वर्षाविहार २०१४: संयोजक हवेत आणि नवीन कल्पना कळवा

Submitted by Admin-team on 29 May, 2014 - 02:03

यंदाचा (२०१४) वर्षाविहार हा आपला १२वा ववि आहे.. गेली ११ वर्ष उत्साहात साजर्‍या झालेल्या या उपक्रमात नवीन कल्पना पाहिजेत. या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक..

तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा. आपण साधारण्पणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही वर्षासहल आयोजीत करतो.

संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्‍या नावडणार्‍या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२०० किमी...

वविसाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन कर्जत, खोपोली, लोणावळा.. हेच आहेत. उगाच इकडे तिकडे शोधाशोध करु नका..

प्राजकता,साईट अस्तित्वात नाहीये ही.

मावळ्सृष्टीला ववि झालाय दोनदा. गिरीवन तिथेच आहे ना? हे पण मुंबईकराना लांबच आहे.

जिप्सी,हा स्पॉट चांगला आहे. जुन्या वविच्या पायलट्च्या वेळेस भेट दिली आहे याला.फक्त रेट्स पहायला हवेत यांचे.

फक्त रेट्स पहायला हवेत यांचे.>>>>>हो मयुरेश, त्यांनी साईटवर रेट दिले नाहीत. नॅचर ट्रेल्सच्या साजन रिसॉर्टला जाऊन आलोय. जागा आणि जेवण आवडलेल. Happy

ठाण्यात, पितांबरीचे ऑफिस आहे त्याच इमारतीत नेचर ट्रेल्सचे ऑफिससुद्धा आहे. उद्या ठाण्याला जाणार आहे. रेट्स विचारतो. Happy

इथे रेट्स आहेत पण वन डे पिकनिकचे नाही. Sad
http://www.naturetrails.in/cgi-bin/rez60load.pl?contact.html

गिरिवनची साईट ऑफीसमधे ओपन होत नव्हती म्हणून मी नुसतीचं लिंक दिली, मी एक महीन्यापूर्वी चेक केली होती तेव्हा तर ओपन झाली होती. मुलीची ट्रिप गेली होती गिरिवनला, वयोगट - ५ ते १०, त्यांना तरी आवडलं होतं. विक्रम गोखलेंचं आहे वाटतं ते.

सगुणाबाग चांगल आहे की ... आधी ववि झालाय म्हणुन काय झाल ?

सायलेंट बकवास आहे ... पुण्याला प्रचंड लांब ...

हिम्या +१ ... मुंबई पूण्याच्या मधे बघा ...

सगुणाबाग भर उन्हाळ्यातही बेस्ट होतं. पावसाळ्यात तर प्रश्नच नाही.

सायलेंट रिसॉर्ट पुणेकरांना कै-च्या-कै लांब पडेल.

सगुणाबागचे रेटसही इतर रिसॉर्ट्सच्या मानाने कमी असावेत. फक्त इथे स्विमिंग पूल मिळ्णार नाही. Happy

मल्ल्या नदि काठच्या पाय-यांच्या जवल खुपशा जागा आहेत ..
आण्णा पाउस आला तर काय नदीत उतरनार काय? :अओ:.

मयुरेश, वरच्या अकुने दिलेल्या लिंक मधील, सायलेंट व्हॅली पहा
पुण्याहुन लांब आहे वाटतं.

फक्त इथे स्विमिंग पूल मिळ्णार नाही.
ए मग अर्धी मजाच गेलि ना Sad
पाउस नसेल तर अजुनच बोर... नो पाउस, नो पुल, नो पाणी... म्हण्जे बिन पाण्याचा ववि...

स्विमिंग पूल कशाला... नदी आहे की बेस्ट... भर उन्हाळ्यातही नदीला पाणी होतं, पाण्यात म्हशीही होत्या, पावसाळ्यात तर काय प्रश्नच नाही Lol

Pages