मजेत छान खेळू या (साभिनय बाल गीत)

Submitted by पुरंदरे शशांक on 18 June, 2014 - 01:06

मजेत छान खेळू या (साभिनय बाल गीत)

गरगर गिरकी घेऊया घेऊया
भिंगरी भिंगरी होऊया होऊया

हात पसरुन धावूया धावूया
विमान मस्त उडवूया उडवूया

टगडक टगडक दौडू या दौडू या
घोड्यावर स्वार होऊ या होऊ या

एकामागे एक एक, डबे डबे होऊ या होऊ या
झुक झुक झुक झुक आगगाडी शिट्टी मारत जाऊ या जाऊ या

एक हात कानाशी, एका हाताची सोंड अश्शी
हत्ती दादा होऊया मजेत मस्त झुलू या

हात वरती नाचवत, पाऊसधारा झेलू या झेलू या
गाणे गात पावसाचे, गोल गोल नाचू या नाचू या

पावसाबरोबर येतो कसा, डराव डराव करतो कसा
बेडुक उड्या मारु या मजेत छान खेळू या खेळू या

------------------------------------------------------------------------------------------
वेगवेगळे प्राणी, पक्षी, इ. घालून हे गाणे पुढे कितीही वाढवता येईल .... Happy

खेळताना जेवढी जास्त मुले तेवढी जास्त मजा येईल ... Happy Wink

छोट्यांकडून हे करवून घ्या आणि पहा मग कशी रमतात ती ... Happy
अर्थात पालकांना यात आधी सामील व्हावे लागेलच हां.... Happy Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users