वर्षाविहार २०१४: संयोजक हवेत आणि नवीन कल्पना कळवा

Submitted by Admin-team on 29 May, 2014 - 02:03

यंदाचा (२०१४) वर्षाविहार हा आपला १२वा ववि आहे.. गेली ११ वर्ष उत्साहात साजर्‍या झालेल्या या उपक्रमात नवीन कल्पना पाहिजेत. या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक..

तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा. आपण साधारण्पणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही वर्षासहल आयोजीत करतो.

संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्‍या नावडणार्‍या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस्स्स्स्स्स ववि फिव्हर इज बॅक Happy

संयोजनात काम करता येणार नाही पण फार लांबचं ठिकाण ठरवू नका बाबा (गेल्या वर्षी सारखं) मग यायला जमत नाही Sad

बाकी आयडीयाज देते जमतील तशा Happy

यंदाचा ववि नक्की पुणे-मुंबईच्या मधे होणार.. गेल्या वेळेसचा अनुभव लक्षात घेता..

हिम्या... तुला लाख मोदक.
यंदाचा ववि हा नक्की पुणे- मुंबईच्या मधे असलेल्या ठिकाणीच होणार.

मी असेनच संयोजनात.
रिया, वेल तुम्हाला जमेल का यावर्षी?

मला संयोजनात भाग घ्यायला आवडेल... असे ठिकाण/ रिसार्ट असावे जिकडे आवडीनुसार वेगवेगंळ्या गोष्टी करता येतील... नदिकिनारी/ वडाच्या झाडाखाली पुस्तक/कवितावाचन, zip drive adventures, पाण्यात/ धबधबामध्ये डुंबण.. वगैरे...

ववि ला यायला आवडेल . हा पहिलाच ववि असेल माझा . पण संयोजनात काम करता येणार नाही.

पुणे मुंबई रस्ता कुठेही चला , ढाबा पण चालेल पण मुरबाडसारखे दूर नको.... Happy
ह.घ्या.

अ‍ॅडमीन.. तारिख लवकर फायनल करा आणि संयोजनात येण्याबाबत थोड सविस्तर लिहा, म्हणजे नेमके काम काय करायचे,किती वेळ द्यायचा वगैरे .. संयोजनात भाग घेणे शक्य आहे.

The Great Escape
Parol - Bhiwandi Road, Off Vajreshwari Road
Bombay Ahmedabad highway,
Virar (East), Thane, Maharashtra, India

http://www.greatescape.co.in/contact.html

हा एक Water Park आहे . नाशिक ,पुणे, मुंबई सगळ्यांन साठीच मध्यवर्ती ठिकाण आहे.
100% शाकाहारी , ७५० रु. जेवण व सकाळ संध्याकाळचा चहा,नास्ता अनलिमिटेड
जेवण हि स्वादिष्ट........

कार्ल्याचे MTDC रिसॉर्ट आणि वॉटर पार्क अलीकडेच रिनोव्हेट केले आहे, पायलट्मध्ये चेक करा वाटल्यास.

<संयोजनात येण्याबाबत थोड सविस्तर लिहा, म्हणजे नेमके काम काय करायचे,किती वेळ द्यायचा वगैरे .<>
गेल्या ५ वविंचे सविस्तर वर्णन वाचुन काढा. आयडियाची कल्पना येइल...
तसेच संयोजक म्हणुन काम करणे, म्हणजे आधी जागा निश्चित करणे, त्यासाठीचा समन्वय.., त्यानंतर नोंदणी, टी-शर्ट नोंदणी, सांस्कृतिक समिती, जाहीरात करणे, टिझर्स देणे अशी य्य्य कामे असतात.
पहिल्या मिटींगमधे, ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शन करतातच.
मी मागच्या वर्शी पहिल्यांदाच आले संयोजनात, पण असे वाटते की आता तो माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, यावरुनच काय ते समजा.

मुम्बई - माळशेज १३४ किमि.
पुणे - माळशेज १३१ किमि.
नाशिक - माळशेज १३६ किमि.

माळशेज घाटात गेल्यावर्षीच जाऊन झाले आहे.. जर घाट बंद असेल तर फार प्रॉब्लेम येतो.. पुणेकरांना लांबून यावे लागते.. आणि मग खूप वेळ लागतो.. दिसायलाच सगळी कडून अंतर समान आहे.. पण प्रत्यक्षात तसे नाही.. पुण्यातून यायला भरपूर वेळ लागतो.. आणि नाशिक मधून आधी कोणी येणार आहेत का ते बघा.. गेल्यावर्षी एकही जण नव्हता.. सामूहिक टांग दिली नाशिककरांनी...

माळशेज बंद असेल तर नाशिककरांनाही सोयीचा रस्ता नाही..

मुंबईकरांनाही सोयीचा नाही माळशेज घाट. रस्ता कंटाळवाणा आणि खराब आणि पावसाळ्यात तर बघायलाच नको.
कर्जत, लोणावळा, खोपोली ही ठिकाणं बेस्ट आहेत.

<<पुणे - मुंबईच्या मधे आणि जेवण चांगले बाकी फार काही अपेक्षा नाहीत. माझा पहिलाच ववि असेल हा.>>
माझाही Happy

Pages