला चहा पाहीजे व भरपूर बिस्किटं. चहा नि दहा.. हे चहा नि दहा मला ऑल्मोस्ट दर वेळेस आठवते!! Happy त्या गोष्टीत पुढे काय होतं अजिबात आठवत नाहीये.

वोंका नि चॉकलेट फॅक्टरी पण फार भारी होती..

कम्या,आवट्या,बद्रो आणि उफाळ्या अशी नावं फक्त किशोरच देऊ शकला हो.
चांदोबातले विक्रम वेताळ आणि ट्रॉयचं युद्ध... त्यातली कोडी आणि छोट्या-छोट्या बोधपर गोष्टी.त्यातली चांगली पिशाच्चे,त्यांची ती सळसळणारी सफेद चित्रं...प्रत्येक सोप्या गोष्टीतून दिलेला बोध...नागीरेड्डी आणि चक्रपाणींचे लाख-लाख धन्यवाद! ठकठक मधली राजीव तांबेंची 'बब्बड'.

किशोरमध्ये एक 'पकीडा लपकीडा' असल्या नावाची एक क्रमशः कथा सुरू होती. त्यात त्या मुलाला काळात काही वर्षं मागं जाता येणार असतं आणि तो चुकून त्याच्या जन्मापर्यंत मागे जातो, इथपर्यंत वाचली होती.

अजून एक फेव्हरिट मासिक म्हणजे विज्ञानयुग. त्याचा दिवाळी अंक म्हणजे विज्ञानकथा विशेषांक असे. नंतर बंद झालं ते मासिक.

चंपकमधल्या प्राण्यांची नावं एकदम फ्याशनेबल असत. मिंटी कोल्हीण, स्वीनी खार, मिकी हत्ती.

ज्ञानसागरातील शिंपले
किशोर
आनंद
षटकार
कुतुहल
फास्टर फेणे
चांदोबा
- महाबली वेताळ, वाघ्या कुत्रा, हिरो घोडा, डायना पामर, गुर्रन, रेक्स, डेंकालीचे जंगल, कवटी गुहा, बांडार जमात, जंगल पेट्रोल
- जादुगार मँड्रेक, महाबली लोथार, नार्डा, लोथार ची बायको कार्मा , त्यांचा शेफ असलेला होजो, आकाशगंगेचा राजा मॅग्नान, मँड्रेक आणि त्याचा दुष्ट सावत्र भाउ ल्युसिफर उर्फ कोब्रा आणि त्यांचे वडिल थेरॉन, जादुचे स्फटिक आणि जादुचे विश्वविद्यालय
-फ्लॅश गॉर्डन, त्याची बायको डेल, मित्र झर्कोव्ह त्यांचा शत्रु स्त्रीलंपट मिंग, आधी शत्रु आणि मग मित्र झालेला राजपुत्र बारिन...
- बहादुर, त्याची बायको बेला, सुखिया, लखन आणि नागरी सुरक्षा फोर्स

... सारे विसरु म्हटले तरी विसरत नाही

गापैंनी दिलेला मंत्र भारीये. मला फक्त शेवटची ओळ आठवत होती.
या धाग्याबद्दल थँक्स ग मामी.
किशोर मध्ये एकदा ती 'मुकूट हवा मज जलबिंदूंचा' नावाची गोष्ट आली होती. ती एकच मला खूप नीट आठवतेय. बाकी आता काहीच आठवेना Sad

आमच्या कडे पण किशोर यायचा. किशोरचा अंक आधी कोण वाचणार यावरुन बहिणीशी भांडण ठरलेले. कुमार, फुलबाग आणि चांदोबा लायब्ररीत मिळायचे. ६वी-७वीत असताना शाळेच्या लायब्ररीमुळे विज्ञान युग वाचायला सुरवात झाली. भालबा केळकर, सुधाकर भालेराव वगैरे मंडळीचे सोप्या मराठीतले विज्ञानविषयक लेखन असायचे, विज्ञान कथा असायच्या. किशोरचे अंक आईने बाइंडिंग करुन बरीच वर्षे जपुन ठेवले होते. माझी मामे भावंडं दुसरी तिसरीत जाताच एका सुट्टीत सगळा खजिना त्यांना पाठवून दिला. चंपक मी लहान असताना वाचल्याचे आठवत नाही. पण कॉलेजमधे असताना माझ्या मामेबहिणीला त्यातल्या गोष्टी वाचून दाखवव्या लागायच्या नॅप टाईमला.

भन्नाट धागा!
लीलावती भागवत बहुतेक हेच नाव असाव लेखिकेच.
चार पाच मित्र मैत्रिणी असतात त्यापैकी एकाला पळवून नेतात आणि मग त्या मुलाचा शोध चालू होतो अशी कथा होती.
त्यात एका गाडीचा MRS असा नम्बर असतो. त्यावर ती मुल मिसेस मिसेस असा नम्बर होता अस सान्गतात अशी काहीतरी कथा होती. कोणाला नाव माहीत आहे का?

चम्पक, किशोर, चान्दोबा, आनन्द, ठकठक आणी चाचा चौधरीन्ची कॉमिक्स याने अख्खे आयुष्य व्यापलेय.:स्मित:

मामी मस्त आठवणी जागवल्यात.:स्मित: किशोरमध्ये एक अलकनन्दा आणी तिच्या भावाची की बहिणीची गोष्ट होती. तिला एक जादूगार पळवुन नेतो, मग कुणीतरी सोडवत वगैरे. मला ती अलकनन्दा आवडायाची. असेच काहीतरी माझ्या सोबत व्हावे असे मला वाटायचे.:फिदी:

चान्दोबात कायम प्रबोधनपर गोष्टी. तर चम्पकमध्ये चुन्चु, चिकू च्या गमती जमती.

आता कुठे मिळतील का ह्या सगळ्याचे जुने अंक? न जाणो किती वाचायचे राहिलेत.. पण आता मुलासोबत वाचायला खूप मज्जा येईल.

रविवारी सकाळी लहान मुलांचा कार्यक्रम लागायचा तो लागतो का अजून? कोणी एइकत का तो? आणी आठवड्यातल्या एका संध्याकाळी सुद्धा लागाय्चा लहान मुलांसाठी कार्यक्रम. ते एइकायला मिळालं की काय भारी वाटायचं आपल्या मुलांना त्याम्ची आवडती सिरियल पाहायला मिळालं की काय वाटत असेल त्याचा फील येतोय.

विको, तेच ते पुस्तक - डाकूंची टोळी आणि बालवीर (शैलजा राजे). मस्त होतं एकदम. शेवटी मढ आयलंडच्या बंगल्यातून सुटका होते असं काही तरी होतं. बांद्रा बॅन्डस्टॅन्ड, वाळकेश्वर, मढ वगैरे नावं पहिल्यांदाच त्या गोष्टीमुळे कळली

भा.रा. भागवतांचं 'जयदीपची जंगलयात्रा' वाचलंय का कुणी ? गणपतीपुळे ते त्रिनिदाद ते थेट अ‍ॅमेझॉनचा किनारा, ब्राझिल असा ग्राफ होता त्याचा. आमच्याकडचं गायब झालंय आणि सध्या मिळत नाहीये कुठे ते Sad

माझ्याकडे पाच-सहा अंक आहेत.पण सगळे स्कॅन करुन टाकणं..अरे बाप्रे...
परत कॉपीराईट भी है ना त्याला...पण जमलच तर एक-दोन कथा स्कॅन करुन मेल करु शकतो.
चंपक्,चांदोबा(जुने-नवे),ढ्वळे ग्रंथ प्रकशनाच्या प्रदर्शनातून घेतेलेली काही पुस्तकं आणि बरच काही शिफ्ट होताना देऊन टाकलं आईने एका शाळेला का कुठल्या ग्रंथालयाला. Sad आख्खा एक लॉफ्ट भरलेला त्या पुस्तकांनी.
पाहीजे होती आता ती पुस्तकं.तुमच्या पाल्यासाठी घेतलेली पुस्तकं जपून ठेवा.त्याचं महत्व ती मोठी झाली की कळेल त्यांना.

लोकहो,

बिपिन बुकलवार कोणाचा मानसपुत्र होता? त्याचं अराउंड मुंबई इन एटी अवर्स हे पुस्तक वाचल्याचं आठवतं.

आ.न.,
-गा.पै.

शालेय जीवनातले हे असले सच्चे मित्रच निवृत्तीनंतरही तुम्हाला आनंदायी साथ देतात, एवढंच स्वानुभवावरून सांगतो !

इन्द्रजाल कॉमिक्सचा वेताल मी कधीच चुकविला नाही. दुर्दैवाने १९८८ ला ते बन्द झालं.

डायमन्ड कॉमिक्सचा वेताल ..फॅन्टम वाचून मी दुधाची तहान........ असो.

गेले ते दिन गेले. Sad

Pages